Thursday, July 11, 2013

मैत्र निर्माण करता येत नसेल तर...

जागतीक परिप्रेक्षातील दहशतवादाला असंख्य पैलू आहेत. ख्रिस्ती राष्ट्रे, कम्युनिस्ट राष्ट्रे आणि ज्यु राष्ट्र स्वत:च सर्वात मोठी दहशतवादी केंद्रे आहेत. ख्रिस्ती, ज्यू हेही धर्म जन्मापासून दह्शतवादी कृत्यांत सामील होते हा इतिहास आहे. शिख दहशतवादाने काही दशकांपुर्वी देशभर थैमान घातले होते हे विसरता येत नाही. आत्मघातकी दहशतवाद ज्यूंनी दोन हजार वर्षांपुर्वीच शोधला...वापरला आणि तमिळ वाघांनी त्याचा सर्वाधिक उपयोग केला. वैदिक-अवैदिकांनीही प्राचीन काळी एकमेकांविरुद्ध दहशतवादाचा वापर केल्याचे दाखले मिळतात. अर्वाचीन काळत हिंदुत्ववादी (वैदिकवादी) दहशतवादी संघटनाही छुटपुट का होइना दहशतवादी कृत्ये करतांना दिसतात. जगातील एकही धर्म दहशतवादापासून अलिप्त नाही. राष्ट्रप्रणित दहशतवाद हा शक्यतो ख्रिस्ती राष्ट्रे विरुद्ध मुस्लिम राष्ट्रे किंवा कम्म्युनिस्ट राष्ट्रे  असा माजवला जात आहे. माओवाद्यांनी भारतात आजवर जेवढे लोक मारले ते भारत पाकमद्ध्ये झालेल्या तिन्ही युद्धात मेलेल्यांपेक्षा अधिक आहेत. माओवाद्यांना धर्म नसतो असे म्हटले तरी त्यांचा मूळधर्म कोणता आहे हेही अभ्यासनीय आहे.
दहशतवाद फक्त हिंसकच असतो असे नाही. तो सांस्कृतीक/आर्थिकही असतो. जगभर हा संघर्ष सुरु आहे. तेंव्हा एकाच धर्माला दहशतवादी असे सरसकट लेबल लावता येत नाही, कारण कोणत्या ना कोनत्या स्वरुपात सर्वच धर्म दहशतवादाशी या ना त्या प्रकारे संलग्न आहेत.
ख्रिस्ती-ज्यू दहशतवादाचा झटका भारताला विशेष बसला नाही. (अर्थात इशान्यपुर्व राज्यात आजमितीला ३ ख्रिस्ती दहशतवादी संघटना कार्यरत आहेत व त्यांनाही आंतरराष्ट्रीय फंडींग आहे.) म्हणुन जगात एकमेव इस्लामच दहशतवादी आहे असे सरसकट विधान करता येत नाही. त्यांच्यातही शिया-सुन्नी वाद असून एकमेकांविरुद्ध दहशतवाद माजवला जातो हे पाकिस्तानमधील घटनांवरुन लक्षात येते. भारतात रा. स्व. संघ स्थापनेपासूनच मुस्लिम द्वेष जोपासत आला आहे. गांधीजींच्या खुनानंतर मिठाया वातल्या गेल्या. आप्पासाहेब पटवर्धन यांनी साधनातील (२३-७-४९ च्या) लेखात स्पष्ट लिहिले कि "आमच्या रत्नागिरीतही मिठाया वाटल्या गेल्या...संघापासून दूर राहण्यात राष्ट्राचे, मानवतेचे कल्याण आहे."
संघाची बैठकच चुकीची" या ४८ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात (पान क्र. ४) बाळुकाका कानिटकर म्हणतात, "संघातील पाच वर्षाच्या पोरापासून पंचाऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांची अंत:करणे मुसलमानांच्या द्वेषाने भरली आहेत. कुणी तो प्रकट करतात. कोणी दडवून ठेवतात. पण कधीतरी तो बाहेर पडतोच. मुसलमान या शब्दाऐवजी संघीयांच्या खाजगी वाटाघाटीत व बैठेकींत "लांडा" हा शब्द अनेकवार कानांवर येतो." बाबरी मशीद प्रकरणाने जातीय तेढ व दहशतवादी कृत्यांची संख्या वाढली हे वास्तव नाकारता येत नाही. गुजरात प्रकरण तर ताजेच आहे.
तेंव्हा सर्वांनी तारतम्यानेच चालायला हवे. चुका सर्वांच्याच आहेत. त्या दुरुस्त करण्याऐवजी कटुता वाढवण्याचे प्रयत्न झाले तर दहशतवादी घतनांना आळा बसणार नाही.
मैत्र निर्माण करता येत नसेल तर किमान शत्रुत्व वाढवण्याचे काम करू नये. आपणच फिर्यादी, आपणच वकील आणि आपणच न्यायाधिश बनायचा प्रयत्न करू नये. तपासयंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे. द्वेषातून द्वेषच वाढतो...

14 comments:

  1. -आप्पा - अहो बाप्पा ,जरा इकडे तर या

    बाप्पा - काय विशेष ?

    आप्पा - एक काम आहे संजय काकांचे फार पूर्वी पासून म्हणणे आहे , की इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे , तर आपण काहीतरी करू या ! काय ?

    - बाप्पा - आपण एक काम करू या ! आपल्याला लिहायचे स्वातंत्र्य संजय काकांनी दिलेलेच आहे , ते वापरू या , त्यांची सेन्सॉर ची कात्री ते लावतीलच , नाहीतर अनानिमास नावाने कान पिचक्या देतील ,

    आप्पा - ती त्यांची आयडिया छानच आहे - म्हणजे स्वतः नामानिराळे राहून प्रत्युत्तर देत येते ,परत " तो मी नव्हेच "आहेच !पण तुमच्याकडे मुद्दे आहेत का ? का उगीच शिळ्या कढीला ऊत ?- कारण संघ इतका बोअर आहे - त्यांना साधा इतका भेजा नाही की नवीन पिढीसाठी तरी त्यांचा युनिफोर्म बदलावा , जरा आकर्षक करावा !

    बाप्पा - अहो मी एकदा त्यातल्या एकाला सांगितले कि ३३ कोटी देव नसून देव नसून देव ३ ३ आहेत फक्त तर त्याने मला बाजूला घेतले आणि तो म्हणाला की असे करून आपली शक्ती कमी करू नका , मी त्यांना परवा पेपरात आलेल्या लेख बद्दल सांगितले तर ते म्हणाले तो माणूस वेद आहे , मी म्हटले मग एकदा कत्तल खान्यात जाऊन गाईच्या पोटात काय असते ते तरी बघू या - नवीन पिढीला खूप उत्सुकता आहे !

    आप्पा - अहो ते हाफ चड्डी वाले नोकरी पक्की करण्यासाठी हे राष्ट्रोद्धाराचे कार्य करतात - सगळ्या ब्यांका , एल आय सी या लोकांनी भरल्या आहेत . शाळा पण यांच्याच ताब्यात !


    बाप्पा - त्यांना मुसलमान द्वेष असतो हे खरेच पण मग आपला नवा इतिहास लिहिताना आपण काय करायचे ? अफजलखानाने शिवाजीला बिरयानी खायला बोलावले आणि चुकून घशात हाडूक अडकून तो मेला असे सांगायचे का ? शिवाजीचा त्यात काहीच दोष नाही ,

    आणि संभाजी चुकून मोगल भेटायला आलेले असताना पाय घसरून डोक्यावर आपटून स्वर्गवासी झाला असे म्हणायचे का ?

    आप्पा - कल्पना छान - अगदी सेक्युलर आहे बर का बाप्पा - कशी काय सुचली हो ! नवीन सर्व धर्म समभाव घडवायला अगदी मस्त ! अजून एक करता येईल - बघा पटतंय का -

    हा ब्राह्मणवाड ताणायचा असेल न तर - ज्ञानेश्वरांच्या चे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणी हे कोडे उलगडून दाखवा - संजय कुमाराना मस्त आयडीया मिळाली - चला आता त्यांचा लेख आलाच समजा - विठ्ठल रुक्मिणी हि ब्राह्मणांची मोठ्ठी गेम आहे - ज्ञानेश्वरांनी आपल्याच आई वडीलाना अमर केलाय -विठ्ठल - रखुमाई देव नसून डी व्ही कुलकर्णी नावाच्या मुलाचे आई वडील होते ! आणि काय हो - ती भावंडे एकदम कशी मेली हो ? काहीतरी गेम आहे !

    कोंडून मारलं यांना - तुकाराम एकदम कसा सदेह गेला - काहीतरी गेम आहे !

    बाप्पा - तुमची बुद्धी अफाट अफाट आहे !तुमचे पायच धरले पाहिजेत !

    आप्पा - आम्ही काही वारकरी नाही !आम्ही अनिस ला मानतो !म्हणजे आम्हाला वारकरी हाकलूनच लावणार !

    बाप्पा - परवा बातमी दाखवत होते अंधश्रद्धा कायद्याला या वारकरी लोकांचा सख्त विरोध !

    आप्पा - काय ग्रेट आहे नाही का ?एकजात सगळे नामदेवा पासून ते तुकारामा पर्यंत वैकुंठात कपाळावर हात मारून घेत असतील !

    बाप्पा - हीच तर कोणत्याही चळवळीची गम्मत असते - फार अभ्यास करण्या सारखी बाब आहे ही बर का - रशियन क्रांती असो , आपली महात्मा गांधींची चळवळ असो किंवा कामगार चळवळ असो - कसकसे मुखडे बदलत जातात ! तीच तर्हा या वारकरी लोकांची

    आप्पा - चला - चालायचंच - संजय भेटतोय का बघू या !

    बाप्पा - चल चल फार वेळ झाला !

    ReplyDelete
    Replies
    1. स्वागत आप्पा-बाप्पा, चुकल्यासारखे वाटत होते. वयोमानानुसार तब्बेत वगैरे ठीक आहे कि नाही चिंता लागली होती. पण तुम्ही मस्त धडधाकट विनोद करतांना दिसताय. बरे वाटले.
      (टीप: अनोनिमस नांवाने मी कधीही प्रतिक्रिया देत नाही हे तुमच्यासारख्या चाणाक्षांच्या लक्षात आले नाही याचे मात्र नवल वाटते!)

      Delete
  2. आप्पासाहेब पटवर्धन यांनी साधनातील (२३-७-४९ च्या) लेखात स्पष्ट लिहिले कि "आमच्या रत्नागिरीतही मिठाया वाटल्या गेल्या...संघापासून दूर राहण्यात राष्ट्राचे, मानवतेचे कल्याण आहे."
    sweets distributed by the congressi people and they burn the houses of brahmins in the name of the ahinsa and gandhi...
    respected aappasaheb patwardhan never look the world beyond ratnagiri... so his comment is very narrow in that sense...
    congressi bhitya gandulani aamchya ghara var pan halla kela( rss shi kothun hi sampark nastana) aani hi kutri aajun hi mokat phirtat..

    ReplyDelete
    Replies
    1. Rahul ji, burning homes after Gandhi murder was brutally wrong and entirely against Gandhian principles. (I wonder why murderers didn't think on it?) Fact remains that sweets were distributed almost everywhere, especially in Hindu princely states. (as mentioned by Mr. Patel in a letter to Nehru.) savarkar was adamant supporter of Hindu princely states remain independent, especially Travancore. I think you may know this.

      Delete
  3. संजयजी - सर्वच धर्मात उजव्या विचारसरणीचे लोक असतात ही गोष्ट अगदी नक्की पण ह्या उजव्या विचारसरणीचे प्रमाण मात्र अगदी नगण्य आहे. सगळ्या धर्मांचे मुसलमान/ इस्लामशी शेकडो वर्षे वाकडे का हा पण प्रश्न विचारात घेण्याजोगा आहे. ख्रिश्चन आणि मुसलमान शेकडो वर्षांचा रक्तरंजित इतिहास, ज्यूंचे पण तेच, आता बुद्ध धर्म (म्यानमार) पण ह्या लढ्यात उतरलेला आहे. भारतात पण हिंदू विरुद्ध मुसलमान अश्या लढाया हजारो वर्षे चालू अहेत. दंगे चालू आहेत.
    तर प्रश्न असा आहे की मुसलमान धर्माचे इतर सर्व धर्मांशी वाकडे का? इथे एक गोष्ट नमूद करतो की सगळे मुसलमान वाईट, वाकडे, दंगेखोर नाहीत. पण मुसलमान धर्मात कडव्या आतंकवादाचे प्रमाण इतर सर्व धर्मान्पेक्षा जास्त आहे असे माझे मत आहे. ऐतिहासिक काळापासून कडवेपणा त्यांच्यात खूप आहे. एक गोष्ट मात्र नमूद करावी वाटते की भारत असो वा छोटेसे इस्राईल असो, कोसोवो असो की म्यानमार असो, मुसलमान धर्माचा सर्वथैव विजय मात्र कधीही झालेला नाही. आणि तो का झाला नाही ह्याची कारणे पण विचारात घेण्याजोगी आहेत.
    - कोहम

    ReplyDelete
    Replies
    1. Koham ji, if we look back in the history, Muslim terrorism occurs as reaction to the terrorism of Judaism and Christianity. In Gulf (Iraqu, Iran, Afganistan...) we know how US (being a christian country) have caused rise of Taliban...and other kinds of terrorist fractions. We forget it that pakistan is being used by USA to counter-check disturb Indian harmony. Our enemy is outside of the India...insiders are paid morons. I do not know how to send to you...but if possible if you can get hold of my book "dahashatavadachi Rupe" you will find history of terrorisms of all religions and how Islam terrorism emerged in the course of the time...

      Delete
  4. संजय काका ,

    आप्पा आणि बाप्पा यांच्या वयाची बेरीज सुद्धा " साठी " गाठत नसेल असा एक विचार कसा वाटतो ?

    पूर्वीच्या दैनिक सकाळ मध्ये आप्पा बाप्पा असे कार्टून असायचे त्याची आठवण ठेऊन चार अक्षरे लिहिली जातात ,

    प्रकृती तोळा मासा असली तरी काटक आहे !

    तुम्ही यंदा प्रचंड आकाराचा नांदी पान्दुरांगासमोर बसवणार असे चौकाचौकात बोलले जाते आहे !


    आम्हीच आमच्यावर धरलेल्या छत्रीच्या आधारे - आप्पा आणि बाप्पा

    ReplyDelete
  5. This is great news...! Bare aappa-Bappa...nandi jethe asayala hava tethe ahech...mhanaje Pundrikeshvara samor...Vitthal svata: Shiv nahi, Shivbhakt ahe...tethe Nandichi garajach kay?

    ReplyDelete
  6. आप्पा - मानल ! संजय काका -अगदी अपेक्षित रिअक्शन दिलीत आणि मी पैज जिंकलो !

    बाप्पा - आप्पा - तू लेका दुसरे कसे प्रतिसाद देतील यात माहीर वाटतोस !

    आप्पा - तस नाहीहो ! एकदा का मन जुळली की समोरचा कसा वागेल ते सांगावे लागत नाही

    बाप्पा - म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की संजय काकांच आणि तुमचं इतकं मेतकुट जमलय ?कमाल आहे !मग आमच कस होणार ?आम्ही तुमचे लंगोटीयार ,

    आप्पा - तस नाही हो ! चंद्रभागेला आला लोंढा - - - विठ्ठल बोले रुक्मीणीला पुंडलिक माझा बुडाला !

    हे थोतांड आहे असेच झाले न बाप्पा ! - हे म्हणजे हिंदी पिक्चरच्या क्लायम्याक्स पेक्षाही भारी -

    बाप्पा - देवाच्या जागी भक्त आणि भक्ताच्या जागी देव - सोलिड प्लॉट आहे !

    आप्पा - शिवच मुळचा देव आणि वैष्णव हा शिवाचा भक्त हा अंडर करंट तर महानच !

    बाप्पा - या स्क्रिप्ट चे सर्वाधिकार संजय काकांकडे आहेत

    आप्पा - एक मराठी मालिका होईल या विषयावर ! शूटिंग पंढरपूरातच करूया ! वर्षभर !

    बाप्पा - आणि त्या हिंडणाऱ्या डुकरांचे आणि मोकाट गायींचे आणि उंदीर घुशींचे काय करायचे ?

    ते पटकथेत जुळवून घेऊ या - कुणीतरी शाप दिला आणि - -

    आप्पा - येस आय गॉट इट !काका हेल्प मी !

    बाप्पा - म्हणजे मराठीत ( संजय) काका मला वाचवा !- असेच ना ?

    लेखनसीमा -

    ReplyDelete
  7. पहिले पाढे पंचावन . मुसलमान विरोधात बोलण्याची हिम्मत नाही म्हणून ही पळवाट . ब्राम्हण साँफ्ट टारगेट आहेत . झोडण्यास सोपे आणि .वर पुरोगामी म्हणून मिरवता येते .चालूद्या .

    ReplyDelete
  8. "द्वेषातून द्वेषच वाढतो" त्याची जोपसनच होते. आपल्या संत महात्मानानीही मैत्रा ची जोपासना करा असे सांगितलेय. बाबरी प्रकारानानातर आपण सर्व ते अनुभवतोयच. रा. स्व. संघ बाबत "परुळेकर" "दाभोळकर" यांचे विश्लेषणही चिंतनीय आहे.

    ReplyDelete
  9. अहो संजयजी आपण बोधागायातील बॉम्ब स्फोतावर बोलाल अशी अपेक्षा होती. उगाच दोन हजार वर्षापूर्वीच संदर्भ देऊन कशाला गोंधळ घालता? जिथे बोलायचे तेथे बोलू शकत नाहीत आणि कसली समाज सुधारणा करणार. बंद करा हे उद्योग. बामियानाच्या मूर्ती विध्वंसानंतर देखील कोठे तीव्र प्रतिक्रया उठली होती?

    ReplyDelete
  10. आपण उल्लेख केलात म्म्हणून विचारतो गांधी हत्येनंतर झालेल्या ब्राम्हण अत्याचाराबद्ल आपण कधी तितक्या आत्मियतेने लिहिलेले आठवत नाही जितके आपण मुस्लीमांवरील तथाकथित अत्याचाराबद्दल लिहिता . कश्मीर मधिल हिंदू हत्याकांडाबाबत आपण कधी अब्दुल्ला कुटुंबावर कधी टीका केली आहे काय जेवढी आपण मोदींवर करता .

    ReplyDelete
  11. पुरोगामित्वाच्या नावाखाली उद्या तुम्ही काहीही लिहायला सुरुवात केली तर तुम्हाला कोणी पुरोगामी सहजी समजणार नाहीत. असला भंपक पुरोगामी विचार तो लोकशाहीचा अपमान तर आहेच कारण स्वतःला समाजवादी म्हणून लपवणारे लोकच समाजवादाची उदो उदो करतात, जेव्हा एक बहुजन मेला तेव्हा त्याआधी एक वैदिक मेलेला आहे, खरा इतिहास उकरून बघायची इच्छा असेल तर तुम्हाला असंख्य पुरावे मी देतो मला ह्या फालतू ब्लोगवर लिहायची अजिबात इच्छा नाही, नां मला वैदिक विरुद्ध अवैदिक वाद उकरून काढून स्वताचे पोट भरायची गरज आहे, कारण मी मरमर करून जगलो आहे ह्यांची मोठ मोठी पुस्तके जोरात खपली म्हणून मोठा वैदिक विरोधी जोर आला असेल तर तो राहू द्यात. हे क्षणिक सुख आहे. हे सुख आपल्या घरात फक्त एका जन्मापुरता राहते पुढे पुनर्जन्म कुठे जातो? स्वतःच्या संततीला हे लोक पुरोगामी सत्य सांगू का शकत नाहीत? का? ह्यांना गुरु पौर्णिमा लाजेची वाटते? का वैदिक ह्यांना चोर वाटतात? कारण हे सगळे पुरोगामी पोटार्थी भिक्षुक आहेत. मला भिक्षेची गरज नाही कारण मी माझे कर्म करतो, पण ह्यांचे विचार ऐका जेव्हा हे नुकतेच ज्ञान घ्यायला लागले होते , if we look back in the history, Muslim terrorism occurs as reaction to the terrorism of Judaism and Christianity. In Gulf (Iraqu, Iran, Afganistan...) we know how US (being a christian country) have caused rise of Taliban...and other kinds of terrorist fractions. We forget it that pakistan is being used by USA to counter-check disturb Indian harmony. Our enemy is outside of the India...insiders are paid morons. I do not know how to send to you...but if possible if you can get hold of my book "dahashatavadachi Rupe" you will find history of terrorisms of all religions and how Islam terrorism emerged in the course of the time..मग संजय सोनावानींनी पुराव्यासहित सांगावे हि भारतीय हिंदूंनी किवा वैदिकांनी किवा जे कोणी बहुजन आहेत त्यांनी पूर्व इस्लामिक किवा इस्लाम पश्चात तिथे जावून त्या लोकांना त्रास दिला, """ मग का तो १ ला खलिफा भारतात झक मारायला आला? का त्याने सोरटी सोमनाथ १७ वेळा उध्वस्थ केले, का कशी विश्वेश्वराची लुट केली? आहेत का ह्या पुरोगामिंकडे उत्तरे?? ह्यांच्ये इतिहासाचे, भूगोलाचे, मानव वंशाचे, प्राणी वान्शाचे ज्ञान पूर्ण फक्त पैसे गोला करण्यासाठी आहे… विकास तुझ्यासारख्या भंकस लोकांना उत्तर द्यायची तुझी लायकी नाही आधी इतिहास वाच, तो काळात नसेल तर भूगोलाचा नकाशा बघ तोही तुझ्या डोक्यात घुसत नसेल तर डोके फोडून घे हा एकाच पर्याय तुझ्या सारख्या लोकांना शिल्लक आहे कारण तुम्ही धोबीचे कुत्रे न भारतीय न अमेरिकन…

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...