सातवाहनांवर संशोधन सुरु असता मी नाणी, शिलालेख ते ताम्रपट सध्य अभ्यासत आहे. त्यातुन अनेकदा खुपच रोचक माहिती पुढे येते. काही आडनावांचेही मुळ समोर येत असुन जातीव्यवस्थेबाबतही काही उलगडे होत आहेत. यापैकी "शिंदे" ह्या आडनावाबद्दल:
आपल्याला महारष्ट्रातील बरेच राजवंश माहित नसतात. यापैकीच एक राजवंश म्हनजे "शिंद" राजवंश. या वंशाची सुरुवात सन ३३० च्या आसपास झाली. ते नागवंशी राजघराणे होते व या वंशातील राजे स्वता:स "फणींद्र" असे संबोधन लावत असत. फणींद्र म्हणजे सर्पांचा राजा. या शिंद राजघराण्याचा प्रथम उल्लेख प्रथम चंद्रवल्ली शिलालेखात येतो. सन ८०५ च्या नेसरी ताम्रपटातही येतो. नेसरी हे गाव सातारा जिल्ह्यात आहे. या घराण्याचे उल्लेख/इतिहास वर्णणारे अनेक शिलालेखही विविध ठिकाणी सापडले आहेत. यावरुन कळणारी माहिती अशी:
१. या घराण्याचा आद्य पुरुष अजानुबाहु शिंद असे असुन त्याचा जन्म सेंद्रक प्रदेशातील अहिछ्त्र गावी झाला.(अही म्हनजे नाग). सेंद्रक प्रदेश हा कर्नाटकातील म्हैसुर प्रांतात होता. त्याचे लग्न कदंब वंशातील राजकन्येशी होवुन त्याला तिच्यापासुन ३ मुले झाली. त्यांनीच शिंद राजवट महाराष्ट्रात येवुन सुरू केली.
२. या राजवंशाच्या तीन शाखा झाल्या व त्यांच्या द्न्यात असलेल्या राजधान्या जुन्नर, कर्हाटक (आजचे क-हाड), तसेच सिंदवाडी (बेल्लारी जिल्हा) येथे होत्या.
३. या राजघराण्याने जवळपास ३३० ते इ.स. १००० पर्यंत कधी स्वतंत्र तर कधी राष्ट्रकुटादि बलाढ्य राजांचे मांडलिक म्हणुन सत्ता गाजवली.
४. या राजांच्या ध्वजावर नागचिन्ह असुन ते स्वत:स नागवंशोद्भव म्हनवत.
५. हे सर्वच राजे कट्टर शिवभक्त असुन आपल्या वंशाची सुरुवात शिव आणि सिंधु नदीच्या मिलनातुन झाली असे मानत असत.
६. या शिंद राजांनी महाराष्ट्र ही आपली कर्मभुमी बनवली त्यामुळे बहुसंख्य शिंद महाराष्ट्रात आले असे दिसते.
७. महाराष्ट्रातील सर्वच शिंदे आडनावाची घराणी ही याच शिंद राजवंशाशी निगडीत आहेत असे मानता येते.
असे असले तरी, सर्वच शिंदे एकजातीसमुह म्हणुन राहीलेला दिसत नाही. सध्याचे मराठे, ओ.बी.सी. ते दलितांत शिंदे हे आडनाव आढळते. म्हणजे एकच वंश विविध जातींत वाटला गेल्याचे वरकरणी चित्र दिसते. त्यामागील कारणांचा विचार करणे अगत्याचे आहे कारण त्यामुळे जातीव्यवस्थेत एखाद्या वंशाचे कसे विभाजन घडु शकते हे लक्षात येइल.
१. इ.स. १००० पर्यंत तरी हा राजवंश कोणत्या-ना-कोणत्या स्वरुपात सत्तेत होता याचे पुरावे लेख, ताम्रपट ते शिलालेखांत आहे. सन ३३० ते १००० या काळात शिंद लोकांची जनसंख्या वाढणे अपरिहार्य आहे.
२. सर्वच राजे असु शकत नाहीत, त्यामुळे काही जमीनदार, वतनदार बनले असावेत.
३. कालौघात काही अन्य व्यवसायांत पडल्यामुळे त्या त्या व्यवसायांवरुन त्यांच्या वेगळ्या जाती बनणे सहज स्वाभाविक आहे.
४. सामाजिक कारणांमुळे, तत्कालीन रीतिरिवाज व धार्मिक कारणांमुळे जे जातीबहिष्क्रुत झाले त्यांना अपरिहार्यपणे शुद्रातिशुद्रात ढकलुन अस्प्रुष्य बनवल्यामुळे हीन व्यवसाय स्वीकारणे भाग पडल्याचे दिसते.
५. परंतु सारेच "शिंदे" मुळच्या एकाच वंशाशी निगडीत आहेत. नागवंशीय आहेत. शिंद वरुनच शिंदे हे नाव रुढ झाले हे उघड आहे कारण अन्य कोणत्याही प्रकारे या आडनावाची उपपत्ती लागत नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सिंधू संस्कृतीची मालकी!
सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
Please have a look at http://jainology.blogspot.com/2009/11/sindia-clan-and-its-jain-origin.html for relted information.
ReplyDeleteशिंदे हे आडनाव आणि सिंधी समाज ह्यांचा काही संबंध आहे का..?? रा.ची.ढेरे ह्यांनी ह्यांच्या तील संबंधातील दुवा म्हणून भाषेवर संशोधन केले आहे जसे.."चांगा भला" आणि "चांग भले" ..कदंब आणि शिंद ह्यांच्यातील संबंधावरही थोडा प्रकाश टाकावा..कादंबंच्या इतिहासाचा अभ्यास करताना कुठली साधने लागतील ते हि थोडक्यात मांडल्यास कदंब इतिहासाचा अभ्यास मला सुरु करता येईल...
ReplyDeleteछान माहिती उपलब्ध्ा करुन दिली. मनापासून आभारी आहे.
ReplyDeleteछान माहिती उपलब्ध्ा करुन दिली. मनापासून आभारी आहे.
ReplyDeleteउत्तम माहिती. कर्नाटकात जे शिंदे आढळतात ते याच वंशाचे आहेत का..आणि या शिंदेंचा आजचे जे ग्वाल्हेरचे शिंदे आहेत, त्यांच्याशी कसा, काही संबंध आहे का?
ReplyDeleteMarthit paschim maharashtraat ek mhan purvi pasun bolali jaate. "Jyala mahit naahi aapli kuli(Kul) tyani dharavi shindyanchi muli".
ReplyDeleteएकनाथ शिंदे कोणत्या जातीचे आहेत
ReplyDelete