भारतीय मानसिकतेला लागलेली सर्वात मोठे कीड म्हणजे भेकडपणा. खोटी आत्मप्रतिष्ठा. खोट्या गौरवगाथांचा उदो उदो. आपल्यांच्याबाबत वर्चस्वतावाद आणि दुस-यांसमोर शेपुट घालणे. पण बाहेरचे आले लिंग उभारुन कि सर्वांनीच आपली शेपुट ...त घालणे. आपापसात कट्टर इस्लामवादी, बहुजनवादी, हिंदुत्ववादी, ख्रिस्तीवादी, आंबेडकरवादी, वैदिकवादी ईईई आपापली झडुन गेलेली नखे परजत आपसी संघर्षाला हमेशा तयार असतात. पण हे सारे लोक पौरुषहीण आहेत हे त्यांनी वारंवार सिद्ध केले असले तरी ते "तसे" आहेत हे त्यांना कोण सांगणार? बव्हंशी मुस्लिमांना पाक जवळचा वाटतो तर ख्रिस्त्यांना पोप. कम्युनिस्टांना चीन जवळचा वाटतो तर नवभाडवलशाहीवाद्यांना अमेरिका...उद्या भारतीय बुद्धीस्टांना चीन-जपान वगैरे जवळचे वाटले तर नवल वाटुन घ्यायचे काही कारण नाही. तसेही माओवादी समर्थक विपुलतेने हयात आहेतच...आणि दुर्दैवाने ते बहुतेक जातीघटकांत आहेत. प्रत्येक आपापल्या जातीतील माओवाद्यांना समर्थन देण्याचा कसोशीने कसा प्रयत्न करतो हे आपण अलीकडे पाहिलेच आहे!
माझा प्रश्न कोणी कोणता वाद जपावा या स्वातंत्र्याबाबत नसून राष्ट्रीय प्रेरणा या सर्वोपरी आहेत कि प्राधान्यक्रमात शेवटच्या आहेत याबद्दल आहे. या देशाची भुमी...क्रमश: गिळंकृत होत आहे. होता होता घरदारेही गिळली जातील. याला कदाचित अजून हजार वर्ष लागतील पण ते कधीच होनार नाही असे नाही. तसेही हिंदुत्ववादी या देशाचा गौरवशाली इतिहास किमान २५००० हजार वर्ष एवढा पुरातन आहे हे सांगतातच. त्यांचे आधार त्यांनाच माहित. पण या देशाचा इतिहास हा पराजयांचा इतिहास आहे हे लक्षात का घेतले जात नाही? विजिगिषु वृत्तीचा अभाव हेच तर कारण नाही ना?
हिंदुत्ववादी जगापेक्षा ख्रिस्ती जग...इस्लामी जग आणि बुद्धीष्ट जग हे अधिक व्यापक आहे हे या महामुढ हिंदुत्ववाद्यांना कधीच समजले नाही किंवा त्यांना तसे वास्तव माहितही नाही. त्यांना त्याची कधी गरजही पडत नाही...सारे काही वेदांत होते ना? बस्स!
हा सारा सर्वांचाच भेकडपना आहे. जीवन ओवाळुन टाकण्यासाठी जी मानसिकता लागते ती आपल्याकडे नाही हे आपल्याला कधीही समजणार नाही. मला खात्री आहे...स्वस्तात मिळते म्हणुन वैर्यांच्याही वस्तु घेणारे कमी नाहीत.
येथे बसून सीमांची काळजी होत नसते. स्वत:ला वेळ द्यावा लागतो. सीमावर्ती प्रदेशांतील लोकांना सांस्कृतीक जिव्हाळा द्यावा लागतो. शत्रू राष्ट्रांतही मित्र बनवावे लागतात. त्यांची संस्कृती आणि विचार समजावून घ्यावे लागतात.
येथे बसून जय श्रीराम, जय भीम, जय मल्हार, जय जिजाउ ईईई करणा-यांना हे समजले पाहिजे कि तुमच्या जय म्हणण्याला जग यत्किंचितही किंमत देत नाही.
कारण तुमची तेवढीही लायकी नाही!
सामाजिक लायकी वाढवण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. अंगात दमही लागतो. भ्रामक कवचांत जगणा-यांना जगाचा उन्हाळा सोसवत नसेल तर त्या राष्ट्राचे भवितव्य तरी काय असनार आहे?
बदलायला हवे!