Sunday, November 28, 2010

शैव संस्क्रुति...आपली संस्क्रुती

आपण ज्या संस्क्रुतीत जगत असतो, आणि ज्या संस्क्रुतीचा आपल्याला अभिमान वाटत असतो, ती नेमकी काय आहे, तीचा इतिहास किती पुरातन आहे, ती कालौघात कशी विकसीत होत गेली हे जानण्याचे कुतुहल प्रत्येकाच्या मनात असते.
आणि जी संस्क्रुती आपली आहे, जिचा अभिमान आहे ती पुढे कशी विकसीत करता येइल यासाठी प्रयत्न करणे, त्या संस्क्रुतीची महत्ता सर्वत्र पसरवणे हे प्रत्येक संस्क्रुतीतिल समाजाला आपले कर्तव्य वाटते.
जगाचा इतिहास हा एका परीने सांस्क्रुतीक संघर्षाचा इतिहास आहे असे स्पष्ट दिसते, कारण प्रत्येक संस्क्रुती आपापले श्रेश्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत ती इतेरांवर लादण्याचा प्रयत्न करत असते हेही इतिहासात आपल्याला दिसते. यातुन कधी ना कधी संघर्षे निर्माण होतो आणि तो अनेकदा हिंसक पातळीवर जातो हे आज आपण ज्यु विरुद्ध ख्रिस्ती, ख्रिस्ती विरुद्ध इस्लाम विरुद्ध अन्य धर्मांच्या रक्तरंजीत संघर्षातुन बघु शकतो. हा संघर्षे नुसता रक्तरंजीत असतो असेही नाही. कधी तो राजकीय गुलामी लादुन सांस्क्रुतीक वर्चस्वाचे प्रयत्न होतात तर कधी आर्थिक वर्चस्वातुन.
तर कधी ते लांड्या लबाड्या करत, खोटे श्रेय पदरात पाडुन घेत, जे स्वत:चे नाही ते स्वत:चेच कसे हे ठसवण्याचा अविरत प्रयत्न करत सांस्क्रुतीक वर्चस्व लादण्याचा प्रयत्न करत असतात.
भारतात यद्न्य संस्क्रुतीच्या, स्वत:ला आर्य समजणार्या भटांनी असाच उद्योग केला आहे.
त्यामुळे मुळात शैव असणार्या शैवजनांना (बहुजनांना) एवढे गोंधळात टाकले गेले कि आपण नेमके कोण हा प्रष्न पडावा.
आपण शुद्र कसे? आपण संस्क्रुतीचे निर्माते असुनही आपलेच सामाजिक स्थान एवड्या खालच्या दर्जाचे कसे हा प्रश्न पडावा अशी वेळ आली.
आपण आज पाळतो, आचारात आणतो तो धर्म, या तथाकथित धर्ममार्तंडांच्या स्वत:च्या धर्मापासुन वेगळा असतांनाही, तेच आपल्या धर्माचे पुरोहित झालेच कसे हा प्रश्नही या निमित्ताने उठतो.
आपल्या संस्क्रुतिची पाळेमुळे शोधने हे प्रत्येकाचे कर्तव्य बनुन जाते कारण ती मानवाची एक मुलभुत गरज असते. आपल्या संस्क्रुतीत भ्रश्ट काय आणि शुद्ध काय याचा धांडोळा घेणे गरजेचे बनुन जाते.
याला मी संस्क्रुती शुद्धीकरणाची मोहीम म्हणतो आणि ती कोणाचाही द्वेष न करता व्हावी ही अपेक्षा आहे.
शैवजनांना ही गरज भासली आहे कारण सांस्क्रुतीकतेच्या पातळीवर हा समाज जगातील सर्वात प्राचीन असला तरी त्याच संस्क्रुतीच्या महानायकांना बदनाम झालेले पाहुन पराकोटीच्या यातना होतात.
येथुन पुढे बहुजनांनी स्वत:ला "बहुजन म्हणने थांबवावे कारण तसे म्हणुन आपण स्वत:ची उदात्त शैव परंपरा वाळीत टाकत असतो.
आपण शैवजन हाच शब्द येथुन पुढे वापरणे संयुक्तिक राहील.

संस्क्रुत्यांचा कालपट:

पुरातन काळापासुन जगाच्या प्रत्येक विभगात कोनत्या ना कोणत्या प्रकारच्या संस्क्रुत्या विकसित झाल्याचे आपल्याला दिसुन येते. अगदी दुर रानावनात अरण्यांत राहणार्या आदिवासि जनांनीही आपापल्या स्वतंत्र आणि वैशिश्ट्यपुर्ण संस्क्रुत्या विकसीत केल्याचे आपल्याला दिसते. एवढेच नव्हे तर सुदुर महासागरांतील आता-आतापर्यंत तथाकथीत सभ्य जग पोहोचु न शकलेल्या इश्टर बेटांवरही एक संस्क्रुती नांदत होती हे आता सिद्ध झाले आहे.
मानव प्रजाती ही अन्य प्राणी जगतापेक्षा वेगळी आहे याचे कारण त्याला बुद्धी आहे असे आपण मानतो. ही एक बाब आहेच. बुद्धीच्या बळावर मानव जातीने आपले जीवन सुसह्य करण्याचा, प्राक्रुतीक सकंटांवर मात करण्याचा, जीवनाची, स्रुष्टीची, विश्वरचनेची रहस्ये उलगडण्याचा अविरत प्रयत्न केला आहे, आणि तो सतत चालुही राहील.
मानवाच्या या अथक प्रयत्नांतुनच संस्क्रुतीची सुरुवात झाली आहे आणि ती कालौघात सातत्याने विकसीत होत राहीली आहे.
शैव संस्क्रुती ही जगातील सर्वात प्राचीन आणि आजही टिकुन असणारी एकमेव संस्क्रुती आहे ही बाब लक्षात घ्या.
येथे संस्क्रुती म्हणजे नेमके काय हे समजावुन घेणे आवश्यक आहे.

संस्क्रुती म्हणजे:

निसर्गावर मात करण्याच्या प्रक्रियेत मनुष्याने निर्माण केलेले धर्म, धर्मश्रद्धा, गरजेनुसार बनवलेल्या व विकसीत केलेल्या भाषा, निती-नीयम, समाजव्यवस्था, युद्धायमानता, साहित्य, कला, विद्न्यान, वास्तुकला, नगरर्चनाशास्त्र, तत्वद्न्यान आदींतुन होणारी अभिव्यक्ती यांचा एकुणातील मेळ म्हणजे संस्क्रुती.
मनुष्य स्वता:वर आणि सभोवतालच्या निसर्गावर संस्कार करत जी एकुणातील परिस्थिती निर्माण करतो ती संस्क्रुती होय. संस्क्रुती ही सातत्याने पुधे जात असते...एकतर अद्धपतनाकडे तरी वाटचाल करत असते वा वर्धिष्णु तरी रहात असते.
या थोडक्यातील व्याख्येवरुन आपण प्रत्येक संस्क्रुतीचे वेगळेपन पाहु शकतो. जाणु शकतो. पुढे आपण शैव संस्क्रुतीचा इतिहास पाहतांना या व्याख्येचा सर्वांगीन विचार करणारच आहोत, म्हणुन येथे एवढेच पुरे.
कोणती संस्क्रुती श्रेश्ठ व कोनती कनिष्ठ याची तुलना जरी केली जात असली तरी ती अन्याय्य असु शकते कारण श्रेष्ठ-कनिष्ठतेचे मानदंड हे सापेक्ष असतात. मानवी समाज हा नेहमीच स्वता:ला अधिकाधिक समाधान देइल अशा व्यवस्थेच्या शोधात असतो. जुने मापदंड, जर ते अडचनीचे वाटु लागले कि ते बदलण्याच्या प्रयत्नांत असतो. संस्क्रुती अशीच पुढे जात राहात असते. त्यात जेंव्हा साचलेपणा येउ लागतो तेंव्हा ती नष्ट होण्याचा धोकाही तेवढाच असतो. तसेच एखाद्या संस्क्रुतीत विजिगिषु व्रुत्तींचा शेवट होवु लागतो तेंव्हा ती संस्क्रुती आक्रमकांच्या पाशात अडकुन पडुन हळु हळु संपण्याचा धोकाही तेवढाच असतो.
जगात मानवी जीवनाच्या द्न्यात-अद्न्यात इतिहासात अगणीत स्वरुपाच्या संस्क्रुत्या उदयाला आल्याचे आपण जगाच्या सांस्क्रुतीक इतिहासात पाहु शकतो. यातील असंख्य संस्क्रुत्या कलौघात नष्ट झाल्या असल्याचेही आपल्याला दिसते. काही संस्क्रुत्या तर केवळ अवषेश सापडले म्हणुन आपल्याला माहीत आहेत. त्या संस्क्रुत्यांचे निर्माते कोण होते, त्यांचे सामाजीक जीवन, धर्मश्रद्धा नेमक्या काय होत्या याचे फ़क्त अनुमान काढता येते. त्या संस्क्रुत्या कलौघात कधी प्राक्रुतीक तर कधी मानवी युद्धादी कारणांनी नष्ट झाल्या असाव्यात. इश्टर बेटावर अवाधव्य मानवी शिरोप्रतिमा उभारणारे आले कोठुन आणि नंतर गेले कोठे हा प्रष्न जसा आजही अनुत्त्ररीत आहे तसाच महारष्ट्रात शीला-वर्तुळे बनवुन दफन करणारे भटके कोणत्या संस्क्रुतीचे होते हाही प्रष्न अनुत्तरीत आहे.
पण जगात एके काळी अवाढव्य, प्रगत असणार्या संस्क्रुत्याही कालौघात नष्ट झाल्या असल्याचे आपण पाहु शकतो.
उदाहरणच घ्यायचे तर आपण येथे इजिप्शियन, सुमेरिअन, अक्काड, ग्रीक, रोमन इ. संस्क्रुत्या विचारात घेवु शकतो. शैव संस्क्रुती खालोखाल आपल्याला द्न्यात असणारी प्राचीन संस्क्रुती म्हणजे इजिप्शिअन संस्क्रुती. या संस्क्रुतीच्या बलशाली असण्याचे पुरावे म्हणजे नुसते पिरामिड्स नव्हेत तर इजिप्शिअन राजांच्या वंशावळी आणि त्यांचा त्यांच्या माडलीक राजांशीचा पत्रव्यवहार, तहनामे आदि लेख आपल्याला उपलब्ध आहेत. परंतु ही संस्क्रुती इ.स.पु. ५०० च्या आसपास संपुश्टात आली.
ग्रीक संस्क्रुती ही नगरराज्यांची राजकीय व्यवस्था निर्माण करणारी पहीली संस्क्रुती. होमर सारखा महाकवी जसा या संस्क्रुतीने दिला तसेच सोफोक्लीज, इस्खुलीज सारखे महान नाटककार दिले. थेलीज ते प्लेटो सारखे महान विचारवंत/तत्वद्न्यानी आणि जीवनाचा भौतिकवादी विचार करणारे प्रतिभाशाली असंख्य विचारवंत दिले. ही संस्क्रुतीही कालौघात नष्ट झाली.
एखादी संस्क्रुती नष्ट होते म्हणजे त्या संस्क्रुत्यांचे प्रभाव नश्ट होतात असे मानण्याचे काहीच कारण नाही. कधी कधी तर त्या वैचारीक का होइना पण पुढील नव्या संस्क्रुत्यांवर राज्य गाजवत असतात. ग्रीक संस्क्रुतीबद्दल तसेच म्हणता येइल. उदाहरणार्थ ग्रीकांच्या नियतीवादी/जडवादी तत्वद्न्यानाचा पराकोटीचा प्रभाव पाश्चिमात्य विचारपद्धती आणि तत्वद्न्यानावर पडला आहे. तसाच तो साहित्यावरही पडलेला आहे हे आपण जेम्स जाइसच्या "ओडीसी" या जगविख्यात कादंबरीवरुनही पाहु शकतो. एवढेच नव्हे तर भारतीय साहित्यावरही ग्रीक कलाक्रुतिंचा केवढा प्रभाव आहे हे आपण मराठीतील जी. ए. कुलकर्णी यांच्या नियतीवादी कथांतुनही पाहु शकतो. औषधी विद्न्यानातील वा कायद्यांतील असंख्य शब्द व परिभाषा आजही ग्रीक आहेत हेही एक वैशिश्ट्य आहे.
तरीही ही संस्क्रुती कालौघात नश्ट झाली हे सत्य नाकारता येत नाही. या संस्क्रुतिचा र्हास अंतर्गत कारणांनी झाला...पण त्यातुनच पुढे रोमन संस्क्रुतीचा उदय झाला. या संस्क्रुतीने तत्कालीन जगावर राज्य केले हेही आपल्याला विसरता येत नाही. या संस्क्रुतीचा उदय आणि अस्त कसा झाला याचा आढावा आपण "राइज न फ़ाल ओफ़ रोमन एम्पायर" या ग्रंथात पाहु शकतो.
एवढेच नव्हे तर ग्रीक संस्क्रुतीची वैष्यिस्ट्यपुर्ण बांधकाम पद्धत आजही भुरळ घालते. त्या पद्धती आजही राबवल्या जातात. अमेरिकेत झालेली अनेक बांधकामे त्याचे पुरावे आहेत. रोमन संस्क्रुतीबद्दलही तसेच म्हणता येइल.
थोडक्यात संस्क्रुती नष्ट होते ती पुर्णपने हे काही खरे नाही. ती कोणत्या-ना-कोणत्या रुपात नवीन संस्क्रुत्यांत, भले बीजरुपाने का असेना, अवशिष्ट राहाते असे म्हणने क्रमप्राप्त आहे.
आणि यातुनच एकुनातील मानवी संस्क्रुती बदल स्वीकारत पुढे जात रहाते.
हा स्वीकार स्वेस्चेने होतो असे नाही...परंतु ती कधी कधी मानवी समुदायांची अगतीकता असते हेही खरे. आणि या अगतिकतेच्या स्म्रुती मनुष्य जतन करण्याचा प्रयत्न करत असतो हेही आपल्या लक्षात येइल. त्यामुळे नवा धर्म जरी स्वीकारावा लागला तरी हे नवधर्मीय आपल्या पुरतन धर्माचे अवशेष आपल्या नव्या व्यवस्थेत कसे जपतात हेही पाहणे मनोरंजक ठरेल.
कोणत्याही संस्क्रुतीचा पुरेपुर विनाश झाला असे म्हनता येत नाही ते यामुळेच.
संस्क्रुत्या पुरातन काळात जन्माल्या आल्या त्या जवळपास स्वतंत्रपणे. म्हनजे त्यांवर इतर मानवी समुहांचा काहीच प्रभाव नव्हता असे नाही. उदाहरणार्थ शैव संस्क्रुतीचे लोक आफ़्रिका ते युरोपे पर्यंत व्यापार करत असल्याने, ग्रीक, खाल्डियन, अक्काड, सुमेरिअन, फिनिशियन, असीरियन संस्क्रुत्यांवर त्यांनी प्रभाव टाकला तसेच त्यांच्याकडील काही तत्वे आत्मसात केली. उदाहरणार्थ ग्रीकांनी नागपुजा ते गणीत अशा अनेकविध कल्पनांना शैव जनांकडुन आत्मसात केले.
सांस्क्रुतीक देवान-घेवान, स्वत:चे स्वत्व राखुन करायला पुरातन मानवी समाजाची हरकत नव्हती. त्या द्रुश्टीने त्याला आपण सहिश्णु मानव म्हणु शकतो. उदाहरणार्थ शैव संस्क्रुतीने भारतीय उपखंडातील इतर संस्क्रुत्या आपल्या विशाल जाणीवांत सामावुन तर घेतल्याच, पण तसे करतांना त्या संस्क्रुत्यांचे मान्दंड धर्मप्रतीकांत सामावुन घेत त्यांची पुर्व-प्रतिश्ठा कशी जपली हेही आपण पुढे पाहणार आहोत.
अर्थात ही सहिष्णुता आधुनिक मानवात होती किंवा आहे काय हा प्रष्न विचारला तर मत्र उत्तर थोडेसे निराशाजनक आहे. उदा. पिज़्ज़ारोने इन्का संस्क्रुतीचा असा अमानुष विनाष केला कि ती संस्क्रुती पुरेपुर नश्ट झाली. मानवी क्रौयाचे असे नमुनेही आपयाला भेटतात. आफ़्रिकेतील अनेक संस्क्रुत्या आजच्या आधुनिक काळात पद्धतशीरपणे नष्ट केल्या जात आहेत. भारतातील आदिवासी संस्क्रुत्याही याच परसांस्क्रुतीक आक्रमणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
बलीश्ठांची संस्क्रुती तीच काय ती श्रेष्ठ हा अहंगंड पुरातन काळापासुन मानवात आहे आणि त्या गंडाने संस्क्रुती-विकसनात हातभार लावण्याऐवजी हानीच केली आहे असे म्हनने क्रमप्राप्त आहे.

परंतु सांस्क्रुतीक आक्रित...

ही बलीष्ठता नेहमीच हिंसात्मक असते असे नव्हे. माणसे मारुनच, एखादा सांस्क्रुतीक समाज नष्ट करुनच वा राजकीय सत्ता लादुनच संस्क्रुत्या संपवण्याचा प्रयत्न होतो असे नव्हे तर अनेकदा त्या विशिष्ट संस्क्रुतीत घुसुन, चुपेपणे आपली संस्क्रुती त्या संस्क्रुतीत घुसवण्याचा, तीचे माहात्म्य लादण्याचा प्रयत्नही होत असतो हे मात्र अनेकदा लक्षात येत नाही. एकाच संस्क्रुतीच्या भौगोलीक परिप्रेक्षात ज्या संस्क्रुत्या नव्याने उदयाला येतात, संख्येच्या अभावाने जेंव्हा आपले माहात्म्य वाढवीता येत नाही, तेंव्हा बहुसंख्यांच्या संस्क्रुतीत घुसुन, त्यांचे माहात्म्य आधी मान्य करुन, त्यांच्या जीवन्श्रद्धा वरकरणी स्वीकारुन, पधतशीरपणे आपले सांस्क्रुतीक माहात्म्य लादण्याचा प्रयत्न केला जातो. हा एक विक्रुत, पराभुत मानसीकतेच्या, परंतु आपापले स्वातंत्र्यही जपु पाहणार्या सांस्क्रुतीक गटांचा प्रयत्न असतो. ही मंडळी जो सांस्क्रुतीक गोंधळ घालतात आणि आहे त्या संस्क्रुतीला तर विक्रुत बनवतातच पण स्वता:ची संस्क्रुतीही गढळवुन टाकतात.
आणि अशी अवाढव्य सांस्क्रुतीक विक्रुती फक्त भारतातच घडुन आली आहे, हे एक दुर्दैव. ही विक्रुत जमात आणि संस्क्रुती कोणती हे आपण पुढे पाहणारच आहोत, पण अशा विक्रुतींमुळे एक संपुर्ण समाज कसा वेठीला धरला जातो आणि त्यात सर्वांचेच कसे नुकसान होते हा मुद्दा जास्त विचरणीय आहे.
प्रत्येक संस्क्रुतीचे स्वत:चे असे स्थान असते, वैषिश्ट्य असते. ते श्रेश्ठ कि कनिश्ठ हा भाग वेगळा, कारण तसे ठरवण्याचे मापदंड बदलते असु शकतात. पण स्वत:ची संस्क्रुती स्वतंत्रपणे जपता येत नाही, ते वेगळेपन स्वतंत्रपणे जपता येत नाही, किंबहुना बलाढ्य संस्क्रुतीच्या मेहरबानीखेरीज स्वतंत्र जगताही येत नाही, कारण जगन्यासाठी जे आर्थिक स्थैर्य हवे ते स्वतंत्रपणे निर्मान करता येत नाही, तेंव्हा त्या बलाढ्य संस्क्रुतीला कवटाळणे आणि मानसिकतेतील दडलेल्या वर्चस्व भावनेला संधी मिळेल तसे इतेरेजनांवर लादत जाणे ही एक विक्रुती आहे. ती भारतीय समाजाने गेली २ हजार वर्ष सहन केली आहे. आपली संस्क्रुती नेमकी काय हा प्रष्न उपस्थित व्हावा अशी वेळ या पर-सांस्क्रुतिकांनी आणली आहे. गंम्मत अशी की हेच लोक आता "आम्हीच तेवढे संस्क्रुती-रक्षक" असा आव आणत जी त्यांची संस्क्रुती आहे तिच इतरांचीही आहे असा खोटरडा आव आणत एक नवा साम्स्क्रुतीक खोटार-वाद जन्माला घालत आहेत आणि त्याला आपलेच स्वत्व, आपलीच संस्क्रुती माहीत नसणर्यांना आपल्या वेड्यात घेत आहेत.
अशी विक्रुती तुम्हाला जगाच्या अन्य सांस्क्रुतीक इतिहासात शोधुनही सापडनार नाही.
मी आधीच म्हटल्याप्रमाणे आपली पाळे-मुळे शोधने ही एक अनावर जिद्न्यासा मानवी मनात असते. आपला नेमका धर्म कोणता? आपली संस्क्रुती कोणती? आपले तत्वद्न्यान कोणते?
आणि जे सांस्क्रुतीक वर्चस्व गाजवण्याच्या, आणि ते सांगतात तीच संस्क्रुती...तर ते सांगतात त्या संस्क्रुतीशी आपला नेमका संबंध काय हे शोधने गरजेचे बनुन जाते.
त्याखेरीज आपण कोण आहोत, आपला नेमका धर्म कोणता? आपला इतिहास काय? आज आम्ही असे का आहोत? आमची पाळेमुळे नेमकी कोठे आणि कशी रुजली आहेत हे कसे कळणार?
आमच्या श्रद्धा आणि सांस्क्रुतीक वर्चस्व गाजवु गाजवु पाहणर्याच्या श्रद्धा मग वेगळ्या का?
त्यांचे आचार-विचार, त्यांची धार्मिक कर्मकांडे, त्यांचे धर्मग्रंथ वेगळे का?
आणि असे असुनही तेच आमचे धर्म्पुरोहीत का?
प्रष्न खुप आहेत.
जे ग्रंथ इतरेजनांना वाचायची/ऐकायची धार्मिक परवानगीच नव्हती तर त्या ग्रंथांशी शैवजनांचा संबधच काय?
तो नव्हताच कारण ते ग्रंथ कधीच शैवजनांचे नव्हते. उलट शैवजनांना आपल्या संस्क्रुतीचे गुलाम करण्यासाठी त्या ग्रंथांचा वापर केला गेल्याचे आपल्याला स्पश्ट दिसते.
एवढेच नव्हे तर शैवजनांच्या धर्म-प्रतिकांना हेटाळुनही, त्यांच्या धर्मग्रंथांना (जे हजारो आहेत) पायतळी त्यांनी तुडवुनही, पुन्हा वर स्वत:ला शैव समजण्याचे क्रौर्यही त्यांनी दाखवले आहे. ते कसे हे आपण पुढे पाहणारच आहोत.
शैवांचे जे स्वतंत्र धर्मसाहित्य, तत्वद्न्यान होते तेही स्वता:चेच असे त्यांनी सांगायला सुरुवात केली. एक असत्य हजार वेळा सांगीतले कि ते खरे वाटु लागते हा गोबेल्स नीतिचा वापर त्यांनी यथेच्च केला...
त्याचा परिणाम असा झाला कि शैवजनच आपली संस्क्रुती आपली नसुन इतरांची देणगी आहे असे समजु लागले.
आपल्या संस्क्रुतीच्या सणांवर त्यांची कलमे करुन घेतली आणि ती सहनही केली गेली कारण आपली पाळेमुळे माहित करुन घेण्यासाठी जी सामाजीक व्यवस्था लागते तीचा पुरेपुर अभाव निर्माण केला गेला.
अशा प्रकारचे सांस्क्रुतीक हत्याकांड फक्त भारतात झाले.
याला आधुनिक जगात सांस्क्रुतीक दहशतवाद म्हणतात...
हे हत्याकांड करणारे मुळचे यद्न्यधर्मीय ब्राह्मण...
तर सांस्क्रुतीक द्रुष्ट्या ठार मारले गेलेले शैवजन होत.

त्यांचा स्वत:चा धर्म कधीच लोकव्यवहारांतुन नश्ट झाला.
आज कोणी ब्राह्मण यद्न्य करत नाही. यद्न्य करु शकतील असे ब्राह्मण आज शंभरही नाहीत.
कोणीही ब्राह्मण आपली कुलदेवता म्हणुन वैदिक इन्द्र, वरुण, मित्र, भारती इ. देवता सांगत नाहीत...उलट शिवपरिवारातीलच देवता त्यांच्या कुलदेवता आहेत. तेच कुलाचार आहेत. शैवच देवके आहेत. (देवक ही कल्पनाच मुळात वैदिक नाही.)
पण तरीही त्यांचा रुग्वैदिक धर्म आणि संस्क्रुती श्रेश्ठ असा आभास मात्र निर्माण केला गेला आहेच...
आम्ही अडानी-आदिवासी लोकांच्या शिवाला वैदिक रुद्राशी तादात्म्य साधुन त्याला "पवित्र" केले असाही युक्तिवाद आहेच...(पहा- भारतीय संस्क्रुती कोष, "शिव")
त्यामुळे शैव जन हजारो वर्ष आपलीच संस्क्रुती अव्याहत पाळत असता तिच्यावर वैदिक कलमे स्वीकारली गेली...
ज्यांनी रुग्वेदात ज्या शिवाला "शिस्नदेव" असे संबोधुन अपमान केला त्याच शिवाला "रुद्र" या यज्न-संस्क्रुतीतील देवतेचेच रुप आहे असे खोटे सांगायला सुरुवात करुन शिवाचे वैदिकीकरण करण्याचा चंग बांधला...पंढर्पुरच्या पुंड्र या अवैदिक समाजातील महान शिवभक्त जो विट्ठल त्याचेही असेच रुग्वेदिकरण केले गेले...
आणि ते तेथे पुरोहित म्हणुन बोकांडी बसले...
आपल्यालाच आपला इतिहास माहित नाही, संस्क्रुती माहित नाही तर मग दुसरे काय होणार?
त्यामुळे आपल्याला आपल्या पुरातन शैव संस्क्रुती म्हणजे नेमके काय? हा नेमका काय धर्म आहे? या संस्क्रुतीची बलस्थाने कोणती? वैगुण्ये कोणती? धर्मग्रंथ कोणते? आपले महान पुर्वज कोण होते? संस्क्रुती कशी बलढ्य होत गेली? त्यात हे लोक कधी घुसले? त्यांनी इतिहास कसा व का बदलला? रामायण व महाभारतासारख्या मुळच्या शैव महाकाव्यांत "ब्राह्मण-माहात्म्ये" का व कशी घुसवली?
अशा असंख्य प्रष्नांना उत्तरे देण्यासाठी हा लेख लिहीला गेला आहे.
सर्व शैवजन त्याचे स्वागत करतील, त्यावर मनन करतील व यज्नधर्मीयांना या धर्मातुन दुर सारुन खर्या शैव धर्माची कास धरतील ही अपेक्षा.


शैव धर्माचा उगम

जगातील सर्वात पुरातन आणि सतत वर्धिष्णु राहिलेली, आजही आचार-व्यवहारात टिकुन राहिलेली संस्क्रुती/धर्म म्हणजे शैव होय.
शैव धर्माचा उगम किमान १५,००० वर्षांपुर्वी झाला. याचे असंख्य पुरावे आता उपलब्ध झाले आहेत. मनुष्य जेंव्हा भटका होता, शिकारी मानव होता तेंव्हापासुन त्याच्यामद्धे जन्म-मरण या सनातन रहस्याने, सत्याने चिंतन्शील केले. स्त्री ही जन्म देते त्याअर्थी तीच्यात काहीतरी गुढ शक्ती वास करत असाव्यात हा निश्कर्ष त्याने काढला. त्या वेळीस विवाहसंस्था अद्याप आकाराला आलेली नव्हती, कारण स्त्री मुलाला जन्म देते हे सत्य माहित असले तरी त्यात पुरुषाचा वाटा किती हे माहित नव्हते. त्यातुन सर्वप्रथम सुरु झाली ती मात्रुपुजा...पुरुष स्त्रीकडे शक्तीरुपात पाहु लागला. मात्रुत्वशक्तीची पुजा बांधणे यातुनच आद्य शैव धर्म आकाराला आला. आद्य "योनीपुजा" त्यातुनच आकाराला आली. मात्रुसत्ताक पद्धतीचा उगमही त्यातुनच झाला. ही शक्तीची प्रतिश्ठा होती.
यातुनच पुढे या आदिमानवाने पुढील झेप घेतली. मर्त्य मानवाला जशी एक स्त्री जन्म देते तशाच पद्धतीने अखिल विश्वाला, सर्व प्राणिमात्राला जन्म देणारी आदिमाताही असली पाहीजे ही ती कल्पना होय. ही आदिमाता अनंत शक्तिशाली असली पाहीजे आणि तीच सर्वांच्या जननाची, जीवनाची आणि म्रुत्युनंतरची कारणमात्र असली पाहिजे ही कल्पना विकसित झाली आणि या आदि-धर्माने पुढची पायरी गाठली.
शेतीचा शोध हा लावला तो स्त्रीयांनी. पुरुष शिकारीसाठी भटके तेंव्हा स्त्रीया तात्पुरत्या निवार्यांत राहत. बीज जमीनीवर पडले कि ते रुजुन रोपटे बनते...व्रुक्ष होतो हे निरिक्षन कामाला आले. त्यातील खाद्य काउ, अखाद्य काय हे अनुभवांतुन समजु लागले. आद्य शेतीचा उगम असा झाला. मानवी जीवनात अभुतपुर्व क्रांती घडली. भटका माणुस हळुहळु स्थीर झाला. शिकारी मानव हा क्रुषि-मानव बनला.
यातुनच सांस्क्रुतीक क्रांतीही घडली. तीने मानवी जीवन पुरेपुर बदलुन टाकले. शेतीमुळे समाज स्थिर झाला. भुमीतुन बीजरोपणाखेरीज रोपटे उगवत नाही...म्हणजे स्त्रीही पुरुषाखेरीज संतती प्रसवु शकत नाही हा साक्षात्कार मानवी समुदायाला झाला. त्यातुनच जसा भुमीवरील हक्क तसाच स्त्रीयांवरील हक्क ही संकल्पना उदयाला आली. त्यातुनच आद्य विवाहसंस्थेचा पाया रचला गेला.
यातुनच नवी सामाजीक, सांस्क्रुतीक क्रांती घडली. भुमी आणि स्त्री हे मानवी समाजाचे अद्भुत अंग बनले. स्त्री व भुमीसाठी लढने हे नित्याचे बनले.
यातुनच हळुहळु पुरुषसत्ताक पद्धतीचा उगम झाला. पुरुष हाही एक अपत्यजन्मातील नुसता महत्वाचा नव्हे तर मुख्य घटक आहे ही जाणीव त्यामागे होती. हा एक प्रकारचा सत्तापालट होता. आता फक्त योनीपुजा नव्हे तर त्याबरोबर लिन्ग्पुजाही होवु लागली...
कारण जशी विश्वाला जन्म देणारी आदिमाता आहे तसाच आदिमातेच्या शाश्वत गर्भातुन विश्वजन्माला कारण होणारा आदिपुरुष असला पाहिजे आणि या स्रुष्टीच्या जन्माला तो कारण असला पाहिजे ही प्रगल्भ आणि त्याचवेळीस श्रद्धापुर्ण जाणीव आदिम शैव धर्मात क्रांती घडवणारी ठरली.
पुरुषाने अशा प्रकारे वर्चस्व निर्माण केले असले तरी स्त्रीची/आदि-शक्तीची महत्ता मात्र मुळीच कमी झाली नाही...दोहोंमद्धे एकरुपत्व, अद्वैत कल्पुन पुढे शिव व शक्ती हे विभिन्न नव्हेत तर एकाच तत्वापासुन केवळ स्रुष्टीजन्मासाठी विभक्त झालेले उगल आहे अशा उदात्त पातळीवर शैव सिद्धांत पोहोचला.
हे हजारो वर्षांच्या मानवी जीवन प्रवासाच्या कालखंडात घडले. शैव तत्वद्न्यानाचा इतिहास हा एका अर्थाने मानवी प्रगल्भतेचा, जाणीवांच्या विकासाचा इतिहास आहे हे येथे लक्षात घेतले पाहीजे.
शैव धर्माचा/संस्क्रुतीचा उगम आपल्या देशात झाला याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि हा धर्म आपण आजतागायत टिकवला याचा आपल्याला सार्थ अभिमानही वाटला पाहिजे. आपण आपल्या अति-पुरातन पुर्वजांशी कसलीही प्रतारणा न करता, त्यांनी ज्या आदिम परंतु कुतुहल्ग्रस्त मनातुन ज्या संस्क्रुतीची सुरुवात करुन दिली ती हजारो वर्ष नुसती टिकवली नाही तर त्यात तत्वद्न्यानाची भर घालत तिचा विकास केला आहे. आजही आपण तोच धर्म, तीच संस्क्रुती पाळतो, पण इतेरेजनांनी "आम्हीच शिव-शक्ती" या अवैदिक, अडाण्यांच्या, रानटी लोकांच्या देवतांना वैदिक रुद्राशी तादात्म्य साधत पवित्र केले, अशा दाव्याला मान्य करुन आपल्या मुर्खपणावर शिक्का-मोर्तब करत असतो हे दुर्दैव आहे. खरे तर रुग्वैदिक रुद्राचा आणि शिवाचा काहीएक संबंध नाही, ते कसे हे आपण पुढे पाहणार आहोत. पण आपण शिवपुजा करतांना शतरुद्रीय जप करुन घेत आपण किती असांस्क्रुतीक शैव आहोत याचा नकळत पुरावा देत असतो.

शैवांचा द्न्यात इतिहास:

सिंधु नदीच्या खोर्यात प्रथम प्राचीन अवशेष सापडले म्हणुन तीला आपण सिंधु संस्क्रुति म्हनतो, पण ती प्रत्यक्षात "शैव संस्क्रुति" आहे. याचे कारण असे कि हरप्पा ते मेहेरगढ येथे ज्या असंख्य मुद्रा मिळाल्या आहेत त्यात योगिश्वर स्वरुपातील शिवमुद्रा जशा मिळाल्या आहेत तशाच मात्रुदेवता आदिमातेच्याही असंख्य मुद्रा मिळाल्या आहेत. एवढेच नव्हे तर शिवाचे जे "पशुपति" ( म्हनजे सर्व स्रुष्टीचा पिता) हे रुप शैवांनी आजही जपले, त्या पशुपति रुपाच्याही मुद्रा सापडल्या आहेत. एवढेच नव्हे तर पुरतन शिवलिन्गही या उत्खननांत सापडले आहे. तसेच, शैव संस्क्रुतिचा पुज्य असा जो व्रुषभ त्याच्याही अगणित मुद्रा मिळाल्या आहेत. फार कशाला, शैवांना अतिप्रिय असा जो पिंपळ व्रुक्ष याचे त्या काळातही पुजन होत होते असे दाखवणार्या मुद्राही मिळाल्या आहेत. त्याखेरीज शिवलिन्ग आणि मात्रुदेवतेच्या खुणा दर्शवणार्या शाळुंका आणि लिंग दर्शक प्रस्तरखंड हजारोंच्या संख्येत मिळाले आहेत.
हे शैव संस्क्रुतिचे प्राचीन अवशेष. त्यांचा काळ सरासरी इ.स.पु. ३७०० एवढा जातो. ही संस्क्रुति किती प्रगत होती हे अवशेषांवरुनच कळते. उत्क्रुश्ठ नगररचना, प्रगत नौकानयन शास्त्र, त्यांचा अरबस्तान ते ग्रीकांशीचा सागरमार्गे व्यापार, त्यांच्या कला, सौन्दर्यमान मुर्त्यांचे अवशेष आजही आपला पुरातन गौरव गात आहेत.
इ.स.पु. १७५० च्या आसपास सरस्वती नदीच्या खोर्यात वारंवार झालेल्या भुकंपांमुळे तत्कालीन अनेक नगरे नश्ट झाली. एवढेच नव्हे तर सरस्वती नदीसुद्धा विलुप्त झाली. याच नदीच्या काठी एक नवा धर्म स्थापन झाला होता. त्यालाच आपण आज यज्नधर्म म्हणतो. हा शैवांच्या पुरेपुर विरोधात होता. एका भटक्या, पशुपालक लोकांनी स्थापन केलेला हा धर्म. ही नदी नश्ट झाली तसा हा धर्मही संपला. या धर्माबद्दल पुढे.
भुकंपामुळे काही शहरे, वस्त्या नश्ट झाल्या म्हणुन हा शैव धर्म संपला नाही कारण तो उत्तेरेपासुन ते दक्षिणेपर्यंत कधीच पसरला होता. आजही त्याचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. उलट हा धर्म वाढतच राहिला. भारताच्या सीमा ओलांडुन दुरदेशी पोहोचला. ग्रीकांनी मात्रुपुजा व नागपुजा शैवांकडुन स्वीकारली. असीरिअन संस्क्रुती तर येथीलच असुर समाजाने तेथे जावुन विकसीत केली. शैवांतीलच पणी या व्यापारी समाजामुळे शैव संस्क्रुती व तिच्या द्न्यानाचा इतरत्र प्रसार झाला. अनेक शब्द त्या संस्क्रुत्यांनी शैवांच्या प्राक्रुत भाषेतुन घेतले. आणि त्याचे श्रेय मात्र आजचे स्वता:ला "आर्य" समजणारे ब्राह्मण घेतात हे एक दुर्दैव आहे हे आज़्पण लक्षात घेतले पाहिजे.

हे आर्य कोण होते?

शैव समाजाने क्रुषि क्रांती करुन एक स्थीर आणि बलाढ्य संस्क्रुती निर्माण केली. नद्यांना बांध घालुन, कालवे काढुन प्रगत शेती सुरु केली. स्वता:ला आर्य समजणारे मात्र अद्यापही (इ.स.पु. २५०० पर्यंत) भटके पशुपालक होते. ते भटके असल्याने भारतात नेमके कोठुन आले याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. त्यांच्या मुळ स्थानाबद्दल अजुनही वाद आहे. ते शेती करत, पण ती आजही काही आदिवासी करतात तशी ती फिरती शेती होती. पशुपालन हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. त्यामुळे स्वभाविकपणे ते चरावु कुरणांच्या शोधात ते भटकत असत. पशु हीच त्यांची मुख्य संपत्ती, त्यामुळे पशुमांस त्यांना निषिद्ध नव्हते. पशुमांस भाजण्याच्या रोजच्या उद्योगातुन त्यांनी त्यांचा स्वतंत्र धर्म विकसीत केला. तोच यद्न्यधर्म होय. यद्न्यातील कर्मकांडे करण्यासाठी त्यांनी जे मंत्र तयार केले त्याचाच अवशिश्ट राहीलेला पुरातन भाग म्हणजे "रुग्वेद". त्यातुन आपल्याला त्यांच्या धार्मिक कर्मकांडाची व समाज जीवनाची माहिती मिळते.
हे लोक कुडाच्या झोपड्यात रहात. त्यांची गावे लहान असत. ब्राह्मण (ज्याला मंत्र रचता येतो तो, मग तो कोणीही असो.) विश (म्हनजे नागरजन,...व्यापारी- वैश्य नव्हे) आणि क्षत्र ( लढवैये) अशी त्यांची सामाजिक विभागनी होती. मंत्र रचतो तो ब्राह्मण अशी सरधोपट व्याख्या होती, पण सारेच सर्व प्रकारचे काम करत असत. म्हणजे ब्राह्मणही युद्धात भाग घेत.
हे लोक मुळात टिकावु बांधकाम केलेल्या घरांत राहत नसल्याने आज जसे शैव (सिन्धु) संस्क्रुतीचे अवशेष सापडतात तसे त्यांचे अवशेष सापडत नाहीत. कारण शैवांसारखी नगररचना त्यांना अवगत नव्हती.
एवढेच नव्हे तर आर्य वंशाचे म्हणता येतील असे म्रुतदेहांचेही अवशेष मिळत नाहीत, कारण आर्य हा वंश म्हणुन कधीच आस्तित्वात नव्हता तर तो एक मिश्र समाज होता. उदाहरणार्थ रुग्वेदात ज्या वंशाचा वारंवार अभिमानास्पद उल्लेख केला आहे तो वंश, भ्रुगु, हा अवैदिक, अनार्य होता हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व धर्मानंद कोसंबी यांनी साधार सिद्ध केले आहे. फार काय यदु (ज्या वंशात क्रुष्णाचा जन्म झाला.) इक्श्वाकु ( ज्या वंशात रामाचा जन्म झाला) त्यांना रुग्वेद अनार्य मानतो हेही येथे लक्षात घ्यायला हवे.
त्यांची वस्ती मुख्यता: सरस्वती नदीच्या काठावर होती. त्यांनी राजा सुदासाच्या नेत्रुत्वाखाली नजिकच्या शैवांशी अनेक वेळा युद्धे केली. कपटीपने नद्यांवर शैवांनी बांधलेले बांध, कालवे फोडले. कपटाने तर काही र्शैव राजांना ठार मारले. त्याचे पुरावे ठाइठाइ रुग्वेदात सापडतात. जसा सुदासाच्या वंशाचा अस्त झाला, तशी रुग्वेदरचनाही थांबली.

त्यांचा धर्म कोणता?

हे आर्य म्हनवणारे लोक अग्नीभोवतीचे जे धार्मिक कर्मकांड करत त्यातुन हा यद्न्य धर्म उगम पावला. या धर्माची वैषिश्ट्ये अशी:
अ. त्यांना मुर्तीपुजा मान्य नव्हती. यद्न्यात मांस वा वनस्पतीच्या (समीधा) आहुती देवुन ते इन्द्र, वरुण, मित्र, नासत्य इ. देवतांना "हवि" देत. या वेळी ते मंत्र म्हनत. हे मंत्र म्हनजे त्यांच्या अमुर्त देवतांना केलेली विविध आवाहने होत. त्यांत पशुधन वाढावे, शत्रुंचा नाश व्हावा इ. स्वरुपाच्या विनवण्या आहेत. या मंडळीला आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, इ. सिद्धांत मान्य नव्हते वा माहितही नव्हते.
ब. त्यांना मुळात मुर्तीपुजा मान्य नसल्याने त्यांनी कधीही त्यांच्या इन्द्र-वरुणाच्या मुर्त्या बनवल्या नाहीत. आजही तुम्हाला कोठेही या रुग्वैदिक देवतांची मंदिरे आढळनार नाहीत. असे असुनही "हिन्दु" धर्म हा वैदिक-सनातन धर्म आहे असे हे लोक बिनदिक्कतपणे सांगतात हे लक्षात ठेवने आवष्यक आहे.
क. त्यांना अमरतेचा शैव सिद्धांत मान्य नव्हता. त्यांचा देवाधिदेव जो इन्द्र, तोही अमर नाही., फ़क्त आयुष्य मोठे.
ड. रुग्वेदात जो धर्म समोर येतो तो स्थिर नसलेल्या लोकांचा धर्म आहे. ते स्वभाविकही आहे कारण जशी समाजव्यवस्था असते तसाच धर्म आणि धर्मतत्वे बनतात. तो मुलभुत मानवी स्वभाव आहे.त्यांचा धर्म अग्नीभोवती व त्यात दिल्या जाणार्या आहुतिंभोवती फिरतो कारण तेच त्यांचे सामाजिक वास्तव होते.
इ. आर्यांना संन्यास मान्य नव्हता. उलट जो संतती प्रसवत नाही त्याला उच्च गती मिळत नाही असा त्यांचा सिद्धांत होता. शैव धर्मातील "यती"चे (संन्यासी) दर्शन ते अशुभ मानत. महाभारतातही हा सिद्धांत जरत्कारु रुषिच्या कथेतुन मांडला आहे हे लक्षात घायला हवे. एवढेच नव्हे अर "योग" ही शैवांनी जगाला दिलेली देणगी आहे. शिवाच्या योगिश्वर स्वरुपातील मुद्रा सिन्धु खोर्यातील उत्खननात मिळाल्या आहेत.
फ़. आर्यांना पुजा मान्य नव्हती. मुर्तीपुजकांचा ते द्वेष करत असत. यद्न्यात आहुती देवुन देवतांना सतुष्ट करणे हेच त्यांचे प्रमुख धर्मिक कर्मकांड होते.
थोडक्यात आर्यांचा यद्न्यधर्म आणि शैव धर्मात मुलभुत फरक आहे. दोघांचे धार्मिक कर्मकांड आणि तत्वद्न्यान वेगळे आहे. आचार, विचार, नैतीक संकेत यातही पराकोटीचा फरक आहे. उदा: यजुर्वेदात जेथे अश्वमेधाचे वर्णन आहे तेथे सांकेतीक का होइना अश्व आणि राजपत्नीच्या संभोगाची अत्यंत अश्लील वर्णने आहेत. पशुपालकांना अश्व हा महत्वाचा, त्यामुळे त्याचे पौरुष आकर्षणाचा विषय तर क्रुषिसंस्क्रुतीच्या लोकांना व्रुषभ महत्वाचा असल्याने त्याचे महत्व अपार. प्रत्येक शिवमंदिरात व्रुषभाचे महत्व का, या प्रष्नाचे उत्तर या विवेचनात आहे.
कारण मुळात या दोन्ही संस्क्रुत्या वेगळ्या आहेत. धर्मतत्वे वेगळी आहेत. कर्मकांड वेगळे आहे. समाज व्यवस्था वेगळ्या आहेत. जीवनयापनाची साधने वेगळी आहेत. अर्थव्यवस्था वेगळ्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

वेद हेच प्राचीन वा:ड्मय?

"वेद" या शब्दाचा अर्थ आहे "जे सांगितले गेले, कथित केले गेले ते..." आर्यांचा खरा वेद एकच...तो म्हणजे रुग्वेद. साम्वेदात रुग्वेदातील रुचा कशा गायच्या याचे निर्देशन आहे. यजुर्वेदात विषिश्ट प्रयोजनांसाठी केल्या जानार्या यद्न्यांत कोनते मंत्र म्हणायचे याचे निर्देशन आहे. राजसुय, अश्वमेध, पुत्रकामेष्टी इ. यद्न्य प्रसंगी म्हणायचे मंत्र व विधी त्यात आहेत.
पण त्यांना प्राचीन काळी वेद म्हणत नसत. उद. त्यांना "रुक, साम, यजस.." असेच म्हणत. अथर्ववेद हा यद्न्यधर्मियांचा नव्हे, तो यद्न्य विरोधक भ्रुगु आणि अथर्वंगिरस यांनी लिहीला. वेद फ़क्त चार नव्हेत तर त्या काळी असुरवेद, पिशाच्चवेद, गन्धर्ववेद आणि सर्पवेद असे अजुनही वेद होते असे आपल्याला गोपथ ब्राह्मणावरुन कळते.
उपनिशदांपैकी मुख्य ५२ उपनिषदे अथर्ववेदांवर आधारीत आहेत आणि त्यात आत्म्याच्चे अजरामरत्व, त्यागाची महत्ता, योग आणि अद्वैताची महती गायली गेली आहे.
पण येथे लक्षात घायची महत्वाची गोष्ट अशी कि रुग्वेदाला "निगम" असे म्हटले जाते तर शैव तत्वद्नानाच्या ग्रंथांना "आगम" असे म्हटले जाते ही परंपरा आहे. निगम म्हणजे "नंतरचा" तर "आगम" म्हनजे "आधीचा".
अथर्व वेद व त्यावरील आधारित शैव उपनिषदे सर्वांत पुरातन आहेत. त्यांत शिव व शक्ती यांचे महीमान तर आहेच पण तत्वद्न्यानाची सर्वोच्च उंची त्यात गाठली गेली आहे. अथर्ववेदात यद्न्य नव्हे तंत्रशास्त्राला महत्व आहे. तन्त्र शास्त्रांतील अनेक सिद्धांत त्यात येतात. शैव हे मुळात क्रुषक असल्याने अथर्ववेदात भुमीसुक्त अपरिहार्यपणे आले आहे. उत्तम पीके यावीत, पाउस चांगला पडावा, यासाठीचे मन्त्रही अगणीत आहेत. १०८ उपनिषदांतील ५२ प्राचीन उपनिषदे ही अथर्ववेदाशी निगडीत आहेत. आणि हे कथीत "आर्य" इ.स.पु.५०० पर्यंत अथर्ववेदाला मुळात वेदच मानायला तयार नव्हते, हे येथे लक्षात घेणे आवष्यक आहे. याचे कारण म्हणजे अथर्ववेद हा मुळात यद्न्य धर्मीयांचा वेद नव्हे. इतर वेद कालौघात नष्ट झाले.

असे का?

असे का, याचे उत्तर साधे आहे, कारन हे दोन्ही धर्म मुळात भिन्न आहेत. दोहोंचे आचार, विचार, समाजजीवन आणि तत्वद्न्यान भिन्न आहे. शैव धर्मात क्रुषि व व्यापार संस्क्रुती महत्वाची. प्रतीकपुजा, मुर्तीपुजा महत्वाची, संन्यास व योग हे उच्च ध्येय, मोक्ष प्राप्ती ही सर्वोच्च कामना. आत्मा अमर आहे ही श्रद्धा. शिव व शक्ती हे एक अद्वैत आहे आणि केवळ विश्व निर्मितीसाठी ते विभक्त झाले आणि जीवांसाठी त्यातुनच त्रैत निर्माण झाले ही विद्न्याननिष्ट श्रद्धा.
या धर्माचा द्न्यात इतिहास किमान १० हजार वर्ष मागे जातो. यद्न्य धर्म ४५०० वर्षांपुर्वी जन्माला आला. पुढे हा धर्म यद्न्यातील किचकटपणामुळे आणि ते अत्यंत खर्चीक असल्याने बंद पडले. शेवटचा यद्न्य पुश्यमित्र श्रुंग याने २र्या शतकात केला. यद्न्यकर्म संपल्याने अनेक यद्न्यधर्मीय ब्राह्मण शैव धर्मात घुसले आणि वैदिक देवतांचे पुरोहीत बनले. ही घटना इ.स.पु. ५०० मद्धे घडली. असे घडु शकले याला कारण झाला बौद्ध धर्माचा उदय. असंख्य शैव राजे आणि लाखो सामान्य प्रजा बौद्ध धर्मात गेली. बौद्ध धर्माने जवळपास ९व्या शतकापर्यंत राज्य केले खरे पण आदि शंकराचार्यांमुळे (ते कट्टर शैव होते, वैदिक नव्हे.) बौद्ध धर्माची भारतातुन हकालपट्टी झाली. मुळ धर्मात परतणार्यांची मुळ स्म्रुती अंधुक झाली असल्याने, धर्मात जे स्थान मिळेत ते स्वीकारावे लागले. थोडक्यात त्यांना एकच एक जागा मिळाली ती म्हणजे "शुद्र"
ही भारतात घडलेली महत्वाची सामाजीक/धार्मीक घटना आहे हे लक्षात घेतले पाहीजे. या बौद्ध धर्माच्या प्रभावशाली काळात जी पुराणे लिहीली गेली त्यात धर्मेतिहास विक्रुत करण्यात आला. कलीयुगात आता फक्त दोनच वर्ण असुन कोणी क्षत्रीय वा वैश्य नाही असे बजावले गेले. सागरव्यापारात मुळचे तद्न्य असलेल्या शैवांवर समुद्रपर्यटन निषिद्ध करुन टाकले गेले. त्यामुळे भारताचा जगाशी असलेला संबध तुटला. जो आला तो फक्त आक्रमकांमुळे. आणि आक्रमकांनी सतत आघात केले ते सोमनाथावर...
शिवाला रुग्वैदिक रुद्राशी जोडन्यात आले. पणी लोकांचा सागराचा देव म्हणुन जो विष्णु (विष्णु मुळचा लिन्गपुजकांचाच देव, विष्णु या शब्दाचा अर्थ आहे "विस्तारीत होणारे लिन्ग." त्याला रुग्वेदातील एका अत्यंत दुय्यम अशा इन्द्रमित्र "विष्णु"शी नामसाधर्म्याचा उपयोग करुन घेत वैदिक ठरवुन टाकले. रुग्वैदिक विष्णुला साडेतीन रुचा आहेत. तेथे तो इन्द्राचा दुय्यम मित्र व सखा आहे. तो सागरशयनी नाही. लक्ष्मी त्याची पत्नी नाही. त्याचा शिवाशी दुरान्वयानेही संबंध नाही.
थोडक्यात शैव धर्मावर वैदिक कलमे केली गेली. बहुतेक विद्वान जवळपास हजार वर्ष बौद्ध धर्मात गेल्याने ते सोडलेल्या धर्माचा विचार करणे शक्य नव्हते...आणि जे उरले होते ते अतीसामान्य जन...त्यांना हे धर्मकारण कळने शक्य नव्हते असे पुराणांवरुनच स्पष्ट दिसते.
शेवटी शंकराचार्यांनी हिरीरीने बौद्ध धर्माचा पाडाव केला आणि शैव धर्माचे पुनरुज्जीवन केले. तुलनेने शैव धर्म दक्षीनेत सुरक्षीत राहीला होता, त्यामुळेच हे घडु शकले.
येथे हे लक्षात घ्यायला हवे की वैदिक आणि शैवजनांची भाषा थोडाफार फरक सोडला तर एकच होती. सामांन्यांची, बहुजनांची भाषा "प्राक्रुत" तर संस्कार करुन ग्रंथनिर्मितीसाठी जी भाषा वापरली जाइ ती "संस्क्रुत." जे जे संस्क्रुतात ते आर्यांचे हा एक मोठा गैरसमज आहे. तसे वास्तव नाही. प्राक्रुतातुन संस्क्रुत भाषा आली, संस्क्रुतातुन प्राक्रुत नव्हे हे लक्षात ठेवायला हवे. संस्क्रुत कधीच बोलीभाषा नव्हती. युरोपात १६व्या शतकापर्यंत ग्रंथलेखनासाठी सामान्यांना अनकलनीय लटीन भाषा वापरली जात होती हाही इतिहास समोर हवा.
भाषिक साधर्म्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. खुद्द "ब्राह्मण" या शब्दाचे उदाहरण घेउयात.
रुग्वैदिक अर्थाने "जो मंत्र रचतो तो ब्राह्मण".
शैव अर्थाने "जो पुजा-अर्चा करतो, त्या अभिषेकादि कर्मकांडाचे पौरोहित्य करतो वा ज्याला ब्रह्माचे द्न्यान झाले आहे (येथे ब्रह्म म्हणजे विश्वाचे आदिकारण) तो ब्राह्मण"
एकाच शब्दाचे अर्थ समानभाषीक समाज-संस्क्रुती आणि धर्मपरंपरांनुसार बदलत असतात. कालौघातही अनेक शब्द मुळ अर्थ हरपुन बसतात आणि नवे अर्थ समोर येतात. लिंग या शब्दाचा अर्थ जसा आपण आज घेतो तसाच त्याचा अर्थ "चिन्ह" असाही आहे. १०० वर्षांपुर्वि "कारस्थानी माणुस" याचा अर्थ होता "लटपट्या-खटपट्या करुन कार्य साध्य करणारा". आता त्याच शब्दाचा अर्थ अपमानास्पद मानला जातो.
मुळात यद्न्य धर्म हा शैवांच्या संस्क्रुतीच्या अवती-भवती निर्मान झाल्याने त्यांची भाषा ही प्राक्रुतातुनच बनवली गेली. त्या भाषेतील शब्दांना नवे अर्थ दिले, एवढेच. जैन धर्मही अर्थ बदलुन मुळ भाषेतीलच शब्द वापरतो, बौद्धांचेही तसेच झाले. त्यामुळे त्याचे विशेष आस्चर्य वाटायचे कारण नाही.

सर्व ब्राह्मण रुग्वदिक नव्हेत:

याचाच महत्वाचा अर्थ म्हनजे भारतातील आजचे सर्वच ब्राह्मण यद्न्यधर्मीय नव्हेत. किंबहुना यद्न्यधर्मीय ब्राह्मण नामशेष झाले आहेत. आदि शंकराचार्य हे कट्टर शैव होते. त्यांचा जन्मच मुळी शिवाच्या क्रुपाप्रसादामुळे झाला होता अशी दंतकथा प्रसिद्ध आहेच. त्यांनी कधीच यद्न्य केला नाही. ते तंत्रशास्त्राचे अधिकारी होते. यांनी शिव आणि जगदंबेवर अप्रतीम स्तोत्रे लिहीली आहेत. त्यांनी जेही मठ स्थापन केले ती सर्वच पुरातन शैव स्थाने आहेत. नंतरचे शंकराचार्य मात्र काशी विद्वत्सभेच्या प्रभावात जावुन रुग्वैदिक बनली ही एक कटु वस्तुस्थीती आहे.
भारतातील जवळपास सर्वच ब्राह्मणांची कुलदैवते ही शिवपरिवारातीलच आहेत. कोणाचेही कुलदैवत इन्द्र-वरुन नाही. कोणी ब्राह्मण रुग्वैदिक ब्राह्मण खायचे तसे गोमांस भक्षण करत नाही. शैव हे मुळचे, आणि आजही क्रुषि संस्क्रुतीतले असल्याने जो गोवंश शेतीकामाला उपयुक्त असल्याने पुज्य मानत असल्याने त्यांनी त्याचे मांस त्याज्ज्य ठरवणे हे संयुक्तीकच आहे. यद्न्यधर्मीयांना तशी गरजच नव्हती.
असे असुनही ब्राह्मण आपले गोत्र मात्र त्रुग्वैदिक रुषिंशी नेवुन भिडवतात. खरे तर हा त्यांचा मानसीक दुभंगलेपना आहे. याला कारणीभुत झाली ती वैदिकांनी लिहिलेली पुराणे. त्यांत ब्राह्मण माहात्म्य अपरंपार वाढवुन, ब्राह्मण हेच वैदिक, इतेरेजन क्षुद्र असा अव्याहत प्रचार केल्याने कालौघात इतर ब्राह्मणांनाही आपणही मुळचे यद्न्यधर्मीय आहोत असे वाटु लागल्याचे दिसते. यामागे धार्मिक सत्ता टिकवणे, वाढवणे हेच कारण होते. एकीकडे शिवाला शिव्या देणार्या वेदांचेही पठन करायचे आणि दुसरीकडे त्याच शिवपरिवाराच्या देवतांचे पौरोहित्य करायचे असा दुभंग प्रकार त्यातुन घडला.
ब्राह्मण समाजाने यावर चिंतन करुन आपण नेमके कोणते ब्राह्मन हे ठरवायला हवे म्हनजे आजकालचा ब्राह्मण-ब्राम्हणेतर वाद संपेल. जर ब्राह्मण हे यद्न्यधर्मीय, रुग्वेदीक असतील तर त्यांनी आपली आजची शैव कुलदैवते आणि त्यांची पुजा सोडुन द्यावी आणि यद्न्यसंस्थेचे पुनरुज्जीवन करावे. कोणी कोनता धर्म मानायचा हा व्यक्तिगत प्रश्न असतो आणि त्याचा सन्मान केलाच पाहीजे.
तसे नसेल त्या यद्न्यीक संस्क्रुतीचे महिमान गाजवणे सोडुन द्यावे. मुस्लीमाने अभ्यासासाठी बायबल वाचने ठीक आहे, पण तो काही त्याचा धर्मग्रंथ नव्हे. त्या श्रद्धा त्याच्या नव्हेत. पण तो चर्चलाही जाइल, मशीदीतही जाइल आणि मुस्लिमांत मुस्लीम आणि ख्रिस्त्यांत ख्रित्स्चन राहु म्हणेल तर कधी ना कधी त्याची पंचाइत होणारच.

मुळात हिंदु नावाचा धर्मच आस्तित्वात नाही:

"हिंदु" हे येथील कोणत्याही धर्माचे कधीच नाव नव्हते. हा शब्द दिला तो प्रथम ग्रीकांनी. ते लोक "स" चा उच्चार "ह" असा करतात. ते पोहोचले होते फक्त सिंधु नदीच्या खोर्यापर्यंत. त्यांनी ते खोरे आणि त्यापार राहणार्या सर्वांना "हिंदु" असे संबोधले. म्हणजे त्यात जैन, बौद्ध इ.सर्वच आले. इ.स.पु. २०० पुर्वी कोणत्याही धर्मग्रंथांत हिन्दु हे नाव आढलत नाही. कारण त्या नावाचा धर्मच आस्तित्वात नाही.
प्राचीन म्हनता येतील असे दोन धर्म...एक यद्न्यधर्म तर दुसरा मुर्तीपुजक लोकाचा शैव धर्म. पण हिन्दु हे नाव स्वीकारल्याने या दोन्ही धर्माचे जे कडबोळे बनले त्याला आपण हिन्दु म्हनतो. प्रत्यक्षात हे दोन्ही धर्म मुलता: स्वतंत्र आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यात आज भारतात टिकुन राहीलेला एकमेव धर्म म्हणजे शैव धर्म.
देशात आज विभिन्न भाषा, लोकरीती असुनही भारत आज एक देश म्हणुन टिकुन आहे त्याचे कारण म्हनजे शैव धर्म. रामेश्वरपासुन ते कैलासापर्यंत, कामाक्षी पासुन ते सोमनाथापर्यंत सर्वत्र १२ ज्योतिर्लिंगे आणि १४ शक्तीपीठे विखुरली आहेत. एकही गाव-खेडे नाही जेथे शिवमंदिर वा शिवपरिवारातील देवता नाही. प्रत्येक घरांतील देव्हार्यात गनेश, शिव, जगदंबा असतेच. देशभर अक्षरश: लाखो शिवमंदिरे आहेत, ही वस्तुस्थीती काय दर्शवते?
याउलट यद्न्यसंस्था १८०० वर्षांपुर्वीच संपली आहे. तरीही तीचे कौतुक केले जाते व तीच भारतीय संस्क्रुतीची उगमधारा आहे असे सांगीतले जाते हा निव्वळ विपर्यास आहे.

प्राचीन शैव समाज:

पुरातन काळी भारतात अनेक समाज विविध भागांत एकवटले होते. त्यापैकी सर्वात अवाढव्य समाज होता असुर समाज. हा कट्टर शिवभक्त समाज होता हे आपण पुरांनांतील विपर्यस्त स्वरुपात का होइना पण पाहु शकतो. असुरांना पुराणांनी बदनाम केले हे खरेच आहे कारण याच समाजातील बव्हंशी मंदळीने बौद्ध धर्म स्वीकारला होता. पण प्रत्यक्षात स्थीती वेगळी आहे. असुर हे खरेच दुश्ट व मायावी असते तर क्रुष्णाचा नातु अनिरिद्धाने बाणासुराच्या मुलीशी- उषेशी विवाह केला नसता. कंस हा क्रुष्णाचा मामा असुर होता. मगधाचा सम्राट जरासंघ हाही असुर. खुद्द भीमाने हिडिंबा या असुर मुलीशी तात्पुरता विवाह केला होता. . एवढेच काय पण सांख्य तत्वद्न्यानाचा जनक कपिलमुनी हा असुर वंशातील होता. उपनिषदांची निर्मिती ज्या राजा जनकाच्या सभेत झाली तो जनक असुर समाजाचाच होता. अशी असंख्य उदाहरणे आपण पाहु शकतो.
या समाजाखालोखाल मोठा समाज म्हणजे नाग समाज. नाग हे त्यांचे देवक म्हणुन या समाजाला नाग समाज म्हणतात. त्यांना नागपुजा प्रिय होती. उत्तर भारत ते महाराश्ट्रापर्यंत हा समाज विखुरला होता. त्यांची नागपुजा शैवजनांनी नागपंचमीच्या रुपात जपली तर आहेच पण सामाजीक ऐक्याचे प्रतीक म्हणुन शिवाच्या गळ्यातही त्याला स्थान मिळाले आहे. नागपुर, नागाव, इ. गावे आजही या समाजाचा इतिहास लेउन आहेत.
याखेरीज पुरातन शैव समाज म्हनजे औन्ड्र, पुंड्र, मुतीब, शिव, भलानस, मत्स्य, द्रह्यु, अनु, पणी यक्ष, किन्नर इ. होत.
पैकी औन्ड्र हे ओरिसा, आंध्र व काही प्रमाणात महारश्ट्रात पसरले. महारष्ट्रावर जवळ्पास ६५० वर्ष राज्य करणारे सातवाहन घराणे हे औन्ड्र वंशीय होते. आंध्र, ओरिसा ही राज्ये त्यांच्याच वंशनामावरुन बनलेली आहेत.
पुन्ड्र हे आजचा बंगाल, दक्षिण महराश्ट्र, कर्नातक व काही प्रमाणात तमिलनाडुमद्धे पसरले होते. पंढर्पुर ही त्यांची महाराशःट्रातील राजधानी होती. पुन्ड्रपुर वरुन पन्ढरपुर बनले आहे तर पुन्ड्रिकेश्वर हे एक शिवालय आहे...म्हणजे पुन्ड्र समाजाचे आराध्य म्हणुन "पुन्ड्रिकेश्वर" हे लक्षात घेतले पाहीजे. बंगालमद्धेही पुंड्रपुर आहे तसेच तिरुवारुरचे पर्यायी नावही पुन्ड्रपुर आहे हेही महत्वाचे आहे. (प्रस्तुत लेखकाचे "शोध विट्ठलाचा" हे पुस्तक अवश्य वाचा.)
शिव समाज हा शिवालीक टेकड्यांच्या प्रदेशात पसरला होता तर भलानस समाज बोलन खिंडीच्या प्रदेशात. मत्स्य समाज हा आजच्या राजस्थानात होता तर मुतीब हे सिन्धु नदीच्या खोर्यात होते. द्रह्यु समाज हा दक्षिणेत वसला होता. "द्रवीड" हे नाव मुळात द्रह्युंपासुन आले आहे.
पणी हे मुलता: व्यापारी होते.
यापैकी अनु, मत्स्य, अनु, भलानस या समाजांनी यद्न्यधर्मेयांशी युद्ध केल्याचे आपण रुग्वेदातील दाशरद्न्य प्रकरणात पाहु शकतो.
थोडक्यात हे समाज विभिन्न असले तरी त्यांचे आराध्य शिव हेच होते. त्यामुळेच या समाजात एकाकारता आली. समान आराध्य, समान कर्मकांड (पुजा), समान तंत्रशास्त्र, समान कुलदैवते, आदिघटकांनी सामाजीक ऐक्याला धोका होवु दिला नाही. हे सारे समाज कालौघात एकमेकांत मिसळुन गेले, परंतु परंपरा बदलल्या नाहीत.
परंतु अलीकडे वैदिकाभिमानी मंडळी विरुद्ध शैवजन असा संघर्ष सुरु आहे याचे कारण उपरोक्त विवेचनात आहे.

सर्व सण शैव सण:
आपण जेही सण वर्षभर साजरे करतो ते सारे शैव सण आहेत. नागपंचमी घ्या कि दिवाळी. मुळात दिवाळीला "यक्षरात्री" हे नाव होते. कुबेर हा यक्ष आहे व तो शिवाचा खजीनदार आहे असे आपण मानतो. त्याचे स्वागत करावे व धनसंम्रुद्धीची कामना करावी हा मुळ उद्देश. आजही आहे, पण त्याला लक्ष्मीपुजन हे नवे नाव दिले गेले आहे. बलीप्रतीपदा हा नववर्षाचा पहीला दिवस, आणि तो आहे महान असुरसम्राट बळीच्या नावाने. बळीराजा आजही आपल्या संस्क्रुतीने जपला...त्याचा कपटाने वध करणारा वामन नव्हे. संस्क्रुती सुप्त स्तरावर का होइना प्राचीन स्म्रुती कशा जतन करते हे आपल्या लक्षात येइल. नवरात्री ते दसरा हा सण जगन्माता जगदंबेचा आणि दसरा म्हणजे पुढील वर्षासाठी सुफलतेची कामना करणारा संकल्पपुर्तीचा दिवस. त्याचा रावण्वधाशी काही एक संबंध नाही. असता तर मग आधी नवरात्री का? त्याचा रावणवधाशी काय संबंध?
पण आपण हकनाक खोट्या मित्थककथांना बळी पडत आपली गतकाळाशी असलेली नाळ तोडतो आणि सांस्क्रुतीक अनर्थ घडवत असतो.
या सर्व सणांत एकही वैदिक सण आपण साजरा करत नाही. त्यांचे सण आहेत पण ते आज नश्ट झाले आहेत. उदा. इन्द्राच्या स्म्रुतीसाठी ते "इन्द्रमह" नावाचा एक सण साजरा करत असत पण तो सण इ.स. च्या २ र्या शतकातच बंद पडला. त्यांचा दुसरा सण म्हणजे "देव दिवाळी". शैवांच्या दिवाळीशी स्पर्धा म्हणुन हा सण निर्मान झाला. पण तो कोणी साजरा करत नाही. या व्यतिरिक्त वैदिकांचा असा कोणताही सण नाही. जे सण आहेत ते पुरेपुर शैव आहेत.
आता गरज आहे ती शैव धर्म शुद्ध करण्याची, खोट्या मित्थककथा झुगारण्याची. आपली खरी पाळे-मुळे शोधण्याची. आणि ती प्रक्रिया सुरु झाली आहे. दोन धर्माचे खोटे कडबोळे आम्हाला नको आहे. ्हवा आहे तो शुद्ध धर्म. शैव धर्म.
जो मुर्तीपुजा करतो तो शैव ही सोपी व्याख्या लक्षात ठेवा. शैव-वैश्णव हा झगडाच मुळात वैदिक विष्णुला थोपण्यासाठी होता. पण वैदिक विष्णु आणि आपण मानतो तो विष्णु हे मुळात संपुर्ण वेगळे आहेत. आपला विष्णु हा सागरशयनी, लक्ष्मी समवेत आहे. तो शेषनागावर शयन करत आहे...म्हणजे त्याचाही नाग संस्क्रुतीशी निकटचा संबंध आहे. पणी लोक समुद्रमार्गाने प्रवास करत असल्याने, सुरक्षीत नौकानयनासाठी त्यांनी शिव-सद्रुश्य देवता बनवली व ती म्हणजे विष्णु होय. वैदिक विष्णु मात्र अत्यंत दुय्यम स्वरुपाची देवता आहे आणि इन्द्राला प्रसंगी मदत करण्यापलीकडे त्याला काही कार्य नाही.

शैव संस्क्रुतीचा, धर्माचा धावता आढावा या लेखात घेतला आहे. आपले शैव मुळरुप कसे हे दाखवले आहे. आपण मुळात "हिंदु" नसुन, अगदी वैदिकाभिमानी ब्राह्मणसुद्धा (कारण त्यांचाही आचारधर्म शैवच आहे.) शैवधर्मीय आहोत. परकीयांनी दिलेले नाव हटवुन आपण आपल्या मुळ परंपरेशी नाळ द्रुढ केली पाहीजे.

-संजय सोनवणी
मो. ९८६०९९१२०५

4 comments:

  1. शैव व वैष्णव यातील फरक काय?

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. अत्यंत सुंदर शब्दात शैव आणि वैदिक धर्माची व्याख्या तुम्ही केली. मला आठवते कि माझे वडील नेहेमी मला सांगत असत कि आपण शैव आहोत. ते माझा कपाळावर गंध लावायचे ते देखील आडवे. आमचे कुलदैवत देखील कालभैरव हे आहे जे फार थोड्या लोकांचे असते. तुमचे विवेचन वाचून बर्याच शंका दूर झाल्या. ह्या शैव धर्माची वृद्धी करण्यासाठी जाती पाती विसरून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. मनःपूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  4. आपल्या लिखाणावरून आपल्या बौद्ध मत्सराची कल्पना येते.मुळात ज्याला आपण शैव म्हणता त्या संस्कृतीला मुळनिवासी लोकांची संस्कृती म्हणणे अधिक योग्य ठरेल.आणि ती संस्कृती काही एकच नव्हती.त्या काळी भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या टोळ्यांचे राज्य होते त्यापैकी बहुतेक टोळ्या येथील मुळनिवासी लोकांच्याच होत्या.त्यांचेही आपसात वादविवाद होत असत.त्या टोळ्यांना गण असे म्हणत असत.प्रत्येक गणाचे एक चिन्ह असे.आपण जी नाग संस्कृती सांगता ती नाग संस्कृतीही यापैकी एक संस्कृती होती.पुढे ह्या नागांनीही बौद्ध धम्माचा स्वीकार केला.नाग म्हणजे आजच्या अर्थाने "साप" नव्हे तर नाग म्हणजे "हत्ती"(संस्कृत).नाग टोळीने हे हत्ती चिन्ह यासाठी धारण केले होते कारण त्याकाळी भारतात विशेषत: मध्य भारतात हत्ती हा प्राणी प्रचंड संख्येने होता आणि तो नाग लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.
    मुळात बुद्ध हा काही विदेशी व्यक्ती नाही.परंतू आपल्या लिखाणावरून तसे सुचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे वाटते.आदिकालीन संस्कृतीमध्ये मुर्तीपुजा होत होती हे मान्य.परंतू काळाच्या ओघात जग बदललेले असतांना आजही मुर्तीपुजा मान्य करणे हा शुद्ध मुर्खपणाच.विज्ञानाचा या कसोटीवर देव ही संकल्पना मान्य नाही.विज्ञानाने लावलेले शोध मानवाने लावलेले आहेत,मानवाच्या गरज आणि शोधाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून आजच्या सर्व भौतिक सुखसुविधा आलेल्या आहेत.त्याचे श्रेय देव नावाच्या काल्पनिक गोष्टीला देणे संपूर्णपणे चुकीचे आहे.जो देव स्वत:चे रक्षण करू शकत नाही तो काय भक्तांचे रक्षण करणार.
    आपल्या लिखाणात शंकराचार्यांनी बौद्ध धर्म नष्ट केला याचे कौतुक दिसते.वास्तविक पाहता ब्राम्हणांचा यज्ञधर्म(आपण म्हणता तसा..आमच्यामते वैदिक धर्म) आणि आपण आपला सांगत असलेला शैव धर्म(आमच्यामते मुळनिवासी लोकांचा धर्म)जर एक नाहीत तर मग शंकराचार्य शैव धर्माचा कसा? पहिल्या शंकराचार्यापासून आताच्या शंकराचार्यापर्यंत सगळे एकजात ब्राम्हण का? आणि ते सारे वैदिक धर्माचे पर्यायाने चातुर्वण्याचे समर्थक का? शंकराचार्याने प्रत्येक बौद्ध व्यक्तीच्या शिरावर सहस्त्र(100) सुवर्णमुद्रा बक्षिस म्हणून जाहीर केल्या होत्या हेही लोकांपुढे येऊ द्या.जीवाच्या भितीने पुर्वेकडील देशांत पळून गेलेल्या भिक्खुंनी हा धर्म जिवंत ठेवला म्हणून तिकडे या धर्माचे अस्तित्व आज मोठ्या प्रमाणात दिसते म्हणून कदाचित आपल्याला हा धर्म परकीय वाटत असावा.वास्तविक पाहता तिथेही इतर विचारधारांच्या प्रभावात येऊन तिथेही मुळ माणुसकीस प्राधान्य देणारा बौद्ध धम्म उरला नाही,तसे नसते तर चीनमधील लोक मांसभक्षणाचे इतके वेडे नसते.
    अंधविश्वासाच्या गर्तेतून बाहेर काढणारा आणि 100% विज्ञानवादी असा बौद्ध धम्म आहे,धर्म नव्हे.आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या व्याख्येनुसार "मानवाचा मानवाशी असलेला मैत्रीपूर्ण किंवा उचित व्यवहार म्हणजे धम्म होय" देव खरेच असता तर जगात इतके देव मान्य नसते.कुणातरी एका देवाने बाकी देवांना नष्ट करून आपली सत्ता निर्माण केली असती. मानवी समाजात घडणा-या प्रत्येक ब-यावाईट घटनेला माणूसच जबाबदार असतो,देव नाही.
    देवापासून धर्म निर्माण होतो,धर्मापासून पुजाअर्चा आणि त्यातून पुरोहीत वर्गाची रोजगार हमी योजना.ही बाब आजच्या हिंदू म्हणवणा-या धर्मापुरतीच मर्यादित नाही. त्यामुळे निखळ माणुसकीची शिकवण देणारा धम्म आपण स्विकारलात तर त्यात गैर काय? देव,धर्म आणि मुर्तीपुजा यांची शिकवण देऊन आपल्या समाजास परत अंधविश्वासाच्या गर्तेत लोटण्याऐवजी आपण त्यांना नव्या जगाच्या प्रगतीची माणूसकीची वाट दाखविणे बरे होईल.

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...