Wednesday, February 9, 2011

आरक्षण: माझी काही मते

आरक्षण हा सध्या चळवळीतील एक महत्वाचा मुद्दा बनला आहे. जातीनिहाय जनगणना हवी कि नको यावरही वितंड घातले जात आहे. मराठा समाज (जात?) हा कुणबी या संज्ञेत मोडतो असाही एक युक्तिवाद सध्या सुरु आहे. ओ. बी. सी. समाजाचे विचारवंत/नेते मराठ्यांना ओ. बी. सी. मध्ये सामावून घेण्यास तयार नाहीत. यामागे प्रत्येकाची विचारधारा असेल ती असो...माझी मते मी येथे नोंदवत आहे.

१. मी कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाविरुद्ध आहे. आरक्षण पद्धतीने जाती-व्यवस्था अधिकच तीव्र होत जात आहे आणि सामाजिक स्वास्थ्य त्यामुळे अधिकाधिक धोक्यात येत असून परस्पर संशय/द्वेष वाढत जात आहे.
२. आरक्षणामुळे समाज उपेक्षित घटक सबळ होतील हा घटनाकारान्चा विश्वास समाजाने/राजकीय व्यवस्थेने खोटा ठरवला आहे. आज जेही उपेक्षित उच्च पदावर पोहोचलेले दिसतात त्यामागे आरक्षणापेक्षा त्यांची व्यक्तिगत योग्यता महत्वाची ठरलेली दिसते. आरक्षण ही तात्कालिक गरज असणे वेगळे आणि तो जन्मसिद्ध हक्कच आहे असे मानणे वेगळे. आरक्षणाची गरज आता संपली आहे.
३. जातेनिहाय आरक्षणे भारतीय समाजाने (हिंदू) आजवर भोगलीच आहेत. पूजा/पौरोहित्य हे जसे धर्मानेच ब्राह्मण समाजासाठी आरक्षित होते तसेच शिंपी, तेली, आदी १२ बळूतेदारही समाजव्यवस्थेत आरक्षण भोगतच होते...म्हणजे त्यांच्या व्यवसायात अन्य लोकाना प्रवेशच नव्हता.
४. पेशवाईच्या काळात दलित समाजावर पराकोटीचे अन्याय व्हायला सुरुवात झाली. त्याची परिणती म्हणजे याच समाजाने पराक्रम गाजवत पेश्वाइचा अंत घडवून आणला. त्यांची समतेची संधी पुरेपूर हिरावून घेण्यात आली. श्रुती-स्मृतींनी काहीही म्हटले असो, समाज व्यवस्थेत दलितांचा मोठा वाटा होता...आणि तो तत्कालीन कायद्यान्नीही मान्य केला होता. दामाजी पंताला मोठा दंड भरून सोडवणारा विठू महारच होता....विठ्ठल नव्हे.
५. वैदिकाभिमानी ब्राह्मणांनी सर्वांनाच शुद्र लेखत (मग ते राज्यकर्ते का असेनात...) एक दुष्ट परंपरा निर्माण करत समाज रचनेलाच सुरुंग लावला. इतरांच्या व्यवसायात (मग ते क्षात्र कर्म असो, व्यापार असो, कि सेवा कर्म आणि कृषिकर्म असो) ते जोरात घुसले...आणि इतरांना मात्र त्यांनी पारंपारिक व्यवसायच करावेत असे फर्मान काढले...आणि स्वता: मात्र पारंपारिक आरक्षणे (पूजा/धर्मकार्य/पौरोहित्य इ.) भोगत इतरांच्या व्यवसायांवरही डल्ला मारला.
६. या रीतीने पारंपारिक का होईना जेही काही आरक्षण होते ते संपत गेले.
७. त्यामुळेच घटनाकारांना नवीन परिप्रेक्षात आरक्षणाची गरज भासली कि ज्यायोगे समाजातून नष्ट झालेली समानता यावी. सर्वांनाच संध्या मिळाव्यात.
८. आर्थिक आधारावर आरक्षण असावे असा मतप्रवाह उच्च जातींतील लोकांनी प्रसृत केला आणि त्याविषयक रान उठवले. पण भारतीय माणूस हा मुळातच खोटा असल्याने आर्थिक आधार हा फुसका आहे...म्हणजे...मी स्वत: पहिले आहे कि जमीनदारांची मुलेसुद्धा नादारी दाखवत (कागदोपत्त्री) फी माफी मिळवत होते. म्हणजे प्रामाणिक लोकांचा अशा स्थितीत निभाव लागणे अशक्यच आहे.
९. ब्राह्मण ही जात आहे कि वर्ण याबाबत ब्राह्मणी नेत्यांनी आजवर मौन पाळले आहे. ती जात असेल तर त्या जातीतील अपरिहार्य उतरंड दाखवण्यात ते असमर्थ ठरले आहेत. आज ब्राह्मण समाजात ५५० पेक्षा अधिक जाती आहेत आणि श्रेष्ठ-कनिष्ठता त्यांच्यातही आहे. जर तो वर्ण असेल तर ते वर्णाश्रम धर्म जर पाळत नाहीत तर त्यांना ब्राह्मण वर्णीय समजता येत नाही.
१०. मराठा समाज सोयीप्रमाणे स्वता:ला ९६-९२ कुली समजतो आणि आता सोयीस्कर रीत्या आम्ही कुणबी आहोत असे प्रतिपादन करत आहे. माझे स्पष्ट मत असे आहे कि मराठा ही "जात" कधीच नव्हती. सातवाहन कालापासून महारत्ठी हा शब्द प्रचलित झाला आणि हा शब्द पदवाचक होता. जात- वाचक नव्हे. हे पद कोणालाही, लायक माणसाला मिळू शकत होते आणि ते वंश-परंपरात्मक नव्हते. उदा. सात्वाहानातील नागनिका या राणीचा पिता "महाराठ्ठी" होता (पद) पण तो नाग वंशाचा होता.
११. दलित समाजाला आजही आरक्षणाची गरज आहे काय? माझ्या मते नाही. त्यांत मराठा समाजही आरक्षण हवे असे प्रतिपादित करत असेल तर तेही चुकीचे आहे. ओ. बी. सीना तर मुळीच नाही. ओ. बी. सी. समाज हा सेवा आणि उद्योग यांत जातीय उतरंडीत का असेना, महत्वाचा आणि अर्थोत्पादक घटक होता. माळी समाज हा शेतकरीच, परंतु बागायती शेती करणारा...फुले/भाज्या पिकवणारा...तो ओ. बी. सी. कसा असू शकतो हा मला न कळणारा प्रश्न आहे. हाच प्रश्न सोनार, शिंपी, इ.इ. यांच्याबद्दल विचारता येवू शकतो.
१२. मराठा समाज कोणत्या न कोणत्या पातळीवर सतीत होता हे अमान्य होवू शकत नाही. मग ते गाव पाटील असोत, जमीनदार असोत, सरंजामदार असोत कि कोणत्या ना कोणत्या सत्तेचे प्रतिनिधी असोत. त्यांनी सत्तेच्या राजकारणात मोठा रोल बजावला आहे. आजही तेच वास्तव आहे. आता असंख्य मराठे दारीद्र्यातील जिने जगात आहेत हेही वास्तव आहे आणि तसे नको हे मान्यच आहे. पण जातीनिहाय अहंकारात त्यांनीच स्वताची जर वात लावली असेल तर त्याला समाज कसा जबाबदार असेल? आजही जेही कोणी गुंठा सम्राट आहेत ते कोण आहेत? एड्स पासून ग्रस्त होणारे कोण आहेत? बारबालांना धनाढ्य करणारे कोण आहेत? महाराष्ट्रात आजही जी लोक-कला केंद्रे चालतात त्यांचे आश्रयदाते कोण आहेत? त्यांचे प्रबोधन कोणी करतांना मला तरी दिसत नाहीत. पण आरक्षण हवे आहे...जी भाकरच मुळात थोडकी आहे त्यात वाटा हवा आहे...हा सर्व परभुतान्चा खेळ आहे.
१३. आरक्षण आता विघातक आहे. ते कोणालाही नको. वंचितांची काळजी आहे म्हणून आरक्षण हवे हे म्हणणारे सारे खोटारडे आहेत...कारण वान्चीतांपर्यंत काहीच पोहोचले नाही...नाही तर कुनाब्यांनी आत्महत्या केल्या नसत्या...मेळघाटात आजही हजारो बालमृत्यू झाले नसते.
१४. जातीव्यावस्थेखेरीज भारतीय समाज jaguu शकत नाही हे सत्य मनुवाद्यांना आनंदाचे वाटू शकते, पण तेही सुपात आहेत.
१५. थोडक्यात मुळात आरक्षण रद्द व्हायला हवे...तरच सारे आपापली बुद्धी पणाला लावत पुढे जातील असे मला वाटते.

यावर व्यापक चर्चेची अपेक्शा आहेच.

10 comments:

  1. थोडक्यात मुळात आरक्षण रद्द व्हायला हवे...तरच सारे आपापली बुद्धी पणाला लावत पुढे जातील असे मला वाटते. >>>>>>या वाक्याचा तिव्र निषेध.

    आरक्षण ही रोजगार हमी योजना नाही. उपेक्षीताना उभं राहण्याची शक्ती देण्याची ती प्रक्रिया आहे. राहिला प्रश्न स्पर्धेचा तिथे आम्ही आपला योग्यता सिद्ध करतोच आहे.
    बौद्ध समाज सघडयाच आघाड्यांवर आजारी बनवुन ठेवण्यात आला होता. त्याचा आजार घालविण्याची प्रक्रिया म्हणजे आरक्षण होय. माझ्या सारखे एक एक या आरक्षणामुळे आजारातुन बरे होत आहेत अन स्पर्धेत उतरत आहेत. तुमच्या म्हणन्यानुसार आजार बरा करु नका. त्याना तसच स्पर्धेत उतरवा असा सुरु दिसतो. आजार्‍याला औषधपाणि देऊन बरं करणे अत्यंत गरजेचं आहे. मधला एक टप्पा गहाळ करुन विचार करु नका. प्रोसेसचा एक भाग वगळला तर रिझल्टमधे बराच फरक दिसेल.
    म्हणुन दलितांचा विकास करायचा असल्यास त्या प्रक्रियेचे टप्पे असेच असावेत
    १) त्याना सगळ्या ठिकाणी आरक्षण दया
    २) आरक्षणामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात शिरता येईल.
    ३) मुख्य प्रवाहात स्थिरावण्यासाठीही आरक्षण दया.
    ४) तुम्ही आमच्या बरोबरीचे आहात असा संदेश जाण्यासाठी योग्य मान सन्मान दया.
    ५) आपल्याला ईथे किमंत आहे असं दलितानाही जाणव लागेस्तोवर त्या दिशेनी प्रयत्न करा.
    ६) एकदा हा समाज मुख्य प्रवाहात स्थिरावला की मग स्पर्धेचा विचार करता येईल.

    ReplyDelete
  2. Madhukar Jee, aarakshanamule upelshitanaa mukhy samaj pravahat shirtaa yeil he ek swapnach urale aahe. Sarvaant anyaygrast samaaj haa dalit samaaj aahe yabaddal dumat asuch shakat nahee. "dalitannaa ajun kiti divas posayche?" asa prashn Shalinitai Patil yaannee kahi varshanpurvee vicharalyaache malaa smarate. Arakshanamule jaatee dvesh vadhalaa ahe ani to vadhatach chalala ahe. Ani srav dalit bandhunnaa aarakshanaachaa laabh hoto aahe ase ajunahee disat nahee. Tyaasaathee konateetaree navi paddhat shodhalee jaavee ase malaa vaatate. Aaj jo-to aarakshan maagat ahe. Gujaranche andolan athavat aselach.

    barobareeche aahet aani tyaanna man-sanmaan dyaa...yaat shankaach nahi...dyaylaach havaa ani je det nahit te maanavataavirodhee aahet tyaanchaa tiraskaar karane kramprapt aahe.

    Mala vyaktishaa dalitanbadal kaay vatate he mi vegale sangaychee garaj nahee...mee don kadambaryaa dalit nayak ghevun lihilyaa aahet...

    ReplyDelete
  3. ह्या लेखावर प्रतिक्रिया देण्याऐवजी मी माझी काही स्वतंत्र मते(निरीक्षणे) इथे मांडत आहे..
    १) आपण मराठा आरक्षणाचा उल्लेख केला म्हणून लिहितोय.. आपण जो मुद्दा मांडला.."माळी समाज हा शेतकरीच, परंतु बागायती शेती करणारा...फुले/भाज्या पिकवणारा...तो ओ. बी. सी. कसा असू शकतो हा मला न कळणारा प्रश्न आहे" मुळात आज जो मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे..त्याला हि काही अंशी हेच कारण आहे..मराठा आणि माळी समाजाची अर्थीक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय परिस्थिती सारखीच आहे..मग माळी ओ.बी.सी. आणि मराठा ओपन kasa?? हा साधा प्रश्न सहजच कुणाच्याही मनात येऊ शकतो.. त्यातूनच मग त्यांना आहे तर आम्हाला का नको..ते तुपाशी तर आम्ही का राहावे उपाशी..अश्या मानसिकतेतुनच मराठा आरक्षण हा प्रश्न पुढे आला आहे..व त्यामुळे मराठा-माळी हा संघर्ष (खरा कि खोटा..??)सुरु झाला आहे..नुकताच हरी नरकेनी ब्रिगेडविरुद्ध जो कांगावा केला तो ह्यातूनच झालेला आहे..ह्याला राजकीय अंगेही आहेत.. मराठा आरक्षणाचे समर्थक विनायक मेटे आणि विरोधक भुजबळ दोघेही आज एकाच पक्षात आहेत..दोघेही स्वाभिमानी असते तर त्यांनी पक्ष सोडायला हवा होता..पण निवडणुकीच्या वेळी भुजबळांच्या विरोधात बोलणारे मेटे भुजबळ उप-मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे हार-तुरे सांभाळत भुजबळांच्या मागे उभे होते..भुजबल हे जणूकाही ओबीसीचे कैवारी आणि मेटे मराठ्यांचे कैवारी...दोन्ही गंगा शेवटी एकत्रच आल्या ना..!! आरक्षणाची गरज तशी दोघानाही नाही..आणि तशी दोघानाही आहे... पण मराठे आज आरक्षणाच्या बाहेर आहेत हि वस्तुस्थिती आहे...ह्यामुळे असे संघर्ष भविष्यात वाढणार आहेत..हे मात्र नक्की..त्यामुळे एकंदरीत आरक्षणावर नेमकी काय भूमिका असावी ह्या बद्दल सोनवणीसरांनी मार्गदर्शन करावे.. अजूनही बरेच लिहायचे आहे..तूर्तास एवढेच..

    ReplyDelete
  4. "मराठा समाज कोणत्या न कोणत्या पातळीवर सतीत होता हे अमान्य होवू शकत नाही. मग ते गाव पाटील असोत, जमीनदार असोत, सरंजामदार असोत कि कोणत्या ना कोणत्या सत्तेचे प्रतिनिधी असोत. त्यांनी सत्तेच्या राजकारणात मोठा रोल बजावला आहे. आजही तेच वास्तव आहे. आता असंख्य मराठे दारीद्र्यातील जिने जगात आहेत हेही वास्तव आहे आणि तसे नको हे मान्यच आहे. पण जातीनिहाय अहंकारात त्यांनीच स्वताची जर वात लावली असेल तर त्याला समाज कसा जबाबदार असेल? आजही जेही कोणी गुंठा सम्राट आहेत ते कोण आहेत? एड्स पासून ग्रस्त होणारे कोण आहेत? बारबालांना धनाढ्य करणारे कोण आहेत? महाराष्ट्रात आजही जी लोक-कला केंद्रे चालतात त्यांचे आश्रयदाते कोण आहेत? त्यांचे प्रबोधन कोणी करतांना मला तरी दिसत नाहीत."

    agdi saty..hya saranjami wruttichya "The Great 96 kuli" marathyanchya ani muthbhar rajkarnyanchya wirodhat aarkshanachi garaj asnaryarya maratha samajane ekatra hone aawashyak ahe..pan durdaiwane kinwa adnyanamule asa maratha ha aarkshan samjun ghet nahi... thodefar wirodh kartat..kahi aarkshan magtat.. maratha samjat aajhi aarkshanabaddal ani saranjami marathyanchya shoshnawiruddh jagruti ani prabodhan nahi.. hyasathi maratha tarunani ekatra yawe lagnar ahe..bahujanwadi dhorane rabwat aadhi maratha samajat samta prasthapit karawi lagnar ahe.. ek matr nakki aarkshan samarthak ani wirodhak,"warche" bramhan ani "khalche"(he shabd mi samjanyasathi waprat ahe..gairarth nako.) bahujan hyanchya marathyancha sandwitch zala ahe..ani sagle milun tyache lachke todat aahet...

    ReplyDelete
  5. sanjayji tumhi obc v marathha samajala aarakshan deu naye yabaddal karne sangitli.

    pan dalitana aarakshan ka band karave. ya baddal karne sangavit

    ReplyDelete
  6. Dalit in India deserves Reservation.From 200 to 300 years they were supressed like nothing.And now they geeting support of reservation to stand on thers feet.from 1951 onwards dalits started getting reservation.uptil this time may be there4-5 th generation is getting reservation.1st generation got education upto 4-5 standard,because ther mother father was not aware of profit of educatio & there financial conditon was not permitting them for that.2 nd generation got education upto 10-11 standard,because there mother father understood what education is, and they stored some money for there childeren.3rd generation got education upto graduation,because there mother father understood fully what education is.now some where there are in condition to understandd what is higher education means,what is finacne and stability all these things.So i think we shoild continue ther reservtaiopn, till taht time where people from dalit's will say " Ok yar now we got enough reservation,we are stable financially,educationally,politically & we can fight this fight of life"

    ReplyDelete
  7. reservation is representation.dalits are separate identity. dalits dont wanted to be rulled by bramins baniyas with shudras as police force but agreed to democracy with some securities.reservation is one security.it is fundamental right for government service and education.
    in usa black also have reservation and it is called as affirmative action.

    ReplyDelete
  8. सोनवणेजी आपणाला आरक्षणाची संकल्पनाच माहीत नाही असे वाटते. म्हणून आपण वरीलप्रमाणे विधान केले आहे. आरक्षणाची संकल्पना सर्वप्रथम महात्मा फुले यांनी मांडली त्यांनी “जाती जातीच्या संख्येत द्यावीत कामे वाटून” अशी ब्रिटिश सरकाराकडे मागणी केली होती. आरक्षण म्हणजे सवलत, कुबड्या, मेहरबानी किंवा नालायकाना पदे देणे असे नाही. तर जगातील सर्वात बुद्धीमान व्यक्ती म्हणून ज्याला जगात मान्यता आहे अश्या उच्चविद्याविभूषित बाबासाहेबांनी आरक्षण म्ह्णजे प्रतिनिधित्व असे म्हटले होते. म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या जातींना/वर्गाला शासन प्रशासनात प्रतिनिधित्व मिळावे म्हणून दिलेले आरक्षण हे संवैधानिक संरक्षण आहे. आरक्षण हे शासन प्रशासनातील हिस्सा वाटा आहे.व संविधानानुसार आरक्षण हे मूलभूत नागरी अधिकार आहे. जे कायम स्वरूपी आहे काही काळापुरती दिलेली सवलत नाही. सर्वप्रथम आरक्षण लागू करण्याचा मान छ. शाहू महाराज यांना जातो. छ. शाहू महाराजांनी 26 जुलै1902 रोजी कोल्हापुर संस्थानात ब्राम्हण, पारशी, प्रभु व शेणवी या उच्च जातींना वगळता उर्वरित समाजाला 50% आरक्षण लागू केले होते. याचा विरोध करण्यासाठी सांगली संस्थानातील ब्राम्हण कारकून गणपत अभ्यंकर हा गेला. शाहू महाराजांनी त्यांचा आदर सत्कार केला वा त्यांना घोड्याच्या पागेत घेऊन गेले. तेथे सर्व घोडे एका रांगेत बांधलेले होते प्रत्येक घोडा त्याच्या तोंडाशी बांधलेल्या तोबार्र्यातील हरभरे खात होता. कोणीच कोणाच्या तोबार्र्यात तोंड घालण्याची सोय नव्हती. शाहू महाराजांनी अभ्यांकरास हे दाखवून म्हटले पाहा ही माझी व्यवस्था. नंतर त्यांनी सेवकास बोलावून आज्ञा दिली की सर्व घोड्याच्या तोबार्यातील हरभरे काढून एकत्र जमीनीवर टाका व सर्व घोडे सोडून द्या. सेवकांनी त्याप्रमाणे केले. लगेच काय दृश्य उत्पन्न झाले? जी धष्ट्पुष्ट, बलवान,मोठी घोडी होती ती सर्व हरभर्र्याच्या चारी बाजूला वर्तुळ करून, घेरून उभी राहीली व ते हरभरे फस्त करू लागली व जी कमजोर, अल्पवयीन म्हातारी घोडी होती ती मागे उभी राहून त्या घोड्यांकडे लाचारपणे बघत होती की ती बलवान घोडी नुसते खातच नव्हती तर मागे लाता सुद्धा झाडत होती. मग त्या मागे उभे असलेल्या कमजोर घोड्यांकडे बोट दाखवून शाहू महाराजांनी विचारले “सांगा अभ्यंकर आता मी या घोड्याचे काय करू काय यांना गोळ्या घालू ? जाती या जनावरात असतात, तुम्ही ब्राम्हणांनी जनावराची व्यवस्था माणसात लागू केली मी माणसाची व्यवस्था जनावरात लागू केली आहे”. हे एकून अभ्यंकराने शरमेने मान खाली घातली. सोनवणेजी मला वाटतं आरक्षणाची संकल्पना स्पष्ट समजण्यास हे उदाहरण पुरेसे आहे. आरक्षण म्हणजे कोणावर अन्याय नव्हे. आरक्षण हे सामाजिक न्याय प्रस्थापित करणारे तत्व/शस्त्र आहे. दुसरे एक उदाहरण देतो जे थोर विचारवंत मा. हरी नरके यांनी दिले आहे. एक आई व तिची दोन मुलं असतात. ती रोज स्वयंपाक करून ठेवते व कामावर निघून जाते. काही काळानंतर तिच्या लक्षात असे येते की धाकटा मुलगा दिवसेंदिवस बारीक, कमजोर होत चाललेला आहे, व थोरला मुलगा धष्ट्पुष्ट होत चालला आहे. तेव्हा एके दिवशी ती धाकट्याला जवळ बोलावते व विचारते “ बाळा तुला काय त्रास आहे तू दिवसेंदिवस बारीक का होत चाललास “ तेव्हा तो म्हणतो “ आई दादाची भूक दिवसेंदिवसे वाढतच चालली आहे. तो खूप खातो, कधी कधी तर मला तो काहीच जेवण ठेवत नाही.” तेव्हा दुसर्र्या दिवसापासून ती आई स्वयंपाक एकत्रच करते मात्र ती आता दोघा मुलांचा जेवणाचा डबा वेगवेगळा भरून सेपरेट कपाटात ठेवून दोघांना सेपरेट चावी देते. आता सोनवणेजी माझा आपणाला असा प्रश्न आहे की असे करून काय त्या आईने दोघा भावात वैमनस्य निर्माण केले ? दोघांत वैमनस्य निर्माण होईल म्हणून काय तिने धाकट्याला तसेच उपाशी मरू द्यायला पाहिजे होते? काय असे करून तिने मोठ्या मुलावर अन्याय केला ? काय लहान मुलाला सवलत दिली, कुबड्या दिल्या, मेहरबानी केली ? तर नाही तिने असे करून धाकट्याचा हक्काचा वाटा सुरक्षित केलेला आहे जेणेकरून मोठ्या मुलाने त्यात तोंड घालू नये.व मोठ्या मुलालाही त्याचा वाटा दिला आहे.असे करून तिने न्याय केला आहे.अन्याय नव्हे.

    आपण जे मुद्दे मांडले आहे त्याचे उत्तर पुढच्यावेळि देईल

    ReplyDelete
  9. आपण जे मुद्दे मांडले आहे त्याचे उत्तर खालीलप्रमाणे देत आहे.

    १.काय आरक्षण लागू होण्याअगोदर भारतात जातीव्यवस्था सौम्य होती की तीव्र होती ? आणि आरक्षण लागू झाल्यानंतर जातीव्यवस्था पूर्वीपेक्षा तीव्र झाली की सौम्य याची आपणच समीक्षा करावी. आरक्षणामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते म्हणून उपेक्षित जातींनी शोषित दलित जातींनीच का बरे कळ काढावी ? का आपल्या हक्काचा वाटा सोडावा, का दारिद्र्य भोगावे, का गुलाम बनून राहावे, का प्रतिनिधित्वहीन राहावे, शासित राहावे, शासक होऊ नये ? आरक्षण हा शासन प्रशासनात भागीदारीचा मामला आहे.
    २.आरक्षण हा प्रत्येक जातीचा समाजाचा जन्मसिद्ध हक्क आहे. जो पर्यंत भारतात जातीभेद आहे तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे. आज जेही उपेक्षित उच्च पदावर पोहोचलेले दिसतात त्यामागे आरक्षणापेक्षा त्यांची व्यक्तिगत योग्यता महत्वाची ठरलेली दिसते असे म्हणण्यात आपले अज्ञान दिसून येते. आरक्षण लागू होण्यापुर्वी म्हणजे 1950 च्या आधी आमचे (SC, ST,OBC चे) आजोबा, पंजोबा ग्रज्युएट, प्रोफेसर, डॉक्टर, वकील, इंजीनियर, कलेक्टर नव्हते. काय ते सर्व नालायक होते ? तर नाही त्याकाळी मनुस्मृतीनुसार त्यांच्यावर शिक्षणबंदी होती त्यामुळे पुढील प्रगतीचा प्रश्नच येत नाही. तुमच्यात शेती करण्याची धमक आहे, ताकद आहे, हुशारी आहे पण जर तुम्हाला जमीनच नसेल तर तुम्ही काय आकाशात शेती करणार ? आमच्या महापुरूषांनी आरक्षणाद्वारे आम्हाला ही हक्काची जमीन मिळून दिली आहे.त्यामुळे आजचा हा वर्ग स्वत:ची योग्यता सिद्ध करू शकला. आरक्षणामुळे उपेक्षित वर्ग हा सबळ होऊन जागृत झालेला आहे व तो आपल्या समाजाच्या हक्क अधिकारासाठी स्वतंत्र लढा उभारीत आहे. घटनाकारांचा हा विश्वास समाजाने खरा ठरवलेला मला दिसत आहे.
    ३.जातेनिहाय आरक्षणे भारतीय समाजाने (हिंदू) आजवर भोगलीच आहेत असे म्हणने चूक आहे. फसवे आहे. दिशाभूल करणारे आहे. फक्त ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य या वर्णानेच 100% आरक्षण भोगले असे म्हणता येईल. पूर्वीच्या काळी शिक्षणात, शासन प्रशासनात या तीन वर्णातील लोकांचाच अधिकार होता व इतरांना बंदी होती हे वादातीत आहे. आणि शूद्र अतिशूद्र सुद्धा आरक्षण भोगत होते असे म्हणने म्हणजे भंगी समाजाला असे म्हणण्यासारखे आहे की बाबारे तुम्हाला भंगीकाम करण्याचे पूर्ण अधिकार आहे. दुसरा कोणी तुमच्या हक्काच्या भंगी कामात ढवळाढवळ करणार नाही. तुम्हाला 100% आरक्षण आहे. तुम्ही कायम तेच भंगी कामाचा उपभोग घ्यावा. म्हणजे तुम्ही सुशिक्षित होऊन प्रोफेसर, डॉक्टर, वकील, इंजीनियर, कलेक्टर होऊन शासन प्रशासनात भाग घेऊ नका, शासक होऊ नका, नेहमी शासित रहा. असेच म्हणने नाही काय ? म्हणजे लाता घालून मेहरबानीचा आव आणणे आहे. ही भूमिका टिळकांसारखीच आहे जसे टिळक भास्करराव जाधव यांनी साउथबरो कमिशन कडे ओबीसी वर्गांसाठी केलेल्या प्रतिनिधित्वाच्या मागणीला विरोध करतांना म्हणाले होते की तेली तांबोळी व कुणभटांना संसदेत जाऊन काय नांगर चालवायचा आहे ? म्हणजे संसदेत फक्त ब्राम्हणांनीच जावे, ओबीसींनी त्यांची परंपरागत कामेच करावी.

    ReplyDelete
  10. ८.ज्या आधारावर भेद केला जातो त्या आधारावरच आरक्षण दिले जाते.व हेच आरक्षणाच्या संकल्पनेत आहे. इतर देशात काळा गोरा हा भेद आहे म्हणून काळ्या लोकांना त्या देशात आरक्षण/राजकीय संरक्षण दिले गेले आहे. त्याचप्रमाणे भारतात जातीभेद आहे म्हणून जातीच्या आधारावरच आरक्षण आमच्या महापुरूषांनी दिले आहे. आमच्या महापुरूषांना आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची बुद्धी का झाली नाही. आर्थिक आधारावर आरक्षण असावे हा आरक्षण न देण्याचा व उच्च जातीतील लोकांना ओबीसी समाजाचा वाटा पूर्वीप्रमाणे लाटता यावा या साठी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. हे लक्षात ठेवावे.
    ९.ब्राह्मण ही जात ही आहे व वर्णसुद्धा आहे. सर्वच ब्राम्हण वाईत नसतात. आज बहुतेक ब्राम्हण आमच्याशी व्यक्तिगत पातळीवर प्रेमाने, मिळून मिसळून वागतांना दिसतात. परंतु जेव्हा बहुजनांच्या सामाजिक हक्क अधिकाराचा मुद्दा उचलला जातो तेव्हा सर्व सनातनी ब्राम्हण प्राणपणाने त्याचा विरोध करतात अश्यावेळी तथाकथित चांगले (?) ब्राम्हण या सनातनी ब्राम्हणांचा विरोध करण्यास आजपर्यंत पुढे आलेले दिसत नाही. ते त्या सनातनी ब्राम्हणांचे समर्थनच करतांना दिसून येतात. मग अश्या ब्राम्हणांचा चांगुलपणाला काय चाटायचे. ? ब्राम्हणवाद जोपासणारे व ब्राम्हणाचे वर्चस्व टिकवून ठेवण्यास झटणारे ब्राम्हण हे समजदार व जागृत आहेत त्यांचे प्रबोधन करण्याची आम्हाला गरज नाही पण जे बहुजनातील जे लोक ब्राम्हणाची भाषा बोलतात, ब्राम्हणवादाला खतपाणी घालतात त्यांना मात्र प्रबोधनाची गरज आहे असे मला वाटते.
    ११.दलित समाजालाच काय सर्व जातींना आरक्षणाची गरज आहे. आरक्षणात आर्थिक हा घटक विचारात घेतला जात नाही. एखाद्या समाजातील मूठभर लोक श्रीमंत असतील तर त्या समाजाला आरक्षण न देणे हे आरक्षणाच्या संकल्पनेतच नाही. प्रत्येक समाजाचे शासन प्रशासनात प्रतिनिधित्व असणे म्हणजे आरक्षण आहे.
    १३.आरक्षण हे विघातक नाही. आरक्षण हे वंचित समाजासाठी आहे वंचित व्यक्तिसाठी नाही . कुणबींना आरक्षण असते तर त्यांनी आत्महत्या केल्या नसत्या.
    १४.जातीव्यवस्थेखेरीज भारतीय समाज जगू शकत नाही हे सत्य नाही. जातीव्यवस्था ही भारतात इ.स.पू. दुसर्र्या शतकात प्रतिक्रांतीनंतर ब्राम्हणांनी षडयंत्र पुर्वक निर्माण केली आहे. त्याआधी फक्त वर्णव्यवस्था होती. प्रतिक्रांतीपूर्वी भारत हा बुद्धाच्या क्रांतिने वर्णव्यवस्था संपुष्टात येवून बौद्धमय झाला होता. आणि मनुवादी सुपात आहेत हे म्हणने हास्यास्पद आहे. ब्राम्हण वर्ग हा सत्तेवर काबीज झालेला शासक वर्ग आहे. लोकशाहीचे जे चार आधारस्तंभ आहेत ( कार्यपालिका, विधायिका, न्यायपालिका व प्रचार प्रसार माध्यमे) या सर्वांवर ब्राम्हण बनियांचा पूर्णपणे कब्जा आहे. त्यामुळे जातिव्यवस्थेची झळ त्यांना बसणार नाही जो पर्यंत सर्व बहुजन समाज जागृत होऊन संघटित होवून आंदोलन करणार नाही.
    १५.जातीभेद असल्यामुळे व संधीची समानता नसल्याने आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे जातिभेद नष्ट झाल्याशिवाय व सर्वांना संधीची समानता असल्याशिवाय गुणवत्तेच्या आधारावर निकोप स्पर्धा होणे शक्य नाही.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...