Sunday, October 18, 2015

काहीतरी बोला!

या हिंस्त्र झालेल्या
नपुंसकांच्या कोलाहलात
माणूस हरवतो आहे...

माणसांनो
जेथेही असाल
जागे व्हा
या कोलाहलावरही
तुमचा साधा मानवतेचा शब्द
मात करेल...

पण बोला...

गप्प राहणे म्हणजे
या विकृत्यांना
समर्थन देणे
स्वत:ही विकृत आणि नपुंसक
असल्याचे सिद्ध करणे

आणि मग एक दिवस स्वत:चाही विनाश करुन घेणे!

नको असेल विनाश
मानवतेचा विध्वंस...

तर जागे व्हा...

काहीतरी बोला!

आज वेळच तशी आली आहे म्हणुन....

आज वेळच तशी आली आहे म्हणुन बोलणे भाग आहे. मी मोहन भागवत अथवा आसारामबापुच्या विधानांवर प्रतिक्रिया का दिली नाही असा प्रश्न मला काही मित्रांनी...