Thursday, January 16, 2014

आणि म्हणे आमचा विट्ठल...


विट्ठलाचीच जे आण-भाक
त्या चोखा मेळ्याला नि
नामदेवाला बडवणारे बडवे
साने गुरुजींनी दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी
प्राणांतिक सत्याग्रह करुन मंदिर खुले झाल्यावर
श्री विट्ठलाचे प्राण (?) मुर्तीतुन काढुन 
घागरीत भरणारे बडवे
श्री विट्ठलाला 
निरंकार सदाशिवाला
सोवळ्या-ओवळ्यात घालणारे बडवे
विश्वाची अंगाई गाणा-या विट्ठलाला
निजेला पाठवणारे बडवे
अस्पृश्यांचा-शुद्र-अवैदिकांचा बाट लागतो म्हणून
वर्षातून एकदा
ज्याने विश्वाचा कणकण व्यापला
त्या महेश्वराचा
बाट काढणारे बडवे
तीर्थकुंडात मुतनारे बडवे...
...
आणि म्हणे आमचा विट्ठल...

विट्ठल यांच्या बापजाद्यांना कधी समजला तरी होता का?


27 comments:

 1. नामदेव ढसाळाना भावपुर्ण श्रद्धांजली!

  एक विद्रोही कवी नि पॅंथरचे संस्थापक, यांच्या मृत्यूने आंबेडकरी चळवळीतील(कम्युनिस्ट धार्जिण्य) एक सच्चा शिपाई हरवला असे म्हणता येईल. अमेरीकेतल्या ब्लॅक पॅंथरच्या धर्तीवर मुंबईत पॅंथर संघटना उभी केली ती ढसाळ व ढालेनी. दादासाहेब गायकवाडानी कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्यावर रिपब्लिकनच्या रुपात घोंगावणारी आंबेडकरी समाजाची राजकीय चळवळ शांत झाली... विझून गेली. त्यामुळे आंबेडकरी समाजात सत्तरच्या दशकात सर्वत्र असुरक्षीततेचा सूर व नेत्यांच्या गद्दारी विरुद्ध नाराजिचा लावा धगधगत होता. चळवळ ज्याच्या जगण्याचं अविभाज्य अंग बनलं होतं तो आंबेडकरी चळवळीविना अस्वस्थ होता. नेमकं तेंव्हाच ढसाळांचा निळा वाघ ’पॅंथर’ मुंबईतून गरजला. मग अशा वेळी नुकतेच्या जन्मलेल्या पॅंथर नावाच्या या निळ्या वाघाला घराघरातून दानागोटा मिळाला व हा हा म्हणता हा निळा पॅंथर प्रत्येक घरातून डरकाळी फोडताना दिसू लागला. अशा या पॅंथरचे जनक म्हणजे ढसाळ व ढाले. लगेच पॅंथर संघटनेची ताकट इतकी वाढली की सत्तरच्या दशकात ढसाळांच्या डरकाळीने उभा महाराष्ट्र हादरायचा... एवढा तो पॅंथरचा दरारा. पण लवकरच एक गुपीत बाहेर पडलं ते म्हणजे ढसाळ हे विचाराने कम्युनिस्ट निघाले अन आंबेडकरी जनता हबकली. याच कारणामुळे ढालेनी त्यांच्याशी फारकत घेतली व पॅंथर बरखास्त करण्याची घोषणा केली. उभा आंबेडकरी समाज बाबासाहेबाना आपला वैचारीक बाप मानतो त्या विचारासाठी जगतो. पण ढसाळ मात्र दोन बापांचा वैचारीक वारसा सांगू लागले. बाबासाहेबांच्या जोडीला हळूच कार्ल मार्क्सला उभं केलं व आता जयभीमच्या जोडीला लाल सलामचा नारा उभा झाला. हेच आंबेडकरी जनतेला नापसंद पडले. आंबेडकरी जनता बाबासाहेबांशी वैचारीक पातळीवर एवढी एकनिष्ठ आहे की सरमिसळ करण्या-या नेत्याला पिटाळून लावते. ढसाळांशी नेमकं हेच घडलं. ढसाळांच्या लेखी हा एक प्रयोग होता तर आंबेडकरी समाजाच्या नजरेत तो एक अक्षम्य गुन्हा होता. अन अनावधानाने म्हणा की नेतेगिरीच्या गुर्मीत म्हणा पण गुन्हा घडला होता व ढसाळाना त्याची किंमत मोजावीच लागणार होती. या सगळ्याचा परिणाम असा झाला की साम्यवादाकडे झुकलेल्या ढसाळाना आंबेडकरी समाजानी कायमचं घरी बसवलं.
  CONT........

  ReplyDelete
 2. तिकडे कार्ल मार्क्सचा वारसा सांगणारी ब्रम्हो-कम्युनिस्टांची पिल्लावळ मात्र ढसाळांच्या या नव्या घोषणेने उड्या मारू लागली. पुढे कम्युनिस्ट ढसाळानी भगव्यांच्या कंपूत सामिल होऊन अनेक प्रयोग केलेत जे सगळेच्या सगळे फसले. अशा प्रकारे पॅंथर ढसाळांचा आंबेडकरी नेता म्हणूण मृत्यू झाला तो सत्तरच्या दशकातच... उरला तो फक्त साहित्यिक ढसाळ. पुढे साहित्यिक ढसाळानी अनेक प्रयत्न केले पण आंबेडकरी समाजानी त्याना चळवळ्या म्हणून कधीच स्विकारले नाही तर वळवळ्या म्हणून कायम नाकारले. कार्ल मार्क्सच्या पिल्लावळानाही पुढे जाऊन ढसाळ ओझं वाटू लागले. कारण त्यांची सगळी गणितं आंबेडकरी समाजानी हाणून पाडली होती. ढसाळाना कम्युनिस्टांच्या कंपूत तेंव्हाच मान सन्मान मिळाला असतात जेंव्हा ते निळी फौज लाल सलामच्या मागे उभी करु शकले असते... पण ते जमलं नाही... मग ढसाळांचं लाल चलवळीच्या दृष्टीनी मुल्य शुन्य... ढसाळाच्या खांद्यावरुन आंबेडकरी समाजाची शिकार करण्याची स्वप्न उध्वस्थ झाल्यावर कम्युनिस्टानी ढसाळाना टांग दाखविली. मग परत एकदा ढसाळानी आंबेकरी चळवळीतुन आपलं गमावलेलं स्थान मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी केली पण बाबासाहेबांच्या विचाराशी एकदा फारकत घेतली की त्याला चळवळीत स्थान नसते हे जनतेने दाखवुन दिले. त्यामुळे पुढची हयात समाना सारख्या दलित विरोधी शिवसेनेच्या दैनिकांतून स्तंभ लिहण्यात गेली.
  CONT.................

  ReplyDelete
 3. ढसाळ खरंतर एक दर्जेदार कवी नि साहित्यिक होते. त्यांच्या लेखणीतून उतरणारा प्रत्येक शब्द मनाचा वेध घेणारा तर कधी प्रस्थापित विचाराना सुरुंग लावणारा... कधी झोपलेल्याना गदागदा हलविणारा तर कधी कल्पनाविलासाच्या डोंगराना उध्वस्थ करणारा. आजवरच्या मराठी किंबहुना भारतीय साहित्याला एका वेगळ्या उंबरठ्यावर नेऊन उभं केलं ते ठसाळाच्या कवितेनी. आजवरचे सगळे प्रस्थापीत समिकरणाना छेद देत साहित्याला नव्या दिशा दिल्या त्या ढसाळानी... साहित्यिक ढसाळाची कुवत एवढी की साहित्याच्या साचेबद्द सीमा तडातडा तुटल्या. आजवर बंदिस्त असलेल्या साहित्यानी मोकळा श्वास घेत अभिजनांच्या मोजपट्टीला बाद ठरवत स्वत:ची साहित्यिक मोजपट्टी निर्माण केली. त्या मोजपट्टीने मुल्य ठरविलं जाऊ लागलं. पुढे या नव्या मोजपट्टीतल्या साहित्यात भर पडत गेली ती ढसाळांमुळेच. त्यानी मराठी साहित्याला नवा चेहरा नि विचार दिला. संत तुकारामा नंतर विद्रोहाचा उद्रेक कवितेतून उतरविण्याचा खरा प्रयोग जर कुणी केला तर तो ढसाळानी. तुकारामा नंतर विद्रोही काव्य लिहणारे आजवरचे एकमेव महान कवी म्हणून ज्याना गौरवावं असं व्यक्तीमत्व म्हणजे नामदेव ढसाळ. ज्यांच्या काव्यातून उद्रेक उसळतो ते म्हणजे ढसाळ.
  पण हाच साहित्यिक ढसाळ राजकारणाच्या व संघटनात्मक चळवळीच्या मैदाना मात खातो... बाबासाहेबांचा विचार व कार्ल मार्क्सचा विचार या दोन विचाराना एकत्र जोडुन एक नवा प्रयोग करण्याच विचार ढसाळाना भोवला व नेता ढसाळ सपाटून आपटला तो कायमचाच.
  दोन बापांचा वारसा त्याना महागात पडला हेच खरे.
  आज ज्यांचा मृत्यू झाला ते आंबेडकरी चळवळीने नाकारलेले कम्युनिस्ट व कन्फ्युज्ड नेतृत्व होते व चळवळ्या म्हणून ज्याची ओळख फार पुर्वीच मिटली अशी व्यक्ती होय. आता काही अर्ध-शहाने आमचा नेता गेला म्हणून उर बडवत आहेत ते केवळ अज्ञानामुळे...

  तरी एक महान कवी नि साहित्यिक म्हणून उभा देश त्याना अनेक वर्ष हृदयात जपेल हे ही तेवढच खरं.
  --------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  ReplyDelete
 4. पंढरीचा पांडुरंग भगवान बुद्धच!
  -विशू काकडे

  पंढरीचा पांडुरंग हा प्रत्येकाला आपला वाटत आला आहे. मग याच मातीतले संस्कार पचवणारे बौद्धधर्मीय त्याला अपवाद कसे असणार. पंढरपूर हे बौद्ध तीर्थक्षेत्र असल्याचे दावे ऐतिहासिक संदर्भ आणि खुद्द संतकवींच्या रचना यांच्या आधारे नेहमीच केले जात आहेत.
  ...............................

  गेली अडीच हजार वर्षे भगवान बुद्ध आपणा भारतीयांचा मार्गदर्शक राहीला आहे. त्याच्या प्रभावापासून त्याच्या कडव्या विरोधकांनाही कधी मुक्त होता आले नाही. बुद्धाची तात्त्विक उसनवारी करीतच त्यांना आपला प्रपंच प्रतिष्ठित करावा लागला. इतकंच नव्हे तर भगवान विष्णूच्या दशावतारांचा इमलाही त्यांना बौद्ध सिद्धांताच्या पायावरच उभारावा लागला. त्यांनी बुद्धाला विष्णुचा अवतार मानले आणि त्यांनीच बुद्धाला शिव्याशापही दिले. इतिहासात इतिहासात बुद्धासंतांवर शस्त्र-शास्त्रांच्या माध्यमातून अनेकदा आक्रमणं झाली. पण ती सर्व आक्रमण पचवून बुद्ध जगभर पसरला. भारताला गौरवांकित केले. बुद्धाच्या हयातीतच महाराष्ट्रात बुद्ध धर्माचे आगमन झाले होते. त्यानंतर पंधरा-सोळाशे वर्षे तो इथे बहरत होता. त्याच्या तात्कालीन वैभवाच्या शिल्पखुणा महाराष्ट्रातील प्रत्येक पर्वतराजी उरीपोटी बाळगून आहे. बौद्ध धर्माच्या इतिहासात महाराष्ट्राची कामगिरी अत्यंत भूषणास्पद आहे. सांप्रत भारतात जवळपास १२०० बौद्धलेणी आहेत. त्यातील ७०० पेक्षा जास्त लेणी एकट्या महाराष्ट्रात आहेत. काही लेण्यांवर बौद्धेतर कब्जा करुन बसले आहेत तर काही बौद्ध विहारांचे मंदिरात रुपांतर करण्यात आले आहे. पंढरपूरचे विठोबाचे मंदिर हे त्याचे एक उदाहरण आहे.

  इसवी सनाच्या आठव्या शतकातील पुराणींनी बुद्धाला विष्णूच्या दशावतारात स्थान दिले. महाबलीपूरम येथील एका शिलालेखात बुद्ध विष्णूचा नववा अवतार असल्याचे लिहिलेले आहे. हा शिलालेख आठव्या शतकातील आहे. वेरुळ येथील दशावतरांची लेणीही आटव्याच शतकातील आहे. आर. सी हाजरा विष्णूच्या दशावतारांची निश्चितक्रम परंपरा (मत्स्य ते कल्कि) आठव्या शतकापासूनच सुरू झाल्याचे सांगतात. आठव्या शतकातील राष्ट्रकूट - चालुक्य राजवटीतील एका शिलालेखात त्याचा मराठीत अर्थ होतो. ' टेकडीवरचा पांडुरंग ' असा उल्लेख आहे. यावरुन पंढरपूरचा विठ्ठल पांडुरंग म्हणून आठव्या शतकापासून ओळखिला जात असावा असे वाटते. परंतु या पांडुरंगाला अत्यंत लोकप्रिय केले ते मात्र मध्ययुगीन मराठी संतकवींनी. त्याला कारणही तसेच बलवत्तर होते !

  भारताचा मध्ययुगीन इतिहास हा परकीय आक्रमकांचे भयानक हल्ले, कत्तली, त्याबरोबरच धार्मिक आणि सांस्कृतिक विनाशाचा इतिहास आहे, हे काही अंशी खरे आहे. तरी त्यामुळेच आक्रमकांच्या मुळे का होईना, सनातन्यांनी चालविलेल्या कर्म छळाला शह बसला होता. म्हणूनच भारतीय इतिहासातील सध्यकाळ मूलतः पतन काळ होता, असे म्हणता येत नाही. कारण याच मध्ययुगात संतकवींनी उभी केलेली भक्ती चळवळ ही एक युगांतकारी घटना होती. महाराष्ट्रात या चळवळींचे नेतृत्त्व ज्ञानेश्वर - ज्ञाती बहिष्कृत ब्राम्हण (१२२९-७२), नामदेव- शिंपी (१२७०-१३५०), एकनाथ- ब्राम्हण (१५३३-९८), तुकाराम वाणी (१५२९-७२), नरहरी - सोनार, सावता - माळी, गोरोबा - कुंभार, सेना - न्हावी, चोखोबा - महार, शेख महंमद - मुसलमान, तुकाराम शिष्या बहिणाबाई - ब्राम्हण आणि कान्होपात्रा - नर्तकी इत्यादींनी केले. काही अपवाद वगळता हे सर्वच संतकवी बहुजन समाजातील होते. वरील सर्वांनाच सनातनी अत्याचारांच्या अनुभवातून जावे लागले होते. चातुर्वर्ण्य ब्रम्हाने वा कृष्णाने निर्माण केले असेल पण म्हणून का स्त्री, शूद्र, अतिशूद्रांना गुराढोरांसारखे वागवायचे ? आम्हालाही माणसांसारखे वागवा असा संतांचा आग्रह होता आणि तो त्यांनी चातुर्वर्ण्याच्या चौकटीत राहूनच व्यक्त केला !

  तरीही ब्रम्हवृंदांचे वर्चस्व असलेली धर्मसत्ता पाझरली नाही. शेवटी माणुसकीला पारखी झालेली बहुजन जनता पांडुरंगाला शरण गेली. त्यांची समतेची आणि ममतेची भूक करुणासागर पांडुरंगाने भागविली. तेव्हापासून संतांचा - भक्तांचा मेळा पांडुरंगाभोवती गोळा होऊ लागला. या करुणाकराची करुणा भाकताना भक्तांनी भगवंतांला कधी ' माऊली ', कधी ' बा ' तर कधी ' राया ' म्हणून पुकार केला. भगवंताचा आणि भक्तांचा हा सोयर संबंध आता एका विशाल संप्रदायात परिणाम झाला आहे. भगवंताचे दारी पंढरीची वारी करण्यासाठी भगवंत आणि भक्त वारकरी पंढरपूरी मोठ्या श्रद्धेने येत असतात. शेकडो वर्षांपासून चालू झालेला हा जनाचा प्रवाह आज बहुजनांची वहिवाट झाली आहे.

  आज पंढरीची वारी करणारे वारकरी पांडुरंगाला विश्वरुप मानत असो वा शिव रुप मानत असोत वा विष्णू शिवाचे एकात्म रुप मानत असोत. पण संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज मात्र पंढरीच्या पांडुरंगाला बुद्धरुपच मानत होते. CONT............

  ReplyDelete
  Replies
  1. खरा इतिहास माहित नाही कारण ???? तो कोणी नष्ट केला ???

   Delete
 5. एकनाथ महाराज आपल्या अभंगात म्हणतात.

  लोक देखोनी उन्मत्त वारानी आसक्त ।
  न बोले बुद्धरुप ठेवीले जयनी हात ।।
  संत तया दारी तिष्ठताती निरंतरी ।
  पुंडलिकासाठी उभा धन्य धन्य विठ्ठल शोभा ।
  बौद्ध अवतार घेऊन विटे समाचरण ठेवून ।।
  धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी ।
  या लागे बौद्धरुपे पंढरी नांदसी ।।

  संतशिरोमणी तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात

  बौद्ध अवतार माझिया अदृष्टा ।
  मौन्य सुखे निष्ठा धरियेली ।।

  वरील अभंगावरुन संतश्रेष्ठ विठ्ठलालाच बुद्धरुप मानत होते हे स्पष्ट होते. संत साहित्यावर बौद्ध मताचा प्रभाव का आहे, याचे उत्तर या अभंगात आहे. मराठी संत कवींच्या उदयापूर्वीच महाराष्ट्रात बौद्धधर्माचा - हास झाला होता तरी बुद्धसंत मात्र बहुजन मानसात तग धरुन होते म्हणूनच संत साहित्यातून ते अभिव्यक्त झाले.

  मा. शं. मोरे आपल्या महाराष्ट्रातील ' बुद्धधम्माच्या इतिहास ' या ग्रंथात मानतात. महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा लोप झाल्यावर अनेक बौद्ध विहार, लेणी, बौद्ध धार्मिक स्थळांचे हिंदुकरण करण्यात आले. एकनाथ, तुकाराम हे संतश्रेष्ठच जर विठ्ठलाला बुद्धरुप मानतात तर मग पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बौद्धांचा विहार होता. हे सिद्ध करण्यासाठी आणखी पुराव्याची गरज काय ? सुप्रसिद्ध पाश्चात्त्य पंडित जॉन विल्सन आपल्या ' मेमॉयर ऑफ दी केव्ह टेंपल ' या ग्रंथात पंढरपूरचे विठठ्ल मंदिर बौद्ध असल्याची साक्ष देतो.

  या मंदिराच्या सभामंडपातील दगडी खांबावर ध्यानस्थ बुद्धाच्या कोरीव मुर्ती असले, वारकरी संप्रदायात प्रवेश करताना जी शपथ घेतली जाते ती बुद्धाचे पंचशील असणे. वारकरी संप्रदायातील लोकांनी निदान पंढरपूरपुरतं तरी जातिबंधनं, श्रेष्ठ - कनिष्ठता न पाळणे. कारण, जातिभेद नष्ट करणे ही बुद्धाची शिकवण आहे. पंढरपूरची यात्रा आषाढी पौर्णिमेस करणे कारण त्यादिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्खुंना पहिले प्रवचन देऊन धर्मचक्र प्रवर्तन केले होते. CONT..............

  ReplyDelete
 6. बुधवारच्या दिवशी पंढरपूर न सोडणे, विठ्ठल पितांबरधारी असणे कारण बुद्धाने स्वतःसाठी व भिक्खुंसाठी पिवळे व वस्त्र धारण करण्याचा नियम केला होता. याच ग्रंथात मोरे यांनी वासुदेव गोविंद आपटे यांच्या ग्रंथातील मजकूर उद्धृत केला आहे. त्यात ' विठोबाची मूर्ती खडकावर खोदलेल्या बुद्धमुर्ती, याच्या स्वप्नातील सदृश्य व विठोबा - रखूमाई यांची पृथक पृथक मंदिरे असणे, गोपाळकाल्याच्यावेळी जातीभेदाला फाटा देणे या गोष्टी सांप्रदायिक पद्धतीला सोडून आहेत. यावरुन हे क्षेत्र मूळचे बौद्ध असावे. बौद्ध धर्माच्या -हासानंतर बामण धर्माने त्या मूळच्या बौद्ध धर्माच्या आपल्या धर्मात समावेश करुन घेतला परिस्थितीजन्य पुरावा पहाता आजचे विठ्ठल मंदिर हा बौद्धांचा विहार होता त्याचे हिंदूकरण करण्यात आले हा त्यांचा निष्कर्ष अगदी योग्य आहे.

  डॉ. आ. ह. साळुखे (सर्वोत्तम भूमिपुत्रः गोतम बुद्ध) यांनी डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या ' श्री विठ्ठल महासमन्वय ' या ग्रंथातील काही वाक्य उद्धृत केली आहेत. डॉ. ढेरे लिहितात ' मराठी संत साहित्यात विठ्ठल हा बुद्ध असल्याची धारणा जशी वारंवार शब्दात प्रकट झालेली आहे तशीच ती महाराष्ट्रात चित्र आणि शिल्प या माध्यमातूनही प्रकट झाली आहे. महाराष्ट्रात शिळाप्रेसवर पंचांगे छापली जाऊ लागल्यावर दिर्घ काळपर्यंत पंचांगांच्या मुखपृष्ठावर नवग्रहांची अथवा दशावतरांची चित्रे छापीत असत. या दशावताराच्या चित्रात नवव्या अवताराच्या स्थानी सर्वत्र न चुकता विठ्ठलाचे (एखाद्याचे अथवा रुक्मिणीसहीत) चित्र छापलेले दिसते. आणि त्याबाबतीत आपल्याला कसलीही शंक उरू नये, म्हणून त्या चित्रावर बुद्ध वा बौद्ध असे नावही छापलेले आठवते.... दशावतारातील बुद्धाच्याजागी विठ्ठल असल्याची दोन तरी शिल्पे मला माहीत आहेत. एक तासगाव (जिल्हा सांगली) येथे विंचूरकरांनी बांधलेल्या दक्षिणी शैलीच्या गणेश मंदिराच्या गोपूरावर आहे आणि दुसरे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या प्रकारातील एका ओवरीत आहे. जानोबा-तुकोबांनी ज्या इंद्रायणीच्या प्रवाहातून वैश्विक करणेचा महापूर महाराष्ट्रभर पसरविला. त्या इंद्रायणीचा उगम तथागताच्या करुणामय जीवितातून स्फूर्ती घेणा-या असंख्य भिक्षुंच्या निवासभूमीत झाला आहे, हे सत्य सहजी डावलता येण्यासारखे नाही.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपली पत्नी रमाबाईची पंढरीला जाण्याची इच्छा पूर्ण करता आली नाही. पण बौद्धाची स्वीकारापूर्वीचे त्यांच्या मनात पंढरीच्या विठ्ठल बुद्धरुपच असल्याचे पक्के झाले होते. आपल्या एका भाषणात त्यांनी ' पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती ही वस्तुतः बुद्धाची आहे. आणि या विषयावर मला एक प्रबंध लिहायचा आहे. तो पूर्ण झाल्यावर पुणे येथील भारत संशोधन मंडळाच्या पुढे मी तो वाचणार आहे. विठ्ठलाचे पांडुरंग हे नाव पुंडलिक या शब्दापासून बनलेले आहे. पुंडलिक म्हणजे कमळ आणि कमळालाच पालीमध्ये पांडुरंग म्हणतात. म्हणजे पांडुरंग दुसरा कोणी नसून बुद्धच होय. ' मार्च १९५५मध्ये त्यांनी या विषयावर प्रबंध लिहायला सुरुवातही केली होती. परंतु पुढे हा प्रबंध अपुराच राहीला अशी नोंद त्यांचे चरीत्रकार धनंजय कीर यांनी केली आहे.

  संत शिरोमणी एकनाथ - तुकाराम यांनी विठ्ठलाला बुद्धरुप मानले आहे. विद्वानांनी विचारवंतांनी त्याला पूरक असे संशोधन केले आहे. त्याचा निष्कर्ष पंढरीचा पांडुरंग भगवान बुद्धच आहे याची खात्री पटविणार आहे.
  .......................................................................................................

  ReplyDelete
 7. संजय सर ,
  नामदेव ढगाळ यांची कविता आपण ब्लोगवर टाकून जे औचित्य दाखवले त्याबद्दल आभार
  ढगाळ याच्या कविता अर्थपूर्ण होत्या- विचार प्रगल्भ आणि रसरशीत होते
  त्यांना राजकारणात बळीचा बकरा करण्यात आले
  आज जर ते कार्यरत राहिले असते तर त्यांनी अनेक कविता लिहून समाज क्रांती केली असती
  डॉ आंबेडकर यांचा वारसा चालविण्याची भाषा करणारे सत्ताधारी वर्गाच्या विळख्यात अलगद सापडतात - कोण आहे हा सत्ताधारी वर्ग ? ब्राह्मण , मराठा का माळी ?
  नामदेव ढगाळ यांची कम्युनिस्ट सलगी मान्य करून समजा रिपब्लिकन पार्टीने त्याना नेता मानत जर राजकारण पुढे नेले असते तर चित्र बदलले असते
  नामदेव ढगाळ याना भावपूर्ण सलाम

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks. Hi kavita Namdeo Dhasalanchi nahi...majhi ahe. Dhasal he mahan kavi hote. Tyanna vinamra shraddhanjali!

   Delete
 8. नामदेव धसाळ यांची खाजगीत आणि प्रकट मागणी ऐकिवात होती की
  नोटेवर म गांधींच्या जागी बुद्ध प्रतिमेला स्थान दिले जावे
  त्यामुळे भारताची प्रतिमा जगभर उंचावेल असे ते नेहमी म्हणत असत
  त्यांनी शिवसेनेत जाण्याचे पाप कधीच केले नाही इतके तरी आठवले आणि मंडळी लक्षात घेतील का ?
  राहुल खेडकर

  ReplyDelete
 9. प्रथम नामदेव ढसाळ याना श्रद्धांजली वाहून नंतर संजय सोनवणी यांचे अभिनंदन करते
  संजय सर आपण हृदयाचा वेध घेणारे शब्द निवडले आहेत - अगदी थेट ढसाळ
  यांची आठवण येईल इतके !
  ज्या कुणी आधी बरेच रकाने खर्च करून नामदेव ढसाळ यांचे मूल्यमापन केले आहे ते कितीही योग्य असले तरी समयोचित नाही हे अगदी सर्वांचा मान राखून सांगावेसे वाटते ! इथे कुणाचाही अवमान करायचा हेतू नाही !
  कुणी कितीही तथाकथित वाईट असला ,मार्ग चुकलेला असला तरी त्याच्या मृत्यू नंतर असे लेख लिहिणे हे आपल्या भारतीय संस्कारात बसत नाही - जागतिक परिभाषेत तर याला असंस्कृत पणा समजतात हे पण नमूद केले पाहिजे - अगदी लालू प्रसाद किंवा शिवसेना नेते पण अशी भाषा वापरणार नाहीत ! !
  परवाच " आप " च्या मंत्र्याने मुलाखतीत बलात्कार झालेल्या मुलीचे नावच सांगून अशीच एक अलिखित सामाजिक परंपरा मोडली - अशा गोष्टीत काहीच शौर्य नाही - नामदेव ढसाळ कसे होते किंवा ते जेथे होते तिथेच कायमचे कसे थांबले - त्याची कारणे सर्वांनाच माहित आहेत - आत्ता त्याचा काथ्याकुट करण्याची ही जागा नाही असे सांगावेसे वाटते - मतभेद दाखवायची ही वेळ नाही - असो
  संजय सराना हे मान्य असेल असे गृहीत धरते - -
  उत्तम कवी हा उत्तम नेता होईलच असे नाही -
  लेखक कवी , नाटककार आणि समाज कारणी तसेच राजकारणी यांच्यात हा वाद असाच अनेक शतके चालला आहे - अगदी विदुर - दुःशासना पासून -हा फरक अपरिहार्य आहे . कविमनाचा माणूस अलगद बळीचा बकरा बनतो आणि एकदा का पाय घसरला की सर्वस्व गमावून बसतो - नेमके हेच घडले -
  आणि गुण दोषांच्या बेरीज वजाबाकीत ढसाळ आपले स्थान निर्माण करण्यात कमी पडले -असो - दुसऱ्या शिकावे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी माझ्यावर टीका होईल कारण मीही नकळत तेच करू लागले - दिवंगत माणसावर टीका - क्षमस्व !
  परत एकदा या श्रेष्ठ कवीला वंदन !-
  -
  जाता जाता एक विचार मनात येतो की डॉ बाबासाहेबांनी जी ज्योत पेटवली , त्यातून अनेक रूपांनी असे जाज्वल्य लिखाण , विचार ठिणगीसारखे बाहेर पडले पण -
  संघटना कौशल्य नसल्यामुळे सगळे श्रम विस्कळीत झाले -आणि हा विचार ब्राह्मण द्वेषापुरताच तेवता राहिला - त्याला विधायक स्वरूप देण्यात नव बौद्ध समाज कमी पडला हे सत्य नाकारता येत नाही !-द्वेषातून समाजकारण होत नसते हेच त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले -
  हिंदू महासभेने कोन्ग्रेस द्वेष करून स्वतःचे नुकसान करून घेतले आणि या चळवळीने ब्राह्मण द्वेष करून स्वःताचे नुकसान करून घेतले -सत्ताधारी वर्गाचा मात्र विजय झाला !
  हेच राजकारणाचे कौशल्य म्हणता येईल - ज्याना ब्राह्मण द्वेष पेटता ठेवून आपली पोळी भाजायची होती त्यांनी अगदी हसत हसत या धर्मांतराची खिल्ली उडवत या चळवळीचा शेवट केला - या धर्मांतराची हि फार मोठी शोकांतिका आहे - शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची जशी ज्योत पेटवली आणि ती पुढे दोनशे वर्षे वेगवेगळ्या रुपात तेवती राहिली तसे या लढ्याचे झाले नाही !
  महाराजांनी सगळ्याना एकत्र ठेवत , योग्य श्रमाची आणि कौशल्याची वाटणी करत स्वातंत्र्याची पालखी पुढे नेली - अठरा पगड जातीनी भोई म्हणून आनंदाने त्या पालखीला उचलले - अगदी ब्राह्मणापासून न्हावी महारापर्यन्त सर्वांचा हातभार लागला - आणि महाराजांनी सुद्धा कुणाचाही द्वेष केला नाही -त्या काळात तर जातिभेद परमोच्च स्थितीला होता तरीही !

  ReplyDelete
  Replies
  1. Sahamat. Kitihi matbhed asale tari vyaktichya janyanantar phakt changale rahile te smarave! Dhasal he mahakavi hote ani tech chirantan tiknar ahe. Tyanche baki rajkiy bhale-bure yash-apayash yachi chikitsa nantar karata yeil...hi vel navhe!

   Delete
 10. सर,
  अभिनंदन !

  विठ्ठल हे एक निमित्त म्हणून वापरून आपण सर्व समाजाची व्यथाच या कवितेत मांडली आहे
  सरकारने आत्ता त्या पुजारी वर्गाच्या पाशातून मुर्तिपूजेला सोडवले असे म्हणूया !
  सर्व महत्वाची मंदिरे याबाबत एकसारखीच आहेत कुणी त्याला काही म्हणोत - पण हे मंदिरांचे रखवालदार काही रूढी आणि प्रथा निर्माण करतात - आपले पोट भरायला - आणि त्याचा इतका गवगवा करण्यात त्यांच्या इतकाच भक्तांचा पण दोष आहेच असे सांगावेसे वाटते -
  महाराष्ट्रातील श्रद्धास्थाने पाहिली की मन उद्विग्न होते -

  शिरडी , शेगाव,अक्कलकोट,गोंदवले येथील अलीकडची गर्दी पाहिली की वेड लागायची वेळ येते - सगळीकडे एकच ठराविक पद्धती रूढ आहे-४० वर्षांपूर्वी असे नव्हते -
  आरती ,आणि दर्शनानंतर प्रसादाचे जेवण हा तर अत्यंत विनोदी भोंगळ प्रकार पहायला मिळतो समाजाच्या इतक्या श्रद्धा कशा बसतात हे एक कोडेच आहे - ३० वर्षांपूर्वी या सर्व ठिकाणी एक निरामय शांतता होती - शुकशुकाट होता - शनि शिंगणापूर तर ओसाड होते -
  जसजशी समाजात समृद्धी वाढत गेली तसतसे या सन्स्थानाना भरभराटीचे दिवस आले - हाच नियम जर इतर पुरातन देवस्थानाना लावला तर यातील व्यवहार समजायला सोपे जाईल -

  लोकसंख्या आणि छापील लेखनाचा प्रभाव - याचा हा परिणाम असेल -पूर्वीची पिढी पाठकोरे कागद सुद्धा जपून वापरत असेल आता कागद आणि इतर गोष्टींची चैन चालते - हेच सूत्र देव आणि धार्मिक उलाढालीला लागू होते -एकवीरा देवी असो किंवा दगडूशेठ वा सिद्धिविनायक- यांचे प्रस्थ हा मनाला क्लेश देणारा प्रकार आहे -समाज-लोकसंख्या आणि अस्तित्वातील मंदिरांची अपुरी संख्या - आणि
  वाढते टुरिझम चे प्रमाण यामुळे लोकांच्या हिंडण्याचे प्रमाण अतोनात वाढले आहे - समाजातील प्रत्येक वर्ग आपला स्वार्थ साधण्यासाठी याला प्रोत्साहनच देत असतो-आणि गणपती दुध पितो म्हणणारे मुख्यमंत्री असल्यावर असल्या तकलादू भक्तीमार्गाला उधाण आल्यास नवल नाही-

  देवालायाना मोठ्ठे दरवाजे असणे हे खरेतर आवश्यक आहे - पण आजही देवाला लपवल्यासारखे ठेवून रांगा लावायच्या हि दर्शनाची पद्धत आजही एजंट लोकाना वाव निर्माण करत असते - मग गळ्यात जानवे असो वा नसो - वृत्ती एजंटचीच असते -रागाच्या भरात कुणी त्याना भाडखाऊ म्हटले तर ते त्यांनी सहन केले पाहिजे इतके कधीकधी लोकमत त्यांच्या विरुद्ध प्रक्षुब्ध होते

  आपण आपापल्या घरात शांतपणे ध्यान धारणा करणे महत्वाचे आहे - अशी दगदग करून आणि देवाकडे मागणे मागत हिंडण्यात कोणते औचित्य असते हेच समजत नाही - आणि असे अतृप्त आत्मे आणि देवाची दुकाने उघडून बसलेले एजंट यांच्या मध्ये तुम्ही तुमचे तत्वज्ञान सांगायला लागलात तर तुम्हीच वेडे ठरता -
  अंधश्रद्धा वगैरे तर फारच पुढच्या गोष्टी झाल्या !
  मला सगळे सुख हवे आणि हमखास हवे - या ध्यासापोटी हे घडते हे उघड आहे !
  यालाच भक्ती म्हणतात का हे प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारले पाहिजे -
  तुळजापूर असो , कोल्हापूर असो , अष्ट विनायक असो वा १२ ज्योतिर्लिंगे असोत साचा ठरलेला आहे - मागणे एकसारखेच आहे - एकदातरी आपण हा विचार करुया - !
  आपण मानसिक शांती शोधत आहोत का ? - आपली ऐहिक सुखाची गाऱ्हाणी आपण देवासमोर नेत आहोत ?ह्याला कोणती भक्ती म्हणायचे ?
  आणि अशा मागण्या करणाऱ्या लोकाना असे एजंट - बडवे म्हणा - भडवे म्हणा - भेटले तर मग त्यात तक्रार कोणी कशाची करायची ?आणि दोष तरी कोणाला आणि का द्यायचा ?
  आपल्या श्रद्धा आणि आपली वृत्ती आपण तपासून पाहुया - खरच एकाही आधुनिक संत महन्ताचि आणि देवालयाची तुम्हाला गरजच नाही हे तुमच्या लक्षात येईल !
  या बदव्याञ्चा माज उतरवण्याला स्वयंप्रकाशित प्रज्ञेला जागृत करणे आवश्यक आहे - नुसते कायदे काहीही कामाचे नाहीत !

  ReplyDelete
  Replies
  1. Khare aahe. Apana sarvannach tyasathi prabodhan karat rahave lagel. Parmeshvar jar sarvatra ahe tar mandire kashala...ani asali tari konatahi madhyasth kashala? Devala Dan dene mhanaje srushti nirmatyala bhik denyasarakhe ahe...ha murkhapana ahe...tyapeksha garajunna madat karavi...he shikvave lagel!

   Delete
 11. बडव्यांची एकाधिकारशाही संपल्यावरच अचानक देवालयांची गरज नसल्याचा साक्षात्कार कसा काय झाला बुवा?

  ReplyDelete
  Replies
  1. खरेतर आता आपल्याकडे इतके नवनवीन संशोधन झालेले आहे - वित्थाल मंदिर हे बुद्ध मंदिर आहे - त्यामुळे तिथे जवळच डॉ आंबेडकर यांचा पुतळा गरुड खाम्बाशेजारॆ उभा करावा - नाहीका ?बुद्धाला तुळशी आवडत नाहीत म्हणून त्यांचा वापर पांडूरंगाच्या आवारात करणे हा धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा समजावा
   शीतल शिरोळे

   Delete
  2. आम्ही तथाकथीत रेकोर्ड पुरते ब्राह्मण असूनही आमचा बडव्याना विरोध आहे
   आम्ही कधीही देवळात जात नाही -देवासमोर आज पर्यंत एकही पैसा ठेवला नाही मागितले नाही
   देव काहीही देत नाही आणि हिरावून घेतही नाही देव
   ही एक सुंदर कल्पना आहे - आईचा जसा मुलाला धाक असावा तसेच समाजाला हा प्रेमळ धाक आहे असे मानूया -पूर्वीच्या काळी सबलांच्या कडून अबलांवर अन्याय होऊ नये आणि नैतिकता टिकून शासन करणे सोपे व्हावे म्हणून या कल्पनांची निर्मिती झाली असावी असेपण म्हणता येईल - नीट वापरली तर हि कल्पना समाज अभ्युदायाला पूरक ठरू शकते - ती जर घातक ठरू लागली आणि अगदी उच्च ब्राह्मण वर्ग सुद्धा त्याचा गैरवापर करू लागला आणि स्वार्थ साधू लागला तर देव आणि मंदिरांना काहीच अर्थ नाही -
   ब्राह्मणांनी देवळे आणि मंदिरे यातून स्वार्थ साधला आहेच !
   ती नष्ट झालेली अधिक चांगले - पण त्याच वेळी नवीन मंदिरे होणार नाहीत हेपण पाहिले पाहिजे
   देवाचा कोप होईल हे वाक्य त्या अर्थाने घेतले तर समजते -खरेतर तसे काहीही नसते - नाहीतर
   जेजुरी , पर्वती अशा देवळात चोऱ्या झाल्याच नसत्या -
   जेजुरी ब्राह्मणांच्या ताब्यात आहे का ?
   तुळजापूर कोणाच्या ताब्यात आहे ?
   मंदिरातील देव आणि देवता स्वतःचे रक्षण करायला असमर्थ आहेत -
   आपल्याला इतका वेळ का लागतो हे समजायला की देव अजिबात असूच शकत नाही ?
   आपण ब्राह्मण नालायक आहेत हे पटकन म्हणू शकतो पण
   देव हि फसवाफसवी आहे असे आपण का म्हणू शकत नाही - आपली जीभ का रेटत नाही ?
   जे खोटे आहे ते नष्ट करायला आपण घाबरतो का ?
   ब्राह्मणांचे ब्राह्मणत्व खोटे आहे म्हणून त्यांचा द्वेष करायचा आणि त्यांनी आज पर्यंत बळकावलेले देव हे खरे हे कसे काय ?अहो देवपण ब्राह्मणाना सामिलच असे कसे तुमच्या डोक्यात येत नाही ?
   सगळ्यांनी मिळून आपापल्या घरापासून सुरवात करा !
   आजपासून आम्ही कोणत्याही देवाचा जन्मदिन साजरा करणार नाही असे ठरवा - गोकुळाष्टमी रामनवमी हनुमान जयंती दत्त जयंती -एकादशी गुरुपौर्णिमा चतुर्थी आणि महाशिवरात्र काहीही नाही -! नवरात्र नाही -गणेश चतुर्थी नाही -
   आधी देव हि खुळचट कल्पना - त्यात परत देवांच्या आणि वार आणि तिथी यांच्या वाटण्या - हा बावळट पणा आपल्याला कळत का नाही ?
   आशुतोष

   Delete
  3. देवासमोर आज पर्यंत एकही पैसा ठेवला नाही --- कारण देव भिकारी नाही . भिक देणारा भिक घेणाऱ्या पेक्षा श्रेष्ठ असतो. ब्राह्मणांनी कधीही स्वतः देवळे उभा रली नाहीत देवळे क्षत्रियांनी उभारली . राम हा ब्राह्मणांचा नाही तर क्षत्रियांचा पितृदेव म्हणजे बापाजादा आहे तसेच कृष्ण हा यादवांचा बापजादा आहे ब्राह्मणांचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही ते केवळ क्षत्रियांच्या इच्छेनुसार पूजा करतात.

   Delete
 12. बरे झाले "तुम्ही खरे तेच बोललात" ना गरज आहे देवांची, ना देवालायांची, ना भट-ब्राह्मण पुजारांची अर्थात स्वयंघोषित पृथ्वीवरील एजंटांची................

  ReplyDelete
  Replies
  1. now since it is discovered that the pandharpur temple is a buddh vihaar , then please stop the ekaadashi sarakaaree puja off paandurang by the chief minister of maharaashtraa

   Delete
 13. छापून आले आहे ते पाहिले की वाटते - किती लूट चालली होती देवाच्या नावावर !
  आता तुळजापूर ,कोल्हापूर याठिकाणी मोर्चा वळवून तिथेपण अशीच कारवाई करावी
  मुंबई आणि पुण्याची गणपतीची मंदिरे आता सरकारी करावीत -कारण तिथे पैसा खूप आहे आणि गैर व्यवहार्पन माजला आहे -संपूर्ण पंढरपूर चे नव्याने रस्ते आणि इतर सुधारणा करण्याची ताकद आहे या मंदिराच्या उत्पन्नात - चलातर - आता शेजारीच एक भव्य विहार बांधला तर बौद्ध लोकाञ्चिपन सोय होईल - दरम्यान कुणी मुसलमानाने शोध लावला की विठ्ठलाचे मंदिर हा पीर किंवा दर्गा होता तर अजूनच धमाल !
  आपण घाई करुया -
  इथेच जर एकत्र बुद्ध विहार मशीद आणि मंदिर एकाच प्रांगणात झाले तर सर्व ब्राह्मण जातीचा कचरा होईल आणि सर्व धर्म समभाव पण होईल -
  आता त्यानंतर तुळजापूर - देवळात जातानाच एक भव्य डॉ आंबेडकर पुतळा आणि बौद्ध विहार झालाच पाहिजे -आणि बुद्धाची आरती केली की नाही त्या नामदेव धसाळानी ?देवीच्या आरती बरोबर हि आरती झालीच पाहिजे -
  नंतर कोल्हापूर -
  जमले कि मस्तच !
  कोल्हापुरला तर नमाज पधायला भरपूर जागा झाली आहे - दुकाने हलवली की !
  शुक्रवार नमाजाचा आणि देवीचा - गर्दी - सोलिड उत्पन्न !त्यातूनच तोल रद्द झाला कि मजाच !

  ReplyDelete
 14. नवीन कोणताही धर्म स्थापन करायची गरज नाही - कारण शीख , आणि इतर पंथ - धर्म यांचे काय झाले ?
  परत परत आपण ती चूक का करत आहोत ?-कुणाच्यातरी सांगण्यावरून का ?मग त्यांचे इंटरेस्ट आपण जपत आहोत - जपणार आहोत !शिवधर्म स्थापून असेल किंवा हिंदुधर्म मोडून असेल - वैदिक धर्म तुम्ही पाळत नाही तर ठीक आहे ना - कुणाचीही कशावरही बळजबरी नसावी - आशुतोष म्हणतो कि घरातील देवही नष्ट करा - हे जरा जास्तच होते आहे - आपली संस्कृती हि अतिशय सुंदर आहे यावर आपला विश्वास नाही का ?हरकत नाही संस्कृतीच अनावश्यक आहे जगण्याला असे पण आपले मत असू शकते -
  तुम्हाला जर वाटत असेल की विठ्ठल म्हणजेच बुद्ध तर तसे माना - काहीही माना - पण एक विचार करा त्याने काय फरक पडणार आहे ?- आता या सगळ्या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत असे वाटत नाही का ?
  सगळे विचार शेवटी आजकाल मार्केटशी गुंतले किंवा गुंफले जातात -सण -जयंत्या पुण्यतिथ्या - वाढदिवस -उद्घाटने ,निरोप समारंभ , धार्मिक सण सगळे आता व्यापार धंदा किती होईल त्या दृष्टीने पाहिले जात आहे -
  मनःशांती हा पण एक समाजाची गरज म्हणून मागणीतला प्रकार आहे आणि त्यावर मनःशांती पुरवणारे अनेकजण ठेकेदार आहेत या - घ्या आणि आनंदाने परत जा - देणगी द्या - सभासद व्हा !मग तो गुरु ब्राह्मणच पाहिजे असे नाही तो खात्री देणारा हवा - ब्रांड असलेला हवा - त्याचा मठ हवा- शिष्यवर्ग हवा - चेले हवेत - मंत्र हवा - संदेश हवा - असले प्रकार आपण ओढवत चाललो आहोत - आता हे दुष्टचक्र चालूच राहणार - तुमचा नवा धर्म मग तो शिवधर्म असो किंवा कोणताही संघटीत क्रांतिकारक विचार असो - आज त्याची बाजारात आणि राजकारणात - किंमत काय हा विचार होत राहणार - झेंडे हवेत , शेले पागोटी हवीत - घोषणा हवी -स्वप्न हवे - छापील लेखन हवे - फोटोची रेलचेल हवी - ब्राह्मणद्वेष पण असलाच तर छानच - नसला तर उच्च विचार हवेत -इंग्लिश भाषा असेल तर औरच !असा सगळा मामला आहे -
  एकीकडे कळकट्ट अंधारलेल्या गुहा , डोळे वटारलेल्या उग्र प्रतिमा , कोन्दटलेले धुपाचे आणि उद्बत्यांचे वास , नारळ आणि इतर बत्तासे हार यांचा चिखल असा पण एक उन्माद असतो - अंधाऱ्या जागेत ढकला ढकली , चेंगरा चेंगरी - आणि घामाघूम होऊन झालेल्या दर्शनाचे कृतार्थ भाव असा पण धर्म वाढत असतो - आणि अगदी एसी रूम मध्ये उच्च इंग्लिश प्रवचन आणि ध्यान धारणा अशीपण धर्माची धाटणी असते - सगळ्याला मार्केट आहे - आणि सगळे खपते - तिरुपती आहे , अयाप्पा आहे - शिरडी आहे - काली कलकत्तेवालि आहे - पांडुरंग आहे सगळे प्रकार आहेत - तुमचा धर्म हापण अनेकातील एक होऊन जाइल बघता बघता !आपणपण सामाजिक आणि वैचारिक क्रांतीची स्वप्ने बघून समाज जीवनात उडी मारतो आणि हळूहळू अनेकातील एक होत जातो त्या वेदना असह्य असतात - कधी कधी परिस्थितीच्या रेट्याने आपलि विचारांची धार बोथट होते आणि आपण भ्रष्ट होतो - निराशेपोटी आपण कशालातरी शरण जातो - फार वेदना देणारा क्षण असतो हा !
  मग आपल्याला आठवते आईच्या कुशीची उब आणि वडिलांनी दाखवलेले जगाचे दर्शन ,काही उत्कट क्षण आठवणीत साठवून आपण हळूहळू कालबाह्य होत जातो -

  ReplyDelete
 15. संध्याकाळी चावडीवर - पारावर , कोपऱ्या वर नाक्यावर चर्चा चालते तसा प्रकार चालू आहे - बरेच कानावर वेगवेगळे येत असते आणि बरेच नवीन शिकायला मिळते वाईट काय चांगले काय ते कळते किंवा पूर्वी मारुतीचा देवळात अशाच जागेवर रोज लोक जमत - एकमेकांचा दुस्वास हेवा न करता चर्चा रंगत असत -एकमेकाना सल्ले देत असत ,हवापाणी दाणागोटा अशा चर्चा झडत ,विचारपूस होत असे -
  आज त्याची जागा अशा ब्लोग ने घेतली आहे असे समजूया
  पण अशा पद्धतीत एक दोष दिसतो - प्रत्यक्ष नजरभेट न होता संवाद होत असल्यामुळे अनेकवेळा सभ्यतेची पातळी ओलांडली जाते - वडिलधारे जाब विचारणारे कुणीच नसल्यामुळे आओ जाव घर तुम्हारा असे होते आणि प्रक्षोभक वाक्यांची आतिषबाजी सुरु होते - जातीय विचाराना थोपवणारे कुणीच नसते - हे काम जर ब्लोग ओनरने बजावले तर अशी विकृती असणारे लोक आपल्या ब्लोग चा गैर वापर करणार नाहीत असे वाटते

  ReplyDelete
 16. कशाला असल्या कविता छापत बसता ?
  नुसते शब्दांचे बुडबुडे !
  नुसतीच शब्दांची फ़ितवाफ़िरव आणि भडक वाक्यांची अरेरावी

  अहो मला एकेक वाक्य घेत सांगा कोण निरो चौकाचौकातून माणसे जाळतो ? जुन्या बाजाराच्या चौकात किंवा रेल्वे पुलाखाली हातभट्टी पेटली आहे-दिव्याखाली जुगाराचा डाव रंगला आहे -

  भाकरी आणि पाणी यासाठी कुठे नांगर फिरतो आहे आज घरावरून - अनेक सेवाभावी संस्था आहेत इथे दोन वेळचे घास देत माणसाला जिवंत ठेवणाऱ्या ! तिथे गर्दीच गर्दी आहे !बाबांचा प्रसाद स्वामींचा प्रसाद -अशा नावाने अशा लोकाना जिवंत ठेवण्याचा उद्योग करत आजची क्रांती उद्यावर ढकलण्याचा उद्योग जोरात आहे आणि जग शांत आहे -

  कुणीही कुणाची नाकेबंदी करत नाहीये - सगळे निवांत आहेत -बाबासाहेबांच्या नावावर वस्तीतून सगळ्या सुविधा फुकट मिळत आहेत - घरपोच ! केजरीवाल स्वतः सांगत आहे -
  जुग्गी झोपडी को पानी मुफ्त !असा हा मुख्यमंत्री -
  रक्तात अजिबात सूर्य पेटलेला नाही आणि हे निर्ढावलेले लोक एकीकडे बाबासाहेबांचे नाव घेत देवाच्या दारचा प्रसाद हावरटपणे खायला रांगा लावत शिल्लक पैशाची टमरेल भरून हातभट्टी कशी मिळेल याची स्वप्ने रंगवत आहेत - शहरांसारखी प्यारी जागा त्याना पोसते आहे - त्याला कसे हे आग लावतील ?-
  एकाच वेळी शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थ आणि निळ्या झेन्ड्याचा - आणि ज्ञानोबा तुकारामांचा विजय असो - जरा लवकर - घशाला कोरड पडते आहे - आपला टाईम झाला - पहिल्या धारेचा !-
  बाकी तुमची कविता एकदम फस्क्लास - पहिल्या धारेसारखी ! जाम मजा आला

  ReplyDelete
 17. लाल बावट्या चा जमाना होता तेंव्हा अशा भडक कवितांची चलती होती आणि खरे तर असले शब्द रचायला काहीही डोके लागत नाही - कविता म्हणजे चित्रा सारखाच प्रकार नाही का ? मग ते
  नट सम्राट मधले लेखन असो किंवा अण्णाभाऊ साठे - ढसाळ यांचे उरबडवे लेखन असो - शब्दांचा पोत आणि वजन यांचा खेळ जमला की मग विचारांचा वारू सुसाट सुटतो -
  कविता बांधणे हे एक व्यसन आहे - सगळ्यात सोपी कविता म्हणजे क्रांतीची -
  तिचे नेहमीच कौतुक होते पण
  आज त्या कविता उपऱ्या वाटतात - शिमग्याच्या सोंगा सारख्या करमणूक करतात पण कालबाह्य !
  मतांच्या राजकारणाने गरीबीची इतकी चेष्टा केली आहे की त्यापुढे सगळे जुने राजे आणि सल्तनती यांचे अत्याचार फिके पडतील आणि आपणपण इतके कोडगे झालो आहोत - एखाद्या गझल किंवा लावणी सारखे आपण हे रक्त बंबाळ - नव्हे शब्द् बंबाळ दलित काव्य ऐकत रात्रीची मैफिल रंगवत असतो -
  बाई बाटली आणि बिदागी च्या ओझ्याखाली क्रांतीसूर्य झाकाळून जाताना या शतकात अनेकांनी पाहिला आहे - ते फक्त शालीचे आणि पाच पन्नास रुपयांच्या बक्षिसाचे धनी -
  मोट्ठे साहेब खुष झाले पाहिजेत हा लाडका हट्ट !
  खरी क्रांती अशी नसतेच - आपणच स्वप्नाळू -चीन असो रशिया असो - गिरणी कामगार असो रेल्वेचा संप असो -सगळे वाहून गेले कालाच्या ओघात -लाल महासत्ता विझल्या - आपण आपल्या मिणमिणत्या दिव्याचे कौतुक करत एक कविता करायची - खोटा स्वप्नाळूपणा जपत -
  और एक जाम !
  एक प्याला भरताना म्हणायच्या त्या ओळी - बोथट आणि शिळ्या ! !फक्त टाळ्यांसाठी !

  ReplyDelete
 18. कोकणस्थ ब्राह्मण मुळचे रशियन, ज्यू देवरुखे ब्राह्मण - कोकणातील ७ मांत्रिकांचे वौंशज म्हणजेच ४०० -५०० वर्षापूर्वी काशीतून ब्राह्मनात्व मिळत होते तुमच्या पिढ्यांना ते का मिळवता आले नाही ???? कारण तुमच्याकडे पात्रता नव्हती- तुम्हाला फक्त अंदाधुंदी हवी होती.

  ReplyDelete
 19. kunihi kahihi mhana,He asach chalat alele ahe ani shatkanu-shatake asech

  chalnar.

  ReplyDelete