Monday, April 1, 2013

आम्हाला ना बुद्ध समजला ना बाबासाहेब!


  • आजच्या माझ्या लक्ष्मण माने यांच्याविषयीच्या पोस्टबद्दल (लक्ष्मन माने यांनी स्वत:च स्त्रीयांचे शोषण करावे, पदाचा दुरुपयोग करत सरंजामशाहीच्या काळात शोभेल असे वर्तन करावे , फरार होऊन कायद्याची हेटाळणी करावी...आणि आजतागायत पुरोगामित्वतेचा टेंभा मिरवावा या सर्वच बाबी लज्जास्पद, निंद्य आणि एके काळचे शोषितच आता कसे शोषक बनू शकतात याचे विदारक दर्शन घडवणा-या आहेत.

    लक्ष्मन माने यांना कोणीही राजकीय अथवा संरक्षण देता कामा नये. न्यायालयीन प्रक्रीयेत अडथळे आणु नयेत.

    लक्ष्मन माने यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे!. )

     या पोस्ट्वर  जेही लाइक्स पडले आणि येथे वा अन्यत्र ज्या प्रतिक्रिया आल्या त्या पाहता काही मुलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत ते असे...


    १. लक्ष्मण माने यांच्यावरील आरोप खोटे असून त्या पाचही स्त्रीया दोषी असून त्यांना चाबकाने मारले पाहिजे कारण त्यांनी स्वेच्छेने स्वार्थासाठी मानेंची शेज सजवली असे माझ्या परममित्राचेच विधान आहे. माझे मत असे आहे कि बाबासाहेबांनी मनूस्मृती जाळली ते अत्यंत चुकीचे कृत्य होते कारण आपलेच अनुयायी भविष्यात कधीतरी महिलांबाबत मनू बाळगतो तेवढीही यत्किंचितही आदरभावना बाळगणार नाहीत याचा अदमास आला नसावा.

    २. पाच स्त्रीया विरुद्ध एक पुरुष या पद्धतीनेही मी या सर्व घटनाक्रमाकडे व प्रतिक्रियांकडे पहात विचार केला तर सर्व प्रतिक्रियांत फक्त जातीयवाद दिसतो...म्हणजे लाइक करनारेही जातीय आहेत व विरोध करणारेही जातीय. या सर्वांत कोणीही महिलांची बाजू एखादा अपवाद वगळता घेतांना दिसत नाही...त्या खोट्याच आहेत म्हणुन त्यांना झोडायचे अथवा मानेंनी बौद्ध धर्मांतर केल्याने सुड घ्यायचा म्हणुन हा कट केला गेला असे म्हनायचे या बाबी अशासाठी निरर्थक आहेत कारण या सर्वांत त्या महिलांचीही बाजू असू शकते यावर कोणीही सविस्तर विचार करतांना दिसत नाही. स्त्री कोणत्याही जाती/वर्ण/धर्माची असो...ती मात्र स्वार्थी आणि त्यासाठी पुरुषांना मोहात पाडत असते हा तर्क संपुर्ण स्त्रीजातीचा अवमान करणारा आहे, रानटी जमातींनाही शरम आनणारा आहे याचे भान आम्हाला राहिलेले नाही हे दुर्दैव नव्हे तर काय आहे?

    ३. निवडनुका तोंडावर असतांना तर मानेंसारख्या एका सुप्रतिष्ठित जातिनिष्ठ नेत्याला अडकवण्याचा डाव रचावा एवढे ब्राह्मणही मुर्ख नाहित कि मराठेही. एक मतपेटी गमवायचा जुगार सहसा राजकीय नेते खेळत नाहीत. तरीही गुन्हे दाखल आहेत.

    ४. माने या क्षणापर्यंत तरी गायब आहेत.

    ५. हे सर्व बाजुला ठेवुयात. मानेंची काळजी अधिक का हवी? कशासाठी त्यांचे समर्थन केले जात आहे? ते भटके विमुक्त आहेत म्हणुन कि बौद्ध धर्मिय आहेत म्हणुन? त्यांनी आपल्या जातीच्या दाखल्यातच बनवेगिरी केलेली आहे. "आपल्या जातीच्या/धर्माच्या माणसाचे वाट्टेल ते करुन संरक्षण करणे..." हाच जर येथे नीतिनियम असेल तर मग या देशात कोणीही आरोपी नाही. शरद पवार अजुनही मूक असतील तर ते मुक राहून किती बोलतात याचा किमान अंदाज महाराष्ट्रीय माणसाला असायला हवा.

    ६. येथे खून करून कोर्टाचा पुरता निकाल लागेपर्यंत इस्पितळात महाराष्ट्रीय आदर्शांचे वंशज राहतात व निकाल बाजुचा लागताच रुग्णालयातून गाशा गुंडाळतात अशा अनुभवांनंतर जर मानेही सारी वारी त्याच दिशेने सज्ज करण्यासाठी सध्या तरी बेपत्ता नसतील असे मग का म्हणू नये?

    ७. या देशातील नैतिकतेचा कधीच अस्त झाला आहे. स्त्रीयांनी कधीही अत्याचार झाले तर तोंड उघडायचे नाही असा नियम बनवलाच पाहिजे. अत्याचार झाल्या झाल्या तक्रार केली तरी त्याच दोषी असतात...त्या पुरुषांना लंगिक निमंत्रण देत असतात असे तारे तोडनारे आणि पुरोगामी म्हणवनारे यांच्यात काडीएवढाही फरक नाही.त्याचाच अधिक खेद आहे. लैंगिक अत्याचाराची तक्रार देना-या महिलेलाच आधी आत घातले पाहिजे, कारण त्यांचीच तेवढी चूक असते...पुरुष बिच्चारे कधीच चूक असू शकत नाहीत...कायदा बनवायला पाहिजे.

    ८. मानेंवर आरोप झाला म्हणुन ज्यांना आनंदाच्या अधिक उकळ्या फुटल्या त्यांच्या मनोविकृततेचा तर पराकोटीचा निषेध केला पाहिजे...कारंण त्यांना मुळात प्रश्नाचे गांभिर्य तर सोडाच...पण केवळ नवबौद्धावर आरोप आहे एवढाच भाग त्यांचे स्वसमर्थन करण्यास पुरेसा वाटतो हे लाजीरवाने आहे. त्यांचीही तहकिकात केली तर तेवढेच नराधम त्यांच्यातही आहेत. आता दिवंगत असलेले महान नेते होते म्हणुन नांव घेत नाही एवढेच!

    ९. मी माझ्या आधीच्या पोस्टमद्धे जे नमूद केले होते ते पुन्हा म्हणतो कि....सरंजामशाही प्रवृत्ती संधी मिळताच सर्वभक्षी व्हायला सिद्धच असते...आणि अशा क्षणी केवळ जातीय/धर्मीय/पंथीय प्रवृतींनुसार माणसे वागणार असतील तर त्यांना माणुस कसे म्हणावे?

    वाईटाला वाईट म्हणायला कोणी अडवले आहे?

    १०. आणि शेवटचे...आपण शोषक कोण असू शकतो आणि शोषित कोण यात तारतम्य ठेवले पाहिजे. पुरातन कळापासून कुणबिनी/बटक्या ठेवणारी एक संस्क्रुती भारतात होती...रुपया-पैशांत त्यंचे लिलाव होत असत...विकत घेणारे काही नि:स्प्रुह समाजसेवक नव्हते. आजही स्त्रीयांच्या मजबुरीचा गैरफायदा घेणारे सरंजामदार अगणित आहेत. काही स्त्रीयांनी धाडस केले त्याचे कौतुक सोडुन, त्यांच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे रहायचे सोडुन आम्ही जर त्यांना जाहीरपणे चाबकाने मारावे असे म्हणत असू तर मला क्षमा करा....


    आम्हाला ना बुद्ध समजला ना बाबासाहेब!

21 comments:

  1. हा सर्व प्रकार राज कारणाचा भाग असावा असे सकृतदर्शनी वाटते

    हा बनाव एका व्यक्तीला सार्वजनिक जीवनातून उठवण्याचा पद्धतशीर प्रयत्न आहे. आपण सर्वांनी त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांना समजून घेतले पाहिजे.

    ते जिवाचे बरेवाइट ही करू शकतात.

    त्यांचं गात आयुष्य बघता जे सांगितले जातंय ते खरे वाटत नाहि. आपण सर्वांनी भडकपणा टाळून त्याना कायद्यासमोर येण्यासाठी उद्युक्त करू या !

    ReplyDelete
  2. HE NEEDS HELP

    AND

    PL DONOT CRITISIZE WITHOUT PROOF

    MAY BUDDHA SAVE HIM TO SERVE THE

    POOR PEOPLE OF INDIA

    ReplyDelete
  3. लक्ष्मण माने महान आहेत

    बहुजन चळवळीला खड्ड्यात घालण्याचा हा राजकारणी लोकांचा डाव आहे त्याला आपण कसे बळी पडता ?

    त्यांचे वय बघा -

    त्यांचा आवाका बघा

    टाळी एका हाताने वाजत नाही !त्यांना समजून घेणे आवश्यक आहे

    बहुजन चळवळीचा विजय असो

    बाबासाहेबांचा विजय असो !

    मनुवादी संघटनांचा निषेध असो !


    आमच्या भावना आपण मुद्दाम छापणे टाळाल म्हणून आपला कडक निषेध !

    माने सर असे असूच शकत नाहीत . त्यांचे वय- उमर बघा -

    आरोप करणारे कसे आहेत कोण आहेत ते बघा -

    बहिरी ससाणा

    ReplyDelete
  4. पोस्ट कशाबद्दल आहे त्याचे आमचे काही देणे घेणे नाही पण "आम्हाला ना बुद्ध समजला ना बाबासाहेब!" हे वाक्य इतर काहीही न अभ्यासता देखिल अचूक आहे... इतके मात्र कळले... ते कसे हे पहा...

    आम्हांस ना कळला देव, ना कळला दानव, नाहीच कळला मनुष्यजन्म, तर कसा कळणार महामानव?

    म.हा.मानव? की महा.मान.व?

    :-)

    ReplyDelete
  5. माझे मत असे आहे कि बाबासाहेबांनी मनूस्मृती जाळली ते अत्यंत चुकीचे कृत्य होते कारण आपलेच अनुयायी भविष्यात कधीतरी महिलांबाबत मनू बाळगतो तेवढीही यत्किंचितही आदरभावना बाळगणार नाहीत याचा अदमास आला नसावा. >>> महिला म्हणून आदर करणे हा वेगळा विषय आहे अन माणूस म्हणून नैतिकतेच्या कसोटीत घालून तपासणे हा वेगळा विषय आहे. महिला आहेत एवढ्या कारणासाठी माणूस म्हणून त्या बाद ठरत असल्या तरी त्याना सूट द्यावी का कुठला कायदा. प्रत्येक महिला ही माणूस आहे व माणूस म्हणून महिलेच आचरण चांगले असणे अनिवार्यच आहे. ईथे त्या पाच महिलांचे मिल्यांकन करताना माणूस ही कसोटी वापरावी, त्यात बाद ठरल्या ठरल्या महिला नावाचं कवच चढवणे तुम्हाला तरी पटतं का?
    असो.

    दुसर...
    माने फरार कुठे झालेत? अहो त्यानी जामिनीसाठी अर्ज दिला आहे. त्या अर्जवर न्यायालयाचा निर्णय येईस्तोवर ते पोलिसांपासून दूर आहेत. आता न्यायालयाला ठरवू द्या. अर्ज नाकारला तर ते पोलिसा समोर हाजर होणारच आहेत. तेवढा धीर नको का आपण धरायला???????


    ---

    एम. डी. रामटेके.

    ReplyDelete
    Replies
    1. <<>>

      ....लक्ष्मण माने हे धर्माने बौद्ध आहेत, म्हणून त्यांना कायद्यातून सूट द्यावी, हा तरी कुठला कायदा आहे? बौद्धांना नैतिकतेच्या कसोट्या लावायच्या नाहीत की काय?

      पूर्वी ब्राह्मण म्हणायचे आम्ही सर्व नीति-नियमांच्या वर आहोत, आता बौद्धांना ही सवलत हवी आहे का?

      Delete
  6. उत्तम लेख आहे.
    महाराष्ट्रापेक्षा इंडोनेशियावर अधिक माया असलेल्यांना महात्मा फुले समजले नाहीत असेच म्हणावे लागेल.

    ReplyDelete
  7. DEAR SIR

    THODISHI SAMPATTICHI/SATTECHI SATH MILALYAWAR JAR MANE SARKHE

    VIDROHI SAMAJ SUDHARAK,SHOSHAN KARU LAGLE ASATIL,TAR JYANI

    HAZARO WARSHE SATTA BHOGALI TYANI JE SHOSHAN KELE TE SUDDHA

    SATTECHYA MAJATUN. ITHE HE SIDDH HOTE KI SURWA JATIT ASHI MANASE

    ASATAT . 3.5% MADHIL SURWA LOKAN WAR TIKECHI ZOD UTHAWANARYA

    DALIT CHALWALILA ATA HE SAMJLE PAHIJE KI DOSH JATI /DHARMACHA

    NASATO TAR SATTEWAR NIYANTRAN THEWANARI WYAVASTHA NASANE HA ASATO.

    ReplyDelete
  8. आप्पा - पहिले लक्ष्मण हे नाव बदला !

    बाप्पा - दुसरे म्हणजे त्यांच्या गळ्यात जानवे अडकवा !

    आप्पा - असे वागणारे फक्त पुणेरी भट च असू शकतात !लक्ष्मणाने लक्ष्मण - रेषा ओलांडली !

    बाप्पा - लक्ष्मण चे वडील दशरथ किंवा बापू नसतील तर - कदाचित बाजीराव असतील ,

    आप्पा - ही पेशव्यांची परंपरा आहे -

    बाप्पा - नाही हो - संभाजीने पण हेच केले - बाजीरावाच्या आधी - पुणेरी मान्याना तेव्हढे मात्र मस्त जमले - आपल्याच आश्रमशाळेत जर हे चाळे तर मग इतर गोष्टी बोलायलाच नको !

    आप्पा - अहो पुण्याच्या पाण्याचा गुणच आहे तो ! म्हणून तर शिवाजीने राजधानी पुण्याला नाही केली - या पाण्याला भीत असे तो !

    बाप्पा - भल्या भल्यांना हे " म " कार गाळात घालतात -

    आप्पा - यांना बौद्ध कुणी केले - यांना बौद्ध धर्मातून हाकलून द्या !- त्यांना हिंदू करणे हीच शिक्षा - त्यात - पुणेरी ब्राह्मण असे जातीचे प्रमाणपत्र दिले जावे अशी मी सर्व भात भिक्शुकाना विनंती करतो - त्याला आपल्या घरी बोलावू नका - डेंजर आहे .!

    बाप्पा - १ ९ ४ ९ चा जन्म - आत्ता ६ ३ वर्षाचा झाला - हिरवट पानाची कमाल आहे !

    आवरत नाही हा आमचा उद्वेग !- वाईट लिहील पण चांगल्यासाठीच लिहील - !

    आप्पा - लोक म्हणतात की हि मोठ्ठी गेम आहे !

    बाप्पा - अहो बुद्ध हो - डोळे उघडा आणि सांगा - खर काय ते - मेंदू फुटायची वेळ आली आहे - अशाने या जगण्यावरचाच विश्वास उडेल हो देवा !

    आप्पा - खरच देवा आम्हाला शक्ती दे - या विशाला पचवायची -

    बाप्पा - देवा पुन्हा एकदा समुद्रमंथन करायची वेळ आली आहे !

    ReplyDelete
  9. मालुसरे चा तान्हा ,देशपांडे आणि पासलकराचा बाजी

    शेलार मामा ,असे हिडीस लक्ष्मण माने सारखे होते का ?

    शिवाजी आणि संभाजीची नावे बेलाशक घेताना आणि कुठेही जोडताना लाज कशी वाटत नाही ?

    चिमाजी आप्पा असा होता का ?- थोरले माधवराव असे होते का ?

    बाजीरावाची मस्तानी होती आणि त्यासाठी त्याने आईकडूनही वाइट पणा सहन केला पण मस्तानीची साथ सोडली नाही . तिचे वंशज थेट पानिपतात लढले !

    शिवाजी महाराजांनी असा कोणताही प्रकार केला नाही - ५ लग्ने केली तीसुद्धा सोयरिक म्हणून !

    शारीरिक गरज म्हणून नाही !- या थोर लोकांची स्वप्ने महान होती - म्हणूनच ते वंदनीय ठरतात !

    आपण कुणाची कोणाशी तुलना करतो याचे भान ठेवावे आणि छापणारे जे तद्न्य असतील त्यांनीपण अशा विचारांना प्रोत्साहन देवू नये .

    ReplyDelete
  10. संजय

    आपल्या ब्लोगवर अनेक उलटसुलट प्रतिकिया येत आहेत

    विकिपेडीयावर लक्ष्मण माने यांच्या बद्दल असे दिले जात आहे की त्यांच्या बाबतचा तपास एका खास पथकाकडे देणार आहेत

    पारधी समाज हा मागास असून त्यांनी फोर्ड फौंडेशन तर्फे त्या समाजासाठी नेमके काय काम केले ते कधीच समाजासमोर आले नाही . खरे म्हणजे ते व्यसनी होते का - आहेत का ?त्याचा त्यांच्या कर्तृत्वावर किती परिणाम झाला आहे ? याची तपासणी झाली पाहिजे .

    आपल्या वेदना आपण अतिशय मोजून मापून शब्द वापरून फेसबुक वर दिल्या आहेत .

    त्याबद्दल आपले अभिनंदन !

    माणूस हा समाजप्रिय असतो - तर तो अशा प्रकरण बळी का पडतो ?

    ज्यांना अशा शिष्यवृत्या मिळतात त्यांची तर खूप मोठी नैतिक जबाबदारी असते ! कारण त्यांच्या बद्दल समाजाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात !

    कायदा आणि झालेल्या घटनेचे योग्य विश्लेषण सर्वांसमोर येणे अतिशय आवश्यक आहे ,

    अनेक लोक , त्यात वयोमानानुसार अनेक गात येतात ,लहान मुले हल्ली वर्तमानपत्र आणि टी .व्हि. बघत असतात - त्याचा परिणाम फार खोलवर होत असतो !

    राजकारण आणि समाजकारण यात एक नवा पायंडा पडत आहे - सापडला तरच तो चोर - हि वृत्ती बरी नव्हे !अनेक आमदार खासदार गुन्हा सिद्ध होत नाही म्हणून ताठ मानेने समाजात हिंडत आहेत - हे सर्व भयानक आहे !

    ReplyDelete
  11. नाही "समजला" तरी "उमजला" का हे मात्र आपल्या लेखनातून निःसंशयरित्या कळत नाही हे खरे...

    ReplyDelete
  12. jara janachi nahi tar manachi laj balga na layak mansa babasahaeb & lord buddhacha kai sambadh jayni swatacha porivar balatkar kela tayla pujtha pratayak manus he taycha karmane kam karto tayala mahapurushashe jodu nahi apli buddhi kiti aahe he disun yate me yathe mane yanche samarthen karath nahi he important

    ReplyDelete
  13. संजय सर ,

    हळू हळू , मते बदलत आहेत

    शेवटी मुलभूत नाती हीच खरी हेच याने सिद्ध होते !

    निसर्गतःच ,स्त्रीला एक वेगळे स्थान समाजात मिळाले आहे

    त्याचा अवमान झाला तर काय होते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे .


    स्त्रीत्व हे सर्वश्रेष्ठ आहे ! - असे ठरवताना पुरुषांनी पण स्वार्थच साधला आहे का ?

    मुल प्रश्न आहे तो कोणता ?- स्त्रीचे शील का पुरुषांचा संयम ?

    इथे जात पात आणि श्रीमंत गरीब हा मुद्धाच येत नाही -

    गुन्हेगाराला शासन झालेच पाहिजे !


    यातील राजकारण काय ते ओळखणे पण समाजाला जमेल -त्यात समाजाला प्रवचने देण्याची

    गरज नाही ! आणि इतकेच श्री लक्ष्मण माने यांचे कौतुक असेल तर - ज्यांना कौतुक आहे त्यांनी

    आपल्या घराच्या पोरीबाळी गुरे दावणीला बांधतात तशा त्यांच्या दारात बांधाव्यात !होईल का असे करण्याची मनाची तयारी ?

    जेंव्हा स्वतःचे जळते तेंव्हाच कळते !

    आपल्या समाजाची घसरण किती पातळ्यांवर होणार आहे ?

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या समाजाची घसरण किती पातळ्यांवर होणार आहे ?>> उत्तर सोपे आहे. जोपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा होत नाही तोपर्यंत. वरील प्रतिक्रिया वाचा. माने एका विशिष्ठ समाजाचे आहेत त्यामुळे त्यांना गोवण्यात येते असा खूप लोकांचा समज आहे. तसाच समाज संघाच्या लोकांबद्दल आहे. तसाच समाज मुस्लिमांबद्दल आहे. सध्या ब्राह्मण लोकांना दोष देण्याची मनोवृत्ती वाढली आहे. सर्व वाईट गोष्टींचे कारण फक्त ब्राह्मण आणि ब्राह्मणच.
      आपल्या एकाही राज्यकर्त्याला शिक्षा होत नाही. एकाही मोठ्या व्यावसायिकाला शिक्षा होत नाही. जोर्पर्यंत हे चालू आहे तोपर्यंत समाजाची घसरण होताच जाणार.

      Delete
    2. चैतन्य,
      तुमच्या तक्रारी आणि त्याची उत्तरे

      1. सध्या ब्राह्मण लोकांना दोष देण्याची वृत्ती वाढली आहे.
      उत्तर : ब्राह्मणांनी पापे केली, तर त्याचा दोष त्यांच्या माथी येणारच.

      2. एकाही राजकारण्याला शिक्षा होत नाही, एकाही मोठ्या व्यावसायिकाला शिक्षा होत नाही....
      उत्तर : म्हणणे खरे आहे, गुन्हेगारांना शिक्षा होत नाहीत. परंतु शिक्षा न झाल्यामुळे फायदा ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांचाच होत आला आहे. कसे ते पाहा :

      १९९३ च्या दंगली घडविणा-या शिवसेनेच्या एकाही नेत्याला अजून शिक्षा झालेली नाही. इतकेच काय सतत तोडफोड करणा-या एकाही शिवसैनिकाला अजून शिक्षा झालेली नाही. मनसेच्या लोकांनी उत्तर भारतीयांवर हल्ले केले. एकालाही आजपर्यंत शिक्षा झालेली नाही.

      बाबरी मशीद पाडून देशात दंगलीचा भडका उडविणारे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि त्यांचे सर्व बगलबच्चे तुरुंगात असायला हवे होते. ३ हजार मुसलमानांना जाळून मारणारे नरेंद्र मोदी तुरुंगात असायला हवे होते.

      गुन्हेगारांना शिक्षा झाल्या तर अर्धे अधिक ब्राह्मणवादी नेते तुरुंगात असतील.

      - राजा मइंद,
      संपादक मंडळ सदस्य, अनिता पाटील विचार मंच.

      Delete
    3. This comment has been removed by the author.

      Delete
    4. मुल प्रश्न आहे तो कोणता ?- स्त्रीचे शील का पुरुषांचा संयम ?
      स्वरदा मॅडम खूप महातवाचा प्रश्न आहे आणि खर च मूलभूत प्रश्नाला हात घालण्यासाठी धन्यवाद कोळसा काळा आहे तर काळाच आहे त्यात जात कुठे आली खरा ते खर आणि खोट ते खोट अहो बाबासाहेब महणून गेले की मनसाच्या विचारांच्या पुजा न करता माणसाला देव बनवईची या भारतात जुनी परंपरा आहे ते या निमिताने खरे ठरले अहो लक्ष्मण माने भले मोठे विचार ठेवत असेल किंवा त्याने भूतकालात मांडले किंवा भूतकालात खूप मोठे कम केले पण आहे तो माणूस च न का त्याचा पाय घसरणार नाही महणून सत्ता संपनती यांचा गंध नाकाला लागताच हंसाचे कावळे झालेले इतिहासात का कमी दाखले आहेत

      मल hecha महानईचे आहे की लक्ष्मण माने फराree का झाले आपली बाजू का खुलेपणाने मांडली नाही

      Delete
  14. हा राजा माईन्द कुठला ओसाड गावाचा राजा ?

    असे राजे गल्लोगल्ली झाले तर आम्ही म साहेबाना तोंड कसे दाखवणार ?

    आणि हा ब्राह्मणांच्या मागे का लागला आहे ?


    स्वराज्यात सर्वांचाच सहभाग होता असे आम्ही खुद्द सांगतो त्या वेळेस मासाहेबाही आनंदाने आमची अजूनही पाठ थोपटतात

    त्या म्हणतात , शिवबा आगऱ्याहून इकडे आलास पण तुझ्यासाठी किती ब्राह्मण आणि कायास्थानी औरंगजेबाचे आसूड झेलले - त्याचा कधीही विसर पडू देऊ नकोस -


    रायगडावरून आमच्या देखत ज्या वेळेस आमच्या लाडक्या कुत्र्याची समाधी या नराधमांनी विस्कटली त्या वेळेस तर आम्ही हतबल झालो -



    या राजा माइन्द सारख्यांना तर आमच्या हाताने आम्ही चिरडून टाकू इच्छितो

    असले भाडोत्री फेकलेल्या तुकड्यावर नाचणारे शिवभक्त असूच शकत नाहीत

    आमचे भक्त असूच शकत नाहीत

    आजच्या कायस्थ ,धनगर साळी माळी ब्राह्मण ,सुतार -कुंभार शिंपी ,गवळी अशा लोकांकडूनच परत आमचे स्वराज्य उभे राहील याची आम्हाला खात्री आहे -माझ्याच लोकांनी मला माझ्या अठरा पगड लोकांपासून दूर केलं आणि जणू नजर कैदेत टाकलं -

    माझ्या अठरापगड शिबंद्यानो सोडवा मला -

    ReplyDelete
  15. कोण आहे ए हे भिकार मालींद ?

    हा संजयदादा अशा राजना पोसायला लागला म्हणजे या राजाची लायकी काय राहिली ,

    अरे अरे राजू ,



    उगू उगी ,

    तुला भूक लागली वाटत - आई गेली भूर ,तुझी ,रडीचा डाव खडी

    आमच्या मावळ्यांना असल अजिबात आवडत नाही आणि मासाहेबा ना तर असल खपत नाही

    खबरदार जर असले फालतू बोललात तर .

    आम्ही सर्वाना सारखे लेखतो ,आमच्या समोर कुणी लहान नाही आणि कुणी मोठे नाही ,मेंदू

    कुणाचा लहान नाही आणि कुणाचा मोठ्ठा नाही ,आम्ही स्वतः समक्ष तपास करतो कि कुणाचा मोठा आणि कुणाचा लहान , मग मासाहेब परत तपास करतात आणि परत्यक्ष बघून निर्णय घेतात

    जगदंब जगदंब !

    आणि त्या राहुल आणि चैतन्यला घाला चुलीत आणि आप्पा आणि बाप्पाला टकमक टोकावरून ढकलून द्या .

    कोण आहे रे तिकडे ?

    त्याचं ते आत्मक्लेशाच काय संपल कि नाही ?

    का आम्हालाच आता रायगडावरून उतरून यावे लागेल दरवेळेस ?

    त्या अनितालापण सांगा , जर दमान , एलेक्शन जवळ आल्याती , मासाहेब रागावत्यात अस समद्यांना सांगा ,

    आमचा वाघ्या कुठे गेला ?

    त्या संजयला एक शेपटी हलवत उभे रायाची सवय लागल्ये , त्यान कोण वाघ्या आणि कोण संजय तेच काळात नाय ,कस्स ?

    ReplyDelete
  16. अरे माला फकटा एवडेच महणवईचे आहे की जर लक्ष्मण माने निर्दोष होता व तो बुद्ध अनुयायी होता तर तो का पळून गेला फरार झाला कै सांगू तुमहाला मी सुद्धा लक्ष्मण माने चा खूप चाहता आहे हे वृत्त मनाला किती डागण्या देऊन गेला ते कै सांगू पण खर्चा सांगतो त्यांच्यावर आरोप झाले त्याचे एवढे दुख झाले नाही जेवढे दुख त्यांच्या फरारी होण्याच्या वृत्ताने झाले काहीच वेध लागत नाही सत्तेच्या वर्तुळात जाऊन हंसचा कावळा झाला की तो आदीचा कावळा होता लक्ष्मण माने समोर केवन्ह समोर आले तर जेव्हा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिल्यावर

    माणूस एका वर्तुळा पूर्णा करणार हे निशचीत दिसतय प्राणी मग माणूस पुन्हा प्राणी


    लक्ष्मण माने तुमचं त्रिवार धिक्कार

    तुम्ही तुमची बाजू माडण्यासाठी जारी घटना झ्ल्य झाल्या समोर आला असतात तरी आम्ही आमची समजूत घातली (समजूत हा खर खोयहा तुमकीहा जाणोत आणि शरद पवार जाणोत ) की हे कुभांड आहे

    आमच्या भीमरावन सांगितलं होता हे पुरोगामी तुमहाला आपल्या कळपात नेतील आणि नवीन राजकीय गुलाम तयार करतील लक्ष्मण माने तुम्ही हे खर ठरवलत

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...