Monday, October 5, 2015

विश्वाच्या अंतापर्यंत!

तुझ्या आकांताचा.
हृदय विदीर्ण करणा-या
वेदनांचा
मी
विसावा आहे
सखे
ये विसाव
माझ्या अश्रुंत
तुला भिजवत
तुझ्या वेदनांना
मी विझवतो...बघ!
पण ये...आकांतू नकोस...
माझ्या अविरत झरणा-या अश्रुंकडॆ
लक्षही देवू नकोस...
ये!
हसशील तरी
तू एकदा तरी
कोणत्या वेड्याशी गाठ पडली
म्हणून
हसवेलच मी तुला
नि बघत राहील प्रतिबिंब तुझे
माझ्या अश्रुंच्या बिलोरी आयन्यात...
मी वेडाच...
होय सखे
मी नेहमीच वेडा होतो नि राहील
तुझ्यासाठी
विश्वाच्या अंतापर्यंत!

मानवी जीवनाला स्थैर्य देणारा शेतीचा शोध!

शेतीचा क्रांतीकारी शोध हा सुरुवातीच्या शिकारी मानवांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्याआधी इ.स.पू. २०,००० पर्यंत पशुपालक आणि शि...