गोवंश हत्याबंदीबद्दल बरीच चर्चा होत आहे. खरे तर हे चर्चा तशी आपल्या मानसिक अजागळपणाचे लक्षण तर आहेच पण कायदेशीर व सांस्कृतिक बाब म्हणुनही अशी बंदी घालणेही चुकीचे आहे.
गाय, बैल, म्हैस, रेडा, घोडा, हरणे, रानडुक्कर अशा एन्क चतुष्पाद प्राण्यांचे मांस खाने हे भारतीय इतिहासाला नवीन नाही. सिंधू संस्कृतीतही गाय-बैलाचे मांस विपूलपणे खाल्ले जात होते हे संजीव सभलोक यांनी पुराव्यांसहित दाखवून दिले आहे. (वाचा http://www.sabhlokcity.com/2013/07/the-precise-method-of-cow-slaughter-in-the-indus-valley-civilisation/)
वैदिक यज्ञांत पशुहिंसेची रेलचेल असायची. त्यात गोवंशाला मोठे स्थान होते. किंबहुना गोमांस भक्षण हा पवित्र विधी होता. महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक काळातील उत्खननांतही शेळी-मेंढीसारख्या प्राण्यांबरोबरच गाय, बैल, म्हशी खाल्ले जात असत याचे पुरावे उपलब्ध आहेत. (पहा" महाराष्ट्र ग्यझेटियर- प्राचीन काळ:इतिहास:खंड १)
मनुष्य जेंव्हा पशुपालक अवस्थेत होता ते पशुपालकत्वच त्याने मुळात आपल्या अन्नाची सहज सोय व्हावी यासाठी स्विकारले होते. तो नंतर कृषीमानव झाला असला तरी त्याने आपल्या खाद्य सवयी सोडल्या नाहीत. सिंधु संस्कृतीच्या लोकांना बैल हा शेतकामासाठी अत्यंत उपयुक्त पशु वाटला असला तरी त्याला खायचे थांबवले नाही. किंबहुना नंतरच्या काळातही बैल जरी शिवाचे वाहन म्हणून मान्यताप्राप्त होत शिवासमोर कायमचे स्थान मिळवले असले तरी ती पुज्यता ठेवुनही त्याचा खाद्य म्हणुनही वापर कमी झाला नाही. देवाला प्रसाद म्हणून जे अर्पण केले जाते ते माणसाचेही खाद्य असते. पशुबळी यज्ञात होत असत तसेच ते आजही कोणत्या ना कोनत्या रुपात इतर देवतांसमोर होतच असतात. रेड्याचे बळी आजही दिले जातात. गाय-बैलाचेच बळी (किंवा खाद्य म्हणून) नेमके कधीपासून निषिद्ध झाले याचा निश्चित काळ जरी उपलब्ध नसला तरी तो गुप्त कालोत्तर (सहाव्या शतकानंतर) असावा असे अनुमान करंण्याइतपत शिलालेखीय पुरावे उपलब्ध आहेत.
पण ही निषिद्धे नेमकी कोणी व का करवून घेतली? बौद्ध व जैन धर्माचे ही प्रतिक्रिया असावी असे मानले जाते. पण तसे वास्तव दिसत नाही. बौद्ध धर्मात हिंसेचा निषेध असला तरी मांसाहाराचा निषेध नाही. म्हणजे भिक्षुंना कोनी मांस जरी वाढले तरी ते खाण्याचा निषेध नाही. बुद्ध म्हणतात, "Monks, I allow you fish and meat that are quite pure in three respects: if they are not seen, heard or suspected to have been killed on purpose for a monk. But, you should not knowingly make use of meat killed on purpose for you." (Book of the Discipline, Vol. 4, p. 325)
गोवंश मांसाहार निषेध शेतक-यांकडुनच प्रथम झाला असणे स्वाभाविक आहे. त्यासाठी प्राकृतिक कारणे, गोवंशाची प्राकृतिक अथवा यज्ञादि कारणांनी होणारी / झालेली घट शेतीसाठी घातक ठरणे हे व्यावहारिक कारण त्यामागे असणे स्वाभाविक आहे. वैदिक धर्मियांना गोमांस धर्मत्याज्ज्य नव्हतेच. त्यामुळे त्यांनी धर्मनियम बदलले म्हणून गोवंशीय मांस निषिद्ध झाले असे म्हणने अतार्किक आहे. त्यापेक्षा यज्ञांतही पुढे गोपालक ते शेतक-यांनी गोवंशाचा पुरवठाच बंद केल्याने त्यांना यज्ञीय गोवंश हत्या बंद करावी लागली असे म्हणने अधिक तार्किक ठरेल. आणि ही परिस्थिती गोवंश संख्या घटल्याने, शेतक-यांची गरज म्हनून उद्भवणे स्वाभाविक आहे. जोवर ही संख्या मुबलक होती तोवर गोवंश हत्येचा निषेध करण्याचे काही कारण नव्हते. आजही अनेक दुर्मीळ होत चाललेल्या खाद्य पशुंच्या शिकारीवर बंदी केवळ याच कारणाने आली आहे हे विसरून चालणार नाही.
आज शेतीपद्धती बदललेली आहे. पुर्वी ती सर्वस्वी बैलांकरवी होत असे. आधुनिक काळात बैलांची शेतीयोग्य उपयोगिता कमी झालेली आहे. दुधासाठी ज्या डेयरीज आहेत त्या भारतीय वंशाच्या गायी आपल्या फार्म्समद्ध्ये ठेवत नाहीत. जेही शेतकरी घरच्या सोयीसाठी गाय-बैल ठेवतात त्यांच्या अर्थशास्त्राला गायी/बैल ठराविक काळ हातभार लावतात. नंतर निरुपयोगी झालेले हे प्राणी विकून ते नवीन घेतात.
आता गोवंश हत्याबंदीमुळे जर हे प्राणी मरेपर्यंत पोसायचे असतील तर ते नवीन खरेदी करू शकणार नाहीत हे उघड आहे. ते नवीन खरेदी करणार नसतील तर स्वाभाविकपणे या प्राण्यांची पैदास कोण करणार? शेतक-यांची अर्थव्यवस्था संपवण्याचे हे शहरी कारस्थान म्हणावे काय? त्याचे प्रमाण येत्या दहा-पंधरा वर्षात घटत शेवटी भारतीय वंशाच्या गायी आणि बैल फक्त चित्रातच पहायला उरणार, असे होनार नाही काय? जर्सी गायींची पूजा हे भाकड गोभक्त करणार आहेत काय?
भावना आणि श्रद्धा या बाबींपेक्षा नेहमीच प्रबळ असते ती ऐहिक बाब. व्यक्तिगत अर्थशास्त्र जी बाब जीवंत ठेवते तीच बाब लोक अनुसरणार. धर्मसुद्धा अशाच सोयीनुसार बदलतो. बदललेला आहे. मग तो कोणताही असो. इसवी सन हजार पुर्वी गोमांस भक्षण निषिद्ध नव्हते. धार्मिक निषिद्ध आले असले तरी अनेक हिंदू जाती-जमाती त्याचे भक्षण करतच होत्या व आजही करतात. हा केवळ आवडीचा भाग नसून किमान दरात प्रोटीनयुक्त मांस मिळवण्याचा हा सुलभ मार्ग होता. त्यात वावगे काहीही नाही. मुस्लिम/ख्रिस्ती धर्मात गोमांस त्याज्ज्य नाही, त्यामुळे ते खात असले तर त्यातही वावगे नाही. खाण्या-पिण्याच्या सवयी या प्रत्येकाच्या निवडीचा भाग आहे. गायी-बैल हे भारतात दुर्मीळ प्राण्यांपैकी नाहीत. पण त्यांना ही अशी बंदी घालून दुर्मीळ केले जाईल याबाबत शंका नाही.
"गोमाता" हा शब्द भावनिक केला जात आहे. भारतातील गायींची सध्यस्थिती पाहिली तर त्यांची अवस्था तिला हिंदू "माता" मानत असावेत असे दिसण्यासारखी नाही हे दुसरे वास्तव आहे. तिच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असे म्हटले जाते. यातील कोटी म्हणजे संख्येतील कोटी नसून "तीन गटांत विभागलेले तेहतीस प्रकारचे देव" असा अर्थ आहे. ही कल्पना मुळात व्याकरणकार यास्काची. त्याने पृथ्वी, अंतरिक्ष व द्युलोक असे तीन लोक कल्पत प्रत्येक गटात ११ वैदिक देवतांचे विभाजन केले. असे ते तेहतीस देव होतात. यातील सारे देव वैदिक असावेत हा योगायोग नाही. ज्या वेळेस यज्ञांत याच गायीचे व वासरांचे मांस चवीने खाल्ले जात होते त्या काळी कदाचित ते त्रिलोक भक्षण करत असतील. आता त्या तेहतीस कोटी देवांचा हवाला देवून त्यांनीच गायीला "गोमाता" म्हणत आधुनिक काळात दुस-यांवर निर्बंध आणण्यासाठी आटापिटा करावा हे अनाकलनीय आहे.
मी गोमांसाचा भक्षक नाही. परदेशात मी खाल्ले तर चिकन, व तेही भारतीय रेस्तरां सोडुन कोठेही खाल्ले नाही. पण माझे इंग्लंड-अमेरिकेतील भारतीय मित्र मात्र बीफ खाणे निषिद्ध मानत नव्हते. ते स्वाभाविक आहे. ज्या देशात तुम्ही राहता तेथील लोकप्रिय खाद्यपद्धती तुम्हाला अंगिकाराव्या लागतत. विभक्तपणा दाखवत शहाजोगपणा करुन चालत नाही. शेवटी हा विषय व्यक्तिगत निवडीचा आहे. आणि व्यक्तिगत निवड जपने हाच लोकशाहीचा गाभा आहे. एखाद्या प्राण्याच्या हत्येवर व मांस खाण्यावर तेंव्हाच बंदी येवू शकते जेंव्हा एखाद्या प्राणी-प्रजातीचे अस्तित्वच धोक्यात आले असेल. त्याला कोणीही कधीही विरोध केलेला नाही. पण त्यांच्या चोरुन शिकारी कशा होतात हे सर्वज्ञात आहे. आणि अशा शिका-यांना आणि मांसभक्षण करणा-यांना कोणी अधार्मिक म्हटलेले नाही हा धर्माचा दांभिकपणा आहे.
तुम्ही काय खावे, काय नको यावर फालतू चर्चा करत...निष्पापांचे...केवळ मुस्लिम आहे म्हणून प्राण घेत असाल...तर हे लोक धार्मिक नसून धर्माचेच खुनी आहेत असे म्हणने क्रमप्राप्त आहे. यांना कोणता धर्म माहित आहे? उद्या विष्णुचा मत्स्यावतार, वराहावतार, कुर्मावतार म्हणून हेही निषिद्ध (खरे तर यांनी ते आधीच का बनवले नाहीत बरे?) म्हणायला लागले तर नवल वाटायचे कारण नाही,कारण ते एवढे बिनडोक आणि माथेफिरू आहेतच!
मी वैदिकतेबद्दल लिहिले तर अनेकांना चीड येते. पण शेवटी सत्याला तुम्ही कोठे कोठे डावलणार? हा धर्मच भाकड आणि हिंदुंचा घात करणारा आहे, बदनाम करणारा आहे हे जर टळटळीत वास्तवच आहे तर मी तरी काय करणार? तुमचे विखारी फुत्कार मला जाणवत असतात.
पण जगा आणि जगू द्या. तुम्हाला जे प्रिय ते खा आणि दुस-यांना काय प्रिय ते खावू द्या. तुमच्या आंबट आमट्या आणि चतकोरभरचे फुलके सर्वांच्या माथ्यावर मारत तुमची जीही आजची खाद्य संस्कृती आहे ती दुस-यांच्या माथ्यावर थोपू नका. उद्या समजा एमायएम सत्तेवर आले आणि त्यांनी तुम्हाला गोमांसभक्षणाची सक्ती केली तर जशी तुम्हाला चालणार नाही तसेच गोमांस खाऊच नका ही सक्तीही अशाच अतिरेकीपणाची आहे हे समजावून घ्या! आमच्या जीवावर तुमच्या तथाकथिक हिंदुत्वाचे (पक्षी वैदिकत्वाचे) कोड पुरवण्याची नादानी तर बिल्कूल करु नका...कारण आम्ही किमान सत्य जाणतो!