शैव धर्माचा पुरातन काळ आपण सिंधू संस्कृतीपासून प्रत्यक्ष पुराव्यांनिशी पाहू शकतो. उत्खननांत असंख्य लिंगरुप प्रस्तरखंड आणि योनीनिदर्शक शाळुंखा सापडलेल्या आहेत. शिवाच्या योगीस्वरुप ध्यानस्थ मुद्राही असंख्य मिळाल्या आहेत. साडेपाच हजार वर्षापुर्वीही भारतात शैव धर्म आणि संस्कृतीही सर्वत्र नांदत होती...जशी आजही नांदत आहे. आपली मुळे ओळखायला आपण शिकले पाहिजे.
कालिबंगन (राजस्थान) येथे सापडलेले इसपू २६०० मधील हे शिवलिंग. हडप्पा येथेही शिवलिंग मिळालेले आहे. शिव-शक्ती यांची संयुक्त स्वरुपात पुजा सुरु झाल्याचा हा पुरातन पुरावा.
शिव हा परंपरेने जसा योगी मानला गेला आहे तसाच तो शिकारीही (किरात) आहे. हरप्पा येथील पट्टीकेत शिवाची ही दोन्ही रुपे चित्रीत केली गेली आहेत. बारकाईने पहा, शिकारी शिवाच्या हातात त्रिशुळाचे आद्य रूप आहे (दोन फाळ वरच्या दिशेऐवजी खालच्या दिशेने आहेत) पुढे हीच टोके उलट फिरवून आजचा त्रिशुळ जन्माला आला. शिवाच्या मस्तकावर मात्र आजच्या त्रिशुळासारखीच तीन टोके आहेत. दैवतशास्त्र कसे विकसीत होत जाते हे आपण शिवाच्या आद्य रुपातून पाहू शकतो.
शिवाचे दुसरे महत्वाचे नामाभिमान म्हणजे पशुपती. सिंधु संस्क्रुतीच्या उत्खननात योगी आणि पशुंचा अधिपती या स्वरुपातील असंख्य मुद्रा मिळाल्या आहेत. नेपाळमधील जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिरास कोण विसरेल? पाशुपत संप्रदाय हा शैव धर्मातील पुरातन संप्रदाय मानला जातो. आताचा वीरशैव (लिंगायत) संप्रदाय पाशुमत मतावरच आधारीत आहे. पाशुपत मतातही जातीव्यवस्था व वर्णव्यवस्थेला स्थान नाही. भेदातीत जाण्याचे सामर्थ्य फक्त शैवांत होते व आजही आहे आणि हाच खरा हिंदू धर्म आहे. वैदिक व्यवस्थेला बळी पडुन विषमतेच्या भिषण अरण्यात भटकून जावू नये!
आदिशक्तीचे हे पुरातन रूप.
सिंधू संस्कृती नष्ट झाली असे दावे केले जातात ते धादांत खोटे आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यावेळी जशा नौका व बैलगाड्या वापरल्या जात होत्या तशाच्या तशा आजही सिंध प्रांतात वापरल्या जातात.
कोनतीही संस्कृती नष्ट होत नसते तर तिचा प्रवाह वाहता असतो. शैव परंपरा आजही सर्वत्र जपल्या जातात. मुर्तीपूजा ही सर्वस्वी शैव आहे. विष्णू या मुर्तीपूजक संस्कृतीत उत्तरकालात...दुस-या शतकानंतर अवतरला. विष्णु या शब्दाचा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दिलेला अर्थ आहे "विस्तारित होणारे लिंग." विष्णुच्या याच शिपिविष्ट रुपामुळे ऋग्वेदात त्याला स्थान अत्यल्प स्थान मिलाले असे तर्कतेर्थ म्हणतात. परंतु वैदिक विष्णु हा इंद्राचा दुय्यम सहाय्यक आहे. त्याची पत्नी लक्ष्मी नाही. तो सागरशयनीही नाही. त्यामुळे अवैदिकांचा विष्णु आणि वेदांतील विष्णुत केवळ नामसाधर्म्यामुळे एकत्रीकरण केले गेले हे उघड आहे. तसाच प्रकार रुद्र व शिवात साधर्म्य करत अवैदिक देवतांचे अपहरण करण्याचे प्रयत्न केले गेलेत. प्रत्यक्षात वैदिक रुद्र व शिवात कसलेही साधर्म्य नाही. रुद्र या शब्दाचा अर्थच रडणे असा होतो. रुद्र म्हणजे अग्नी अथवा वादळ असाही एक अर्थ आहे. शिवलिंगावर शतरुद्र वा लघुरुद्र घालणारे चुकीचे आहेत.
एके कळी शैव ब्राह्मण व वैदिक ब्राह्मण अशी सुस्पष्ट सीमारेखा होती. उदा. रावण ब्राह्मण असला तरी तो शैव ब्राह्मण होता. आदि शंकराचार्यही शैव ब्राह्मण होते. त्यामुळे अवैदिक देवतांवर त्यांनी नितांतसुंदर स्तोत्रे लिहिली यात काहीच नवल नाही. परंतू ही सीमारेखा नंतर धुसर होत पुर्ण पुसली गेली. कालौघात सर्वच ब्राह्मण वैदिकाश्रयी झाले. त्यामुळे त्यांना वैदिक धर्मीय म्हनण्यास प्रत्यवाय नाही. त्यांचा धर्म व कर्मकांड सर्वस्वी वेगळे आहे जे वैदिकांपुरतेच सीमित आहे. मुर्तीपूजा करुन ते द्वैधर्मीपण दर्शवतात जे त्यांच्याही दृष्टीने चुकीचे आहे. पण ती त्यांची धार्मिक समस्या आहे. ती त्यांनी कशी दूर करावी ते ठरवावे.
Pls read this also:
http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_4205.html






