जागतीक परिप्रेक्षातील दहशतवादाला असंख्य पैलू आहेत. ख्रिस्ती राष्ट्रे, कम्युनिस्ट राष्ट्रे आणि ज्यु राष्ट्र स्वत:च सर्वात मोठी दहशतवादी केंद्रे आहेत. ख्रिस्ती, ज्यू हेही धर्म जन्मापासून दह्शतवादी कृत्यांत सामील होते हा इतिहास आहे. शिख दहशतवादाने काही दशकांपुर्वी देशभर थैमान घातले होते हे विसरता येत नाही. आत्मघातकी दहशतवाद ज्यूंनी दोन हजार वर्षांपुर्वीच शोधला...वापरला आणि तमिळ वाघांनी त्याचा सर्वाधिक उपयोग केला. वैदिक-अवैदिकांनीही प्राचीन काळी एकमेकांविरुद्ध दहशतवादाचा वापर केल्याचे दाखले मिळतात. अर्वाचीन काळत हिंदुत्ववादी (वैदिकवादी) दहशतवादी संघटनाही छुटपुट का होइना दहशतवादी कृत्ये करतांना दिसतात. जगातील एकही धर्म दहशतवादापासून अलिप्त नाही. राष्ट्रप्रणित दहशतवाद हा शक्यतो ख्रिस्ती राष्ट्रे विरुद्ध मुस्लिम राष्ट्रे किंवा कम्म्युनिस्ट राष्ट्रे असा माजवला जात आहे. माओवाद्यांनी भारतात आजवर जेवढे लोक मारले ते भारत पाकमद्ध्ये झालेल्या तिन्ही युद्धात मेलेल्यांपेक्षा अधिक आहेत. माओवाद्यांना धर्म नसतो असे म्हटले तरी त्यांचा मूळधर्म कोणता आहे हेही अभ्यासनीय आहे.
दहशतवाद फक्त हिंसकच असतो असे नाही. तो सांस्कृतीक/आर्थिकही असतो. जगभर हा संघर्ष सुरु आहे. तेंव्हा एकाच धर्माला दहशतवादी असे सरसकट लेबल लावता येत नाही, कारण कोणत्या ना कोनत्या स्वरुपात सर्वच धर्म दहशतवादाशी या ना त्या प्रकारे संलग्न आहेत.
ख्रिस्ती-ज्यू दहशतवादाचा झटका भारताला विशेष बसला नाही. (अर्थात इशान्यपुर्व राज्यात आजमितीला ३ ख्रिस्ती दहशतवादी संघटना कार्यरत आहेत व त्यांनाही आंतरराष्ट्रीय फंडींग आहे.) म्हणुन जगात एकमेव इस्लामच दहशतवादी आहे असे सरसकट विधान करता येत नाही. त्यांच्यातही शिया-सुन्नी वाद असून एकमेकांविरुद्ध दहशतवाद माजवला जातो हे पाकिस्तानमधील घटनांवरुन लक्षात येते. भारतात रा. स्व. संघ स्थापनेपासूनच मुस्लिम द्वेष जोपासत आला आहे. गांधीजींच्या खुनानंतर मिठाया वातल्या गेल्या. आप्पासाहेब पटवर्धन यांनी साधनातील (२३-७-४९ च्या) लेखात स्पष्ट लिहिले कि "आमच्या रत्नागिरीतही मिठाया वाटल्या गेल्या...संघापासून दूर राहण्यात राष्ट्राचे, मानवतेचे कल्याण आहे."
संघाची बैठकच चुकीची" या ४८ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात (पान क्र. ४) बाळुकाका कानिटकर म्हणतात, "संघातील पाच वर्षाच्या पोरापासून पंचाऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांची अंत:करणे मुसलमानांच्या द्वेषाने भरली आहेत. कुणी तो प्रकट करतात. कोणी दडवून ठेवतात. पण कधीतरी तो बाहेर पडतोच. मुसलमान या शब्दाऐवजी संघीयांच्या खाजगी वाटाघाटीत व बैठेकींत "लांडा" हा शब्द अनेकवार कानांवर येतो." बाबरी मशीद प्रकरणाने जातीय तेढ व दहशतवादी कृत्यांची संख्या वाढली हे वास्तव नाकारता येत नाही. गुजरात प्रकरण तर ताजेच आहे.
तेंव्हा सर्वांनी तारतम्यानेच चालायला हवे. चुका सर्वांच्याच आहेत. त्या दुरुस्त करण्याऐवजी कटुता वाढवण्याचे प्रयत्न झाले तर दहशतवादी घतनांना आळा बसणार नाही.
मैत्र निर्माण करता येत नसेल तर किमान शत्रुत्व वाढवण्याचे काम करू नये. आपणच फिर्यादी, आपणच वकील आणि आपणच न्यायाधिश बनायचा प्रयत्न करू नये. तपासयंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे. द्वेषातून द्वेषच वाढतो...