Thursday, December 11, 2014

मा. प्रधानसेवक....

मा. प्रधानसेवक,
सहा महिने उलटलेत. लोकांनी तुम्हाला विकासासाठी भरभरुन मते दिली. त्य संदर्भात अजुन तरी एकही पाऊल पडलेले दिसत नाही. कोणतेही नवे, ताजेतवाणे वाटेल, उत्साह वाढवेल असे आर्थिक धोरण नाही. अर्थव्यवस्था होती तशीच मंदावस्थेत सुस्त अजगरासारखी पहुडलेली आहे. तुमच्या कृपाशिर्वादाने काही मोजक्यांचे उत्थान होतही असेल त्यामुळे तुम्हाला सा-यांचेच उत्थान होतेय असा भासही होत असेल, पण ते काही खरे नाही.
हो, तुमच्या राज्यात घडतांना दिसतेय ते म्हणजे एकच...वैदिक, संस्कृत, पवित्र गंगा, नत्त्थू, गीता इ.इ.इ. चे तुमच्याच चेल्यांचे माहात्म्यगायन आणि त्यावरुनचे गदारोळ. एवढा कि कोणालाही वाटॆल धर्म आणि खुन्यांचे उदात्तीकरण सोडून या देशात कोणतीच समस्या नाही.
जरा जमीनीवर या. भाषणबाजी बंद करा आणि आता तरी कामाला लागा. देशातील आजवरचे सर्वात नाकर्ते पं.प्र.म्हणून थेट गिनीज बुकात स्थान पटकावू नका. (तसेही भारतियांना टुक्कार कामांसाठीच गिनीज बुकात स्थान मिळाले आहे...तुम्ही काहीच केले नाही म्हणून मिळेल एवढाच फरक!)
तुम्ही एक बाब विसरत आहात. लोक कोणालाही ज्या वेगाने डोक्यावर घेतात त्याला तेवढ्याच वेगाने फेकुनही देतात.....तसे तुमचे होऊ नये. काळजी घ्या. नियतीने दिलेल्या संधीचे सोने करा, इतिहासात मानाचे स्थान निर्माण करा.
आता हे वाचायचेही काम तुम्ही करणार नाहीत याचा ठाम विश्वास आहे. मग कोट्यावधी परिस्थितीत होरपळत असणा-यांचे आक्रोश तरी तुम्ही कसे ऐकणार?
असो.
आपला,
एक संत्रस्त नागरिक

9 comments:

  1. यदि भारतीयों ने इतिहास में कोई महान काम नहीं किया है तो क्या यह हमारी जिम्मेदारी नहीं है कि हम कुछ नया करके गिनीज बुक में अपना नाम लिखायें? अन्यथा भावी पीढ़ी हमारी पीढ़ी को इसीतरह कोसती रहेगी. और उनके बाद वाली पीढ़ी उनको यूँ ही कोसते रहेगी. इसतरह सभी कोसने की दुकान खोलते रहेंगे और एक दूसरे को अपनी असफलता का दोषी बताते रहेंगे.
    इतिहास के प्रति इतनी निंदा पालने से क्या यह बेहतर नहीं है कि हम कुछ नया करें और भावी पीढ़ी को एक समृद्ध भारत विरासत में दें?
    दिनेश शर्मा

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. भारताचे पंतप्रधान कोठे आहेत?
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    ते सध्या भारत दौऱ्यावर आहेत !!!

    ....................................................................................................................

    सुषमा स्वराज : अहो, मोदी भारताचे परराष्ट्र मंत्री तुम्ही आहात की मी??? तोंड वर करून फ़िरायचा सपाटा लावलाय नुसता !!!

    .....................................................................................................................


    अखेर मोदींचे लहानपणी उघड्या डोळ्यांनी (दिवास्वप्न) बघितलेले world tour / जगाच्या सफरीचे स्वप्न सहा महिन्याच्या आतच साकार !!!


    ........................................................................................................................

    ReplyDelete
  4. आप्पा -असे रागावू नका मुलानो -
    बाप्पा - कोणती मुले ? काय रे आप्पा - तू प्रवचनच सुरु केलेस की रे मार्गशीर्ष महिना खरे - पण इतकी घाई ?काय झाले काय ?
    आप्पा - अरे ही मुले म्हणतात की मोदी सारखे हिंडत असतात - अरे फिरणारच - आता काश्मीर मध्ये त्यांनी अख्खा काश्मीर पिंजून काढला त्यावेळेस का असे विचारले नाही ?
    बाप्पा - म्हणजे तू मोदिवाला आहेस की काय ?
    आप्पा - मुळीच नाही ! ते हिंदू वगैरे तर नुसता फार्स आहे - आणि राम मंदिर तर कधीही होणार नाही - कारण ते झाले तर मुद्दाच खलास आणि संघाचे भागवत तर अगदी पोरकट आहेत !
    बाप्पा - हमारे खयालात कितने मिलते जुलते हैं -म्हणजे आपले जमणार तर !
    आप्पा - प्रश्न असा आहे कोणीही राज्य केले -मग ते काँग्रेस असो वा भाजप - असे क्षणात काहीच बदलणार नाही - आणि वृथा वाद घालून आपली एनर्जी मोदी कशाला खर्च करतील ?त्यांनी आज नथुराम बद्दल झालेल्या प्रकाराबद्दल वाईट वाटल्याचे सांगितले आहेच ! आणि मराठा आरक्षणाचे कसे तीन तेरा वाजले ?असल्या अगदी स्वस्त अफवा तरी निदान मोदी पसरवत नाहीत
    बाप्पा - अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी खाली आला तरी मराठा वर्गाला अपेक्षित आरक्षण मिळणार नाही हे त्या मेटेला समजत नाही का ? पण सांगणार कोण ?अशा निर्बुद्ध वल्गनांपेक्षा मोदी परवडला - निदान लोकसभेचा तमाशा बघायला थांबतच नाही !आपली लोकसभा म्हणजे अक्षरशः निर्लज्ज माणसांचा पोरकट आणि वात्रट दंगा असतो !आजकाल धमाल विनोद पसरवत एखाद्याला टार्गेट करणे अतिसोपे झाले आहे
    आप्पा - या पाच वर्षात कोन्ग्रेस अशा लाटा तयार करण्याचे कसब मात्र भाजप कडून शिकून घेईल हे नक्की कारण पाच वर्षात आपण कुठे चुकलो ते त्याना नक्की समजेल
    बाप्पा - भाजप कडे चांगल्या निर्मळ हुशार बुद्धिमान लोकांची कमी आहे कि काय असे वाटू लागते आणि त्याला कारण म्हणजे हे असले उद्योग !
    आप्पा -तसे पाहिले तर गांधी गेले आणि महाराष्ट्रात ब्राह्मण द्वेष पेटवून महाराष्ट्रात त्यांची राख रांगोळीही केली गेली - या मराठा वर्गाने त्यांच्या जमिनी हडपल्या शेती लाटली आणि घरातून बेघर केले - ते असो - पण मराठा वर्गाने स्वतः तरी मानाने राज्य करावे ना ? नाही - त्यांनी आरक्षण मागितले - नारायण राणेचे तीन तेरा वाजले !ना घरका ना घाटका !
    बाप्पा - खरच - थोरल्या महाराजांपासून राज्य करणारे म्हणून मिरवणारे हे महाराष्ट्राचे शेर आरक्षणाची झूल पांघरून नंदीबैल होण्यास तयार झाले - अरे रे !
    आप्पा - केवळ काँग्रेस नकॊ या विचारापायी मोदी आले - सध्या जो भाजपात तमाशा चालला आहे तो नक्कीच त्यांना रसातळाला नेणार !
    बाप्पा - अगदी ही काळ्या दगडावरची रेघ म्हटलस तरी चालेल -
    आप्पा - या शिवसेनेची पण किती कुतरओढ झाली बघ !
    अगदी भादव्यातील कुत्रीच - जणू काही एकमेकात अडकलेली ! चूक कोणाची कळत नाही पण करमतही नाही ! आणि सर्वाना गम्मत मात्र पहायला मिळते फुकटची
    बाप्पा - आणि गप्पा मात्र मराठी बाणा मराठी अस्मिता ! शीः - अगदीच बोगस निघाली शिवसेना !
    आप्पा - आता मुंबईत महापालिकेत , तसेच प्रांतात आणि देशात युतीचेच राज्य आहे , आतातरी रस्ते चांगले झालेच पाहिजेत - होतील का ?
    बाप्पा - शक्यच नाही - कारण हे राज्य पक्षांचे नसतेच - हे वेगवेगळ्या लॉबीचे असते
    आप्पा - पक्ष बदलतात पण ठेकेदार बदलत नाहीत !
    बाप्पा - मोदींनी २१ ज्तारॆख हा योगाचा - योगा दिन असे युनो कडून मंजूर करवून घेतले हे विशेष
    आप्पा - योगायोगाचीच गोष्ट म्हणायला पाहिजे

    ReplyDelete
  5. आप्पा -राज्य पक्षाचे नसते म्हणजे ?
    बाप्पा - अरे असे बघ - हा सर्व खेळ असतो - मोठमोठे भांडवलदार देश चालवतात ! अगदी अमेरिकेत सुद्धा -कारण इकनोमी मार्केट इकनोमी आहे - आपल्या वडीलांचा उद्योग मुकेश अंबानी विकणार आहे , अरे आप्पा - आपण आपल्या वडिलांच्या किती गोष्टी आठवणी म्हणून जपून ठेवतो , पण हे भांडवलदार किती हिशोबी असतात - बापाच्या नावाने पाणपोया उघडतील पण त्याने उभारलेले उद्योग फुकून टाकतील
    आप्पा - कारण त्यांना तो बोजा वाटत असतो -अशा लोकाना देशप्रेम तरी किती असेल आणि समाजमूल्ये तरी किती समजत असतील ?
    बाप्पा - मग शाश्वत काय ?
    आप्पा - सगळेच एकमेकांची खेळणी म्हणून नाचत असतात !
    बाप्पा - सगळ्यांची कामे बिनबोभाट होत असतात - मुखवटे घालून फक्त आवाज चढवायचे !
    आप्पा - आपल्याला वाटते की सरकार निर्णय घेत आहे , पण सरकार म्हणजे कठपुतली !हे बडे लोक अति नम्रतेने हा नाच नाचवत असतात -
    बाप्पा - गांधींचा खुनी हा देशभक्त असू शकत नाही का ? असे विचारायचे आणि सोनियाची मुलगी प्रियांका राजीवच्या खुन्यांना भेटायला जाते त्याचे काय असा प्रश्न विचारायचा हा सगळा फार्स असतो ! आणि मग एक भयानक सिद्धांत आळवायचा ! - खुनी हा माणूसच असतो असे कॉंग्रेसने म्हणायची मुभा घ्यायची आणि खुनी हाही देशभक्त असतो असे भाजपने बोलायचे
    आप्पा - आणि अंबानी अडानिनी " बहोत मजा आया यार " असे खाजगीत म्हणायचे याला म्हणतात देश चालवणे - मग मोदी दिल्लीत राहिले काय किंवा अहमदाबादला किंवा जग फिरत बसले काय - त्याला काहीच तितकासा अर्थ नसतो !
    बाप्पा - अरे मग अर्थ कशाला आहे ते तरी सांग !
    आप्पा - अर्थ कशालाच नसतो !ब्यारीस्टर जीनानाही कदाचित पश्चाताप झाला असेल नाही का ?
    कारण त्यांना अपेक्षित पाकिस्तान तरी कुठे निर्माण झाला ?

    ReplyDelete
  6. Ha ha ha ! Didn't saw same lines for Maunmohan ! One can understand ur frustration. & importantly the person who has voted Namo has right to ask Namo. Rental intellectuals are not allowed

    ReplyDelete
  7. एकीकडे विकासाची स्वप्ने दाखवीत सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी यांचे सरकार, दुसरीकडे उन्मादावस्थेत गेलेल्या उजव्या संघटना आणि तिसरीकडे आदळआपट करणारे विरोधक असे तिरंगी वगनाटय़ सध्या देशात सुरू आहे. यात सर्वसामान्यांचा मात्र मोठाच वैचारिक गोंधळ उडत आहे.
    देशात मोदीलाट आल्यापासून गोडसे या नावाला चांगले दिवस आले आहेत. इतके चांगले की गेल्या निवडणुकीत शिवसेनेत मनसेमार्गे दाखल झालेले हेमंत गोडसे हेसुद्धा छगनराव भुजबळांचा पराभव करून निवडून आले. ते आडनावामुळे नव्हे तर मोदींमुळे निवडून आले असे कोणी म्हणेल. परंतु महाराष्ट्रात शिवसेना उमेदवारांच्या यशामध्ये मोदींचा अजिबात वाटा नसल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेच म्हणणे असल्याने गोडसे हे बस नावच पुरेसे ठरले असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. आता तर गोडसे यांचे - हेमंत नव्हे, नथुराम - पुतळे देशभरात उभारण्यात येणार आहेत. मेरठमध्ये त्यांच्या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे. हिंदू महासभेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु उत्तर प्रदेशात अजून भाजपचे सरकार आलेले नसल्याने तेथील जिल्हा प्रशासनाने त्यास हरकत घेतली आहे. हरकत नाही. त्यामुळे हिंदू महासभेला मंदिर वहीं बनायेंगे असा एक नवा कार्यक्रम आपसूकच मिळेल. ही हिंदू महासभा आता दे. भ. नथुराम गोडसे यांच्यावर एक चित्रपटही काढणार आहे. खरे तर हे काम रिचर्ड अ‍ॅटनबरो या इंग्रजाने केले असते तर ते न्यायोचित झाले असते. जे इंग्रजांना जमले नाही ते गोडसे यांनी करून दाखविले. त्यांनी मोहनदास करमचंद गांधी यांना जीवनातून उठविले. परंतु सर रिचर्ड यांना कोणी खरा इतिहास सांगितलाच नसल्याने त्यांनी गांधींवर चित्रपट काढला. तो जगभरात बरा चालला. त्यात गांधी हे नायकाच्या भूमिकेत असल्यामुळे ते उगाच नायक ठरले. त्याचा बदला हा कोणी तरी घ्यायलाच हवा होता. आता भाजपची भरभक्कम सत्ता आल्यामुळे तो घेण्यासाठी हिंदू महासभा सरसावली आहे. महासभेचे राष्ट्रीय महासचिव मुन्नाकुमार शर्मा हे त्याचे निर्माते असून त्याचे दिग्दर्शक, कलाकार या छोटय़ा गोष्टी अजून ठरायच्या आहेत. तरीही येत्या ३० जानेवारी रोजी हा माहितीपट प्रदर्शित केला जाणार आहे. यात आणखी एकच समस्या आहे, की मुन्नाभाई काहीही म्हणत असले, तरी मुळात अशा चित्रपटाचेच काही ठरले नसल्याचे महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक सांगत आहेत. एकंदर तुरी अजून बाजारातच आहेत आणि इकडे वाद मात्र सुरू झाले आहेत. त्यावर कडी म्हणजे या चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी पुण्याच्या न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. अशी बंदी घातल्याने गोडसेंचे उदात्तीकरण थांबेल वा गांधीजींच्या बदनामीची मोहीम थंड पडेल असे कोणाला वाटत असेल तर त्या व्यक्ती वेगळ्याच नंदनवनात वावरत आहेत असे म्हणावे लागेल.

    ReplyDelete
  8. गोडसे यांना अशी बंदी नवी नाही. यापूर्वी नथुराम यांच्या शेवटच्या जबानीवर सरकारने बंदी घातली होती. गोपाळ गोडसे यांच्या 'गांधीहत्या आणि मी' या पुस्तकावरही काही काळ बंदी घालण्यात आली होती. पुढे युती सरकारच्या काळात 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकावर बंदीसाठीही उग्र निदर्शने झाली होती. कशासाठी हवी होती ही बंदी? महात्मा गांधी हयात असताना आणि त्यांचा खून झाल्यानंतरही त्यांची बदनामी मोहीम सुरूच आहे. जहाल, मवाळ, साम्यवादी, समाजवादी, मुस्लीम लीग, सावरकरवादी, आंबेडकरवादी, झालेच तर इंग्रज सरकार अशा सर्वानीच गांधीजींची यथेच्छ बदनामी करूनही ते संपलेले नाहीत. काँग्रेसने तर गांधी यांच्या नावाचे खेळणेच केले. त्यांचे पुतळे उभारले, सरकारी िभतींवर त्यांचे फोटो चढविले आणि सरकारी खर्चाने त्यांची जयंती-मयंती साजरी केली म्हणजे आपण गांधीविचारांचे असा स्वार्थी समज काँग्रेसी नेत्यांनी जाणीवपूर्वक पसरवला. हीसुद्धा गांधीजींची बदनामीच होती. त्याने गांधीजींची लोकप्रियता, त्यांची थोरवी कमी झाली, असे घडलेले नाही. जगभरच्या स्वातंर्त्येच्छुकांना ते प्रेरणा देतच राहिले. जगभरातील अनेक जनचळवळींना त्यांचे विचार दिशा देतच राहिले. तेव्हा नथुराम यांच्यावरील आगामी माहितीपट गांधींना देशद्रोही ठरवील असा भ्रम ज्यांना बाळगायचा त्यांनी तो खुशाल बाळगावा. इतरांनी तसा विचार करण्याचे कारण नाही. सर्वच गोष्टी चर्चा आणि चिकित्सेसाठी खुल्या असल्या पाहिजेत. थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी अशा प्रकारे 'गांधीहत्या आणि मी' या पुस्तकाची चिकित्सा करून गोडसे यांची कांगावेखोरी उघडकीस आणली होती. इतिहास सांगण्याचा दावा करणारे हे पुस्तक सावरकरांबाबत कसे नेहमीच दुग्ध्यात बोलते हेही त्यांनी दाखवून दिले होते. तीच गोष्ट नाटकाची. ज्येष्ठ संशोधक य. दि. फडके यांनी ते नाटक किती अर्धसत्यांवर आधारलेले आहे हे 'नथुरामयणा'तून सिद्ध केले होते. आज ते नाटकही आहे आणि पुस्तकही. लोकांना काय घ्यायचे ते घेऊ द्यावे. ते सगळे वाचून विचार करू द्यावा. पुतळे उभारायचे असतील तर उभारू द्यावेत. पुतळ्यांमुळे कावळे आणि कबुतरांचीही सोय होऊन तेवढीच भूतदयाही होते. पण आज सगळेच - त्यात डावे आणि उजवेही आले- कसे एकेरीवर आलेले. आपल्याला अमान्य असलेल्या विचारांची कत्तल करू पाहण्यास टपलेले. त्यातूनच अशा बंदीच्या मागण्या समोर येत असतात. वृत्तपत्रांत टीका आली, कर त्याची होळी. कुठल्या पुस्तकात आपल्या प्रिय महापुरुषाबद्दल वा देवतेबद्दल कोणी काही वावगे लिहिले, काढ त्याला मारण्याचे फतवे. कुठल्या चित्रपटात एखाद्या धर्माबद्दल कोणी काही म्हटले, फाड त्याचे पडदे. समाजमाध्यमांत कोणी काही मत मांडले, कर त्याला अटक. या अशा उद्योगांमुळे संपूर्ण समाजच वैचारिक अंधत्वाकडे जाण्याची भीती आहे.
    नव्हे, तो तसा चाललाच आहे. अन्यथा गोडसे हा शब्द असंसदीय ठरविण्याच्या कृतीला काय म्हणणार? राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी थेटच हिटलर, मुसोलिनी, इदी अमीन, रावण या खलपुरुषांच्या पंक्तीत गोडसे हे नावही नेऊन ठेवले आहे. म्हणजे आता गोडसे या नावाचा उच्चारही संसदेत निषिद्ध. याचा सर्वात मोठा फटका शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनाच बसणार. कुरियन यांनी त्यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला की कसे हे समजू शकले नाही, पण नावच बदलायचे तर मग ते कम्युनिस्ट पक्षांचेही बदलावे लागेल. कारण लोकसभा सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या असंसदीय शब्दप्रयोगांच्या ९०० पानी सूचीमध्ये कम्युनिस्ट या शब्दाचाही समावेश आहे. संसदेचे सुदैव हे की तेथे डुकरे, लांडगे, कोल्हे अशा आडनावांचे खासदार नाहीत. असते तर त्यांचे नाव घेऊन कोणास बोलता आले नसते, कारण अशी प्राणीनावेही असंसदीय आहेत. या प्रकारांना बालिश म्हणायचे की काय हे ज्याचे त्याने ठरवावे. पण हे प्रचंड विनोदी असून त्याने आपली वैचारिक इयत्ताच अधोरेखित होत आहे हे मात्र खरे.
    एकीकडे विकासाची स्वप्ने दाखवीत सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी यांचे सरकार, दुसरीकडे सया भए कोतवाल, अब डर काहे का म्हणत उन्मादावस्थेत गेलेल्या उजव्या संघटना आणि तिसरीकडे आपलेच केस उपटत आदळआपट करणारे विरोधक असे तिरंगी वगनाटय़ सध्या देशात सुरू असून, भंपक आणि बालिशांचे बहुमत वाढण्यास हे वातावरण पोषकच आहे. यात सर्वसामान्यांचा मात्र मोठाच वैचारिक गोंधळ उडत आहे. आपल्यासमोर वाढून ठेवलेले दिवस नेमके कोणते आहेत हेच त्यांना कळेनासे झाले आहे. त्यातून उद्या त्यांनी विचारस्वातंत्र्य आणि लोकशाही हेच असंसदीय ठरविले नाही म्हणजे मिळविले.

    ReplyDelete
  9. 'नथुराम गोडसे'वर बंदी घाला

    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्या जीवनावरील 'देशभक्त नथुराम गोडसे' या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी करत अखिल भारतीय हिंदू महासभेविरोधात पुण्यातील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज, शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशीच, ३० जानेवारी रोजी हा चित्रपट देशभर प्रदर्शित होत आहे.
    अखिल भारतीय हिंदू महासभेचे सरचिटणीस मुन्नाकुमार शर्मा यांनी या चित्रपटाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना 'नथुराम गोडसे देशभक्त तर गांधीजी हिंदूविरोधी, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे,' असे सांगितले होते. शर्मा यांच्या या विधानाला आक्षेप घेत हेमंत पाटील यांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. न्यायाधीश एस. एस. नायर यांनी यावरील सुनावणी शुक्रवारी ठेवली. ३० जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटामुळे समाजातील धार्मिक सलोखा धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या चित्रपटात आक्षेपार्ह असे काही नाही, हे चित्रपटाचे निर्माते न्यायालयात सांगत नाही तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील मीरत येथे गोडसे यांचे मंदिर बांधण्याचा घाट हिंदू महासभेने घातला आहे. त्यासाठी भूमिपूजनही नुकतेच करण्यात आले. त्यामुळे वाद निर्माण झाला असून उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

    ReplyDelete

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...