मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अजतागायत जो काही प्रवास दिसत आहे तो विकासाकडे नसून धर्मांधतेकडे जाणारा आहे असे कोणीही तटस्थ निरिक्षक म्हणेल. भाजप हा पक्ष रा. स्व. संघाचे अपत्य असल्याने त्याची वैदिकवादी विचारसरणी पुढे रेटणार हे अभिप्रेत होतेच पण फक्त तोच एकमेव अजेंडा रेटला जाईल हे मात्र अभिप्रेत नव्हते. कोंग्रेसचे आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण व सामाजिक/शैक्षणिक धोरण यात अधिक वास्तविकता, सर्वोपयोगी एकसुत्रीपणा आणतील व विकासाच्या दिशा बदलत उद्योग ते रोजगाराच्या व्यापक संध्या उपलब्ध करण्यासाठी नवीन धोरणांची अपेक्षा होती. शिक्षण क्षेत्रालाही मेकालेच्या रोजगारप्रणित गारुडातून बाहेर पाडत विद्यार्यांचे कल लक्षात घेत त्यात त्यांना "तज्ञ" बनवणारे नवीन धोरण आणतील अशीही अपेक्षा होती. भारत-पाक सीमेवर कोंग्रेसच्या राजवटीत जेवढ्या घुसखोरीच्या, भारतीय सैनिकांच्या मृत्युच्या घटना घडत होत्या त्यात कमी होणे सोडा या "छप्पन इंची" छातीच्या प्रधानसेवकाच्या काळात वाढच झालेली दिसते.
याचा अर्थ असा घ्यायचा कि खरे तर या सरकारकडे राबवण्यासाठी मुळात धोरणच नाही? प्रत्यक्षातील वास्तव तर तेच दिसते आहे. जेही काही धोरण आहे ते मात्र सुरुवातीपासून चर्चेचे, समाजाच्या टीकेचे कारण बनलेले आहे. सुरुवात केली ती स्मृती इराणी यांनी. शपथविधी होऊन काही दिवस उलटतात न उलटतात तोवर त्यांनी अभ्यासक्रमात वैदिक विज्ञान-गणित वगैरे सामील करणार असे घोषित करुन धुरळा उडवून दिला व या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत हे एका परीने घोषित केले. बात्राप्रणित शिक्षणप्रणाली गुजराथमद्ध्ये राबवली गेलीच असल्याने आता ती भारतभर राबवली जाणार अशी रास्त शंका नागरिकांना येणे स्वाभाविक होते. तुर्तास जरी हे धोरण गासडीत बांधून ठेवले असले तरी ते पुढे खरेच राबवले जाणार नाही असेही नाही. नंतर अलीकडेच इराणीबाईंनी अभ्यासक्रमात जर्मनीऐवजी संस्कृतचे पिल्लू सोडले. खरे तर ही ऐच्छिक भाषा आहेच. परंतू संस्कृत या मृत भाषेची सक्ती करणे म्हणजे मुलांचा वेळ वाया घालवणे. बरे ही भाषा वैदिकांची असा काहीतरी गैरसमज (जसे भारतीय संस्कृतीबाबत संघाचे आहेत) यांचा आहे त्यामुळे एवढे कवतूक. प्रत्यक्षात ही भाषा सनपुर्व ३०० ते सन १५० या कळात क्रमश: कशी उत्तर ते महाराष्ट्रापर्यंतच्या दक्षीण भागात कशी उत्क्रांत झाली याचे अतोनात पुरावे उपलब्ध आहेत. या भाषेची निर्मिती बौद्ध ते अनेक अवैदिक समाज व सत्तांनी केली. याचा फक्त वैदिकांशी काही संबंध नाही. परंतू सांस्कृतिक अपहरणे करत वैदिक महत्ता गाजवण्यासाठी संस्कृतचा हत्याराप्रमाणे गेल्या सहस्त्रकात वापर केल्का गेला हेही वास्तव आहे आणि तोच कित्ता आता गिरवण्याची त्यांना हौस आली आहे एवढाच मतितार्थ त्यातून निघतो. अर्थात संस्कृतच्या सक्तीलाही विरोध झाला....स्मृती इराणी यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले. त्यात "रामजादे-हरामजादे" हे "हे राम" म्हणायला लावील असे प्रकरण घडले. ते वादळ अजून शमत नाहीय.
हे प्रकरण ताजेच असतांना आता सुषमा स्वराज वैदिक सांस्कृतिक झेंडा घेऊन पुढे सरसावल्या आहेत. त्यांनी दिल्ली येथील भगवद्गीतेच्या ५१५१ व्या वर्धापनदिनी लाल किल्ल्यासमोर झालेल्या कार्यक्रमात गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करण्याची पंतप्रधानांकडे मागणी केली. आपण या कार्यक्रमात मंत्री म्हणुन सामील झालो नाहीत अशी पुस्तीही त्यांनी जोडली. या कार्यक्रमात त्या असेही म्हणाल्या कि, "बराक ओबामांना मोदींनी गीतेची प्रत भेट दिल्याने अनौपचारिक रित्या गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा दिलेलाच आहे." या त्यांच्या असांस्कृतिक मागणीमुळे अजून नवे वादळ उठणे स्वाभाविक होते. तसे ते उठलेही आहे.
खरे तर मोदींच्या सध्या रिकामटेकड्या असलेल्या मंत्र्यांनी संघाची बौद्धिके देणा-या पुस्तकांपार जात अन्य संशोधनेही वाचायचे कष्ट घेतले पाहिजेत. तसेही सर्व खात्यांचे खरे मंत्री मोदीच असल्याने त्यांना वेळच वेळ आहे. तो जरा सत्कारणी तरी लावला पाहिजे व भारतीय केंद्रीय मंत्रीमंडळ हे अर्धवट ज्ञानी नसून सखोल अभ्यासकही आहेत हे सिद्ध होईल. असो. आपण हा गीताप्रकार नीट समजावून घेवूयात.
भगवद्गीता काय आहे?
भगवद्गीता ही साक्षात श्रीकृष्णाने महाभारताच्या समरप्रसंगी हतोत्साहित झालेल्या अर्जुनाला युद्धोन्मूख करण्यासाठी सांगितली यावर सर्वच हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. प्रत्यक्षात महाभारताचे अभ्यासक यावर काडीइतकाही विश्वास ठेवत नाहीत. महाभारताच्या भीष्मपर्वात गीता येते. मुळात १८ अध्यायांची गीता रणभुमीवर कृष्णाला सांगायचा अवधी मिळाला हेच गृहितक, महाकाव्यात शोभत असले तरी, वास्तवात ते शक्य नाही. मुळात आज उपलब्ध असलेले महाभारत व्यासांचे नाही. व्यासांचे मुळ वीरकाव्य हे "जय" नांवाचे होते व ते ८८०० श्लोकांचे होते. पुढे "जय"चे भारत व पुढे अजून भर पडत महाभारत झाले ते सौति व जनमेजयामुळे. ही रचना शेकडो वर्ष चालु असली तरी त्याला अंतिम रुप गुप्तकाळात इसवी सनाच्या चवथ्या शतकात मिळाले असे विद्वानांचे मत आहे. गीता मुळात व्यासांची कि सौतीची याबाबतही विद्वानांत मतभेद आहेत.
हे असे असले तरी गीतेत एकाच वेळीस इतके तत्वज्ञान प्रवाह आले आहेत कि गीतेला नेमके काय सांगायचे आहे याबाबतही घोळ आहे. एकाच वेळीस युद्धभुमीवर अर्जुनाला युद्धायमान करण्यासाठी इतकी सारी तत्वज्ञाने कृष्ण सांगत बसेल हेही संभवनीय नाही. त्यामुळे युद्धभुमीवर सांगितली गेलेली गीता प्रत्यक्षात एखाददुसराच अध्याय असू शकेल असेही विद्वानांचे मत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गीतेच्या प्रत्येक अध्यायाचा शेवट हा ज्या समाप्तीने केला आहे तो पाहता व तसा महाभारतात अन्य कोणत्याही अध्यायात दिसत नसल्याने त्याची रचनाच एक स्वतंत्र पुस्तक म्हणून झालेली दिसते.
खरे तर गीता हा तत्कालीन उपलब्ध तत्वज्ञानांचा कुशलतेने केला गेलेला संग्रह आहे व त्याचे महत्व वाढवण्यासाठी महाभारतातील युद्धप्रसंगाचा अत्यंत चपखलपणे वापर केला गेलेला आहे. तसा गीता हा ग्रंथ कृष्णाच्या नांवावर असला तरी ते वास्तव नाही. असू शकत नाही. सध्याचे महाभारत हे इ.स. च्या चवथ्या शतकात सिद्ध झाले. मुळ व्यासप्रणित "जय" मद्धे नेमके काय होते हे कळयला आता तरी मार्ग नाही. मुळात ते फक्त ८८०० श्लोकांचे होते. पुढे त्यात भर पडत गेली व जवळपास लाख श्लोकांचे महाभारत बनले. गीता ही कधीतरी दतिस-या-चवथ्या शतकाच्या आसपास कोणी अनाम तत्वद्न्याने महाभारतात घुसवली असे स्पष्ट दिसते.
भगवद्गीतेवर आजवर अनेक टीका (भाष्ये) झालेली आहेत. उपलब्ध असणारे जुने भाष्य हे आदी शंकराचार्यांचे असून त्यांनी गीता ही अद्वैतवादी व निवृत्तीपर असल्याचे प्रतिपादन केलेय तर मध्वाचार्यांनी त्यात विशिष्टाद्वैतवादाचा शोध लावला आहे. ज्ञानेश्वरांना त्यात संन्यास/ज्ञानयोग दिसतो तर टिळकांना गीतारहस्यात गीता ही कर्मयोगपर असल्याचे वाटते. म. गांधींनीही गीतेवर भाष्य लिहिले असून तीत त्यांना "अनासक्तियोग" दिसतो. याचा अर्थ असा कि आजवर प्रत्येक भाष्यकाराने गीतेतून आपल्याला हवा तसा अर्थ काढला आहे आणि ते केवळ सहजशक्य अशासाठी आहे कि त्यात सर्वच प्रकारांच्या तत्वज्ञानांची रेलचेल आहे. अनेक तत्वज्ञाने स्वाभाविकपणेच परस्परविरुद्ध आहेत. उदा संन्यासयोग आणि कर्मयोग परस्परांशी मेळ कसा घालतील? थोडक्यात गीता हा तत्वज्ञानांचा संग्रह आहे आणि त्या दृष्टीने त्याचे तत्वज्ञानांचा इतिहास पाहण्यासाठी मोल आहेच!
गीता ५१५१ जुनी?
संस्कृतीवादी नेहमीच आपले प्रिय ग्रंथ किती पुरातन आहेत हे सांगण्यात धन्यता मानतात. महाभारताचा काळ कथित नक्षत्रस्थितीवरून इसपू ३१३९ एवढा काढला जातो. त्यात काही अर्थ नाही हे सर्व विद्वानांना मान्य आहे. मुळात ऋग्वेदच इसपू १५०० वर्षाच्या मागे जात नाही. एडविन ब्रायंट म्हणतात जर उत्खननांत उपलब्ध जालेले पुरावे आणि महाभारतातील पुरामद्ध्ये हस्तिनापूर वाहून गेले ही कथा विचारात घेतली तर महाभारत इसपू चारशेच्या पलीकडे घडलेले असू शकत नाही. अंधभाविकांसाठी गीता पृथ्वीची निर्मिती झाली त्याही पुर्वीची वाटू शकते. परंतू मंत्र्यांनाही जर तसे वाटत असेल तर मात्र आपल्या देशाचा एकुणातील बुद्ध्यांक ढासळत तर नाहीहेना याची चिंता वाटली पाहिजे.
दुसरे म्हणजे स्वराज म्यडम धडधडीत खोटे बोलतात हेही या निमित्ताने सिद्ध झाले. मोदींनी ओबामांना गीतेची प्रत भेट दिली असे त्या सांगतात. मोदीच अनेक खोटे दडपून बोलत असतांना त्यांचे मंत्रीमंडळ तरी मागे का राहील? खरे असे आहे कि गीता नव्हे तर महात्मा गांधींनी गीतेवर जे भाष्य लिहिले ते मोदींनी ओबामांना भेट दिले. त्यामागील सांकेतिक अर्थ वेगळा होता. स्वराज म्यडमचेच खरे मानायचे तर मग मोदींनी गांधींच्या अनासक्तियोगाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून अनौपचारिक रित्या घोषित केले असा मग अर्थ निघेल. अर्थात तसेही वास्तव नाही. गीता हा धर्मग्रंथ नसून तत्वज्ञानांचा संग्रह अहे असे सुयोग्य निरिक्षणही उच्च न्यायालयाने २०१२ साली नोंदवले होते हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे.
राष्ट्रीय ग्रंथ?
गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावे ही मागणी स्वराज यांनी केली हे अधिक गंभीर आहे. पहिली बाब म्हणजे कोणताही धर्मग्रंथ भारतात राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करता येत नाही कारण भारताने धर्मनिरपेक्षतेची चौकट स्विकारली आहे. गीता जरी तत्वज्ञानांचा संग्रह असला तरी त्यालाही राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करता येत नाही कारण गीता हा परस्परविरोधी तत्वज्ञानांनी भरलेला ग्रंथ आहे. त्यतील अर्जुनाला "युद्धायमान" करणारा कृष्ण संघाच्या एकुण विचारसरणीला प्रेय वाटत असला तरी मुळात तत्वज्ञान हे सापेक्ष आणि नेहमीच द्वंद्वात्मक असल्याने त्यात कोणातही एकमत होऊ शकत नाही.
गीतेवर आजवर शेकडोंनी भाष्ये लिहिली गेली आहेत. सांप्रदायिक मंडळी त्यात आघाडीवर राहिली आहेत. गीतेची परसंगी मोडतोड ते करतात. अलीकडचेच उदाहरण म्हणजे रशियात गीतेवर बंदी आल्याची बातमी इकडॆ फार गाजवली गेली होती. प्रत्यक्षात गीतेवर नव्हे तर गीतेच्या इस्कोनचे संस्थापक प्रभुपाद यांच्या भाष्यावर ती बंदी होती कारण त्यांनी हिंसेला प्रोत्साहन दिले होते. हे सत्य मी उजेडात आणल्यानंतर इस्कोनी भडकले होते हेही वास्तव आहे. थोडक्यात गीतेचा हवा तसा सोयिस्कर उपयोग सर्वच पंथांनी केला आहे असे दिसून येईल.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे यच्चयावत जगात कोणत्याही राष्ट्राने कोणत्याही धर्मग्रंथ अथवा तत्वज्ञानग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देलेली नाही. इस्लामी राष्ट्रांत शरियाचे कायदे लागू असले तरी त्यांनीही कुराणला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित केलेले नाही. भारतात गीता शैव-शाक्तांना तसेच अनेक नास्तिक पंथांना जुन्या काळापासूनच मान्य नाही कारण गीतेत असलेले वैदिक समर्थन.
कोणाला कोणता ग्रंथ धर्मग्रंथ म्हणून आवडावा याचे स्वातंत्र्य घटनेने नागरिकांना दिलेले आहेच. त्यातील तत्वज्ञानाचा रुचेल तसे अर्थ काढत प्रचार-प्रसार करायलाही कोणी अडवलेले नाही. भारतात असंख्य तत्वज्ञानांची रेलचेल आहे. त्यात सांख्य-चार्वाकादि नास्तिक तत्वज्ञाने आहेत तशीच नाथ, शैव/शाक्त, बौद्ध, जैनादि स्वतंत्र धर्मप्रेरणांनी निर्माण झालेली वैदिकविरोधी स्वतंत्र तत्वज्ञानेही आहेत. कोणते तत्वज्ञान आपल्या जीवनाचा आधारस्तंभ म्हणून वापरावे/अभ्यासावे याचे मन:पुत स्वातंत्र्य आपले संविधान देते.
अशा परिस्थितीत वैदिकवादाने झपाटलेल्या मंडळीने आमचे (ते त्यांचे नसले तरी...उदा सांख्य तत्वज्ञान अवैदिकांचे आहे) तत्वज्ञान वा आमचा धर्मग्रंथ हाच राष्ट्रीय ग्रंथ व्हावा अशी मागणी, तेही स्वत: मंत्र्यांनी करावे हे अजब आहे...निषेधार्ह आहे.
मोदी सरकार कोठे चालले आहे याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. जनतेचे प्रश्न, त्यांच्या आशा/आकांक्षा व जीवनस्वप्ने वास्तवात येण्यासाठी धोरणे न ठरवता, अंमलबजावणी न करता फुटकळ विषयांना चर्चेत आणत लोकांचा वेळ वाया घालवणे त्यांना शोभत नाही. चर्चाच घडवून आणायच्या तर विकासावर. धर्मावर नव्हेत याचे भान अजुनही मोदी सरकारला येत नसेल तर त्यांनी जनतेचा घोर विश्वासघात केला आहे असेच म्हणावे लागेल!