Friday, February 22, 2013

शैव संस्कृतीची पुरातनता!


शैव धर्माचा पुरातन काळ आपण सिंधू संस्कृतीपासून प्रत्यक्ष पुराव्यांनिशी पाहू शकतो. उत्खननांत असंख्य लिंगरुप प्रस्तरखंड आणि योनीनिदर्शक शाळुंखा सापडलेल्या आहेत. शिवाच्या योगीस्वरुप ध्यानस्थ मुद्राही असंख्य मिळाल्या आहेत. साडेपाच हजार वर्षापुर्वीही भारतात शैव धर्म आणि संस्कृतीही सर्वत्र नांदत होती...जशी आजही नांदत आहे. आपली मुळे ओळखायला आपण शिकले पाहिजे.



कालिबंगन (राजस्थान) येथे सापडलेले इसपू २६०० मधील हे शिवलिंग. हडप्पा येथेही शिवलिंग मिळालेले आहे. शिव-शक्ती यांची संयुक्त स्वरुपात पुजा सुरु झाल्याचा हा पुरातन पुरावा.


शिव हा परंपरेने जसा योगी मानला गेला आहे तसाच तो शिकारीही (किरात) आहे. हरप्पा येथील पट्टीकेत शिवाची ही दोन्ही रुपे चित्रीत केली गेली आहेत. बारकाईने पहा, शिकारी शिवाच्या हातात त्रिशुळाचे आद्य रूप आहे (दोन फाळ वरच्या दिशेऐवजी खालच्या दिशेने आहेत) पुढे हीच टोके उलट फिरवून आजचा त्रिशुळ जन्माला आला. शिवाच्या मस्तकावर मात्र आजच्या त्रिशुळासारखीच तीन टोके आहेत. दैवतशास्त्र कसे विकसीत होत जाते हे आपण शिवाच्या आद्य रुपातून पाहू शकतो.


शिवाचे दुसरे महत्वाचे नामाभिमान म्हणजे पशुपती. सिंधु संस्क्रुतीच्या उत्खननात योगी आणि पशुंचा अधिपती या स्वरुपातील असंख्य मुद्रा मिळाल्या आहेत. नेपाळमधील जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिरास कोण विसरेल? पाशुपत संप्रदाय हा शैव धर्मातील पुरातन संप्रदाय मानला जातो. आताचा वीरशैव (लिंगायत) संप्रदाय पाशुमत मतावरच आधारीत आहे. पाशुपत मतातही जातीव्यवस्था व वर्णव्यवस्थेला स्थान नाही. भेदातीत जाण्याचे सामर्थ्य फक्त शैवांत होते व आजही आहे आणि हाच खरा हिंदू धर्म आहे. वैदिक व्यवस्थेला बळी पडुन विषमतेच्या भिषण अरण्यात भटकून जावू नये!



आदिशक्तीचे हे पुरातन रूप.




सिंधू संस्कृती नष्ट झाली असे दावे केले जातात ते धादांत खोटे आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यावेळी जशा नौका व बैलगाड्या वापरल्या जात होत्या तशाच्या तशा आजही सिंध प्रांतात वापरल्या जातात.






 कोनतीही संस्कृती नष्ट होत नसते तर तिचा प्रवाह वाहता असतो. शैव परंपरा आजही सर्वत्र जपल्या जातात. मुर्तीपूजा ही सर्वस्वी शैव आहे. विष्णू या मुर्तीपूजक संस्कृतीत उत्तरकालात...दुस-या शतकानंतर अवतरला. विष्णु या शब्दाचा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दिलेला अर्थ आहे "विस्तारित होणारे लिंग." विष्णुच्या याच शिपिविष्ट रुपामुळे ऋग्वेदात त्याला स्थान अत्यल्प स्थान मिलाले असे तर्कतेर्थ म्हणतात. परंतु वैदिक विष्णु हा इंद्राचा दुय्यम सहाय्यक आहे. त्याची पत्नी लक्ष्मी नाही. तो सागरशयनीही नाही. त्यामुळे अवैदिकांचा विष्णु आणि वेदांतील विष्णुत केवळ नामसाधर्म्यामुळे  एकत्रीकरण केले गेले हे उघड आहे. तसाच प्रकार रुद्र व शिवात साधर्म्य करत अवैदिक देवतांचे अपहरण करण्याचे प्रयत्न केले गेलेत. प्रत्यक्षात वैदिक रुद्र व शिवात कसलेही साधर्म्य नाही. रुद्र या शब्दाचा अर्थच रडणे असा होतो. रुद्र म्हणजे अग्नी अथवा वादळ असाही एक अर्थ आहे. शिवलिंगावर शतरुद्र वा लघुरुद्र घालणारे चुकीचे आहेत.

एके कळी शैव ब्राह्मण व वैदिक ब्राह्मण अशी सुस्पष्ट सीमारेखा होती. उदा. रावण ब्राह्मण असला तरी तो शैव ब्राह्मण होता. आदि शंकराचार्यही शैव ब्राह्मण होते. त्यामुळे अवैदिक देवतांवर त्यांनी नितांतसुंदर स्तोत्रे लिहिली यात काहीच नवल नाही. परंतू ही सीमारेखा नंतर धुसर होत पुर्ण पुसली गेली. कालौघात सर्वच ब्राह्मण वैदिकाश्रयी झाले. त्यामुळे त्यांना वैदिक धर्मीय म्हनण्यास प्रत्यवाय नाही. त्यांचा धर्म व कर्मकांड सर्वस्वी वेगळे आहे जे वैदिकांपुरतेच सीमित आहे. मुर्तीपूजा करुन ते द्वैधर्मीपण दर्शवतात जे त्यांच्याही दृष्टीने चुकीचे आहे. पण ती त्यांची धार्मिक समस्या आहे. ती त्यांनी कशी दूर करावी ते ठरवावे.

Pls read this also:

http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_4205.html


16 comments:

  1. भाऊ, उपलब्ध अशा सबळ पुराव्यांवर आधारीत असलेले आपले संशोधन धुडकावून लावणे आता जवळपास अशक्यचं आहे. भारतात किंवा जेथे जेथे सिंधू संस्कृती व त्या संस्कृतीचे लोक पोहोचले होते तेथे तेथे बव्हंशी शिवमंदिरेच कशी आहेत या प्रश्नाचेही उत्तर यातून मिळते.

    ReplyDelete
  2. रुद्रावतार म्हणजे क्रोधीत झालेला असा एक अर्थ आहे, याचा अर्थ रुद्र म्हणजे क्रोध असाही असेल ना ? पण तुम्ही जे काही विवॆचन शिवाबाबत केले आहे ते तार्किकतेच्या आधारावर पटण्यासारखे आहे. पण शेवटी एक प्रश्न राहतोच कि आम्ही मूळ कोण ? आणि आम्ही प्रत्येक वेळेस स्वतःला असे कोणत्याही धर्माच्या वळचणीला का बांधून घ्यायचे ? तसेही सर्व धर्माचे विक्रते धर्म विकण्यासाठी दुकान थाटून बसलेले आहेतच आता प्रश्न हा आहे कि आम्ही कोणता धर्म विकत घेऊ ? शेवटी काय कि जो स्वस्त मिळतो तोच आमचा धर्म. शेवटी धर्म म्हणून जे काही चालले आहे ते खरे तर त्या (पाच कि सात लक्षात नाही आता) आंधळ्या आणि एक हत्तीसारखे आहे.शेवटी ज्याला जसा भावाला त्याने तसा समजायचं. गरिबाला धर्म म्हणजे जगण्यासाठी लागणारा एक मार्ग असतो तर श्रीमंतांना तो प्रतिष्ठा मिळवण्याचा मार्ग असतो. शेवटी काय जसा भाव तसा देव आन जसा देव तसा धर्म. असो...छान वाटले वेगळे काहीतरी वाचुन.....

    ReplyDelete
    Replies

    1. नितीनजी, तुम्ही म्हणत: ते तत्वत: मलाही मान्य आहे, परंतू विषमतेच्या आगीत होरपळणा-यांना त्यांची पाळेमुळे दाखवून देणे आवश्यक वाटते म्हणुन हा प्रपंच. असो. रुद्र या शब्दाचे कालौघात अनेक अर्थ बदलले अथवा दिले गेले. वैदिक भाषेतील अनेक शब्द आज विरुद्धार्थांनीही प्रचलित आहेत...उसा. असूर...म्हणजे नीतिमान, वीर्यवान वगैरे. आज आपण हच शब्द कोणत्या अर्थाने वापरतो हे आपल्याला माहित आहेच! आवरुजुन प्रतिक्रिया दिलीत...धन्यवाद!

      Delete
  3. आप्पा- अहो लवकर या हो जरा बाप्पा ,ही पिशवी धरा पटकन ! हाताला रग लागलीय नुसती -आधी ही हवा अशी विचित्र .!
    बाप्पा- काय झालय काय असे ?. मोबाईल वाजतोय तुमचा .
    आप्पा - अहो तेच तर ,नातवाला नेटवर बसवलं होत , त्याचा कॉल आलाय - धड कळेना.त्याचे इंग्लिश मिडीयम -
    नुसताच सांगतोय ,शेव का शिव का शिव्या काहीच सांगायला जमत नाहिये.पण मी ओळखल !
    त्याला विचारलं कि संजय सरांचा ब्लोग ओपन केलेला दिसतोय . पठ्ठा हो म्हणाला - या छोट्यालापण त्यांची आवड लागली वाटते !
    म्हटलं चांगली गोष्ट आहे . वाच वाच - छान संस्कार होतील ! तू खातो ती शेव ,मी खातो त्या शिव्या आणि आपण नमस्कार करतो तो शिव असे सांगितल्यावर पटले त्याला .
    बाप्पा - आप्पा , तुम्ही खाता त्या शिव्या - हे काही खरे नाही - बर का - उगीच आपल !
    आप्पा - अहो मोबाईलवरूनच विचारतोय तो की टी .व्हि.वर सिनेमा लागलाय संतोषी माता ! तर त्याला हवय की ती कोणत्या गटात येते आपल्या शैव का त्यांच्या वैष्णव गटात !
    बाप्पा - म्हणजे ?. त्याला म्हणाव एकतर नेटवर बस किंवा सिनेमा बघ !आणि ती संतोषीमाता आहे सिनेमावाल्यांची - आपली नाही आणि त्यांचीही नाही . प्युअर फिल्मी आहे !

    आप्पा - अहो,तेच तर ना !संजयजींचे वाचून झालय आणि आता सिनेमा लागलाय ,तर तो बघावा कि न बघावा असं चाललंय . फार सिन्सियर आहे हो आमचा नातु.
    कारण ते म्हणतात कि वैदिक म्हणजे वैष्णव - ते हिंदू नाहीत ! आणि हिंदू म्हणजे शैव ! गोंधळतो हो बिचारा !
    बाप्पा - फारच हळवा दिसतोय - काय नाव तुमच्या नातवाचे ?
    आप्पा - विष्णू - पण आम्ही त्याला लाडाने "महादेवा "असे म्हणतो !- सोमवारी झाला आहे न का ?

    ReplyDelete
  4. अहो सगळ्याची उत्तरे कशी तयार ठेवावी लागतात. आता बघा - आमचा नातू विचारेल बघा - मागच्या महिन्यात संत तुकाराम पाहिला झी वर - मग ते तर " आम्ही वैकुंठवासी " असे म्हणत होते - मग ते हिंदू नाहीत का ?- मागच्या गणपतीत ज्ञानेश्वर भिंत चालवतात असा सीन होता आपल्या गणपती मंडळात - तर मग मुळात ज्ञानेश्वर हिंदू नाहीत का काय ? अहो हि मुले काहीही विचारतात - घाबरत नाहीत !
    आपण कसे जुने जपणारे - त्यात आनंद शोधणारे - आपल्याला सगळ्या आरत्या सारख्याच ! शेवटी खिरापत आणि प्रसाद महत्वाचा ! मग ती लवथवती विक्राळा असो वा दुर्गे दुर्गट भारी असो .
    बाप्पा - म्हणजे तिरुपतीचा बालाजी ? तो पण हिंदू नाही ?. आपला गोकुळचा माखन चोर, आणि पंढरपुराचा निळा लावण्याचा पुतळा हिंदू नाही ? ज्ञानोबांनी इतक्या आर्त विरहीण्या गायल्या त्या कुणासाठी ?आता असो द्यावी दया तुमच्या लागतसे पाया - रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला - ते तुकाराम महाराज हिंदूच नाहीत ?
    आप्पा - उगी उगी ! तुम्ही इतके रडवेले होऊ नका ! संजयजी मार्ग काढतील -तुमचा देव्हारा रिकामा रहाणार नाही .
    बाप्पा - तेही खरच आहे म्हणा ! शेवटी शरण जाणे महत्वाचे ! मग तो देव शिव् कांचीचा असो वा विष्णु कांचीचा ! आजच्या काळात देव कोणता का असेना - तो पावणारा असला म्हणजे झाले !
    आप्पा - म्हणजे नवीन पाण्याची लाईन भा. ज़.प.च्या नगरसेवकाने दिली काय वा कॉंग्रेसच्या - अशा भाषेतच बोलताय की तुम्ही राव ! मग तुम्हाला शिवापुरचा दर्गा आणि बनेश्वर सारखाच कि काय ?
    बाप्पा - नाहो , तुम्हीच सांगा , आधीच जगणे इतके मुश्किल झालय त्यात आणि हा शैव वैष्णव गोंधळ ! आणि प्लीज तो पाण्याचा विषय नको हो -हृदयाला पीळ पडतो
    आप्पा - खरच , असं झालय कि काल मी रांगेत अर्धा तास उभे राहून शनि- मारुतीला तेल आणि रुइची माळ घातली तो गुन्हा झाला कि काय ? रामच हिंदू नसेल तर मारुती नक्कीच नाही ! आता काय कराव ?
    सोमवार सोडून मग इतर वारानां देवच नाही कि हो आपल्याला बाप्पा ! सगळच मुसळ केरात ! गुरुवाराच काय ? दत्ताच काय ? ५० -५० का ? अर्धा वैष्णव आणि अर्धा शैव ?
    बाप्पा - आपण संजय सराना लिस्ट जाहीर करायला सांगुया की ! हे बघा आप्पा, एक मात्र काळ्या दगडावरची रेघ - बर का - आपला धर्म बुडता कामा नये ! फट म्हणता ब्रह्महत्या नको !- अहो आमची एक आत्या होती तिला घेऊन आम्ही एकदा रामेश्वराला गेलो होतो.
    मध्ये मदुराइला तिच्या हातून काशीची आणलेली गंगेची बाटली -फुटली मग काय विचारता -
    दिसली गाय की धावत जायची - शेपटी डोळ्याला लावायला - हैराण झालो आम्ही - मध्येच नाहीशी -होयची -
    गायीच्या मागे धावताना . गंगा वाहायची होती रामेश्वरास ते हुकले - म्हणजे पाप झाले -त्याची आठवण दिलीत बर का तुम्ही !
    आप्पा - खर आहे . बाटल्या काय म्हणाल तितक्या मिळतात पण आत गंगा असेल असे नाही . धन्य आहे तुमची आत्या क़ाय करते ती ?
    बाप्पा - तेच तर . ती जाउन १२ वर्षे झाली - पण ती गेली कुठे ? शिवलोकास का वैकुंठास - त्या परमेश्वरालाच माहित. कारण ती सगळच करायची ! चातुर्मास ,प्रदोष,एकादशी ,संकष्टी ,सगळे स्वामी ,
    त्यांच्या जयंत्या ,पुण्यतिथ्या ,तीच बिचारीच एकच म्हणण असे - जिथे हात जोडावेसे वाटतात तिथे हात जोडावेत ,भेदाभेद करू नये. आपल्या हृदयात हा मायेचा- प्रेमाचा -माणुसकीचा झरा वाहातोय तो मरेपर्यंत तसाच वाहू दे । हात हलत आहेत तो पर्यंत सर्वाना हव नको विचारलं पाहिजे- जे झेपेल ते करायचं !
    आप्पा - खरच रे बाप्पा , देव असो वा नसो - अशी देवमाणस मात्र उदंड झाली पाहिजेत - आज त्याचीच गरज आहे !मग ती शैव असोत वा वैष्णव - गाणपत्य असोत वा शाक्त्य !
    बाप्पा - आपली हि सगळी बडबड संजय सराना आवडेल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा-बाप्पा, देव तर चराचरात आहे. तुमच्यात आहे. सर्वांत आहे. तत्वज्ञानाच्या पातळीवर संतांनाबी हे मान्यच..पण व्यवहारात मात्र तसे काही नसते. ज्ञानोबारायही तत्वज्ञातात सारे समान म्हणतात पण व्यवहारत चातुर्वर्ण्याचा आग्रह धरतात. आपला धर्म कोणता हा गोंधळ आहे खरा. पण किमान भेद साधा आहे तो हा कि मुर्तीपुजा मान्य असनारा धर्म, तो मी शैव नव्हे तर शैवप्रधान म्हणतो तो वेगळा आणि चातुर्वर्ण्य माननारा, वैदिक/वेदोक्त संस्कारांचा अधिकार असना-यांचा वैदिक धर्म वेगळा. त्यांचे देव वेगळे (तुम्ही चुकुनही इंद्र-वरुणाचे नांव घेतले नाही म्हणजे तुम्ही वैदिक नसावेत असा अंदाज करायला पुरता वाव आहे.) त्यांचे कर्मकांड वेगळे, धर्म-संस्कार वेगळे...आता येथेच थांबतो. पुढील अजून बरेच लिहायचेय....तुमच्या संवादाला वाचायचेय...

      Delete
  5. Sonavani sir tumhi ithe je lihile aahhe tyachyashi mi purnapane sahamat naahi...pan maazi kahi tika karayachi icchahi naahi...karan tyaamadhhye kaahi anshi tathya asanyachi shakyataa ahe.

    Mala asha motthya vadaat padayala avadat naahi.
    Maza mul mudda bajula padel mhanun.

    Sar, mi tumhala kaahi divasa purvi email lihile hote...alchemy ani natha sampraday ya baddal.
    tumachya te vachanyaat aale ka?

    sar, jar tumhala vel milala tar tya sambandhi uttar pathava.

    kalave

    neeraj

    ReplyDelete
    Replies
    1. नीरज, मी तुमच्या असहमतीचा आदर करतो. तुमची किमयेबाबतच्या मेलला उत्तर पाठवायचे विसरलो होतो, आठवण करुन दिल्याबद्दल आभार. भारतात किमया सातव्या शतकात अरबांच्या संपर्काने अवतरली. नागार्जुन पंडिताने तिचा विशेष स्वीकार केला. रसरत्नाकर या त्याच्या ग्रंथात तांबे अथवा चांदीपासुन (लोखंडापासून नव्हे) सोने कसे बनवायचे याच्या पद्धती दिल्या आहेत. नाथ संप्रदायाचा किमयेशी असलाच तर अत्यल्प संबंध आहे, पण ग्रांथिक रुपात त्यांनी किमयेचा पुरस्कार कोठेहे केलेला नाही. भारतात किमयेबद्दल विशेष आकर्षण नसले तरी कथा सरित्सागरात मात्र किमयेने सोने बनवण्याच्या अनेक कथा आलेल्या आहेत. किमयेचा (अल्केमी) वापर आधी इजिप्त अथवा चीनमद्ध्ये निर्माण होऊन अरबांनी तिचा स्वीकार केला असे इतिहासावरुन दिसते. युरोपातही याचा खूप प्रसार झाला होता व असंख्य लबाड्याही होत होत्या.

      Delete
  6. बाप्पा - अहो इकडे या आधी आप्पा साहेब !
    आप्पा - काय आज स्वारी जोरात दिसत्ये - आम्हाला एकदम साहेब करून टाकलत !
    बाप्पा - अहो , गोष्टच तशी घडल्ये ! काय विचारा -
    आप्पा - काय ?
    बाप्पा - आता कसं ! अहो सगळी दुखः नाहीशी होणार या जगातून ! आता शैव असो वा वैष्णव ,आयुष्याचं कोडंच सुटलं म्हणाना !
    आप्पा - अहो सांगता काय ? काय झालं तरी काय ?पेन्शन बिन्शन वाढल की काय ?
    बाप्पा - नाही हो. असे उतावीळ होऊ नका. मामला गंभीर आहे पण समजण्यासारखा आहे.
    आप्पा - असे कोड्यात नका हो बोलू ! मुद्द्यावर या लवकर. धीर धरवत नाही -
    बाप्पा - झाल काय बर का - आज एक माणूस अचानक आला आपल्या अण्णा साहेबांकडे- त्याला चहुबाजूनी वेढाच पडला - बायकांचा नि पुरुषांचा .
    आप्पा - कोण होता कोण हा एवढा ?
    बाप्पा - अहो वास्तुतज्ञ आणि फेंग शुई स्पेशालीस्ट ! अगदी सगळ्याची उत्तरे होती त्याच्याकडे ! प्रत्येकाची घाई !
    वरच्या मजल्यावरचे भिकंभटजी तर सगळ्याना ढकलून सर्वात पुढे ! त्यांच्या मुलीचा फोटो दाखवत - दुसरी ती आपली मागची प्रधानीण आणि त्यांची मावशी गुप्तीण -
    झालच तर ते नाडगौडा -वरचे शिंदे नि पानसरे ! सगळ्यांची एकच गर्दी . शैव काय नि वैष्णव काय - सगळे कानात प्राण आणून ऐकत होते. तो सांगत होता - हे ऐकत होते !-
    आग्नेयेला ग्यास शेगडी हलवा नि बघा ,काय चमत्कार होतो तो- अहो प्रधान वहिनी, पूर्वेला डोके करून झोपा - महिन्याने स्वतः सांगत याल !ठरलं म्हणून , भिकं भटजी , अहो , उत्तरेला बांबूचे बोन्साय लावा अन पत्रिका छापायला टाका - काय -
    आप्पा - अहो सांगताय काय - हा भिकंभट पत्रिका जुळवण्याचे वाजवून ५० रु. घेतो ! तो पण यात अडकला की काय ?
    बाप्पा - त्या अण्णाकडे कुत्र सुद्धा फिरकत नाही , पण आज "फेंग शुई "म्हणताच हाउस फुल ! अहो , जात नाही,पात नाही ,अगदी सर्वधर्म समभाव,
    ती कांबळीण भुजबळीणीच्या मांडीला मांडी लावून आणि ती राऊतांची सुमन,भिडे वहिनींच्या खांद्याला खांदा लाऊन गप्पा छाटत होत्या !
    हि जादू कशामुळे विचारा - भविष्य आणि वास्तुशास्त्र ! कमाल झाली न ?
    आप्पा - साम टीव्ही लावा नाहीतर स्टार - सगळीकडे हेच ! अहो आपले संजयसर घसा कोरडा करून विनवीत आहेत , सांगत आहेत पण - हाय रे दैवा ! लोकाना दैव फार प्यारे !
    बाप्पा - एका बिल्डींग मध्ये हा प्रकार तर सर्व भारतभर काय असेल ? सकाळी प्रत्येक वाहिनीवर एकेक साधू वा साध्वी मस्त मेकप करून पब्लिकला येड करत असतात ते पाहिलं की असं वाटत
    आप्पा - कि याना नांगराला जुंपावे - बरोबर ना ?
    बाप्पा - अगदी मनातलं बोललात. सगळे साजूक तूप खाउन गरगरीत- त्या देवाला जर कळल ना यांच्या या नौतंक्या तर तो पण -
    आप्पा - बास हो बाप्पा ,किती दिवस स्वतःची फसवणूक करत बसणार आहात ? का धाडस होत नाही जगाला ओरडून सांगायचं कि जगात देव नावाचं काहीच नाहिये. !भविष्य , उत्तर -दक्षिण -
    मला सांगा मी उत्तर ध्रुवावर पोचलो चालत चालत तर मी उत्तरेला तोंड कसे करायचे ? मग इशान्य तरी कुठे असणार नि ईश्वर !
    बाप्पा - शांत व्हा ! आप्पा शांत व्हा !
    आप्पा - किती दिवस समाज शहाणा होईल म्हणून वाट बघणार आहात. अहो तो तर अजूनच वेडेपणा करत चालला आहे !कधीतरी त्याला सांगण भागच आहे कि देव वगैरे काहीही नसत -
    बाप्पा - थांबा आप्पा - ते काम आपण संजय सराना सांगू या !
    कराल न सर ? आमचा आप्पा म्हणतोय इतकं पोटतिडकीने - सांगा न सर काहीतरी चार शब्द -!

    ReplyDelete
  7. sar kimayagiri he pseudoscience ani science yanchya border varache science aahe.

    Jyala proto-science mhanata yeil ase.

    Jya madhye baryach khotya goshti asalya tari sagale kahi khote aselach ase naahi.

    Ani scienntist na jar kahi fundamental karayache asel...tar assha proto-sciences kade seriously baghave lagate.

    Mi ithe kimayagari fakta sone tayar karayachi labadi ya drushtikonatun baghat naahi.

    For example Newton, Robert Boyle..Starky..hyasarakhe sceintist alchemy kade serious science mahanun baghat hote.

    http://www.pbs.org/wgbh/nova/physics/newton-alchemy.html

    Mi tasech bharatatali protoscience chi mule shodhanyacha prayatna karat aahe.

    Hyatun navin shastra nirman hou shakate.

    Jase ki japani lokani tyanche traditional knowledge vaparun surgical tools tayar kele, ceramic electronics tayar kela, earthquake proof buildings tayar kelya, robotics madhye bahulyanchya khela pasun prerana ghetali etc.

    Mala bharati alchemy sandarbhat ke pustak milale aahe
    The Alchemical Body: Siddha Traditions in Medieval India
    pan te apure aahe.

    Apalyakade apan samajato ki madhya ygin kalaat vidnyan navhatech....
    te chukiche mat asanyachi shakyata aahe...

    ekhadya goshti baddal vicharach kela naahi tar purave kase gola karnaar...
    ti gat zaleli aahe.

    Jar ajunahi kuni jaaun mathat vagaire shodhale tar alchemy chya manuscript sapadanyachi shakyata aahe ase vatate.

    Hyatun nanotechnology la vagaire madat hou shakate...


    kinva farashi madat zali jari naahi...tari he nakkich kalu shakate...ki madhya yugin bharatiy kahi pramanat tari vidnyanacha paath purava karat hote...


    ReplyDelete
  8. अरे रे ,
    काय हे दिवस आले आहेत. सोने करायची इतकी हौस कशाला ?
    मी तर ऐकले होते कि ज्ञानेश्वरीत सुद्धा सोने करायची विद्या गुप्त रुपात दिलेली आहे. .
    मध्ययुगात आपण कोण होतो यापेक्षा आज आपण कोण आहोत आणि आपला दृष्टीकोन वैज्ञानिक आहे का अंधश्रद्धाळू आहे ते महत्वाचे - नाही का ?
    आपले मुख्यमंत्री मुलाखती देत होते कि गणपती दुध पीत आहे !.
    श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी -!

    ReplyDelete
  9. सर,
    आपण असे क्षणभर विचार करू या की पूर्वी लोक नदीचे पाणी ,विहिरीचे पाणी प्यायला वापरत असत,आता नळातून पाणी पुरवठा होतो.
    पूर्वी प्रेत दहन गवऱ्या लाकडे यावर होत असे आता विजेचा वापर होतो.
    पूर्वी धोतर होते आता प्यांट ,पूर्वी नऊ वारी आता ५ वारी आणि कुरता ,
    पूर्वी औक्षण करून वाढदिवस केला जाई आता केक कापून साजरा होतो .
    पूर्वी शाळेमध्ये सर्वांचे केस चमन असायचे आता नसतात.
    केशवपन,सती असे असंख्य प्रकार आता कालाच्या पडद्या आड गेले आहेत.
    असे असंख्य प्रकार सांगता येतिल.
    अंगणात तुळशी वृंदावन असावे का बेलाचे झाड का सब्जाचे हा वादाचा मुद्दा नसून ,खरा मुद्दा आजचा काळ आणि त्याची मागणी काय आहे ?
    आज गोमांस खाल्ले म्हणून घटनेने कुणासही फाशी देता येणार नाही .त्यात गैरही काही नाही- कधीच नव्हते.पेशव्याञ्च्य किंवा शिवाजीच्या काळात सुद्धा गोहत्या पुण्यात होत होती
    . पूर्वीही वेदकाळी ब्राह्मण गोमांस भक्षण करत असतच ! यज्ञ मुख्यत्वे त्याच्यासाठीच असत.

    शैव आणि वैष्णव हे दोन्हीही कालबाह्य झालेले मुद्दे आहेत असे आपण का नाही मांडत ?

    पूर्वीची शंकर-मदन कथा प्रसिद्धच आहे ,पार्वती सती कथा सर्वांनाच माहित आहे. गुरुचरित्रात तर भस्म महिमा आणि स्फटिक लिंग याविषयीच्या कथा वाचताना हसू येते.
    शिवाचे सैन्य आणि त्या महाशिवरात्रीचा महिमा वाचून हसू येते.गणपती जन्म आणि शंकराच्या भोळेपणाच्या अनंत कथा केवळ विनोदी म्हणता येतील .
    तीच गोष्ट वैष्णव पंथाची !दौपदीची थाळी,सुदामा,भक्त प्रल्हाद, आणि असंख्य !
    कुणीही कमी नाही नि जास्त नाही.
    कुणीही कुणाच्याही मागे लागलेले नाही कि वेदप्रामाण्य मान्य करा नाहीतर तुम्हाला अमुक प्रवेश बंद किंवा तमुक अधिकार बंद !
    महालक्ष्मी अम्बाबाईच्या देवळातील लाडू प्रसाद वाटपाबाबत जो प्रकार झाला त्यात तसे स्त्रियांना करू न देण्यात ( विटाळ ) कुणाचा पुढाकार होता ?
    अजूनही बडवे पांडुरंगाला कसे वेठीला धरून ठेवू शकतात ?
    आपल्याला शैव असो किंवा वैष्णव , किमान सामाजिक स्वच्छतेची आणि आरोग्याची अजूनही जाणीव नाही .
    मुळात ब्राह्मण आणि ब्रह्मज्ञान याची कुणावरही सक्ती नाही . रोजच्या जगण्याशी त्याचा कणमात्र संबंध राहिलेला नाही.
    मुसलमान मौलवी सारखे ब्राह्मण वर्ग कुणालाही धर्मबाह्य करू शकत नाही .
    मग अडचण कसली आहे ?
    बरेचसे ब्राह्मण खाणे पिणे वगैरे बाबतीत सैल वर्तन करत असताना दिसते. शेंडी ठेवणारे भटजी आणि ब्राह्मण जात याबद्दल कुणाच्या मनात गोंधळ आहे का ?
    असंख्य विदेशी स्थायिक हिंदू आज गोमास नित्य नेमाने भक्षण करतात - त्यात काहीच गैर नाही .
    आज आपल्याकडील पातंजली योग आणि शरीर निकोप ठेवण्यासाठी त्याचा वापर असा फार तर अभ्यास करता येइल. पण देव आणि त्याबरोबर येणारे असंख्य गैर प्रकार याबद्दल जर जपूनच विचार केला पाहिजे. उलट या सर्वापासून जनतेला निरीश्वर्वादाबाद्दलाही सांगणे आपले कर्तव्य ठरते असे आपल्याला नाही का वाटत ?

    ReplyDelete
  10. सर,
    आपण असे क्षणभर विचार करू या की पूर्वी लोक नदीचे पाणी ,विहिरीचे पाणी प्यायला वापरत असत,आता नळातून पाणी पुरवठा होतो.
    पूर्वी प्रेत दहन गवऱ्या लाकडे यावर होत असे आता विजेचा वापर होतो.
    पूर्वी धोतर होते आता प्यांट ,पूर्वी नऊ वारी आता ५ वारी आणि कुरता ,
    पूर्वी औक्षण करून वाढदिवस केला जाई आता केक कापून साजरा होतो .
    पूर्वी शाळेमध्ये सर्वांचे केस चमन असायचे आता नसतात.
    केशवपन,सती असे असंख्य प्रकार आता कालाच्या पडद्या आड गेले आहेत.
    असे असंख्य प्रकार सांगता येतिल.
    अंगणात तुळशी वृंदावन असावे का बेलाचे झाड का सब्जाचे हा वादाचा मुद्दा नसून ,खरा मुद्दा आजचा काळ आणि त्याची मागणी काय आहे ?
    आज गोमांस खाल्ले म्हणून घटनेने कुणासही फाशी देता येणार नाही .त्यात गैरही काही नाही- कधीच नव्हते.पेशव्याञ्च्य किंवा शिवाजीच्या काळात सुद्धा गोहत्या पुण्यात होत होती
    . पूर्वीही वेदकाळी ब्राह्मण गोमांस भक्षण करत असतच ! यज्ञ मुख्यत्वे त्याच्यासाठीच असत.

    शैव आणि वैष्णव हे दोन्हीही कालबाह्य झालेले मुद्दे आहेत असे आपण का नाही मांडत ?

    पूर्वीची शंकर-मदन कथा प्रसिद्धच आहे ,पार्वती सती कथा सर्वांनाच माहित आहे. गुरुचरित्रात तर भस्म महिमा आणि स्फटिक लिंग याविषयीच्या कथा वाचताना हसू येते.
    शिवाचे सैन्य आणि त्या महाशिवरात्रीचा महिमा वाचून हसू येते.गणपती जन्म आणि शंकराच्या भोळेपणाच्या अनंत कथा केवळ विनोदी म्हणता येतील .
    तीच गोष्ट वैष्णव पंथाची !दौपदीची थाळी,सुदामा,भक्त प्रल्हाद, आणि असंख्य !
    कुणीही कमी नाही नि जास्त नाही.
    कुणीही कुणाच्याही मागे लागलेले नाही कि वेदप्रामाण्य मान्य करा नाहीतर तुम्हाला अमुक प्रवेश बंद किंवा तमुक अधिकार बंद !
    महालक्ष्मी अम्बाबाईच्या देवळातील लाडू प्रसाद वाटपाबाबत जो प्रकार झाला त्यात तसे स्त्रियांना करू न देण्यात ( विटाळ ) कुणाचा पुढाकार होता ?
    अजूनही बडवे पांडुरंगाला कसे वेठीला धरून ठेवू शकतात ?
    आपल्याला शैव असो किंवा वैष्णव , किमान सामाजिक स्वच्छतेची आणि आरोग्याची अजूनही जाणीव नाही .
    मुळात ब्राह्मण आणि ब्रह्मज्ञान याची कुणावरही सक्ती नाही . रोजच्या जगण्याशी त्याचा कणमात्र संबंध राहिलेला नाही.
    मुसलमान मौलवी सारखे ब्राह्मण वर्ग कुणालाही धर्मबाह्य करू शकत नाही .
    मग अडचण कसली आहे ?
    बरेचसे ब्राह्मण खाणे पिणे वगैरे बाबतीत सैल वर्तन करत असताना दिसते. शेंडी ठेवणारे भटजी आणि ब्राह्मण जात याबद्दल कुणाच्या मनात गोंधळ आहे का ?
    असंख्य विदेशी स्थायिक हिंदू आज गोमास नित्य नेमाने भक्षण करतात - त्यात काहीच गैर नाही .
    आज आपल्याकडील पातंजली योग आणि शरीर निकोप ठेवण्यासाठी त्याचा वापर असा फार तर अभ्यास करता येइल. पण देव आणि त्याबरोबर येणारे असंख्य गैर प्रकार याबद्दल जर जपूनच विचार केला पाहिजे. उलट या सर्वापासून जनतेला निरीश्वर्वादाबाद्दलाही सांगणे आपले कर्तव्य ठरते असे आपल्याला नाही का वाटत ?

    ReplyDelete
  11. जगातील सर्वच संघटित धर्मांमध्ये एक प्रवर्तक किंवा संस्थापक, एक सर्वोच्च ईश्वर, एक धर्मग्रंथ आणि त्यावर श्रद्धा ठेवणारे अनुयायी अशा प्रकारची रचना दिसून येते. तुम्ही ज्या शैव पंथाबद्दल मांडणी केली आहे त्यात ह्यातले कोणतेच वैशिष्ट्य आढळत नाही. त्यामुळे ह्या शैव पंथाला एक विशिष्ट प्रकारची उपासना पद्धती मानता येऊ शकेल. परंतु पारंपारिक अर्थाने वेगळा धर्म मानणे अवघड आहे. अर्थात यावर अजून संशोधन झाल्यास नवी माहिती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    दुसरा मुद्दा म्हणजे हिंदू धर्माच्या सर्वोच्च पीठाचे नावच शंकरावर बेतलेले आहे. तेव्हा शैव उपासना हा वेगळा धर्म म्हणून प्रस्थापित करणे हे कागदोपत्री शक्य असले तरी त्याला हिंदूंचे समर्थन मिळणे कठीण आहे.

    ReplyDelete
  12. हिंदू धर्माविषयी एक लेखाचा संदर्भ खाली दिलेला आहे थोडा तपासून पहा.आपण येथे हिंदू आहे कि नाही याविषयी भांडतो आहोत. आणि हिंदू सोडून बाकी सारे लोक हिंदू धर्माविषयी काय विचार करतात. बुद्धिस्ट लोक स्वतःला हिंदू पेक्षा वेगळे समजतात पण वस्तुता ते हिंदू धर्म पंथाचाच एक भाग आहे कि काय अशी शंका येते? तसेही बुद्धामाद्धेही आता पुरोहित वर्ग तयार होत आहे. जो स्वतःला इतर बुद्ध बांधवानपेक्षा वेगळा समजतो.असो ते महत्वाचे नाहीये येथे.तसेही अजूनही बरेच लोक किमान भारतात (हिंदुस्तानमध्ये) स्वतःला हिंदूच म्हणून घेतात.
    http://www.thedailybeast.com/newsweek/2009/08/14/we-are-all-hindus-now.html

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...