Sunday, May 5, 2013

संकट आलंय म्हणून....


संकट आलंय म्हणून
घाबरुन जावू नकोस
बावरून जावू नकोस
जीवनात संकटे येतच असतात
नव्हे, 
त्यांना यावंच लागतं
नियमीत येणा-या
जीव जाळणा-या
ग्रीष्माप्रमाणे
त्यांशिवाय 
थोडीच कळणार आहे
जीवनाची किंमत?

संकटांच्या राशी 
कोसळुन गेल्यानंतर
लाभणारे एक साधे 
 ओलावेदार
स्नेहमय 
पर्जन्य-स्मितही
जगण्याचे नवे निमित्त देते
पुन्हा जगण्याची 
अपार उर्मी देते
म्हणून गड्या
जरा धीर धर...
जरा धीर धर.........

ग्रीष्मानंतर
 पावसाळा नियतच आहे!

शारीरिक मर्यादांवर मात करत लावले गेलेले शोध!

मानवी बुद्धिमत्ता आणि शोधवृत्तीला कोणतीही शारीरिक मर्यादा नसते , हे इतिहासाने वेळोवेळी सिद्ध केले आहे. जेव्हा शरीराचे अवयव साथ सोडतात , दृष्...