Monday, September 28, 2015

आम्हाला सत्य का नको आहे?

ज्ञानाची रचना हे जगातील उपलब्ध ज्ञान समजावुन घेतल्याखेरीज होणार नाही. इंग्रजी ही ज्ञानभाषा बनली कारण प्राकृत, संस्कृत, अरबी, चीनी ते पार आपल्याल माहितही नसलेल्या भाषांतील उपलब्ध प्राचीन साहित्य, शिलालेख ईईई सर्व त्यांनी आपल्या भाषेत तर नेलेच पण त्यावर अभ्यासपुर्ण प्रस्तावना/विश्लेशने लिहिली. कथासरित्सागर असो कि गाथा सप्तशती, मीदोज ओफ़ गोल्ड हे अल मसुदीचे प्रवासवर्णन असो कि रिचर्ड बर्टनचे अरेबियन नाइट्स....अगणित उदाहरणे आहेत. त्याहीपेक्षा उत्खनने, पुराणवस्तुंचे संशोधन यात युरोपियनांनी आघाडी घेतली. नियाच्या Aurel Stein यांनी शोधलेल्या प्राकृत भाषेतील (ज्या पुरातन मराठीशी साधर्म्य दाखवतात) पाट्या असोत कि बुद्धिस्ट स्तूप...यातही त्यांनी आघाडीच घेतली. एका फ्रेंच तरुणाने अवेस्त्याचा फ्रेंचमद्ध्ये अनुवाद करण्यासाठी काय कष्ट उपसले हे पाहिले तर थक्क आणि नतमस्तक व्हायला होते. ते जाऊद्या, आपल्याच येथल्याच खरोष्टी आणि ब्राह्मी लिपीतील लेख शोधून ते वाचायला ब्रिटिशच आले होते. येथले मुखंड त्यात कामी आले नाही.
जिज्ञासा म्हणजे काय हे तर त्यातून दिसतेच पण आपल्याला आपली शरम का वाटायला हवे तेही यातून ठळक होते. आम्ही आमचे काही जतन करण्याचा प्रयत्न करणे तर दूर त्याचे वाटोळे कसे करता येईल हे पाहण्यात आम्ही धन्यता मानली. १८८३ साली प्रसिद्ध झालेले मल्हारराव होळकरांचे मराठी चरित्र मला टोरोंटो विद्यापिठाच्या वेबसाईटवर डिजिटल स्वरुपात मिळाले....भारतात नाही. आम्ही फक्त पुरातनाचा गवगवा करण्यात धन्यता मानली. बोगसपणा करत "आमचे वेद किती पुरातन आहेत आणि राम किती जुना..." याच्या छातीफोड गप्पा हाणण्यात धन्यता मानली. प्रसंगी खोटेपणा व फोर्जरीचाही वारेमाप उपयोग केला. सिंधू संस्कृतीच्या मुद्रांतही अशीच फोर्जरी करुन जगभर लाज घालवली. वैदिक विमानांचे लाज काढणारे प्रकरण तर अगदीच अलीकडचे.
कशाला हे? आम्हाला सत्य का नको आहे? आम्हाला ज्ञान का नको आहे? आम्हाला जागतिक ज्ञानावर कुरघोडी करायची असेल तर आमच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवायला हव्यात हे का समजत नाही? आम्ही डिजिटल ईंडियाच्या नव्या थापा सुरू केल्या आहेत...पण आम्ही त्यात ०.१% सुद्धा पुढे सरकलो नाहीत हे वास्तव काय सांगते? कोठे मेलीत आमची विद्यापीठे आणि कोठे डुबल्यात त्यांच्या कोट्यावधीच्या ग्रांटी? टुकार गमजा मारत जगणारी गांडुळे फेसबुकापुरत्या डरकाळ्या फोडतात, एवढीच आमच्या जगण्याची फलश्रुती आहे कि काय?
भिकारचोट रिकामटेकडेपणा भारतात किती आहे ते व्यस्त आणि व्यस्त असलेल्या व्हाट्सप ते फेबुवरुन दिसतेच. हे लोक त्याच इंटरनेटचा उपयोग आहे त्या ज्ञानासाठी किती करतात हा प्रश्न विचारला तर उद्वेगजनक उत्तर मिळेल. पण प्रश्नच विचारायचे आम्ही विसरून गेलोत. आणि आमच्याकडे सारीच उत्तरे आहेत या शेखचिल्ली स्वप्नांत दंग राहत थोडा तरी अभ्यास करायला पाहिजे याची जाण घालवून बसलोत.
आमचे सारे काही असे आहे...म्हणून काहीच नाही. गतकाळातल्या गमजा थापा मारून टिकत नाहित. आणि अशा लोकांना भविष्यकाळ काय असणार?

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...