Saturday, January 11, 2014

कधी कधी...

कधी कधी अभेद्य
पहाडही निराश होतात
हताश होतात
खांदे पाडून संध्याकाळी
उतरत्या उन्हात 
एकाएकी
मूक होऊन जातात
धुकट नेत्रांनी
आपल्याच लोकांनी केलेले 
आपले 
पराभव
निमूटपने पहात राहतात...!

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...