Thursday, May 19, 2011

विद्रोहींनी गुढीपाडवा, दिवाळी या सणांना विरोध करू नये

http://www.loksatta.com/daily/20090601/lsv17.htm


विद्रोहींनी गुढीपाडवा, दिवाळी या सणांना विरोध करू नये’
सातारा, ३१ मे/प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीचा ७५ टक्के भाग वैदिक परंपरेने बळकावून ठेवला आहे. ही ब्राह्मणी वैदिकी

पुटे दूर करून पुनर्माडणी करण्याची गरज आहे. विद्रोहींनी उतावीळपणे, उथळपणे सगळेच नाकारण्याच्या उत्साहात गुढीपाडवा, दिवाळी सणाला विरोध करू नये, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.
येथे पार पडलेल्या सहाव्या सत्यशोधक साहित्य संमेलनात डॉ. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोकसाहित्य, संतसाहित्य व सत्यशोधकी साहित्यातील विद्रोही जाणिवा’ या विषयावर परिसंवाद झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, की संयम, विवेकाने मूळ भूमिका समजावून न घेता विरोध करीत राहिल्यास आपल्याच माणसापासून तुटण्याची वेळ येईल. केरळमध्ये ‘ओणम’ सण साजरा होतो. तसाच आपल्याकडे दिवाळी सण आहे. त्यानंतर वैदिकांची एक महिन्यानंतर देवदिवाळी येते. दिवाळी हा बहुजनांचा सण आहे.
भारतीय संदर्भात विद्रोहाची संकल्पना सूत्ररूपाने स्पष्ट करताना डॉ. साळुंखे म्हणाले, की अन्याय शोषण करणाऱ्या घटकांना व प्रवृत्तींना विरोध हा विद्रोह आहे. वेद प्रामाण्याला विरोध करून चिकित्सा केल्याशिवाय व योग्य असल्याची खात्री पटल्याशिवाय काहीही स्वीकारणार नाही. फुलण्यापासून कुणाला वंचित ठेवणार नाही. ज्ञान, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा याचा अधिकार नव्हता त्याविरुद्ध विद्रोह करून समान संधीसाठी आग्रह. मन, भावना शुद्ध ते खरे सोवळेपण समजून पुण्यप्राप्ती, मोक्ष, कर्मकांडांचा भाग अन्यायाचा समजून त्यास विरोध, स्त्री-पुरुष विषमतेला विरोध व नैतिकतेचे नियम दोघांबाबत समान केले पाहिजेत, असा स्त्री-पुरुष समतेचा आग्रह म्हणजे विद्रोह, संत तुकाराम व गाडगेमहाराज यांच्याप्रमाणेच संत नामदेव, ज्ञानेश्वर, कबीर, महानुभाव चक्रधर स्वामी, म. फुले यांनी केवढा मोठा विद्रोह केला आहे हे समजून घेतले पाहिजे, असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
लोकसाहित्यातील विद्रोही जाणिवा या विषयाची मांडणी करताना डॉ. कृष्णा इंगवले म्हणाले, की गुढीपाडवा हा मातृसत्ताक पद्धतीचा सण आहे. गुढी स्त्रीच्या गौरवाचे प्रतीक आहे, तर होळी हे यज्ञाचे विडंबन आहे.
कान्होपात्राची वेदना
‘नारी देवकरी तू जागरी, देवळाच्या मागे कान्होपात्रा भोगले’ ही ओवी म्हणजे कान्होपात्राची वेदनाच प्रकट झाली आहे. कान्होपात्राला भोगल्याचे बडव्यांचे पाप लपवण्यासाठीच तिचे मंदिर उभारण्यात आले असल्याचे डॉ. कृष्णा इंगवले यांनी सांगितले.
‘संतसाहित्यातील विद्रोही जाणिवा’ या विषयाची मांडणी डॉ. अरुण शिंदे यांनी केली. ते म्हणाले, सत्यशोधकी अन्वेषण वृत्ती स्वीकारली असती तर मराठी साहित्याने उंची गाठली असती. सत्यशोधकी साहित्य वंचित शोषित घटकाला आत्मभान व प्रेरणा देणारे आहे ते आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जवळचे आहे.
संजय सोनवणी म्हणाले, की पंढरपूरचे विठ्ठल दैवत विद्रोहाचे प्रतीक आहे. ते वैदिकांनी बळकावले आहे. समतेचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या संतांना समाजाने त्यांच्या त्यांच्या जातीत बंदिस्त करण्यात आले आहे.
‘सत्यशोधकी साहित्य परिवर्तनास दिशा देणारे’
सत्यशोधकी साहित्यच समग्र ग्रामीण परिवर्तनास दिशा देईल, असे प्रतिपादन प्रा. प्रवीण चव्हाण यांनी केले.
‘सत्यशोधकी साहित्यातील ग्रामीण परिवर्तनाचा विचार’ या विषयावरील परिसंवाद प्रा. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी ते बोलत होते. सतीश जामोदकर, डॉ. छायाताई पोवार यांनी परिसंवादात भाग घेतला.
प्रा. प्रवीण चव्हाण म्हणाले, सत्यशोधक चळवळीने काँग्रेस पक्षाला ग्रामीण पाया मिळवून दिला. सत्यशोधकी सौंदर्यशास्त्राची परखड चिकित्सा करण्याची गरज आहे. ग्रामीण परिवर्तनासाठी झालेला भौतिक संघर्ष या चळवळीने केला आहे. क्षत्रियत्वाच्या धारणांची मर्यादा या चळवळीवर येतेय का? याचा विचार झाला पाहिजे. स्त्रीला, श्रमाला प्रतिष्ठा, सत्याला सापेक्ष असे समग्र परिवर्तनाची दिशा सत्यशोधकी साहित्य देईल.
प्रा. जी. ए. उगले यांची प्रकट मुलाखत डॉ. रावसाहेब ढवळे, डॉ. गजानन जाधव यांनी घेतली.

5 comments:

  1. संजय,
    आपल्या या लेखनावर टिपण्णी करताना समजा , समजा कशाला , मीच स्पष्ट म्हणतो आहे की ,
    आपले आरक्षणाबद्दल काय मत आहे ?-तुम्ही आरक्षणाचे समर्थक आहात का नाही असे तुम्हाला विचारले होते !
    त्याच प्रकारे मी आपणास विचारतो की , बडव्यांनी पंढरपुरचे देऊळ ताब्यात घेतले आहे ना ? आणि ते वैदिक आहेत
    म्हणून त्याला आपला विरोध आहे ना ?,तर मग समग्र विद्रोही लोकांना घेऊन एकतर ते मंदिर ताब्यात घ्या,त्या विठोबाला तुमचा निळा रंग फासा -
    त्याच्या डाव्या उजव्या बाजूला समतेचे प्रतिक असे फुले आणि आंबेडकरचे शंभर फुटी पुतळे उभे करा !
    त्याच्या शेजारी जागा मिळाली तर ,अजून कुणीही चालेल -फक्त जानवे नको ! तेवढे मात्र लक्षात असू द्या !
    किंवा त्या " पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा " असलेल्या पांडुरंगावर बहिष्कार टाका .किंवा पंढरपुरातच किंवा
    इतरत्र नवीन मंदिर उभारून या बडव्यांच्या विठ्ठलाला वाळीत टाका ,
    त्यांची रोजीरोटी बंद करा , त्यांचा धंदा बंद करा -
    संपला प्रश्न !
    दगडात देव नसतो हे तुम्हालापण माहित आहे ना ,मग त्या बडव्यांच्या नावाने शंख का करत असता ?
    त्या हिंदू धर्माच्या नावाने का खडे फोडता ?-तो शिवधर्म तुमचा सध्याचा लेटेस्ट धर्म आहे न ? त्याला फॉलो करा - मग काय तर !
    हवे तर अजून एखादा नवीन धर्म स्थापन करायला ही विद्रोही लोकांना उत्तम संधी आहे - इतकी उत्तम परिस्थिती आहे -
    अगदी त्या बाबा आंबेडकराची आठवण येईल इतकी -
    तुम्ही धर्मांतर करा - हिंदू राहू नका - तुमची मते फारच वरवरची आहेत.
    तुम्ही थोतांड तर नाही न असे वाटू लागते !
    अहो तुम्हाला साधा प्रश्न विचारला होता तर ते उत्तर सुद्धा तुम्ही देत नाही.
    आठवा हवे तर !
    कोल्हापूर च्या महालक्ष्मी चा प्रसाद तयार करण्या बाबतसाठी स्त्रियांना बंदी - या बाबतीत आपले मत विचारले होते तर तुम्ही गप्प !
    विटाळ वगैरे ची गोष्ट चालू होती त्या वेळेस तुम्हाला एक प्रश्न विचारला होता ,
    आपण शब्दांचे बुडबुडे करणाऱ्या लहान मुला इतके तरी समंजस आहात असे समजत होतो .मूळ प्रश्न समोर ठेवला की तुम्ही पसार !.उत्तरच देत नाही .

    आरक्षण ,स्त्री मुक्ती बद्दल ऊठ सूट स्वैर बडबड करायची मुभा घेताना आपण ठाम काहीच मत प्रदर्शन करत नाही.
    एकदम मनू , आर्य , वेद , वैदिक ,असे काहीतरी बडबडत सुटायचे !
    तुम्ही केरळ मधल्या ओणम चा उल्लेख केला आहे तो सन तिकडे सर्व आनंदाने साजरा करतात.अगदी ख्रिस्चन सुद्धा..

    मग इथेच महाराष्ट्रातच तुम्हाला काय अडचण आहे.केरळमध्ये तर किती धार्मिकतेने वागतात-एकदम जुन्या जमान्यातले कर्मठ !
    पंढरपूरला गेल्यावर मी स्वतः -मला एका बडव्याने पैसे मागितल्यावर -इतके झणझणीत बोललो होतो कि त्याला त्याच्या मागच्या सात पिढ्या आठवल्या असतील !
    खरेतर त्या पांडुरंगापुढे आपण उभे ठाकलो की आपण आपले राहातच नाही , इतके त्याचे गोजिरे रूप आहे . आणि तुम्ही कसली ही माकड चेष्टा करत बसता ! .
    अहो विरघळून जातात -देहभान हरपते तेथे - फक्त तो आणि आपण ! आपलाची वाद आपणाशी -असा तो संवाद असतो !
    अशी भडक लेखणी किंवा भाषणबाजी ही टाळया मिळवून देण्यासाठी असते नाही का ?
    तुमच्या अंगात जातीयता किती ठासून भरल्ये त्याचे हा लेख म्हणजे उत्तम उदाहरण आहे ! हा तुम्ही नक्कीच लिहिला नाही बर का संजयजी ! माझी खात्री आहे !

    ReplyDelete
  2. भारतभर गुढी का उभारली जात नाही ? महाराष्ट्रातच का ?

    हिंदू धर्मात तांब्या (कलश) शुभ कोणता ?उलटा का सरळ ?
    त्यात कडूलीम्बाची पाने का लावली आहेत ?
    गुढीला पालथा तांब्या शुभ कसा ?
    हिंदू धर्मात पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हा पालथा तांब्या शुभ कसा ?

    केलाय का कधी विचार तुम्ही ? ब्राम्हण आम्हांला गुडीपाढवा सण साजरा करण्यास का लावतो ?
    या मध्ये ही एक षडयंत्र आहे.

    याच दिवशी छत्रपती वीर संभाजी राजे
    यांची मनुस्मर्ती कायद्यानुसार (मनुस्मृती ८ वा अध्याय १२५ वा श्लोक )
    ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हत्या करण्यातआली.
    त्यांचे मुंडके शरीरापासून छाटून भाल्याच्या टोकावर ठेऊन
    मिरवणूक काढण्यात आली.
    ब्राम्हणांना आनंदाला सिमाच उरली नाही.
    एकमेकांचे तोंड गोड करत साखर वाटली कारण
    हा मराठा बहुजनांचा राजा संपवण्यात
    आला होता १६८९ च्या अगोदर कुठे
    हि अशी गुडी उभारल्या गेली नाही .
    संभाजी महाराजांना मारून त्यांचे मुंडके
    भाल्याला लावण्यात आले आहे. याचाच अर्थ
    असा कि तो दिवस तुमचा अशुभ आहे. म्हणून
    गुडीला कलश उलटा लावलेला असतो.

    ब्राम्हणांना असे
    सांगायचे आहे कि तुमच्या आई बहिणीची इज्जत
    आमच्या हातात आहे म्हणून
    गुडीला साडीचोळी लावलेली असते.
    आम्ही मराठा बहुजनांनी त्या दिवशी कडुलिंबाचा पाल
    तोंडात घेऊन कचाकचा चावला आणि आम्ही थुकलोत
    कारण आमचा राजा मारला गेला होता. म्हणून
    कडुलिंबाचा पाला गुडी ला लावलेला असतो. हे सगळे
    जगाला कळावे म्हणून गुडी घराला उंच बांधतात
    कि तुमच्या राज्याला आम्ही मारून, तुमच्या आई
    बहिणीची इज्जत आमच्या हातात आहे हे
    ब्राम्हणांना दर्शवायचे आहे.

    पण...
    आमचे आई वडील सांगतात कि "हा हिंदूंचा नव वर्षदिन
    आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम रावणाचा वध करून
    अयोध्येत
    आले होते . त्यामुळे सर्वांनी आनंदाने
    गुढ्या उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण
    गुढ्या उभारतो."
    मग उत्तर भारतात हा सण असा का साजरा होत नाही. अयोध्येत गुढी का उभारली जात नाही.

    किती मोठे षड्यंत्र ज्या दिवशी आमच्या घरावर
    गुढ्या तुमच्या राज्याला मारून, तुमच्या आई
    बहिणीची इज्जत ब्राम्हणांच्या हातात
    द्याची का ?

    तुम्हीच ठरवा गुडी उभारायची कि नाही ?

    साभार: सुदर्शन दंडनाईक

    ReplyDelete
  3. भारतभर गुढी का उभारली जात नाही ? महाराष्ट्रातच का ?

    हिंदू धर्मात तांब्या (कलश) शुभ कोणता ?उलटा का सरळ ?
    त्यात कडूलीम्बाची पाने का लावली आहेत ?
    गुढीला पालथा तांब्या शुभ कसा ?
    हिंदू धर्मात पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हा पालथा तांब्या शुभ कसा ?

    केलाय का कधी विचार तुम्ही ? ब्राम्हण आम्हांला गुडीपाढवा सण साजरा करण्यास का लावतो ?
    या मध्ये ही एक षडयंत्र आहे.

    याच दिवशी छत्रपती वीर संभाजी राजे
    यांची मनुस्मर्ती कायद्यानुसार (मनुस्मृती ८ वा अध्याय १२५ वा श्लोक )
    ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हत्या करण्यातआली.
    त्यांचे मुंडके शरीरापासून छाटून भाल्याच्या टोकावर ठेऊन
    मिरवणूक काढण्यात आली.
    ब्राम्हणांना आनंदाला सिमाच उरली नाही.
    एकमेकांचे तोंड गोड करत साखर वाटली कारण
    हा मराठा बहुजनांचा राजा संपवण्यात
    आला होता १६८९ च्या अगोदर कुठे
    हि अशी गुडी उभारल्या गेली नाही .
    संभाजी महाराजांना मारून त्यांचे मुंडके
    भाल्याला लावण्यात आले आहे. याचाच अर्थ
    असा कि तो दिवस तुमचा अशुभ आहे. म्हणून
    गुडीला कलश उलटा लावलेला असतो.

    ब्राम्हणांना असे
    सांगायचे आहे कि तुमच्या आई बहिणीची इज्जत
    आमच्या हातात आहे म्हणून
    गुडीला साडीचोळी लावलेली असते.
    आम्ही मराठा बहुजनांनी त्या दिवशी कडुलिंबाचा पाल
    तोंडात घेऊन कचाकचा चावला आणि आम्ही थुकलोत
    कारण आमचा राजा मारला गेला होता. म्हणून
    कडुलिंबाचा पाला गुडी ला लावलेला असतो. हे सगळे
    जगाला कळावे म्हणून गुडी घराला उंच बांधतात
    कि तुमच्या राज्याला आम्ही मारून, तुमच्या आई
    बहिणीची इज्जत आमच्या हातात आहे हे
    ब्राम्हणांना दर्शवायचे आहे.

    पण...
    आमचे आई वडील सांगतात कि "हा हिंदूंचा नव वर्षदिन
    आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम रावणाचा वध करून
    अयोध्येत
    आले होते . त्यामुळे सर्वांनी आनंदाने
    गुढ्या उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण
    गुढ्या उभारतो."
    मग उत्तर भारतात हा सण असा का साजरा होत नाही. अयोध्येत गुढी का उभारली जात नाही.

    किती मोठे षड्यंत्र ज्या दिवशी आमच्या घरावर
    गुढ्या तुमच्या राज्याला मारून, तुमच्या आई
    बहिणीची इज्जत ब्राम्हणांच्या हातात
    द्याची का ?

    तुम्हीच ठरवा गुडी उभारायची कि नाही ?

    साभार: सुदर्शन दंडनाईक

    ReplyDelete
    Replies
    1. गुढीपाडव्याचा संबंध संभाजी महाराजांच्या हत्येशी जोडणे अत्यंत चुकीचे आहे. काही लोक पालथा तांब्या गुढीवर का ठेवतात हे विचारतात...त्यांच्या माहितीसाठी....पुर्वी गुढीवर तांब्या किंवा कलश नव्हे तर "गडू" (गडवा) नांवाचे जाड पितळाचे पात्र ठेवले जात असे. आम्हीही लहाणपणी गडूच ठेवत असू. पण गेल्या ३०-४० वर्षात गडुचे उत्पादन थांबले आहे व त्याची जागा स्टेनलेस स्टीलच्या पात्रांनी घेतलेली आहे. दुसरे असे कि गुढी उभारण्याची प्रथा पुरातन आहे. व्यक्तिगत आनंदाच्या प्रसंगीही लोक आपल्या घरावर ती वार्ता घोषित करण्यासाठी गुढी उभारत असत. वस्त्र, आणि डहाळ्या काठीच्या टोकावर लावल्यावर आधार आणि शोभा वाढवणे एवढाच हेतू गडु (आता तांब्या) ठेवण्यामागे आहे. त्यात काहीतरी चुकीचा अर्थ शोधत बसणे अनैतिहासिक आहे.

      ब्राह्मणांच्या सांगण्यावरून औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली हे तर कल्पोपकल्पित द्वेषमुलक इतिहास-विकृतीकरणाचे उत्तम उदाहरण आहे. औरंगजेब ब्राह्मणांचे ऐकून शिक्षा देतो हा औरंगजेबाचा अपमान आहे तर ब्राह्मण खरेच एवढे शक्तीशाली होते हे दाखवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न आहे. यातून आपण शंभुराजांचाही नकळत अवमान करत आहोत याचे भान ठेवायला पाहिजे!

      गुढीपाडव्याचा आणि रामाचा काही संबंध नाही. गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानावर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ हा दिवस साजरा होतो आणि तो जेथे सातवाहनांचे राज्य होते त्याच भागात साजरा होतो.

      Delete
  4. मित्रांनो सगळे माणूस म्हणून एक राहू या, आयुषय फार कमी आहे, जयज्या रुढी माणूसकीला किंमत देत नाहीत तयाच नषट करणयास आपण कोणाचीही ना नाही, मात्र रोजचया जीवनातील ताण नैराशय दूर करणयास कुटुंब आनंदी उत्साही ठैवणयास उपयुकत परंपरा सामाजिक स्वासथयासाठी आवशयक ठरतात.फकत त्याचे marketing करतांना गोरवापर होणे नाही व आंधळा विरोधही उपयोगी नाही,

    ReplyDelete

Classical Language Status: Marathi

  Why the Marathi language should get Classical Language Status?   The Marathi language has been spoken in Maharashtra and adjoining reg...