Monday, April 1, 2013

आम्हाला ना बुद्ध समजला ना बाबासाहेब!


  • आजच्या माझ्या लक्ष्मण माने यांच्याविषयीच्या पोस्टबद्दल (लक्ष्मन माने यांनी स्वत:च स्त्रीयांचे शोषण करावे, पदाचा दुरुपयोग करत सरंजामशाहीच्या काळात शोभेल असे वर्तन करावे , फरार होऊन कायद्याची हेटाळणी करावी...आणि आजतागायत पुरोगामित्वतेचा टेंभा मिरवावा या सर्वच बाबी लज्जास्पद, निंद्य आणि एके काळचे शोषितच आता कसे शोषक बनू शकतात याचे विदारक दर्शन घडवणा-या आहेत.

    लक्ष्मन माने यांना कोणीही राजकीय अथवा संरक्षण देता कामा नये. न्यायालयीन प्रक्रीयेत अडथळे आणु नयेत.

    लक्ष्मन माने यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे!. )

     या पोस्ट्वर  जेही लाइक्स पडले आणि येथे वा अन्यत्र ज्या प्रतिक्रिया आल्या त्या पाहता काही मुलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत ते असे...


    १. लक्ष्मण माने यांच्यावरील आरोप खोटे असून त्या पाचही स्त्रीया दोषी असून त्यांना चाबकाने मारले पाहिजे कारण त्यांनी स्वेच्छेने स्वार्थासाठी मानेंची शेज सजवली असे माझ्या परममित्राचेच विधान आहे. माझे मत असे आहे कि बाबासाहेबांनी मनूस्मृती जाळली ते अत्यंत चुकीचे कृत्य होते कारण आपलेच अनुयायी भविष्यात कधीतरी महिलांबाबत मनू बाळगतो तेवढीही यत्किंचितही आदरभावना बाळगणार नाहीत याचा अदमास आला नसावा.

    २. पाच स्त्रीया विरुद्ध एक पुरुष या पद्धतीनेही मी या सर्व घटनाक्रमाकडे व प्रतिक्रियांकडे पहात विचार केला तर सर्व प्रतिक्रियांत फक्त जातीयवाद दिसतो...म्हणजे लाइक करनारेही जातीय आहेत व विरोध करणारेही जातीय. या सर्वांत कोणीही महिलांची बाजू एखादा अपवाद वगळता घेतांना दिसत नाही...त्या खोट्याच आहेत म्हणुन त्यांना झोडायचे अथवा मानेंनी बौद्ध धर्मांतर केल्याने सुड घ्यायचा म्हणुन हा कट केला गेला असे म्हनायचे या बाबी अशासाठी निरर्थक आहेत कारण या सर्वांत त्या महिलांचीही बाजू असू शकते यावर कोणीही सविस्तर विचार करतांना दिसत नाही. स्त्री कोणत्याही जाती/वर्ण/धर्माची असो...ती मात्र स्वार्थी आणि त्यासाठी पुरुषांना मोहात पाडत असते हा तर्क संपुर्ण स्त्रीजातीचा अवमान करणारा आहे, रानटी जमातींनाही शरम आनणारा आहे याचे भान आम्हाला राहिलेले नाही हे दुर्दैव नव्हे तर काय आहे?

    ३. निवडनुका तोंडावर असतांना तर मानेंसारख्या एका सुप्रतिष्ठित जातिनिष्ठ नेत्याला अडकवण्याचा डाव रचावा एवढे ब्राह्मणही मुर्ख नाहित कि मराठेही. एक मतपेटी गमवायचा जुगार सहसा राजकीय नेते खेळत नाहीत. तरीही गुन्हे दाखल आहेत.

    ४. माने या क्षणापर्यंत तरी गायब आहेत.

    ५. हे सर्व बाजुला ठेवुयात. मानेंची काळजी अधिक का हवी? कशासाठी त्यांचे समर्थन केले जात आहे? ते भटके विमुक्त आहेत म्हणुन कि बौद्ध धर्मिय आहेत म्हणुन? त्यांनी आपल्या जातीच्या दाखल्यातच बनवेगिरी केलेली आहे. "आपल्या जातीच्या/धर्माच्या माणसाचे वाट्टेल ते करुन संरक्षण करणे..." हाच जर येथे नीतिनियम असेल तर मग या देशात कोणीही आरोपी नाही. शरद पवार अजुनही मूक असतील तर ते मुक राहून किती बोलतात याचा किमान अंदाज महाराष्ट्रीय माणसाला असायला हवा.

    ६. येथे खून करून कोर्टाचा पुरता निकाल लागेपर्यंत इस्पितळात महाराष्ट्रीय आदर्शांचे वंशज राहतात व निकाल बाजुचा लागताच रुग्णालयातून गाशा गुंडाळतात अशा अनुभवांनंतर जर मानेही सारी वारी त्याच दिशेने सज्ज करण्यासाठी सध्या तरी बेपत्ता नसतील असे मग का म्हणू नये?

    ७. या देशातील नैतिकतेचा कधीच अस्त झाला आहे. स्त्रीयांनी कधीही अत्याचार झाले तर तोंड उघडायचे नाही असा नियम बनवलाच पाहिजे. अत्याचार झाल्या झाल्या तक्रार केली तरी त्याच दोषी असतात...त्या पुरुषांना लंगिक निमंत्रण देत असतात असे तारे तोडनारे आणि पुरोगामी म्हणवनारे यांच्यात काडीएवढाही फरक नाही.त्याचाच अधिक खेद आहे. लैंगिक अत्याचाराची तक्रार देना-या महिलेलाच आधी आत घातले पाहिजे, कारण त्यांचीच तेवढी चूक असते...पुरुष बिच्चारे कधीच चूक असू शकत नाहीत...कायदा बनवायला पाहिजे.

    ८. मानेंवर आरोप झाला म्हणुन ज्यांना आनंदाच्या अधिक उकळ्या फुटल्या त्यांच्या मनोविकृततेचा तर पराकोटीचा निषेध केला पाहिजे...कारंण त्यांना मुळात प्रश्नाचे गांभिर्य तर सोडाच...पण केवळ नवबौद्धावर आरोप आहे एवढाच भाग त्यांचे स्वसमर्थन करण्यास पुरेसा वाटतो हे लाजीरवाने आहे. त्यांचीही तहकिकात केली तर तेवढेच नराधम त्यांच्यातही आहेत. आता दिवंगत असलेले महान नेते होते म्हणुन नांव घेत नाही एवढेच!

    ९. मी माझ्या आधीच्या पोस्टमद्धे जे नमूद केले होते ते पुन्हा म्हणतो कि....सरंजामशाही प्रवृत्ती संधी मिळताच सर्वभक्षी व्हायला सिद्धच असते...आणि अशा क्षणी केवळ जातीय/धर्मीय/पंथीय प्रवृतींनुसार माणसे वागणार असतील तर त्यांना माणुस कसे म्हणावे?

    वाईटाला वाईट म्हणायला कोणी अडवले आहे?

    १०. आणि शेवटचे...आपण शोषक कोण असू शकतो आणि शोषित कोण यात तारतम्य ठेवले पाहिजे. पुरातन कळापासून कुणबिनी/बटक्या ठेवणारी एक संस्क्रुती भारतात होती...रुपया-पैशांत त्यंचे लिलाव होत असत...विकत घेणारे काही नि:स्प्रुह समाजसेवक नव्हते. आजही स्त्रीयांच्या मजबुरीचा गैरफायदा घेणारे सरंजामदार अगणित आहेत. काही स्त्रीयांनी धाडस केले त्याचे कौतुक सोडुन, त्यांच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे रहायचे सोडुन आम्ही जर त्यांना जाहीरपणे चाबकाने मारावे असे म्हणत असू तर मला क्षमा करा....


    आम्हाला ना बुद्ध समजला ना बाबासाहेब!

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...