Monday, October 5, 2015

विश्वाच्या अंतापर्यंत!

तुझ्या आकांताचा.
हृदय विदीर्ण करणा-या
वेदनांचा
मी
विसावा आहे
सखे
ये विसाव
माझ्या अश्रुंत
तुला भिजवत
तुझ्या वेदनांना
मी विझवतो...बघ!
पण ये...आकांतू नकोस...
माझ्या अविरत झरणा-या अश्रुंकडॆ
लक्षही देवू नकोस...
ये!
हसशील तरी
तू एकदा तरी
कोणत्या वेड्याशी गाठ पडली
म्हणून
हसवेलच मी तुला
नि बघत राहील प्रतिबिंब तुझे
माझ्या अश्रुंच्या बिलोरी आयन्यात...
मी वेडाच...
होय सखे
मी नेहमीच वेडा होतो नि राहील
तुझ्यासाठी
विश्वाच्या अंतापर्यंत!

5 comments:

 1. विश्वाच्या अंतापर्यंत!.. farach uttam!!

  ReplyDelete
 2. आप्पा - उत्तम भावना रेखाटल्या आहेत
  बाप्पा - थोड्याशा व्याकरण तत्सम सुधारणा सांगण्याचा मोह आवरत नाही .
  आप्पा-मी नेहमीच वेडा होतो नि " राहीन " असे हवे होते
  बाप्पा - किंवा हसशील "जरी " एकदा तरी - - - " हसवेनच "मी तुला असे हवे होते असे वाटते ,
  आप्पा - आपण वापरत असलेले न च्या ऐवजी ल हे कुठल्या जिल्ह्यात वापरतात ते सांगाल का सर ?
  बाप्पा - कविता उत्तमच आहे पण हे बारकावे आम्हाला सुचले,पुण्याच्या बोलीभाषेत ते आम्ही म्हणतो तसे शोभले असते . पण आपले मराठी जळगावी असेल म्हणून हा फरक असेल,तो आपण शेअर केलात तर आम्हास आनंद होईल आपले पुनश्च अभिनंदन
  आप्पा - आपले अभिनंदन.आपण काही मत प्रदर्शन कराल अशी आशा आहे.आणि पुणेरी मराठी हेच सर्वश्रेष्ठ आहे असा आग्रह नाही, आपली मराठी शब्दरचना कदाचित जळगावी भाषेला जवळची असेल, आमच्या गिरगावच्या मराठीतही पुण्यापेक्षा फरक असतोच !
  बाप्पा -इसपर एक पेंटिंग भी हो सकता है is it not so sir ?

  ReplyDelete
  Replies
  1. होय आप्पा-बाप्पा...मी खानदेशी...जळगांवचाच आहे आणि मला माझी भाषा हीच प्रमाण वाटते...पुणेकरंना पुण्याची वाटते तशी. व्याकरणात बांधलेल्या भाषा निर्जेव होत जातात असे मला वाटते...संस्कृतचे तसेच झाले. मराठी जीवंत रहायची असेल तर प्रादेशिक भाषाप्रयोगही स्विकारायला हवेत. नाही का?

   Delete
 3. अप्पा बाप्पा ला न चालते आणि अगदी व्यावास्थित सगळ्यांना कळते . उगाच व्याकरणाचा आव आणून इतक्या चांगल्या काव्याला गालबोट लावू नका .. उगाच काहीतरी घेऊन येतात . काळात तर काहीच नाही फक्त रकानेच्या रकाने लिहिता .. अश्याने पाठीचे दुखणे मागे लागेल हो अप्पा बाप्पा , आणि एका जागी बसून मुळव्याध तर आधीच लागले असणार तुम्हाला. तेच सध्या सांभाळा, बाकीचे आम्ही बघतो, तुम्ही वयोवृद्ध आता आरामात राहा.. हीच ह्या पितृपक्षात अपेक्षा करतो..

  ReplyDelete
 4. Mr.sanjay sonavani sir
  mi tumcha sheti varcha lekh vachla. Sheti malachya nirjalikarnababat mala kahi ajun mahiti tumchyakadun milel ka

  ReplyDelete