दलितांवर गतकाळात पराकोटीचा अमानवी अन्याय झाला आहे याबाबत कोणाचेही दुमत असू शकत नाही. वर्तमानकाळातही ते पुर्ण संपले आहेत असे नाही. आगे प्रकरणातील वास्तव एवढे दाहक आहे कि शरमही शरमली असेल. अमानवीपणाचे हे तांडव कोठे चालले आहे हे पाहून व्यथित व हताश व्हायला होते. हिंदू म्हणून आजही राहिलेल्या अनेक जाती-जमातींना आजही अनेक मंदिरांत प्रवेश नाही. अनेक सार्वजनिक पानवठे वापरायचीही दलितांवर बंदी आहे. वैदिक तत्वे जपणारे कथित हिंदू स्वत:ला कसलेही कारण नसतांना, त्यांना वैदिक धर्माने कसलीही "उच्चता" बहाल केली नसतांना उगाचच स्वत:ला उच्च समजत आले त्याची ही शोकांतिका आहे. बाबासाहेबांनी या अशा असंवेदनशील, मानवताविहिन धर्माला लाथ मारून आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्विकारला. तरीही अजुनही सर्व हिंदूंना अक्कल आलेली आहे अशातला भाग नाही.
पण ही झाली एक बाजू. ज्यांनीही बौद्ध धर्म स्विकारला त्यांनी बौद्ध धर्माचे प्रामाणिक आचरण करीत, घटनेने आणि बौद्ध धर्माने दिलेल्या समतेचे, बंधुतेचे आणि स्वातंत्र्याचे तत्व आचरणात आणण्याचा कितपत प्रामाणिक प्रयत्न केला आहे हाही एक प्रश्न आहे. गतकाळातील अन्यायाचा सल नवी क्षितिजे गाठण्यासाठी झेप घ्यायला वापरायचा कि ज्या धर्माला त्यागले आहे त्याला व त्यातील देव-देवतांना शिव्या घालण्यासाठी नकारात्मक अर्थाने वापरायचा यावर मुलगामी चिंतन शिक्षितांनी तरी करायला हवे होते. नकारात्मकतेतून कोणती मानसिक व बौद्धिक प्रगती होते? प्रश्नच आहे.
सोशल मिडियातून अनेक बौद्धांकडून अथवा बामसेफी विचारांनी ग्रस्त शोषित (बौद्ध नसलेल्या) तरुणांकडूनही हिंदू देव-देवतांची, ब्राह्मण समाजाची यथेच्छ टवाळी करण्याचे सत्र सुरु असते. विशेषकरून हिंदु सणांचा मुहुर्त साधला जातो. बीफचे रसभरित फोटो साइटसवरून फिरू लागतात. हिंदू धर्म वाईट असेल, त्यांच्या देवदेवता अतार्किक असतील, पण हे विसरले जाते कि ८५% अवैदिक बहुजन हिंदुच आहे आणि तो ब-यापैकी धार्मिक असून तो या देवतांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानतो. त्यांना शिवीगाळ केल्यावर प्रतिवाद करायला फारसे लोक पुढे येत नाहीत कारण त्यातून त्यांनाच शिव्यांचे धनी बनावे लागते. पण त्यांची मानसिकता काय बनत असेल? त्यांच्या मनात एखाद्या समाजाबद्दल प्रेम वढेल कि तिरस्कार? सर्वच बौद्धांना हे पसंत असेल असे मुळीच नाही, पण ते मूक राहिल्याने विचारी बौद्धही त्यांचे समर्थकच आहेत अशी भावना निर्माण झाली तर दोष कोणाचा?
बाबासाहेबांनी हिंदू धर्मावर परखड टीका केली आहे. राम-कृष्णाचीही यथेच्छ चिकित्सा केली आहे. पण त्यात विद्वेषाची भावना कोठेही झळकत नाही. आपल्या प्रकांड विद्वत्तेने त्यांनी या धर्माची व अनेक देवतांची "चिकित्सा" केली आहे. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवणा-यांनी बाबासाहेबांकडून काय घेतले हा एक प्रश्नच आहे. द्वेषरहित चिकित्सेला कोणी आक्षेप घेत नाही. मीही माझ्या परीने राम-कृष्ण-शिव यांची चिकित्सा केली आहे. काही सनातनी सोडले तर कोणाचा आक्षेप नाही. परंतू शिवीगाळ करून, अश्लाघ्य भाषा वापरून आपण एक मोठा गट दुखावतो आहोत, त्यांना आपल्या निकट आनण्याऐवजी दूर ढकलत आहोत याचे भान किती जणांना आहे?
महात्मा गांधींना पुणे कराराबाबत दोषी मानत त्यांनाही शिवीगाळ ही नवी बाब नाही. बामसेफने गेल्या अनेक दशकांत पेरलेले हे विष आहे. भगव्यांना गांधींचे जेवढे वावडे आहे तेवढेच बौद्धांना आहे. पण या दोन गटांच्याही पार असलेला गांधीजींना माननारा अत्यंत मोठा जनसमूह आहे आणि आपण त्यांना नकळत दुखावत जातो याचे भान उरले आहे काय? तोंडदेखले का होईना गांधीजींना आणि बाबासाहेबांना रा.स्व. संघाने प्रात:स्मरणियांच्या यादीत टाकले. आपण लोकभावना दुखावत आपली संघटना वाढवू शकत नाही एवढे कागदोपत्री का होईना भान त्यांना आले. मोदींना महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात वर्ध्यापासुनच करावी लागली. हे भान बौद्ध आणि बामसेफी समुदायाला कधी येणार आहे?
प्रिव्हेन्शन ओफ़ अट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग ही ग्रामीण/शहरी भागातले एक दुखणे बनले आहे हेही एक वास्तव आहे. या दुखण्यातून मानवतावादी माणसेही सुटलेली नाहीत हे डा. लहाणेंच्या प्रकरणातून दिसून येते. ग्रामीण भागात या कायद्याचा उपयोग शस्त्राप्रमाणे केला जातो. जातीसंबंध नसलेल्या किरकोळ भांडणांतही अथवा सूडापोटी या कायद्याचा वापर केला जातो. ब्यकमेलिंग हाही या कायद्याचा दुरुपयोग करण्यामागील अनेकदा उद्देश्य असतो. अट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग वाढत असल्याबद्दल बहुतेक उच्च न्यायालयांनीही चिंता व्यक्त केली आहे. या कायद्याअंतर्गत अटक झाल्यावर जामीनही मिळत नसल्याने जीही काही अवहेलना व धुळधान वाट्याला येते त्यांच्या मनात काय भावना राहत असतील? आज ग्रामीण भागात जेंव्हाही मी फिरतो, असंख्यांचा या बाबतीतील रोष मी पाहिला आहे, ऐकला आहे. पण याबाबत जाहीरपणे बोलण्याची हिंमत कोणात उरलेली नाही हेही एक वास्तव आहे. हा कायदाच रद्द करावा अशा मागण्या कधी जाहीर तर कधी खाजगीत केल्या जातात."विशिष्ट समुदायांना जातीवादच हवा आहे...म्हणून अशा मागण्या होतात..." असे म्हणून या समस्येतून सुटका कशी होईल?
बरे सर्व प्रश्न मुळातुन जातीयच असतात हे कशावरून ठरवायचे? त्यांना अनेकदा स्थानिक राजकीय अथवा आर्थिक संदर्भ असले तरी त्यांकडे मुळात न पाहता टीआरपी बेस्ड जातीय रूप दिले जाणे अनेकदा घातक ठरते हे विचारी लोकांच्या लक्षात येवू नये काय?
समतेच्या पायावर समाज जवळ यावेत, परस्परांबद्दल आस्था आणि सहकार्यभाव वाढावा हे खरे तर आजच्या समाजव्यवस्थेला ठिकाणावर आनण्यासाठी गरजेचे आहे. द्वेषातून द्वेषच निर्माण होतो. भगवान बुद्धाने अज्ञान, वासना आणि द्वेषाला तीन विषे म्हटलेले आहे. हिंदू धर्मियांनी वंचितांचा द्वेष केला हे एक वास्तवच आहे. पण आपल्या पापाची बोच म्हणून का होईना ते बदलत असतांना त्यांचा द्वेष करून त्यातून पुन्हा नवीन द्वेष जर निर्माण होणार असेल तर ते धोकेदायक नाही काय?
भगवान बुद्धाची, बाबासाहेबांची विचारसरणी आचरत अन्य सर्वच समाजांसमोर आदर्श ठेवणे अधिक श्रेय:स्कर नाही काय?
कोणीही कोणावर अन्याय करणे, अत्याचार करणे हे वाईटच आहे. त्याचा निषेध सर्वच करताहेत. पण घटनेमागील वास्तव त्या घटनेपुरते, त्या घटनेत सामील असलेल्यांच्या जातीपुरते मर्यादित असते काय? एखाद्या विशिष्ट समुहाच्या व्यक्तीची हत्या अथवा अत्याचार हे एकुणातीलच द्वेषप्रक्रियेचे रुपांतर असू शकते. संपुर्ण समाजात सूप्त पातळीवर जे मतप्रवाह असतात, खतपाणी घालून वाढवले जातात त्या प्रवाहांची दखलही घ्यावी लागते. घटनेला वेगळे काढून तिचे विश्लेशन होऊ शकत नाही. हा आपला सामाजिक प्रश्न बनला आहे. तो सोडवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. आत्मपरिक्षण न करता शस्त्रे परजून कोणी त्यावर उत्तर शोधू पाहिल तर त्यात सर्वांचाच विनाश आहे!