Saturday, March 5, 2011

वैदिक धर्म म्हणजे नेमके काय?

सनातन वैदिक धर्म म्हनजेच "हिंदु" धर्म आहे अशी सर्वसाधारण सामाजिक मान्यता आहे, पण ते वास्तव नाही. खरे काय आहे हे समजावुन घेण्यासाठी मुळात वैदिक धर्म म्हणजे नेमके काय आहे हे माहीत असायला हवे. कोणताही धर्म वेगळा आहे हे ओळखण्याचे साधन म्हनजे:

१. मान्य धर्मग्रंथ
२. धार्मिक कर्मकांड
३. धार्मिक श्रद्धा
४. परलोकजीवनाविशयक कल्पना
५. मान्य जीवन मुल्ये
६. संस्थापक.

वदिक धर्माची वरील मुद्द्यांवर चर्चा करुयात.

१. ऋग्वेद हा वैदिक धर्मियांचा महत्वाचा धर्मग्रंथ आहे. या वेदात यद्न्यप्रसंगी म्हणावयाचे मंत्र आहेत. या वेदात काही सुक्तात इतिहासविषयकही अनेक ऋचा आहेत. सामवेद हा स्वतंत्र वेद नसुन ऋग्वेदातील ऋचा कशा गायच्या याचे दिग्दर्शन करणारा वेद आहे तर यजुर्वेद हा काही विशिश्ट यद्न्यांचे सांगोपांग वर्णन करणारा वेद आहे. अथर्ववेद हा चवथा वेद म्हणुन इ.स.पु. च्या ४थ्या शतकापर्यंत मान्य नव्हता.

२. वैदिक धर्माचा उदय सरस्वती नदीच्या काठी राज्य करणार्या सुदास राजाच्या कारकिर्दीत झाला. त्याचा मुख्य प्रवर्तक म्हणजे वशिश्ठ होय. त्याचा काळ हा सरासरी इ.स.पु. २५०० वर्ष असा अंदाजिला गेला आहे.

३. या वेदाची एकुण दहा मंडले असुन तो १० ऋशिकुळांतील ३५०च्या वर व्यक्तिंनी रचला आहे. ऋग्वेद रचना ही जवळपास इ.स.पु. १७५० पर्यंत सुरु होती. यात एकुण १०१२८ ऋचा आहेत.

४. यद्न्य हे वैदिक धर्माचे महत्वाचे कर्मकांड असुन यद्न्यात विविध द्रव्ये, मांस यांची आहुती देवुन इंद्र, मित्र, वरुण, नासत्यादि शेकडो देवतांना आवाहन करत त्यांच्याकडुन धन, पशुधन, दिर्घायुष्य, आरोग्यादिची मागणी करणार्या ऋचा म्हटल्या जातात. अनेक यद्न्य तर १२-१२ वर्ष चालणारे असत.

५. वैदिक धर्मियांच्या देवता अमर नसुन त्यांचे आयुष्य मानवापेक्षा खुप मोठे असते ही श्रद्धा. म्हणजे इंद्रसुद्ध मर्त्य्यच, कारण अमरतेची संकल्पना वैदिक धर्मात नाही. वैदिक देवता या बव्हंशी निसर्गाची प्रतीके आहेत. उदा. इंद्र हा पर्जन्याचे तर मित्र हा सुर्याचे प्रतीक आहे.

६. वैदिक धर्मात मोक्षाची संकल्पना नाही. तसेच संन्यास मान्य नाही. दीर्घायुरोग्य लाभो हीच अपेक्षा असंख्य ऋचांमधुन केली आहे. संततीहीण मनुष्य वैदिक समाजाला मान्य नव्हता...म्हणुनच संन्यासही मान्य नव्हता.

७. आश्रमव्यवस्था (ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ व संन्यास) ऋग्वेदात नाही. ती प्रथा वैदिक नाही. (असुर प्रल्हादाचा पुत्र कपिल मुनीने आश्रम व्यवस्था प्रचलित केली. तीचा वैदिक धर्माशी संबंध नाही.

८. यद्न्यसंस्थेभोवतीच सारे वैदिक कर्मकांड फिरते.

९. वैदिक धर्मात मुर्ती वा मुर्तीपुजेला स्थान नाही. "पुजा" हा शब्द द्राविड असुन त्याचा अर्थ होतो "माखणे", म्हणजे जल, तेल, सिंदुर वा प्रसंगी रक्ताने पुज्य मुर्तीला माखणे म्हनजे पुजा. पुढे तिचा अर्थ अधिक व्यापक झाला, पण पुजा ही वैदिक नाही.

१०. सोमरस प्राशण हा महत्वाचा धार्मिक विधी होय. ऋग्वेदाचे पहिले मंडल तर पुरेपुर सोमसुक्तांनी भरलेले आहे. सोम म्हनजे इफेड्रा ही नशा आननारी वनस्पती होते असे धर्मानंद कोसंबी यांनी म्हटले आहे. सोम म्हणजे भांगही असावी असेही एक मत आहे. सोमपान करुन नशा होत असे एवढे मात्र खरे.

११. वैदिक समाज हा पित्रुसत्ताक पद्धतीचा होता. स्त्रींयांना यद्न्यात भाग घेण्याचा अधिकार नव्हता.

१२. वैदिक धर्मात वर्णांतर सहज शक्य होते. म्हनजे क्षत्रिय ब्रह्मकर्म करु शके तर वैश्यही क्षत्र कर्म करु शके. याचे महत्वाचे कारण म्हणजे "ब्रम्ह" या शब्दाची ऋग्वैदिक व्याख्या. ऋग्वेदानुसार "ब्रह्म" म्हणजे "मंत्र". जोही मंत्र रचतो तो ब्राह्मण अशी अत्यंत सुट्सुटीत व्याख्या आहे ही.

१३. अहिंसेच्या व अपरिग्रहाच्या तत्वद्न्यानाला वैदिक धर्माची मान्यता नाही. मात्रुगमन, गुरुपत्नीगमन, भगिनीगमन ही निषिद्ध्ये आहेत. परदारागमनाबद्दल मौन आहे. सत्याची महती आहे.

१४. संस्कार हे वैदिक धर्माचे मुख्य अंग आहे. गौतम धर्मसुत्रानुसार ४८ संस्कार दिले असले तरी ऋग्वेदात फक्त ३ संस्कार आहेत. पुढे वैदिक धर्मात फक्त १६ संस्कार महत्वाचे मानले जावु लागले ते असे-
गर्भादान, पुंसवन, सीमंतोन्न्यन, जातकर्म, नामकरण, निष्क्रम, अन्नप्राशन, चुडाकर्म, कर्णवेध, उपनयन, वेदारंभ, केशांत, समावर्तन, विवाह, विवाहाग्नी स्वीकार व दक्षिणाग्नी, गार्हपत्य आणि आहवनीय या ३ अग्नींचा संग्रह...म्हणजे अग्निहोत्र.

१५. कुलदैवत/देवता वैदिक धर्माला मान्य नाहीत. शिव, पार्वती, गणपती, मारुती (याचे वैदिक नाव व्रुषाकपी) वा त्या परिवारातील देवता अवैदिक असुन यद्न्यप्रसंगी या देवतांनी विघ्न आणु नयेत अशा अनेक प्रार्थना ऋग्वेदातच आहेत. शिवास "शिस्नदेव" असे हेनवण्यात आले असुन त्याला "स्मरारी" (म्हणजे यद्न्याचा विध्वंसक) अशी संद्न्या आहे. विनायक तथा गणपतीस तर यद्न्यात विघ्न आणु नये म्हणुन "विनायक शांती" प्रथम करुन त्याला दुर जाण्याच्या प्रर्थना आहेत. त्यामुळे वैदिक धर्मियांसाठी विनायक हा "विघ्नकर्ता" होता...विघ्नहर्ता नव्हे. वैदिक धर्मात नसलेल्यांना "अयाजक" (यद्न्य न करणारे) असे संबोधुन त्यांची हेटालणी केली आहे. तसेच व्बैखानस, समन, यती, संन्यासी अशा अवैदिक पंथीयांचीही निंदा केली आहे.

१६. या धर्माचा मुळ संस्थापक वशिष्ठ ऋषि असुन त्याच्या सोबतची अन्य ९ ऋषिकुले सहसंस्थापक मानता येतात. ही सारी ऋषिकुले सुदासाच्या काळात होती व जोवर सुदासाचा वंश चालु राहीला तोवर ऋग्वेद व अन्य वेदांची रचना होत राहीली. सरासरी सनपुर्वे १७५० मद्धे ही रचना थांबली.

वरील माहिती अत्यंत थोडक्यात असुन महत्वाचे मुद्दे तेवढे दिले आहेत. सखोल माहिती ज्यांस हवी आहे त्यांनी मुळात वेद वाचलेलेच बरे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांचे वैदिक धर्माविषयीचे पुस्तकही वाचावे.

त्यामुळे वैदिक धर्म म्हनजेच हिंदु धर्म अशी जी काही फुटकळ व्याख्या केली जाते ती मान्य होत नाही आणि त्यामुळेच लो. टिळक, सावरकर, गोळवलकरगुरुजी इ. प्रणित व्याख्या स्वता:ला सनातनी समजणार्यांनाच मान्य नाहीत हे येथे लक्षात घेतले पाहिजे. वरील विवेचन पहाता वैदिक धर्म हा स्वतंत्र धर्म आहे हे स्पष्ट होते. या धर्माप्रमाणे जेही आचरण करत असतील, कर्मकांडे करत असतील त्यांचा धर्म नि:संशय "वैदिक" आहे. हा धर्म "धर्म" म्हणुन सर्व बाबींची पुर्तता करतो. फक्त तो आचरणात आननारे कोण आहेत आणि इंद्रदि वैदिक देवतांची आराधना करणारे कोण आहेत हेही क्रुपया स्पष्ट करावे. इंद्रादि देवतांची मंदिरे नाहीत कारण मुर्तीपुजा मुळात वैदिक धर्माला मान्य नाही हे मी आधीच स्पष्ट केले आहे.

3 comments:

 1. brahman 10 A.D.paryant mansahar sevan karit aslyche p. w. Kane yanche mat ahe. shraman sanskriti mananare lok mansahar varjya manat asat. te hinsechya virodhat hote.

  ReplyDelete
 2. एके ठिकाणी माझ्या वाचनात आले आहे कि गणपती, हनुमान आणि तत्सम पशु-मानव ह्या यक्ष योनीतील देवता/व्यक्ती मानल्या गेल्या आहेत. अशा खुपश्या आकृत्या दक्षिणेतील देवळांवर कोरलेल्या दिसता. अर्थात आता आपल्याला त्यांची विशेष माहिती राहिली नाही. अजून महाभारतात कृष्णाने गोमांस भक्षण केल्याचाही उल्लेख असल्याचे वाचनात आहे. आपल्या लग्न पद्धतीमध्ये गो-बळी म्हणून एक प्रकार असतो असे वाटते ज्यामध्ये आता प्रतीकात्मरित्या खर्या गायीचा नाही पण कणिकेच्या गाईचा बळी देतात असे पण वाचले आहे पण माझ्या लग्नात मी तर असे बघितले नाही! असो लेख अत्युत्कृष्ट आहे खूप सारी नवीन माहिती मिळाली. मी तुमच ब्लोग वेळ मिळेल तसा वाचत असतो! धन्यवाद!!

  ReplyDelete
 3. कपिल हे वैष्णव प्रलाधाचे पुत्र होते असा जावई शोध आपण कुठून लावला ? कपिल म्हणजे दत्ताचे मामा , प्रल्हादाचा संबंध तरी .
  ________
  वैदिक धर्मात मुर्ती वा मुर्तीपुजेला स्थान नाही. "पुजा" हा शब्द द्राविड असुन त्याचा अर्थ होतो "माखणे", म्हणजे जल, तेल, सिंदुर वा प्रसंगी रक्ताने पुज्य मुर्तीला माखणे म्हनजे पुजा.
  >> तुम्ही कधी एका यज्ञाच अनुस्थान वाचलंय का ? भूमी-पूजन सगळ्यात पहिले होत . तिथ माखत नाहीत ?
  ________
  अहिंसेच्या व अपरिग्रहाच्या तत्वद्न्यानाला वैदिक धर्माची मान्यता नाही
  >>> पशुन्पाही पशूंच रक्षण करा अशी वेदात आज्ञा आहे . वेदांगात कित्तेकदा चोर्य कर्म टाळा म्हणून आलेले आहे तुम्हाला नुसते वेदच पाहिजे असेल तर चोरी हे दस्सू लोकांच कर्म आहे अशी कित्तेक विधान आहेत . आता मी तुम्हाला म्हणालो कि मूर्ख लोक माती खातात म्हणजे माती खावू नये असा साधा अर्थ आहे .
  _________
  "स्मरारी" (म्हणजे यद्न्याचा विध्वंसक)
  >>> शिवला सुहोत्र हे सुद्धा नाव आहे , इथ दक्ष यज्ञा च्या घटने मुल ते विशेषण आलाय त्याचा सगळ्या याग्यांशी कश्याला संबंध जोद्ताय ?
  __________
  विनायक तथा गणपतीस तर यद्न्यात विघ्न आणु नये म्हणुन "विनायक शांती" प्रथम करुन त्याला दुर जाण्याच्या प्रर्थना आहेत
  >>> गणपतीचा आणि वेदाचा संबंध तरी ? वेदात गणपतीचा उल्लेख सुद्धा नाही . तर दूर जा म्हणायचा संबंध काय ? वेदात गणपती शब्द हा बृहस्पती आणि इंद्र यांच्या बाबतीत वापरला गेलेला आहे .
  ___________
  वरील विवेचन पहाता वैदिक धर्म हा स्वतंत्र धर्म आहे हे स्पष्ट होते
  >>> भावू मग तर अशे सगळेच धर्म वेगळे करावे लागतील , शैव , वैष्णव , शकत ,आणि हि बाकीची सगळी वेदांनाच प्रमाण मानतात .त्या मुल आज जे वेदांना प्रमाण मानतात ते हिंदू असा प्रघात पडलेला आहे . नाही मानायचं त्यांनी स्वत हिंदू धर्मापासून वेगळ जाव ते शिव्या-ड्रामा वाले गेलेले आहेत तस .
  धर्म ची व्याख्या सनातन धर्मात काय आहे ? धारण करण्या सारखे गुण ते धर्म . बाकी वैदिक, शकत , वैष्णव हे सारे पंथ आहेत . उगीच काय द्वेष पसरवून हे वेगळे व्हा , ते वेगळे व्हा असल्या गोष्टी खालच्या पातळीच्या लोकांनी कराव्यात तुमच ज्ञान छान आहे , आभ्यास करताय तुम्हाला ते शोभत नाही .

  ......आर्य हरीतेजम

  ReplyDelete