Tuesday, March 31, 2015

त्या डोंगरतळी......

त्या ओघळत्या डोंगरतळी
एक धनगर बसलाय
हनुवटीशी
आश्चर्याने भरलेली
अंगुली टेकवून
पाहत त्या अचाट भरुन आलेल्या
भारलेल्या आभाळाकडे
आणि कधी आपल्याच
हुर्ररणा-या,
सावळ्या झालेल्या
गवतात डोके बुडवत
गैबान्यागत झालेल्या
मेढरांकडे....

एक नि:शब्द महाकाव्य फुलतेय
त्या निरवतेत विरतेय!

अल्याड....पल्याड’ : माणूस आणि त्याच्या जगण्याची उलटी झालेली व्याख्या!

  संजय सोनवणी यांची ‘अल्याड....पल्याड’ ही विज्ञानकथा भविष्यातील एका भयावह जगाचे चित्र उभे करताना माणूस, संस्कृती आणि जगण्याच्या संकल्पनांनाच...