Monday, February 28, 2011

कदमांची कुळकथा!

कर्नाटकातुन कदंब राजवंश इ.स. ३५० ते ५२५ पर्यंत राज्य करत होता हे सर्वांना माहितच आहे. त्यांच्या राज्यात दक्षिण महाराष्ट्रही सामील होता. बनवासी नंतर हंगळ आणि गोव्यातही त्यांनी पाय रोवले. या कदंब राजवंशाची उत्पत्ती कशी झाली याची माहिती अनेक शिलालेखांतुन मिळते. शिवशंकराचा स्वेद कदंब व्रुक्षावर पडला व त्यातुन त्रिलोचन कदंब (वा मयुरशर्मा) या आद्य राजपुरुषाचा जन्म झाला अशी पुराकथा येते. जन्मता:च त्याला तीन नेत्र आणि चार बाहु होते असेही ही पुराकथा सांगते. अन्यही काही पुराकथा आहेत, आणि त्याही शिव-पार्वतीपासुनच या वंशाचा जन्म झाला असे सांगतात.

या राजवंशातील मयुरशर्मा कदंबच्या नावामागे "शर्मा" हे पद असल्याने तो ब्राह्मण असला पाहिजे असे काही इतिहासतद्न्य मानतात. महाराष्ट्रातील अजय मित्र शास्त्री आणि वि. भि. कोलतेही ब्राह्मण मुळाचे समर्थक आहेत. पण हाच प्रकार त्यांनी खुद्द सातवाहनांबद्दलही केला आहे आणि ते अत्यंत चुकिचे आणि अनैतिहासिक कसे आहे हे मी अन्यत्र स्पष्ट केले आहे.

मयुरशर्म्यानंतरच्या सर्वच कदंब राजांनी मात्र "वर्मा" हे उपपद घेतले आहे व ते क्षत्रियवाचक आहे. (उदा. मयुरशर्म्याचा पुत्र कंगवर्मा). इतिहासात अनेक क्षत्रिय राजांनीही शर्मा हे उपपद लावल्याचे दिसते त्यामुळे शर्मा-वर्मा यातुन जात-वर्ण शोधणे चुकिचे आहे....तसेच ब्राह्मणाने राजपद धारण केले तरी आपला वर्ण सोडल्याचे एकही उदाहरण इतिहासात मिळत नाही. श्रुंग घराणे या द्रुष्टीने पहावे. थोडक्यात कदंब ब्राह्मण नव्हते...तसेच वर्णाश्रमधर्मानुसार क्षत्रियही नव्हते. ब्राह्मण इतिहासकारांनी इतिहासातील प्रत्येक महत्वाचा राजवंश हा ब्राह्मणच होता हे सिद्ध करण्याच्या नादात अनेक ऐतिहासिक सत्ये दडवली आहेत. त्यांचे म्हनने खरे असते तर आजचे सारे कदम ब्राह्मण असायला हवे होते किंवा काही ब्राह्मणांची आदनावे कदंब/कदम असायला हवी होती. पण तसे चित्र नाही.

कर्नाटकातील हे कदंब राजघराण्याशी आजच्या महाराष्ट्रातील कदमांशी सर्वस्वी पुर्णपणे संबंध जोडता येत नाही, हेही तेवढेच खरे, पण कदंब व्रुक्ष देवक माननार्या समाजातच कदंब राजवंश जन्माला आला, त्या अर्थी कदंब जनसमुहाची व्याप्ती फार मोठी होती हे स्पष्ट दिसते. कदम हे आडनाव "कदंब" या व्रुक्षाशी निगडीत आहे, हे स्पष्ट आहे. कदंब व्रुक्ष हा सिंधु काळापासुन पवित्र मानला गेला आहे. भारतातील अनेक पुरातन मानवी समुदायांचे हा व्रुक्ष देवक असुन तो अति पुजनीय मानला गेला आहे. भारतातील अनेक आडनावे ही देवक प्रथेतुनही निर्माण झाली आहेत हे येथे लक्षात ठेवायला हवे. खुद्द कर्नाटकात कदंबु नावाची एक लढवैय्या जमात आहे.

कदंब देवक असलेल्या, शिवापासुन आपली उत्पत्ती झाली असे मानणार्या मानवी समुदायाने आपले आडनाव "कदम" ठेवणे संयुक्तिकच आहे. पण सारेच कदंब कुलीन कदमच आडनाव लावतात असे नाही तर त्यातही कालौघात बदल घडलेले आहेत. काजळे, कळंब, भसे, हिरे ही काही उदाहरणे आहेत. हेही मुळचे कदंबच आहेत. हे बदल घडण्याची कारणे तत्कालीन समाजस्थितीत शोधावी लागतात.

कदम ही पुरातन काळापासुन एक लढवैय्या जमात राहिलेली आहे. अगदी पानिपत युद्धापर्यंत त्यांचा नावलौकिक कायम राहिलेला आहे. खानदेशातील कदमबांडे हेही याच जनसमुदायातील आहेत.

कदम मंडळी पुर्वी वर्णव्यवस्थेत नव्हती. ती कट्टर शैव असुन तुलजाभवानी, खंडोबा अशा अवैदिक देवतांचे भक्त राहीले आहेत...किंबहुना त्यांची कुळदैवतेही हीच आहेत. कदंब राजवंशातील काही राजांनी अश्वमेध यद्न्य केला आहे हेही खरे आहे, पण तत्कालीन परिस्थितीत राजे ब्राह्मणांसाठी य्द्न्यही करीत, विहारांनाही देनग्या देत आणि जैनांनाही मदत करत. यद्न्य केला म्हणुन त्यांना वैदिक ठरवले तर ते त्याच वेळीस बौद्धही होते आणि जैनही होते असे मान्य करावे लागते. त्यांना क्षत्रियत्व कधीच बहाल केले गेलेले दिसत नाही. (जसे भोसले कुळालाही केले गेले नाही. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वैदिक नव्हे तर पुराणोक्त पद्धतीने झाला होता. संदर्भासाठी पहा ..."गागाभट्टीय" कारण गागाभट्टाने वरकरणी महाराजांना क्षत्रिय मानले असले तरी प्रत्यक्षात त्याची क्रुती ही त्यांना शुद्रच ठरवणारी होती. वेदोक्त राज्याभिषेक हा ऐतरेय ब्राह्मणातील विधींनुसार करावा लागतो...प्रत्यक्षात त्याने व्रात्यस्तोम विधी सोडला तर अन्य विधी पुराणोक्त पद्धतीनेच केले. यावरुन होणारा बोध म्हनजे कदम्ब वंशीयही ब्राह्मण तर सोडाच कधीच क्षत्रीयही मानले गेले नव्हते...आणि त्याचा काहीएक फरक पडत नाही...दैवायत्त कुले जन्म: मदायत्तंच पौरुषम" हेच काय ते खरे.

पुर्वोक्त एका लेखात मी आजचा मराठा समाज हा अनेक वंशांच्या मिश्रणातुन तयार झाला आहे असे म्हटले आहे. कदंब आणि अन्य राजघराण्यात विवाह झाले आहेत हे मी शिंद राजवंशाच्या संदर्भातही दाखवुन दिले आहे.

कदमही मुळचे उत्तरेचे आहेत काय असा प्रष्न (जसा शिंद वंशाच्या संदर्भात विचारला गेला आहे) पडणे स्वाभाविक आहे...पण ते वास्तव नाही. तसे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. पुराणकथा सर्वस्वी आहेत तशा स्वीकारता येत नाहीत. तत्कालीन बव्हंशी सम्राट उत्तरेकडचे असल्याने आपलेही मुळ उत्तरेकडे दाखवण्याच्या नादात ही गफलत झालेली दिसते.

या संदर्भात कोणाकडे अजुन काही उपयुक्त माहिती असल्यास अवश्य पाठवावी ही विनंती.
MOb: 9860991205

16 comments:

  1. इतिहास संशोधनात पुराणकथांपेक्षा शिलालेखांना जास्त महत्व असते. शिलालेखिय पुराव्यांवरून कदंबांचा सर्वात जास्त संबंध जैन धर्माशी येतो. एखाध्या धर्माला आश्रय देणे आणि त्या धर्माचा प्रचार करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक कदंब राजांनी सत्तेच्या जोरावर जैन धर्माचा प्रचार केलेला दिसतो. कदंबांचा आणि बौद्ध धर्माचा कसलाच संबंध नाही. पण त्यांच्या जैनत्वाचे पुरावे मात्र शेकड्यांनी आहेत.

    आजही कर्नाटकातील तुळुनाडु भागात कदंब आडनावाचे जैन मोठ्या संख्येने आहेत. गोव्यातील प्रसिद्ध कदंब ट्रान्सपोर्टचे संस्थापक हेदेखील जैनच.

    मला वाटते की महाराष्ट्रात इतिहासाच अभ्यास एकतर वैदिक दृष्टीने नाहीतर बौद्ध दृष्टीने चालला आहे. त्यामुळे खरा इतिहास लपूनच रहात आहे!

    ReplyDelete
  2. या संशोधनात वरोपंगी माहिती आहे , प्रा . श्री रा.आ .कदम यांचे " भारतीय राजवंश " हे पुस्तक पहा .यामध्ये विस्तृत लेखन केले आहे , कदम्ब वंशाचे क्षत्रियत्व पूर्ण पुराव्यानिशी सिद्ध केले आहे , आणि कर्नाटकात उड़पी प्रांतात कदम आडनावाचे ब्राम्हण आहेत ते स्वताला हवक्य जातीचे ब्राम्हण समजतात अणि मयूर शर्मांचे वंशज , तलागुन्द येथील शिलालेखत मयूर शर्मन चे चरित्र दिले आहे , तो वैदिक होता ,याचा हातात अश्मि आणि दर्भ होते जे आणि त्यानी हातात खडग घेउन प्रतिदन्या ही केली, कदम्ब-कदम हा राजवंश क्षत्रिय आहे हे निर्विवाद सत्य आहे .हे या शिलालेखातुन स्पष्ट होते ,
    शिवाजी महाराजाना राज्याभिषेक वेदोक्त की पुरानोक्ता हा पूर्ण चुकीची माहिती दिसून येते , मुलत राजभिषेक हा क्षत्रियांसाठी असतो ही संहिता पूर्ण वेदोक्त आहे, शुद्रना राजयाभिशेक होत नसल्याने कोणताही पुरानोक्ता मन्त्र तरी वैदिक वाण्डमायत नाही ,
    गोव्याचे कदम्ब राजे हे क्षत्रिय आहेत ,हे त्यांचे राज मुद्रे वरुन समजते , आणि कितीतरी कदम्ब-कदम घरान्यत वैदिक परंपरेनुसर उपनयन संस्कार केला जातो ,
    अमित कदम

    ReplyDelete
    Replies
    1. ,please send u r Contact no

      Delete
    2. अभ्यासपुर्ण माहीती.आवडली सरजी

      Delete
  3. kay ahe mitra amit kadam,
    sanjay sahebana kitihi mahiti purvali tari te aaple mat sodat nahit, ulat jo tyache dat ghashat glto tyachyavaar te wattel te lihitat he me pratyasha anubhavale aahe..

    या संशोधनात वरोपंगी माहिती आहे sarvach likhan asech aahe..
    sanjayji is nourishing anti brahmin-anti maratha views and all his historical writing is based on one thing that all the great historical kings were shudras..
    naturally one question came to my mind that if all the so called shudra king ruled then how the caste system remain and rooted here..
    even the ahinsak( Non-Violence ) Jain kings ruled here AND FOUGHT BATTLES.... but you need to see the history with out any caste and religion views.

    ReplyDelete
    Replies
    1. You have to understand difference between caste system and varna system. Both are different, have nothing to do with varna system. Varna system belongs to vaidik religion and all those who relate with Varna system (no matter whether Vedic religion accepts it or not) confuse themselves. Let Kandamba's decide whether they are Brahmins or Kshatriya's...they then belong to Vedic religion whereas fact is different. If they are Vedic or consider to be Vedic...it is their problem.

      To me most of the kings were Shudra's (Non-Vedic) and as they didn't follow Vedic religion, Vedic rituals were meaningless to them...

      Delete
  4. सोनवणी साहेब..गिरवी गाव,फलटण,सातारा येथील कदम घराण्याची माहिती सांगा.

    ReplyDelete
    Replies
    1. काही लोक हिरवी गावातून कोकणात ताम्हाणे गाव तालुका महाड जिल्हा रायगड येथे गेलेत

      Delete
  5. Kadam s r decedent of the shak kardamak and they should proud of emperor the rudradaman

    ReplyDelete
  6. कदम्ब घराण्यातील शेवटचा राजा हा बौद्ध भिक्षू झाला असावा असे मला वाटते... कारण नंतरच्या काळात बुद्धाच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत..तर बसवेश्व यांच्या लिंगायत धर्माचा स्वीकार कदम्बांनी केलेला आहे..कदम लिंगायत धर्म आचरण करणारे होते.. कदम्ब मातृसत्ताक शाक्तपंथी शैव घराणे होते..शाक्त आणि शैव पंथात वर्ण नव्हते...

    ReplyDelete
    Replies
    1. Matrusattak no by no mean s they were shak kardamak that s why the problem arise whether they were brahman or kshatriya

      Delete
  7. बारामती सुपे येथील कादमांचा इतिहास सांगा
    8369977912 व्हाट्सप

    ReplyDelete
  8. कमी माहीतीच्या आधारे लेखन केलेले आहे.

    ReplyDelete
  9. तुळजापूर चे तसेच आसपास च्या चार पाच गावात कदम आडनाव असणारे भरपूर आहेत. त्यांचे कुलदैवत हे खंडोबा आणि तुळजाभवानी आहे यांचे मूळ कुठले आहे.
    9405135402

    ReplyDelete
  10. अहो अर्धवटराव पूर्ण माहिती काढून लिखाण करत जा..

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...