सध्या वैदिकांच्या पावलावर पाऊल ठेवून आपापल्या जातींची मुळे युरेशियात, दुरच्या काळातील एखाद्या प्रख्यात राजवंशांत, लोप पावलेल्या (किंवा कधीही नसलेल्या) क्षत्रियत्वात शोधण्याची एक परंपरा निर्माण होते आहे. कोणी आपली जात नागवंशी असल्याचे सिद्द्ध करण्याचा अट्टाहास करतो तर कोणी आमच्याच पुर्वजांनी वेद लिहिले असेही दावे करतो. हे दावे करणारे वैदिक नसतात हे विशेष. सिंधू संस्कृतीचे निर्माते महाराष्ट्रातील मराठे आहेत असेही काही दावे आहेत. द्रविडही यात मागे नाहीत. सिंधू संस्कृतीचे निर्माते द्रविडच असल्याचे दावे आहेत. सिंधू लिपी वाचल्याचे दावे डा. मालती शेंडगे, सदार ते पारपोलापर्यंत सर्वांनीच केलेत...पण एकाच्याही लिपी वाचनात साधर्म्य नाही. राजपूत वंशाशी कसेही करून नाळ भिडवणे तर सर्वात सोपे.. एके काळी ज्यू लोक आपण हिंदुस्तानातून आलो असे सांगत असत. युरोपिय लोकही आम्ही त्या त्या युरोपिय देशातील मुळचे नसून इंडो-युरोपियन आर्य असल्याचे सांगत क्यस्पियन अथवा दक्षीण रशिया हे आपलेव मुलस्थान असल्याचे सांगत असतात. जर्मनांना हे मान्य नाही. ते चार पावले पुढे. ते म्हणतात आर्य मुळचे तिकडचेच आणि शुद्ध नोर्डिक वंश म्हणजेच आर्य वंश. कोणी म्हणतो आम्हीच मुलनिवासी. आर्यभट परकीय...त्यांना युरेशियात हाकला तर वैदिक लोक आम्ही येथलेच...येथुनच जगात आम्ही संस्कृती नेली असे सांगतात.
थोडक्यात प्रत्यकजण आपापल्या पाळामुळांबद्दल संभ्रमात नाही काय?
खरे तर पुराणांतील व महाभारतातील वंशावळ्या जुळत नाहीत. मुळात त्या अवास्तव आणि मिथकांनी भरलेल्या आहेत. उदा. ऋग्वेदातील ययाती, नहूष हे वैदिक ऋचा लिहिणारे ऋषी आहेत तर याच नांवाचे महाभारतात कुरु वंशाचे पुर्वज आहेत. यदु, द्रह्यु, अनु, पुरु व तुर्वश ही ऋग्वेदात टोळ्यांची नांवे आहेत तर महाभारतात ती चक्क ययातीच्या शर्मिष्ठा व देवयानीपासून झालेल्या मुलांची नांवे आहेत. ऋग्वेद ज्याच्या घराण्यात लिहिला गेला त्या मात्र सुदासाचे नांवही महाभारतात येत नाही. एवढेच काय सर्वात मोठे नोंदले गेलेले दाशराज्ञ युद्ध महाभारत अथवा पुराणांत उल्लेखलेले नाही...असो.
असे असुनही आजचे जातीसमाज मात्र आपल्या पाळामुळांच्या शोधात रममाण आहेत. आपली पाळेमुळे शोधावीत असे वाटणे स्वाभाविक आहे, परंतू त्यासाठी भोंगळ साधणे, पौराणिक कालगणना, त्यातील पिढ्यांच्या याद्या, युगसंकल्पनेतील अवास्तवता, त्यातील व्यक्तींची काही हजार वर्षांची आयुर्माने....इकडे सोयिस्कर अथवा अभिनिवेशापोटी दुर्लक्ष करत आपल्या इतिहासाची नाळ काहीही करुन नुसती पुरातन नव्हे तर तर प्रसिद्ध देशातील अथवा विदेशातील प्रसिद्ध टोळ्या/घराणी यांशी केवळ वरकरणी नामसाधर्म्यांनी जुळवायचे प्रयत्न होतात. ज्युडिया म्हणजे इकडील जाधव अशाही मजला गाठल्या जातात. हिट्टाईट लोक म्हणजे हाटकर धनगर अशीही संशोधने होतात. वैदिक ज्याप्रमाणे आजकाल आर्य भारतीयच असून येथुन जगात पसरले असे सांगतात तसे हट्टी लोकही भारतातुन "तिकडे" गेले असे सांगितले जाते.
अशा संशोधनांतून (?) जाती/धर्म अहंकार वाढण्यापलीकडे काय साध्य होणार? खोट्या अहंकारांवर कोणत्या जाती/धर्माचे कल्याण होणार? आहे त्या ज्ञात इतिहासात आपापले योगदान काय याचे तटस्थ विवेचन पुरेसे नाही काय? जनुकीय विज्ञान अजुन बाल्यावस्थेत आहे व त्याचे निष्कर्ष हे परस्परविरोधी आहेत हे उघड असतांना सोयिस्कर निष्कर्ष का उचलले जातात? आउट ओफ़ आफ्रिका हा गेली काही दशके लोकप्रिय असलेल्या सिधांताला तडे जातील असे पुरावे आता आशिया, चीन, मलेशियात समोर येत असल्याने त्या सिद्द्धांताला जनुकीय आधारावरच मुठमाती देण्याच्या बेतात वैज्ञानिक जग आहे हे लक्षात कोण घेणार?
पण या कथित सिद्धांतांनी समाजाचे (युरोपियही) सामाजिक व सांस्कृतीक पराकोटीचे नुकसानच झाले आहे. भारतातील मुलनिवासी विरुद्ध वैदिक वाद, द्रविड विरुद्ध आर्यवादातून निर्माण झालेला व आजही जीवंत असलेला संघर्ष हा सरळ सरळ समाजाची उभी आडवी फाळणी करणारा आहे हे कधी समजणार?
आपापली पाळेमुळे शोधली पाहिजेत. ती माणसाची मानसिक गरज आहे. आत्माभिमान येत न्यूनगंडातून अथवा वर्चस्वतावाद गंडातून मुक्ती त्यामुळेच मिळू शकते. पण जाती/धर्म/वांशिक अहंकारातून संशोधने केली गेली तर मात्र स्वत:च्या हातीही ठोस काही पडणार तर नाहीच पण उलट सामाजिक नुकसानच होईल. युरोपचा इतिहास फार तरुण आहे तो वयोवृद्ध ठरवता यावा व काळ्यांपेक्षा गोरे श्रेष्ठ या अहंभावातून आर्य सिद्धांताचा जन्म झाला. पण काळ्यांचा इतिहास जुनाच आहे, युरोपियन वा भारतियांपेक्षाही हे मान्य करण्याची नैतिक हिंमत यांच्यात आहे काय? पण अस्तित्वात नसलेल्या "आर्य भाषा गटाच्या मुलस्थानावर" जेवढी चर्चा होते तशी सेमेटिक गटाची का होत नाही? त्यांचा इतिहास तर केवळ अवशेषांतून नव्हे तर लिखित स्वरुपात उपलब्ध आहे. गिल्गमेश सारखे जगातील आद्य महाकाव्य लिखित स्वरुपात जसेच्या तसे उपलब्ध आहे. तसे रामायण-महाभारताचे आहे काय? खुद्द ऋग्वेदाचे आहे काय? होमर वगैरे तर फार फार अलीकडचे.
हा सांस्कृतीक बाष्कळपणा करण्यात वैदिकांनी पिढ्या खपवल्या. आता त्यात अवैदिकांचीही (ते स्वत:लाच वैदिक समजतात हा भाग अलाहिदा.) भर पडावी हे भविष्यासाठी सांस्कृतीक दु:श्चिन्ह आहे.
बरे या समाजांचा मानसिक दुभंग पहा. आरक्षणासाठी हेच आम्ही सामाजिक मागास असल्याचे हिरीरीने दावे करतात...एकीकडे तुम्ही सुर्यवंशी/चंद्रवंशी क्षत्रीय म्हणवता, आपापली पाळेमुळे वैश्विक इतिहासातील पुढारलेल्या घटकांतच शोधतात आणि वर मागासही म्हणवून घेता...हे काय आहे? हा स्वत:च्याच अस्तित्वाबद्दलचा मानसिक दुभंग नव्हे तर अन्य काय आहे? स्वत:च्या हीणगंडातून येणारी ही वर्चस्वगंडाची प्रतिक्रिया तर नव्हे?
कोणताही गंड कामाचा नाही. श्रेष्ठता वंशात/प्रांतात/धर्मात/जातीत नसते...ती व्यक्तींच्या एकुणातील सांस्कृतीक/सामाजिक आणि अर्थव्यवस्थेतील योगदानात असते. ती योग्यता आधी वाढवा. पाळेमुळे अवश्य शोधा...पण ती कोणत्याही गंडाच्या किंवा अर्धवट शिजलेल्या विद्वानांच्या साहित्यालाच मुख्य संदर्भ ग्रंथ मानून आणि केवळ काही शब्द-साम्यांतून शोधू नका. नाहीतर "ज्याचा खोट्या इतिहासावर विश्वास असतो त्याचे भविष्यही खोटेच असणार!" याची नोंद ठेवा.