ज्ञानाची रचना हे जगातील उपलब्ध ज्ञान समजावुन घेतल्याखेरीज होणार नाही. इंग्रजी ही ज्ञानभाषा बनली कारण प्राकृत, संस्कृत, अरबी, चीनी ते पार आपल्याल माहितही नसलेल्या भाषांतील उपलब्ध प्राचीन साहित्य, शिलालेख ईईई सर्व त्यांनी आपल्या भाषेत तर नेलेच पण त्यावर अभ्यासपुर्ण प्रस्तावना/विश्लेशने लिहिली. कथासरित्सागर असो कि गाथा सप्तशती, मीदोज ओफ़ गोल्ड हे अल मसुदीचे प्रवासवर्णन असो कि रिचर्ड बर्टनचे अरेबियन नाइट्स....अगणित उदाहरणे आहेत. त्याहीपेक्षा उत्खनने, पुराणवस्तुंचे संशोधन यात युरोपियनांनी आघाडी घेतली. नियाच्या Aurel Stein यांनी शोधलेल्या प्राकृत भाषेतील (ज्या पुरातन मराठीशी साधर्म्य दाखवतात) पाट्या असोत कि बुद्धिस्ट स्तूप...यातही त्यांनी आघाडीच घेतली. एका फ्रेंच तरुणाने अवेस्त्याचा फ्रेंचमद्ध्ये अनुवाद करण्यासाठी काय कष्ट उपसले हे पाहिले तर थक्क आणि नतमस्तक व्हायला होते. ते जाऊद्या, आपल्याच येथल्याच खरोष्टी आणि ब्राह्मी लिपीतील लेख शोधून ते वाचायला ब्रिटिशच आले होते. येथले मुखंड त्यात कामी आले नाही.
जिज्ञासा म्हणजे काय हे तर त्यातून दिसतेच पण आपल्याला आपली शरम का वाटायला हवे तेही यातून ठळक होते. आम्ही आमचे काही जतन करण्याचा प्रयत्न करणे तर दूर त्याचे वाटोळे कसे करता येईल हे पाहण्यात आम्ही धन्यता मानली. १८८३ साली प्रसिद्ध झालेले मल्हारराव होळकरांचे मराठी चरित्र मला टोरोंटो विद्यापिठाच्या वेबसाईटवर डिजिटल स्वरुपात मिळाले....भारतात नाही. आम्ही फक्त पुरातनाचा गवगवा करण्यात धन्यता मानली. बोगसपणा करत "आमचे वेद किती पुरातन आहेत आणि राम किती जुना..." याच्या छातीफोड गप्पा हाणण्यात धन्यता मानली. प्रसंगी खोटेपणा व फोर्जरीचाही वारेमाप उपयोग केला. सिंधू संस्कृतीच्या मुद्रांतही अशीच फोर्जरी करुन जगभर लाज घालवली. वैदिक विमानांचे लाज काढणारे प्रकरण तर अगदीच अलीकडचे.
कशाला हे? आम्हाला सत्य का नको आहे? आम्हाला ज्ञान का नको आहे? आम्हाला जागतिक ज्ञानावर कुरघोडी करायची असेल तर आमच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवायला हव्यात हे का समजत नाही? आम्ही डिजिटल ईंडियाच्या नव्या थापा सुरू केल्या आहेत...पण आम्ही त्यात ०.१% सुद्धा पुढे सरकलो नाहीत हे वास्तव काय सांगते? कोठे मेलीत आमची विद्यापीठे आणि कोठे डुबल्यात त्यांच्या कोट्यावधीच्या ग्रांटी? टुकार गमजा मारत जगणारी गांडुळे फेसबुकापुरत्या डरकाळ्या फोडतात, एवढीच आमच्या जगण्याची फलश्रुती आहे कि काय?
भिकारचोट रिकामटेकडेपणा भारतात किती आहे ते व्यस्त आणि व्यस्त असलेल्या व्हाट्सप ते फेबुवरुन दिसतेच. हे लोक त्याच इंटरनेटचा उपयोग आहे त्या ज्ञानासाठी किती करतात हा प्रश्न विचारला तर उद्वेगजनक उत्तर मिळेल. पण प्रश्नच विचारायचे आम्ही विसरून गेलोत. आणि आमच्याकडे सारीच उत्तरे आहेत या शेखचिल्ली स्वप्नांत दंग राहत थोडा तरी अभ्यास करायला पाहिजे याची जाण घालवून बसलोत.
आमचे सारे काही असे आहे...म्हणून काहीच नाही. गतकाळातल्या गमजा थापा मारून टिकत नाहित. आणि अशा लोकांना भविष्यकाळ काय असणार?
This type of rough language not expected from you, Mr. Sonawani!
ReplyDeleteWhy you are used this (Bhikarchot) ugly word? Keep control on your language! Otherwise there is no difference between you and Avinash!
आप्पा - विकास , आम्ही तुमचा आणि तुमच्या सारख्या लिहा वाचा , मी भारतीय स्नेहप्रभा किंवा वाल्हेकर वगैरे इतर अनेकांचा आदर करत असतो , त्यांची मते तर कधी कधी खूपच नवीन विचार सुचवून जातात नवीन माहिती शिकवतात ,पण अविनाश पाटसकर हे फारच विचित्र लिहितात .
ReplyDeleteबाप्पा - आमची त्याना अगदी कळकळीची विनंती आहे की सध्या हा ब्लोग अनेक लहान मुलेही वाचत असतील , आणि आपण सर्वानीच आपल्या लिखाणावर ताबा ठेवायला हवा .
आप्पा - पाटसकर यांनी अशी धारणा करून घेतली आहे की संजय सोनवणी यांचा एक प्रचारकी ग्रुप आहे आणि ती मंडळी पाटसकर याना त्रास देत असतात , पण हे खरे नाही . पाटसकर याउलट भिकारचोट सारखे असंसदीय शब्द वापरत असतात .
बाप्पा - हा मंच ज्ञान विस्तारासाठी आहे , पण हे ज्ञान जे जे उत्तम उदात्त उन्नत ते ते असे असावे
आम्हाला आशा आहे की इथे कोणाचाही अपमान होणारे लिखाण केले जाणार नाही .
आप्पा - विकास जरा खोलात जाउन मनन चिंतन केलेस तर तुला जाणवेल की संजयाने भिकारचोट हा शब्द कुणाला हिणवण्या साठी नाही वापरला , तर परिस्थितीतील अस्वस्थता आणि अपरिहार्यता दाखवण्यासाठी त्यांनी तो शब्द वापराला आहे .एका ओघवत्या भावनेचा आविष्कार होत असताना आलेले ते उत्स्फूर्त प्रकटन आहे कुऱ्हाडे यांचे खास अभिनंदन
आप्पा - श्रीराम चुकले आहेतच , पण शेवटी राङ्कथा हि काल्पनिक आहे , ते सत्य नाही
बाप्पा -कोणी काय लिहिले हे बघताना , काय संदर्भाने लिहिले आहे ते बघायला पाहिजे .
Pramanit Marathi waperapsun aho shivya samplya aahe. Pl. Marathenche pustk milale tar wacha. I will help u. Tyachya tulnet bhikarchot ashich milmilit watate. It is an adjective for effect of immotion. Sorry.
ReplyDeleteआप्पा - माननीय अभय पवारजी , आपण काय लिहिले आहे ते वाचण्यास मन उत्सुक होते , खूप प्रयत्न केला तरीही काही समजले नाही कारण इंग्रजी अल्फाबेट वापरून लिहिलेले मराठी काही समजत नाही - जे समजले ते असे त्यात सुधारणा करावी .
ReplyDeleteबाप्पा -प्रमाणित मराठी वापेराप्सून अहो शिव्या संपल्या आहेत प्लीज मराठेंचे पुस्तक मिळाले तर वाचा आय विल हेल्प यू . त्याच्या तुलनेत भिकारचोट अशीच मिळमिळीत वाटत्ये It is an adjective for effect of immotion. Sorry.
आपण परत लिहिल्यास बरे होईल आणि हे मराठे कोण तेपण समाजात नाही . ह मो मराठे का ?
आप्पा - आपण काय उद्देशाने लिहिले आहे तेपण काळात नाही , कृपया वेळात वेळ काढून लिहावे हि नम्र विनंती .
बाप्पा - धन्यवाद !
"एका फ्रेंच तरुणाने अवेस्त्याचा फ्रेंचमद्ध्ये अनुवाद करण्यासाठी काय कष्ट उपसले हे पाहिले तर थक्क आणि नतमस्तक व्हायला होते." __________________ वेद आणि अवेस्त्यात किती साम्य आहे हे मात्र शोधायचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही. आम्ही उलट वैदिक लोक हे अफगाणिस्तानातून आले हे हिरहिरीने सांगतो. हिंदी-इराणी, भाषा व फारसी भाषा ह्या दक्षिण युरोप पासून उत्तर आफ्रिका ते आत्ताचा पाकिस्तान अफगाण पर्यंत पसरली होती. सिंधू शिक्क्यांवर सापडलेली लिपी हि अक्षरे नसून ग्रीक रोमन अंकाशी जुळणारे अंक आहेत. हे आत्ता स्पष्ट होते आहे, अर्थात इंटरनेटवर मिळालेली माहिती किती ग्राह्य आणि त्यावरून आपले मत ठरवणे म्हणजे अवघडच आहे. चुकीचीच माहिती अधिक असते.
ReplyDeleteटसएप या प्रकाराने सारे भारतीय जनांचे विश्वच बदलून टाकले आहे . फुकट म्हटले की ते अत्यंत लोकप्रिय होते हा महत्वाचा मुद्दा आहे.आपण म्हणता तसे लोकांकडे किती रिकामटेकडा वेळ पडून आहे तेही स्पष्ट होते.आपण उद्योगी म्हणून कधीच जगात प्रसिद्ध नव्हतो, उदंड खाणे आणि नंतर गावगप्पा करत दिवेलागणी पर्यंत टंगळ मंगळ करणे हा आपला आवडता उद्योग आहे , हा इथल्या पाण्याचाच गुण असावा. इथे जगायला अडचण काहीच नसते,आणि जिथे येते तिथे धर्माच्या नावावर कसे ओरबाडून घ्यायचे ते आपणास माहित आहे , अशा रीतीने आम्ही किती थोर हा डांगोरा पिटत आपण जगात असतो, ससा कासवाच्या गोष्टीतला ससा होणे आपण पसंद करतो .
ReplyDeleteआपली अहंमन्यता आपल्यावर राज्य करणार्यांनी उत्तम रीतीने जोपासली आणि आपल्याला अलगद लुटून बरबाद केले तरी आपल्याला त्याचा पत्ता नाही .
आपल्या सवाई किती हळूहळू बदलत आहेत हे आपण पाहिले तर आपल्याकडे कोणतेही ध्येय नाही , हेच सिद्ध होते , राष्ट्रीय अस्मिता नाहीच , धार्मिक निष्ठा नाही ,सांस्कृतिक जाणीवा बोथात्लेल्या आहेत , फक्त सुखी आणि ऐषारामी जीवनाची ओढ आहे आणि टीव्हीवर दिसणाऱ्या मालिकांची पुनरावृत्ती करत जगणे यातच इति कर्तव्यता आहे , क्रिकेट सारखे बिन बुडाचे खेळ म्हणूनच आपल्या कडे लोकप्रिय होतात .