Friday, May 20, 2011

ब्रेकिंग न्युज: आज अखिल वैश्विक श्वान संघटनेच्या

ब्रेकिंग न्युज: आज अखिल वैश्विक श्वान संघटनेच्या पदाधिका-यांची तातडीची बैठक भरली असून त्यात डोबरम्यान, अल्सेशियन ते देशी पाळीव ते भटक्या आणि लुतभ-या कुत्रांचे प्रतिनिधी सामील होते. यात एकमताने भुंकी-ठराव पारित केला गेला असून त्यात "जर रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीला नुसता हात जरी लावला तर तो डसला जाईल आणि भुंकून व चावून अखिल मानव नामक इमानहीण प्राण्यांना धडा शिकवला जाईल" असा इशारा देण्यात आलेला आहे. यासाठी हजारो बेकार-बेवारस अशा रस्त्यांवरील श्वानांना हाडके देवून विधानसभा ते संसदेवर भूकी नि चावरे मोर्चे काढण्यासाठी प्रेरीत केले गेले आहे. यामुळे घाबरून हे मानव म्हनवनारे थुंकी सरकार नमेल आणि आमच्या इतिहासातील गौरवशाली अशा वाघ्याची समाधी यावज्जीव राहील असा ठाम विश्वास "मी-इमानी" या श्वान-श्रेष्ठाने आपल्या भाषणात व्यक्त केला.

यावर भुंकाळीने अनुमोदन देत सर्व श्वान-श्रेष्ठ आता गुप्त चर्चेसाठी आपापल्या जातींच्या कुत्र-मेळाव्यांससठी रवाना झाले आहेत. यामुळे एकच वानवा निर्माण झाली आहे...आणि ती म्हनजे हाडकांची. पण आताच हाती आलेल्या व्रुत्तानुसार ही हाडके पाठवणारे विमान दिल्लीवरुन नुकतेच रवाना झाले आहे. वाशिंग्टन डी. सी. चा प्रतिनिधी कळवतो कि व्हाईट हाउस मधील प्रशिक्षित अशा ब्लड हाउंड कुत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून ते आता लगोलग पेंटागोन मधील अति-चाणाक्ष अशा आणि या कुत्रा-जमातीवरील हल्ल्याला तोंड देण्यासाठी अणुयुद्ध हा तर अंतिम पर्याय नाही ना...या विषयी चर्चा करायला रवाना होत आहेत.

या श्वान-प्रतिनिधीला संभाव्य विश्वयुद्धाचे पदधम वाजु लागले आहेत असे दिसते. यासाठी शांतताप्रेमी श्वानांनी आपापले भुंकणे काही काळासाठी बंद करावे आणि तेही न जमल्यास थोडेफार गुरगुरावे. हाडे येतच आहेत त्याची अखिल श्वानजमातीचे भवितव्य आणि दुष्मन मानवी समाज यावर कोणालाही ऐकू जानार नाही या गुरगुरीत चर्चा करावी असे या श्वान-प्रतिनिधीचे म्हनने आहे.

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...