राजीव गांधींच्या मारेक-यांच्या सुटकेचे अत्यंत दुर्दैवी असे राजकारण सुरू झाले आहे. द्रवीड वंशवादाची राजीवजींची हत्या ते त्यांच्या हत्याकटात सहभागी आरोपींची सुटका ही अपरिहार्य परिणती असली तरी याला खरे जबाबदार आर्यवंशवाद सुरु करणारे होत. बोप्प ते म्यक्समुल्लरने या वादाची सुरुवात केली. खरे तर म्यक्समुल्लरला आर्य हा वंश म्हनून अभिप्रेत नसून एक भाषागट म्हणून अभिप्रेत होता व त्याने ते स्पष्टही केले. पण लो. टिळकांसारख्या तत्कालीन राष्ट्रीय मान्यता असलेले नेते व विद्वान यांनी "आर्क्टिक होम इन वेदाज" सारखा ग्रंथ लिहून आर्य सिद्धांतावर व ते आद्य आक्रमक असल्याबद्दल सिद्धांतन करून वांशिक अअर्य विरिद्ध द्रविड आणि आर्य विरुद्ध मुलनिवासी या भयंकर संघर्षाची बीजे रोवली. आक्रमक आर्यांनी सिंधू खो-यातून द्रविडांना हाकलले व दक्षीणेत आश्रय घ्यायला भाग पाडले या समजाने पुर्वी कधीच अस्तित्वात नसलेली द्रविड अस्मिता खळबळून जागी झाली. स्वतंत्र द्राविडीस्तान मागेपर्यंत मजल गेली. त्यांनी उत्तरेतील कथित आर्य भाषाही नाकारल्या. पारपोलासारख्या सिंधू लिपीचे कथित वाचन करणा-या विदेशी संशोधकालाही जवळ केले कारण त्याने सिंधू लिपीचे वाचन पुरातन द्राविड भाषांच्या अनुषंगाने केले. त्या वाचनाला अर्थात जागतिक विद्वानांची मान्यता नाही. असे असले तरी आर्य विरुद्ध द्रविड ही मांडणी आज बहुतेक चळवळी आणि विचारवंत गृहित धरतात.
याचाच विस्फोट म्हणजे दक्षीणेत आर्यवाद्यांबद्दलचा असलेला पराकोटीचा वांशिक द्वेष. यातून कै. नरसिंह रावही सुटलेले नव्हते. रामायणांच्या दाक्षिणात्य आवृत्त्यांना ते प्राधान्य देत. आणि या वादाला भारतात तात्विक/संशोधकीय अधिष्ठान मिळवून देणारे लो. टिळक! राजीव गांधींची हत्या ही त्याच वांशिक द्वेषाची अपरिहार्य परिणती होती. आज तमिळ सरकार सर्व आरोपींना सोडण्यासाठी एका पावलावर उभे आहे त्याचाही अर्थ हाच आहे. म्हनजेच आजच्या द्राविड वंशवादाला प्रोत्साहन/समर्थन देणारे नेते/विद्वान म्हनून टिळकच जबाबदार ठरतात हे विसरून चालणार नाही.
वंशवाद निरर्थक व अशास्त्रीय असून तो भारतीय समाजातून जोवर नष्ट केला जात नाही तोवर हा संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत!