Tuesday, May 31, 2011

हा घ्या वाघ्याचा शिवकालीन पुरावा!इ.स.१६७८ साली शिवाजी महाराजांनी दक्षीण दिग्विजय केला, परततांना त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी येथील गढीला वेढा घातला होता. हे काम त्यांनी सखोजी गायकवाड या आपल्या सरदारावर सोपवले होते. बेलवडीचा ठाणेदार येसाजी प्रभु देसाई मारला गेला. तथापि त्याची पत्नी मल्लाबाई हिने लढाई सुरुच ठेवली. तिने पुढे शिवरायांसोबत तह केला. शिवरायांनी तिचे राज्य तिला परत दिले आणि तिला सावित्रीबाई या किताबाने गौरवले. शिवरायांच्या या ऐतिहासिक घटनेची आठवण कायम स्वरुपी कोरून ठेवण्यासाठी सावित्रीबाईने अनेक गावांच्या दरवाज्यांत व मंदिरांसमोर शिवरायांची पाषाणशिल्पे उभी केली. त्यातील एक शिल्प धारवाडच्या उत्तरेस असलेल्या यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षीनाभिमुख देवळाच्या पस्चिमेस असून त्याची उंची ३ फुट व रुंदी अडीच फुट आहे. शिल्पाचे दोन भाग असून खालच्या भागात शिवरायांनी मांडीवर बसवले आहे. शिल्पाच्या वरच्या भागात घोड्यावर स्वार असलेली शिवरायांची प्रतिमा आहे. या शिल्पात शिवरायांसोबत चाललेला एक कुत्रा दाखवला आहे. हे शिल्प शिवरायांच्याच हयातीत बनवले असल्याने शिवरायांच्या जीवनात कुत्रानव्हता हे म्हनने निराधार ठरते. एवढेच नव्हे तर शिवरायांच्या कुत्र्याची महती त्यांच्या हयातीतच कर्नाटकापर्यंत पोहोचली होती हे यावरून सिद्ध होते.

२. छत्रपती शिवरायांचे नातू शाहु महाराज (सातारा) यांच्या संगम माहुली येथील त्यांच्या खंड्या या लाडक्या कुत्र्याची समाधी आहे आणि ती जवळपास शिवरायांच्या वाघ्या सारखीच आहे. आणि हे स्मारक शिवरायांच्या निधनानंतरच सुमारे ४०-ते ५० वर्षांनी बनवले गेले होते. याचाच अर्थ असा होतो कि तत्कालीन सुस्थीतीत असलेल्या वाघ्या स्मारकाचीच प्रेरणा या स्मारकामागे असावी. खंड्याने एकदा शाहु महाराजांचे प्राण वाचवले होते याचा उल्लेख तत्कालीन कागदपत्रांत आहे. यावरुन असे अनुमान निघते कि रायगडावरील वाघ्याचे स्मारक हे शाहु महाराजांच्या खंड्याचे स्मारक बनण्याची प्रेरणा ठरले आणि कालौघात नश्ट झालेल्या वाघ्याचे स्मारक बनायला शाहूंचा खंड्याचे स्मारक प्रेरणादायी ठरले. याचाच दुसरा अर्थ असा कि कुत्रयाचे स्थान शिवेतिहासात जेवढे महत्वाचे आहे तेवढेच त्यांच्याही वंशजांत होते.

याचाच अर्थ असा आहे कि प्रस्तूत वाद हा शिवरायांना, होळकरांना आणि तमाम मराठी मानसांना फसवण्याचा आणि आपले पोट जाळण्याचा धंदा आहे. वाघ्या इतिहासात होता. शाहू महाराजांचा खंड्याही इतिहासात होता. वाघ्या आणि खंड्या हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचीच रुपे आहेत. कर्नाटकातील शिल्प तर शिवरायांच्याच हयातीतील आहे...तेथे गडकरींचा संबंध कोठे येतो? गदकरींच्या "राजसन्यास"च्या ही आधी चिं. ग. गोगटे यांच्या पुस्तकातही (१९०५)वाघ्याचा उल्लेख यावा याला योगायोग म्हणता येत नाही. याचाच अर्थ असा निघतो कि वाघ्या हे शिवजीवनातील एक अविभाज्य असे पात्र होते आणि त्याचा यथोचित सन्मान राखला गेला पाहिजे.

8 comments:

 1. उत्तम पुरावा आहे. ब्रिगेडी लोकांचा उथळपणा यातून दिसून येतो. त्यांना जे वाटते तसा तो इतिहास बदलू पहात आहेत. वाईट एकाच गोष्टीचे वाटते ब्रिगेड मधली तरूण पिढी दिशा चुकलेल्या जहाजा सारखी भविष्याकडे आगेकूच न जाता उलट मार्गी फिरत आहे.

  ReplyDelete
 2. धन्यवाद सर ..या पुराव्यIतुन छत्रपति शिवाजी महाराज अणि त्यंच्या बरोबर सदैव रहनारा इमानी साथीदार वाघ्या कुत्रा हे लोकन पर्यंत फोचवन्यI साठी अपन घेतलेली मेहनत फार अनमोल आहे ....अता वेळ आहे ती स्रावान्नी मिळून शिव इतिहास ख़राब करणार्या कही कर्मठ लोकांच्या भयानक शडयन्त्रतुंन समजला जागृत करण्याची ...तरुणान्ना भाडकवुन समाज विघातक कामे करणार्य लोकांना सुबुधि मिळो.........जय शिव-मल्हार

  ReplyDelete
 3. वाघ्या होता का नाही? शिवरायांचे गुरु कोण ? रामदास कि आणखी कोणी? त्यांची जन्मतारीख कोणती ? या वादाशी सामान्य लोकांचे काही देणेघेणे आहे असे मला वाटत नाही! आम्हाला फक्त एवढेच माहित आहे कि शिवाजी महाराज हा आमचा निधड्या छातीचा, लढवैय्या, गोरगरीबांचा कनवाळू, उत्तम प्रशासक, अन्यायाचे निवारण करणारा राजा होता!! तुम्ही ब्रिगेडी असा ब्राह्मणवादी असा किवा आणखी कुठल्या जातीपातीच्या टोळक्याचे समर्थक असा, या सर्व गोष्टीचा पुळका तुम्हाला एकतर राजकीय सोयीसाठी आहे किवा आपला खोटा अहंकार कुरवाळण्यासाठी आहे.मी असे बरेच ब्लोग पहिले आहेत, वाचले आहेत! त्यातून एकच गोष्ट समान जाणवली ती हि कि प्रत्येकजण एका ठराविक जातीचा अहंकार कुरवाळण्यात धन्यता मानतो!! वाईट एवढ्याच गोष्टीचे वाटते कि बरेच तरुण अश्या नाझी पद्धतीच्या विचारला बळी पडतात!!

  ReplyDelete
 4. ह्या जात्यंध मस्तवाल सरंजामदारांना आंधळा, एकसुरी, ( इतरांचे अस्तित्व पुसून )इतिहास सांगायचा आहे. संभाजी ब्रिगेड ही अतिरेकी, अविवेकी, नव-सनातनी,आणि नव-नाझी विचारसरणीची संघटना आहे. महाराष्ट्रातील "रणवीर सेना" आहे. नुसती बंदीची मागणी करून काहीही होणार नाही. सर्वाना मिळून संघटनात्मक पातळीवर लढाव लागेल.

  ReplyDelete
 5. @ श्रीमान संदिप जे (sandeep3443)

  ""वाघ्या होता का नाही? शिवरायांचे गुरु कोण ? रामदास कि आणखी कोणी? त्यांची जन्मतारीख कोणती ? या वादाशी सामान्य लोकांचे काही देणेघेणे आहे असे मला वाटत नाही! ""

  संदिप जी, तुमच्या वरील प्रमाणे उल्लेख केलेल्या विधानाचा दुसर्या उदाहरणामध्ये विवरण सांगतो. बघा काय अर्थ आहे.

  "माझा बाप कसा होता.? कोण होता.? काय होता.? त्याचे चरित्र काय होते.? त्याच्या आसपासची माणसे कशी होती.? कसा दिसायचा.? कसा वागायचा.? का वागायचा.? त्याच्यावर प्रभाव कोणाचा पडला.?
  या सार्या प्रश्नांपेक्षा "मला बाप होता." याला तुम्ही महत्व देताय. द्याच महत्व. आणि द्यायलाच हव. कारण जर महाराजानी स्वराज्याच्या स्वातंत्र्यासाठी लढा नसताना दिला तर आज तुमचे नाव 'संदिप' ऐवजी कदाचित 'रफिक/रियाज/अकबर/शाकिब' वगैरे वगैरे काहितरी असत. शरम आणि तमा बाळगा जरा. स्वत:ला हिंदु म्हणवुन घेताय? असला उपर्या काळजाचा हिंदु असतो का?? ज्याला स्वत:च्या बापाची जन्म तारिख माहित नाही, तो कसा होता ते माहित नाही आणि कोणी सांगत आहे तर तेही ऐकुण घ्यायची लायकी नाही.

  मी जातीयवाद नाही पसरावत कोणताच वा मी दुसर्या धर्माला नावेही नाही ठेवत आहे. पण जर कोणी माझ्या धर्माला हात लावायचा विचारही करत असेल तर त्याला उभा कापल्या शिवाय राहणार नाही.
  इथे मला खरच लाज वाटतेय की तुम्हीही माझ्या महाराजांच्या 'स्वराज्यातील' एक आहात.

  अस्मितेला जर धक्का लागला तर राग तर येणारच ना.

  बघा काही फरक पडतोय का आपल्या विचारांच्या मध्ये हे सारे वाचुन.

  तुम्हाला अपमानित करण्याचा वा तुमच्या विचारांची अवहेलन करण्याचा हेतु नाहेये माझा. पण तरीही झाला असेल तर क्षमा करा.  महाराजांच्या स्वराज्यातला एक छोटा मावळा..
  जयराज कुदळे.

  ReplyDelete
 6. @ श्रीमान संदिप जे (sandeep3443)