Saturday, October 17, 2015

वैदिकांपासून सावध!

"गाय मारणा-याला ठार करणेच योग्य" अशा आशयाचा लेख वेदांचा हवाला देवून तुफैल चतुर्वेदी यांनी पांचजन्यमद्ध्ये लिहिला असून तसे वेदांत आदेशच आहेत असेही प्रतिपादन केले आहे.

वैदिक धर्मांधांनी किती अधम पातळी गाठली याचे हे एक शर्मनाक उदाहरण आहे. मुळात वेदात असली कसलीही धर्माज्ञा नाही. दुसरी बाब म्हणजे वेद हे हिंदुंचे धर्मग्रंथ नाहीत. त्यामुळे वेदात काय सांगितले ते हिंदुंना कधीच लागु नव्हते व नाही. मुस्लिमद्वेषाच्या नावाखाली हिंदुंवर वैदिकता थोपण्याचे आणि भारतीय मुस्लिमांना भयभीत करण्याचे हे कारस्थान आहे.

गाय, बैल व इतर (पाच नखे असलेले अभक्ष प्राणी वगळता) अन्य खाद्य प्राणी वैदिक खात असत व यज्ञांतही बळी देत असत. गोवधासाठी गोमेध यज्ञ तर अश्वासाठी अश्वमेध यज्ञ केला जात असे. (संदर्भ-The Indian Encyclopaedia, Volume 1, edited by Subodh Kapoor. आणि पहा ऋग्वेद १.१६२.२, ६.१७.१, १०.८५.१३, कृष्ण यजुर्वेद- ८.२१, १.६२.२, शुक्ल यजुर्वेद अध्याय २४...)असे खूप संदर्भ वेदात व वैदिक साहित्यात येतात. तरीही वैदिकांची लबाडी अशी कि आताही कोणाला वेदच माहित नाहीत असे समजून कोलांटउड्या मारतात. लांड्यालबाड्या करून लोकांना फसवायचा आणि भडकवायचा काळ गेला आहे हे यांनी लक्षात ठेवावे.

हिंदुंनी वैदिकांपासून आता तर जास्तच सावध असले पाहिजे. वेदवर्चस्वता लादण्याची आणि मुस्लिम द्वेषाला हिंसेची धार देण्याची रणनिती अंमलात आणन्याची ही तयारी दिसते आहे!

माणसांच्या हत्येचे लंगडे समर्थन करणा-या प्रवृत्तीचा निषेध!

7 comments:

  1. संघाचा बेबनाव अधिकाधिक उघड पडत चाललाय. हे संधोटे आम्ही युरोपातून गाई बैल घेऊन आलो म्हणून सांगत असतात ते तद्दन झूट आहे, हे सगळे इथलेच आहेत. इतकेच काय हे वैदिक इथे २५००० वर्षापासून राहत आलेत, लेटेस्ट शोध आहे हा, जनुकीय शस्त्राप्रमाणे लागलेला. विश्वास ठेवा अगर नका ठेऊ, आंधळेपणाने वेदांवर विश्वास ठेवता ना? जेव्हा ह्यांना थोडेफार सुचायला लागले तेव्हा वेदांच्या १-२ ऋचा रचल्या आणि नंतर रडतखडत फक्त ऋग्वेद लिहायला ह्यांना १०००० वर्षे लागली. पण हे सांगायला हे कुचकुच करतात म्हणून फेकून देतात कि वेद हे ईश्वरनिर्मित आहेत. असे कधी शक्य असते का? काहीही उगाच. तिकडे प्रेषितांचे मात्र अगदी पटते बुवा. त्यांनी फक्त १-२ वर्षात कुराण कि ज्यावरून एक महान धर्म स्थापन झाला ते लिहिले म्हणजे नक्कीच त्यांना जिबरैल ने परमेश्वराकडे नेउन हे सगळे ज्ञान दिले असणार! असो विषयांतर नको नाहीतर ते नीरज सो. बुच ठोकणार! पण सांगायचा मुद्दा हा कि विसरलोच बुवा! आठवले. बहुतेक प्रेषितांना प्रचलित समाजातील वाईट प्रथा परमेश्वराने सांगितल्या असतील, म्हणून बाकीच्या प्रथा त्यांनी तश्याच ठेऊन फक्त वाईट प्रथा बदलल्या असाव्यात. तसे वैदिकांचे दिसत नाही. ह्यांना सगळेच नवीन पाहिजे. अहो आधी शिव धर्म प्रचलित होता, तो सगळा बाद ठरवून म्हणे आमचा वैदिक धर्म श्रेष्ठ, असे कधी होते का? शैव, पशुपत, लिंगायत हे पशुपालक कधी गाय काय साधी मुंगी तरी मारतील का? आणि हे वैदिक ढळ ढाळीत पणे गाई मारून खायचे आणि म्हणतात कि मेध म्हणजे याद्नीय हत्या नाही. मेधा ह्या नावाचा आत्ताचा अर्थ घेऊ नका. रुग्वैदिक अर्थ संजय सरांना माहित आहे. मेधाचा अर्थ पुष्ट करणे असा वैदिक सांगतात. पण हे अग्नी पुष्ट करण्यासाठी गाई -घोड्यांची चरबी वापरायचे कि स्वतःची पुष्टी करण्यासाठी?. राहिलेले मांस तोंडाने खायचे कि नाही हे माहित नाही. उगाच जाळ भादाकावयाचे हे वैदिक! सरांना नक्कीच माहित असणार. त्यांच्या इतके रुग्वैदिक संस्कृत आज कोणालाच कळत नाही. दैवी वारसा लाभलाय त्यांना. शिवाय मनुस्मृतीत "यौवन्नात पदार्पण करण्यापूर्वीच (योनीवर केस उगवण्याआधी.. असे काहीतरी सर लिहितात बुवा.. सॉरी हं) मुलीचा विवाह करावा" असे मनुस्मृतीत लिहिले आहे असे त्यांचे ठाम मत आहे. नंतर तिचा उपभोग कधी घ्यावा हे तिथे लिहिले नाही. ते आपल्या सारख्या सामान्य लोकांवर सोडून दिले आहे म्हणे. मी मनुस्मृती उलटी पालटी करून वाचली पण म्या पामराला असे काही सापडले नाही. शिवाय ते राजस्थानानातील कालीबांगणला सापडलेले इस पु २६०० चे शिवलिंग बहुतेक वैदिकांनी गायब केले असणार. सिंधू उतखानानात सापडलेला शिक्का पशुपती शिवाचा आहे, आणि तोच शिष्ण्देव म्हणजे वैदिक लोकांनी तिरस्कार केलेला शिव आहे हे संजय सरांचे म्हणणे कोणी ऐकून घेत नाही. हे चूक आहे. हरप्पात लाखो लिंगे आणि शाळून्खा सापडल्यात हे संजय सरांना माहित आहे. त्यांचे फोटो त्यांच्याकडे आहेत. ते लवकरच अधिकृतपणे फोटो पुराव्यासह व परदेशी संशोधकांच्या सहमतीसह प्रसिद्ध करणार आहेत. त्यावेळी वैदिकांची बोबडी वळेल.

    ReplyDelete
  2. Well, Someone must address Swami Vivekanada's view about Cow eating/slaughter in vedik India.

    http://www.swamivivekanandaquotes.org/2013/12/swami-vivekanandas-quotes-and-comments_25.html

    ReplyDelete
  3. ऋग्वेद १.१६२.२
    यन्निर्णिजा रेक्णसा प्रावृतस्य रातिं गृभीतां मुखतो नयन्ति ।
    सुप्राङजो मेम्यद्विश्वरूप इन्द्रापूष्णोः प्रियमप्येति पाथः ॥२II
    ह्यात गाई, बैल, अश्व, बोकड, शेळी इत्यादी अर्थ अजिबात दिसत नाही. द्विश्वरुप मध्ये अश्व रूप संजय सरांना दोन अश्व असा अर्थ दिसत असावा. त्यात मेम्यादी हे राहिलेच कि. त्याचा अर्थ मीही असा आहे तो दि ला ईश्वर जोडला गेलाय. पण सरांचे संस्कृत वेगळे आहे. ते नेटवर फार पटापट शोधतात आणि रुचांचे नुंबर देतात. सर असेच देत राहा. आम्हाला फार आनंद होईल.

    ReplyDelete
  4. तुम्हाला माहित आहे का, संजय सरांच्या मागे युरोपियन वेद संशोधक आहेत. त्यांनीच वेदांचे सगळे अर्थ फार पूर्वीच शोधून काढलेत. युरोपियन गाई खातात म्हणून काय झाले? ते वैदिकांच्या धर्मग्रंथांचा अर्थ थोडाच असा चुकीचा काढतील हो संजय सर? आता काही लोक म्हणतात कि इंग्रज आणि युरोपियन लोकांनी मुद्दाम वेदांचे उलटे अर्थ सांगितले, उदा.
    १) ब्राम्हण लोक समाजात जागृती पसरवत होते म्हणून त्यांनाच गाय खाणारे बनवून टाकायचे.
    २) ब्राम्हणांना ते युरोपियनांचे वंशज म्हणून वैदिक म्हणायचे आणि आपल्या बाजूला ओढायचे.
    ३) हिंदूंचा मुख्य आधार धर्म ह्याला सुरुंग लावायचा. असे असंख्य उद्योग.
    कोन्ग्रेस सुद्धा असेच काहीतरी करतो असे लोक बोम्बलतात.
    म्हणजे हाय कि नाय आयडियाची कल्पना.
    पण म्हणून काय झाले. युरोपियन आणि अमेरिकन लोकांनी वेदांचे अर्थ सांगितले आणि आम्ही ते ग्राह्य धरले तर चुकले काय? काय हो सर ते लोक गोरे, हुशार, चाणाक्ष आहेत. त्यांनी मोठमोठे शोध लावलेत. संजय सर आपल्या गेन्ग्चे म्हणजे (मी तुम्ही आणि युरोपियन) लोकांचे कोणी काही शाट वाकडे करू शकणार नाही. कारण ह्या बावल्यांना वेदांचा अर्थच माहित नाही. आपण आता बिनधास लागेल ते विंग्रजीत रेटून देऊ, धुव्वा उडऊ शत्रूंचा. पण साहेब ते तेव्हढे लक्ष राहू द्यात!

    ReplyDelete
  5. http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_22.html
    सर इथे आपण लिहिले आहे कि, "" शैव धर्माचा पुरातन काळ आपण सिंधू संस्कृतीपासून प्रत्यक्ष पुराव्यांनिशी पाहू शकतो. उत्खननांत असंख्य लिंगरुप प्रस्तरखंड आणि योनीनिदर्शक शाळुंखा सापडलेल्या आहेत""
    "" कालिबंगन (राजस्थान) येथे सापडलेले इसपू २६०० मधील हे शिवलिंग. हडप्पा येथेही शिवलिंग मिळालेले आहे. शिव-शक्ती यांची संयुक्त स्वरुपात पुजा सुरु झाल्याचा हा पुरातन पुरावा.""
    सर आता आपण दोघे मिळून ह्या सगळ्या शिवलिंगांची (म्हणजे हरप्पा येथे सापडलेले एक, कालीबंगा येथे सापडलेले १ व असंख्य शिवलिंगे आणि शाळुंका उर्फ योनिदर्शक प्रस्तरखंड) हे कुठे ठेवले आहेत ते जगाला दाखवून देऊ, त्यांची रेदिओ कार्बन -१४ हि त्यांचा काळ ठरवणारी चाचणी करून घेऊ. ते अधिकृत हडप्पा वाले साले काहीच फोटो देत नाहीत ह्या तुमच्या गोष्टींचे. त्यांचे आधी बुचं मारून ठेऊ. आणि मग आपल्या देशातील संघोट्या आणि त्यांच्या उठवळ पिल्लावालीची कशी वाजवायची ते तुम्ही माझ्यावर सोडा.. आणा-आणा लवकर ते सगळे पुरावे इकडे. पण साहेब, ते मर वत्स आणि ढवळीकर ह्यांच्या पुस्तकातील पाने अजिबात नको हो. अशाने हे संघोटे आपल्याच तोंडाला पाने पुसतील. कागदावर किती दिवस काढायचे आता आम्ही सुद्धा मोठे झालोय, आम्हाला नको का आता खरेखुरे! आणा-आणा लवकर. मी आहेच तुमच्याबरोबर. म्हणजे आले ना लक्षात. तुम्ही नका घेऊ मी आहे ना घायला.

    ReplyDelete
  6. जुने जाउद्या मरणालागुनी
    जाळूनी किंवा पुरूनी टाका,
    जळेल वा भविष्यकाळ तुमचा
    ना ऐकता माणुसकिच्या हाका ।।

    ReplyDelete
  7. लेख चांगला आहे.
    ब्राह्मणांना वैदिक म्हणताना ब्राह्मणेतर समाजाला 'हिंदू' हे विशेषण वापरणे टाळले तर लेख वास्तवाच्या अजून जवळ जाऊ शकेल.
    धन्यवाद.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...