Thursday, December 11, 2014

मा. प्रधानसेवक....

मा. प्रधानसेवक,
सहा महिने उलटलेत. लोकांनी तुम्हाला विकासासाठी भरभरुन मते दिली. त्य संदर्भात अजुन तरी एकही पाऊल पडलेले दिसत नाही. कोणतेही नवे, ताजेतवाणे वाटेल, उत्साह वाढवेल असे आर्थिक धोरण नाही. अर्थव्यवस्था होती तशीच मंदावस्थेत सुस्त अजगरासारखी पहुडलेली आहे. तुमच्या कृपाशिर्वादाने काही मोजक्यांचे उत्थान होतही असेल त्यामुळे तुम्हाला सा-यांचेच उत्थान होतेय असा भासही होत असेल, पण ते काही खरे नाही.
हो, तुमच्या राज्यात घडतांना दिसतेय ते म्हणजे एकच...वैदिक, संस्कृत, पवित्र गंगा, नत्त्थू, गीता इ.इ.इ. चे तुमच्याच चेल्यांचे माहात्म्यगायन आणि त्यावरुनचे गदारोळ. एवढा कि कोणालाही वाटॆल धर्म आणि खुन्यांचे उदात्तीकरण सोडून या देशात कोणतीच समस्या नाही.
जरा जमीनीवर या. भाषणबाजी बंद करा आणि आता तरी कामाला लागा. देशातील आजवरचे सर्वात नाकर्ते पं.प्र.म्हणून थेट गिनीज बुकात स्थान पटकावू नका. (तसेही भारतियांना टुक्कार कामांसाठीच गिनीज बुकात स्थान मिळाले आहे...तुम्ही काहीच केले नाही म्हणून मिळेल एवढाच फरक!)
तुम्ही एक बाब विसरत आहात. लोक कोणालाही ज्या वेगाने डोक्यावर घेतात त्याला तेवढ्याच वेगाने फेकुनही देतात.....तसे तुमचे होऊ नये. काळजी घ्या. नियतीने दिलेल्या संधीचे सोने करा, इतिहासात मानाचे स्थान निर्माण करा.
आता हे वाचायचेही काम तुम्ही करणार नाहीत याचा ठाम विश्वास आहे. मग कोट्यावधी परिस्थितीत होरपळत असणा-यांचे आक्रोश तरी तुम्ही कसे ऐकणार?
असो.
आपला,
एक संत्रस्त नागरिक

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...