"गाय मारणा-याला ठार करणेच योग्य" अशा आशयाचा लेख वेदांचा हवाला देवून तुफैल चतुर्वेदी यांनी पांचजन्यमद्ध्ये लिहिला असून तसे वेदांत आदेशच आहेत असेही प्रतिपादन केले आहे.
वैदिक धर्मांधांनी किती अधम पातळी गाठली याचे हे एक शर्मनाक उदाहरण आहे. मुळात वेदात असली कसलीही धर्माज्ञा नाही. दुसरी बाब म्हणजे वेद हे हिंदुंचे धर्मग्रंथ नाहीत. त्यामुळे वेदात काय सांगितले ते हिंदुंना कधीच लागु नव्हते व नाही. मुस्लिमद्वेषाच्या नावाखाली हिंदुंवर वैदिकता थोपण्याचे आणि भारतीय मुस्लिमांना भयभीत करण्याचे हे कारस्थान आहे.
गाय, बैल व इतर (पाच नखे असलेले अभक्ष प्राणी वगळता) अन्य खाद्य प्राणी वैदिक खात असत व यज्ञांतही बळी देत असत. गोवधासाठी गोमेध यज्ञ तर अश्वासाठी अश्वमेध यज्ञ केला जात असे. (संदर्भ-The Indian Encyclopaedia, Volume 1, edited by Subodh Kapoor. आणि पहा ऋग्वेद १.१६२.२, ६.१७.१, १०.८५.१३, कृष्ण यजुर्वेद- ८.२१, १.६२.२, शुक्ल यजुर्वेद अध्याय २४...)असे खूप संदर्भ वेदात व वैदिक साहित्यात येतात. तरीही वैदिकांची लबाडी अशी कि आताही कोणाला वेदच माहित नाहीत असे समजून कोलांटउड्या मारतात. लांड्यालबाड्या करून लोकांना फसवायचा आणि भडकवायचा काळ गेला आहे हे यांनी लक्षात ठेवावे.
हिंदुंनी वैदिकांपासून आता तर जास्तच सावध असले पाहिजे. वेदवर्चस्वता लादण्याची आणि मुस्लिम द्वेषाला हिंसेची धार देण्याची रणनिती अंमलात आणन्याची ही तयारी दिसते आहे!
माणसांच्या हत्येचे लंगडे समर्थन करणा-या प्रवृत्तीचा निषेध!