विट्ठलाचीच जे आण-भाक
त्या चोखा मेळ्याला नि
नामदेवाला बडवणारे बडवे
साने गुरुजींनी दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी
प्राणांतिक सत्याग्रह करुन मंदिर खुले झाल्यावर
श्री विट्ठलाचे प्राण (?) मुर्तीतुन काढुन
घागरीत भरणारे बडवे
श्री विट्ठलाला
निरंकार सदाशिवाला
सोवळ्या-ओवळ्यात घालणारे बडवे
विश्वाची अंगाई गाणा-या विट्ठलाला
निजेला पाठवणारे बडवे
अस्पृश्यांचा-शुद्र-अवैदिकांचा बाट लागतो म्हणून
वर्षातून एकदा
ज्याने विश्वाचा कणकण व्यापला
त्या महेश्वराचा
बाट काढणारे बडवे
तीर्थकुंडात मुतनारे बडवे...
...
आणि म्हणे आमचा विट्ठल...
विट्ठल यांच्या बापजाद्यांना कधी समजला तरी होता का?