विजयांमुळे काही गोष्टी आपोआप सोप्या होऊन जातात.
उदा. अर्जुनाने पणात जिंकलेल्या द्रौपदीवर पाचही भाऊ कामांध होत अधिकार सांगतात आणि गैरसंबंधातून विवाहाआधी आणि विवाहानंतर नियोगातुन पुत्र प्रसवणारी कुंती त्याला अनुमोदन देते. द्रौपदीचा समावेश आम्ही नित्यस्मरणीय पंचकन्यांत करतो...
उदा. धर्मराज जुगारी असतो, तो कोणाचीही परवानगी न घेता भावांना, नंतर भावांच्या सामुहिक बायकोला पणावर लावतो...तरीही तो धर्मराजच असतो.
उदा. पांडव वनवासात जातात. तेथेही लबाड्या करतात. वात्सल्य भावनेने अमांत कि पौर्णिमांत असा वाद काढत अज्ञातवासाच्या काळाबद्दल भिष्म महाराज पांडवांचीच बाजु घेतात. तेच पांडव युद्धात भिष्माला शिखंडीच्या आडुन ठार मारतात.
उदा. द्रोणाचार्य आपल्या अर्जुनापेक्षा कोणी मोठा धनुर्धर होणार नाही या प्रतिज्ञेला जागत एकलव्याचा अंगठा कापून घेतात. त्याच द्रोणाचार्यांना धर्मराजाच्या असत्त्यामुळे अर्जुनाला ठार मारता येते.
उदा. कृष्ण स्वत:ला धर्माचा उद्गाता समजतो. तोच कर्णाला अधर्माने मारायला सांगतो. धर्म आणि अधर्म सोयीने ठरवायचे असतात हे चिरंतन सत्य नव्हे काय?
उदा. खूप आहेत.
आता दुर्योधन पाहुयात. तो हरलेला आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल फार सहानुभूती बाळगायची गरज नाही. पण...
उदा. तो कधीच राजा नव्हता. अंध बापाला ठार मारुन राजा व्हावे अशी स्वाभाविक इच्छा त्याची कधीही नव्हती.
उदा. तो वाईट प्रशासक होता अथवा प्रजेवर अन्याय करत होता असे महाभारतही जितांचे असुनही कोठेही म्हणत नाही.
उदा. त्याला जुगाराचा नाद नव्हता. युधिष्ठिराल होता म्हणून जुगारात त्याने आपल्या मामाला बसवले. द्रौपदीच्या प्रत्येक आक्षेपाला त्याने आधी पांडवांचे त्यावर काय म्हणणे अहे हे विचारले. आणि त्याला कोणाचाही, धर्मराजाचाही आक्षेप नव्हता.
उदा. राज्यावर उत्तराधिकारी म्हणून अभिषिक्त राजाचा मुलगा म्हणून त्याचा आणि त्याचाच अधिकार होता. राज्याचे विभाजनी नको म्हनून अविवाहित व ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा करनारे भिष्म स्वत:च राज्याची कौरव-पांडवांत विभागणी करा हे कोणत्या तत्वाने म्हणाले?
उदा. अर्थस्य पुरुषो दास: हे भिष्मवचन कोणत्या वैफल्यातुन आले? राज्य जर पांडवांचेच आहे असा त्यांचा सिद्धांत होता तर अर्थ ते पांडवांचाच अप्रत्यक्षपणे खात नव्हते काय? जर पंडवांची बाजू न्याय्य होती असे त्यांना वाटले तर ते त्या बाजुला न जाता दहा हजार सैन्याला रोज ठार मारील पण पांडवांना नाही असे का म्हणाले? म्हणजे या न्याय्य महापुरुषाला दहा हजार सैनिकांचे प्राण तुच्छ वातले तर तो नेमका कोणता धर्म होता? आणि असे माहित असुनही केवळ आदरभावनेने ते पडेपर्यंत त्यांना सेनापतीपदावर ठेवणारा दुर्योधन अन्यायी कसा?
उदा. कौरवांपैकी एकही वीर पांडव समोरासमोरच्या पराक्रमात मारू शकले नाहीत. प्रत्येकाला कपटानेच मारावे लागले. अगदी दुर्योधनाला सुद्धा. दुर्योधनाने अखेर आली हे कळूनही धर्मयुद्धाचे नियम तोडले नाहीत. तरीही पांडव न्यायी/धर्मनिष्ठ कसे?
उदा. महाभारतही कौरव अन्यायी होते हे एखाददुसरे उदाहरण सोडले (तेही बालपणीचे) तर उदाहरणांनी सिद्ध करत नाही. केवळ दुष्ट - अन्यायी असे सतत म्हणत राहिल्याने कोणी कसा दुष्ट होतो?
उदा. पांडवांनी अनधिकाराने जेवढे कौरवांवर अन्याय केले तेवढे काही केल्या कौरवांनी पांडवांवर अन्याय केल्याचे दिसत नाही. वनवास युधिष्ठिराच्या जुगारी प्रवृत्तींनी ओढवून घेतला होता. त्यासाठी दुर्योधनाला दोषी धरायचे काय कारण?
उदा. जो जिता वोही सिकंदर...
तात्पर्य: जिंकत जा...न्याय अन्यायाची पर्वा करू नका!
(यात कोठे "यदाकदाचित"ही वर्तमान आढळला तर व्यासांच्या प्रतिभेला अभिवादन करा आणि एकसुरात म्हणा.....अबकी बार....)