Tuesday, March 31, 2015

त्या डोंगरतळी......

त्या ओघळत्या डोंगरतळी
एक धनगर बसलाय
हनुवटीशी
आश्चर्याने भरलेली
अंगुली टेकवून
पाहत त्या अचाट भरुन आलेल्या
भारलेल्या आभाळाकडे
आणि कधी आपल्याच
हुर्ररणा-या,
सावळ्या झालेल्या
गवतात डोके बुडवत
गैबान्यागत झालेल्या
मेढरांकडे....

एक नि:शब्द महाकाव्य फुलतेय
त्या निरवतेत विरतेय!

No comments:

Post a Comment