Thursday, January 2, 2014

चिरंतन निर्झरिणी....!

तू नेहमीच छमछमतेस... 
तू नेहमीच रिमझिमतेस
तू नेहमीच झिमझिमतेस
खळखळाळतेस जशी
चिरंतन निर्झरिणी
ईश्वराच्या खांद्यांवर
सुरक्षित
निरागस खोडकर
हरिणी जशी...

गडे...
तुझ्या निरागसतेचे
प्रतिबिंब
मी नेहमीच पाहत असतो
माझ्या 
इवल्या हृदयाच्या 
तळ्यात...

स्वप्न जसे.....!

महेंद्र-संघमित्रा: एक रहस्य

  महेंद्र-संघमित्राचे रहस्य अजब आहे. ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर समजते की हे रहस्य नाही. महेंद्र आणि संघमित्रा ही भावंडे सम्राट अशोकाची सं...