Saturday, November 14, 2015

दहशतवादाच्या मूळ उद्गमाचे काय?


प्यरिसमधील दहशतवादी हल्ल्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.

जगातील सर्व दहशतवादी संघटना आणि धर्मांध हिंसक मनोवृत्त्या पुर्णपणे चिरडल्याशिवाय असे नृशंस हल्ले थांबणार नाहीत!
ज्यांनीही अशा दहशतवादी संघटनांना स्वार्थापोटी वाढवले अशा राष्ट्रांचाही धिक्कार. जागतिक समुदायाने अशा राष्ट्रांचीही गय करू नये!

दहशतवादाचा भस्मासूर एवढा वाढण्यामागे प्यलेस्टाइनचे फाळणी करून इझ्राएलची निर्मिती केली व प्यलेस्टाईनचा प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतला गेला नाही या मुळ कारणात आहे हे कधीतरी लक्षात घेण्याची गरज आहे. अमेरिका हे जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्र आहे हे मी अमेरिकन रेडियोवरुन दोन मुलाखतीतून २००२ साली म्हणालेलो आहे. चेन रिअक्शनमधून तो वाढत गेला. सद्दामला संपवायचे प्रयत्न केले, शेवटी धादांत खोटे आरोप ठेवत, युद्ध लादत त्याला जाहीरपणे फासावर लटकवले. जगाने ती मजा पाहिली. तो दहशतवादाचा कळस नव्हता काय?

सद्दाम हुसेन भरताचा मित्र होता. बांगला देशाला स्वतंत्र करण्यासाठी भारताने पाकशी युद्ध सुरू केले तेंव्हा सर्व आखाते राष्ट्रने भारताला तेलपुरवठा बंद केला होता. अपवाद फक्त सद्दामच्या इराकचा. बांगला देश स्वतंत्र केल्यानंतर त्यला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणरा इराकच सद्दामच होता. आपण पटकन विसरून जातो. पण हे योग्य नाहे. आज इराक उध्वस्त झाला आहे. कोनी केले हे पाप? त्याविरुद्ध आम्ही कोणता आवाज उठवला?

लाखो इराकी-अफगाणी-इराणी निरपराध नागरिक आजवर जे मेले तो दहशतवाद केवढा भयंकर होता! फक्त तो सत्तेकडून झाला, खाजगी संघटनांकदून नाही म्हणून तो दहशतवादच नव्हता कि काय? त्या दहशतवादामागेही धार्मिक प्रेरणा नव्हत्याच कि काय? की सबल करतात तो न्याय आणि दुर्बळांनी प्रत्युत्तर दिले तर तो दहशतवाद? रशियाच्या फौजांशी लढता यावे म्हणून तालिबानला कोणी जन्म दिला?

सर्वप्रथम युरोपियन राष्ट्रांनी आणि अमेरिकेने आपली जागतिक दादागिरी बंद केली पाहिजे, शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यांनाचा धंदा वाढायला मदत करणे बंद केले पाहिजे. आणि याकडे मुस्लिम दहशतवाद म्हणून बघत, त्यांच्या धर्मग्रंथांतील हिंसकतेचे तत्वज्ञान पुढे रेटायचे प्रयत्न करत न बसता आधी अमेरिका व युरोपियन राष्ट्रांनी काय पापे केलीत तेही पहावे व त्यांचाही खुल्या मनाने निषेध करावा. कुराणात जेवढी हिंसेची मुलतत्वे आहेत तेवढीच ती जुन्या करारात आहेत...अगदी नव्या करारातही हे सोयिस्करपणे विसरू नका. आज समजा अरबी राष्ट्रांत इस्लाम नसून ख्रिस्ती सोडून दुसरा कोनताही धर्म असता तरीही हीच स्थिती निर्माण झाली असती याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आयसिस ही अमेरिका व इझ्राएलची देणगी आहे. जशी तालिबान अमेरिकेचीच उपज होती. निर्मात्यावरच अखेर उलटणे हा दहशतवादी संघटनांचा अलिखित नियम आहे हे आपण ट्विन-टोवरवरील हल्ल्याच्या संदर्भात पाहू शकतो. रशियाचाही विस्तारवाद अधून मधून डोके वर काढतोच. त्यांची आयसिसविरोधी कारवाई मानवतेच्या दृष्टीकोनातून आहे या भ्रमात जगाने राहू नये.

यात शेवटी मरणार आहेत ती सामान्य माणसे. मानवतेची मुलभूत तत्वे. अमेरिकेने त्यांची कधीच पर्वा केली नाही. कै. नरसिंह रावांनी अमेरिकेच्या संसदेत अमेरिकेला रेड इंडियनांच्या केलेल्या उच्छेदाबद्दल अमेरिकनांना झापत दहशतवादावर बोलण्याचा त्यांना काय अधिकार हा प्रश्न विचारला होता. व्हिएतनाम कसे विसरता येईल? दहशतवादाच्या मुळाशी जायचे तर ती महासत्तेच्या राजकारणात आहेत, कोणा धर्मात नव्हेत. प्रत्येक राष्ट्राला सध्या जागतिक नाहीतर प्रादेशिक महासत्तेची स्वप्ने पडू लागलीत. माओवाद्यांच्या भारतातील हिंसाचारामागे चीन असतो. मरतात आमची माणसे. मारतातही आमचीच माणसे. पण हा दहशतवादच नव्हे काय? तेथे तर धर्मही नाही!

वर्चस्वतावाद हा नुसता जागतिक सत्तांच्या संदर्भात नाही. वर्चस्वतावाद अनेक प्रकारच्या दहशतवादांना जन्म घालतो. इतरांना गुलाम करणे, त्यांचे भौतिक स्वातंत्र्य हिरावने अथवा मारुनच टाकणे ही त्याची अपरिहार्य परिणती आहे. हे सगळे थांबवून मानवतेची श्रेष्ठ मुल्ये प्रस्थापित करायची असतील तर सर्वप्रथम ओबामांनीच पुढाकार घ्यावा व अमेरिकेने जगावर आपली सत्ता राबवण्यासाठीचे प्रयत्न बाजुला करावेत. हा माणूस ते करू शकतो. मगच दहशतवादाविरुद्धचा लढा हा मानवी पातळीवर येईल...हिंसकतेच्या नाही. सध्या सर्वच दहशतवादी (मग ती राष्ट्रे असोत कि राष्ट्रप्रणित संघटना) मानवता आणि मुल्यांबद्दल बोलण्याची योग्यता हरपून बसले आहेत. वर्चस्वतावादाने सर्वांना पछाडले आहे. प्रत्येकजण दुस-यावर कुरघोडी करण्याच्या नादात द्वेषाचा आधार घेतो आहे.

आज समोरासमोर युद्धे करायचा काळ संपला आहे हे जागतिक सत्तांच्या लक्षात आले आहे. दहशतवादी कारवाया या वेगवान व अधिक परिणामकारक ठरत असल्याने राजकीय सत्ता दहशतवादी गटांनाच हाताशी धरून या नाहीतर त्या देशात हिंसाचार घडवतात हा इतिहास व वर्तमान आहे. धर्माची लेबले त्यांना दिली कि विशिष्ट धर्मियांबाबतचा जागतिक नागरिकांचा द्वेष वाढतो व जे खरे या कृत्यांच्या पाठीशी आहेत त्यावर मात्र चर्चा होत नाही. आपल्याला दहशतवादी घटनांकडे पहायचा दृष्टीकोण बदलावा लागेल.

हे सगळे थांबायचे असेल तर राष्ट्रांनाच बदलावे लागेल. "महासत्ता" हे बिरुदच मुळात मानवी स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांचे समर्थक पाहिले तर त्यात पाकचा कमी, अनेक राष्ट्रांचा हात दिसेल. हा सारा लढा जगावर स्वामित्व कोनाचे यासाठीचा आहे, त्याकडे तुकड्यातुकड्यात घडत जाणा-या अमानवीय हिंसेच्या घटनांतुन पाहून चालणार नाही!


व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...