Thursday, June 2, 2011

आज पावसाळ्याचा हा पहिलाच दिवस...

विद्युल्लता
लखलखतात दशदिशांतून
रुद्रध्वनी उन्मळतो
आकाशगर्भातून
ऒंकारस्वर करीत
सोसाटत हवा वाहते अशी कि
धरतीने घातले आहे
लोटांगण
या शिवमय अवकाशास
जाण्यासाठी शरण!

मीही विनम्र
कणाकणाप्रमाणेच या चराचराच्या
व्रुक्षवेलींसारखा आणि
थबकलेल्या ...
ओथंबलेल्या
चिंब भिजल्या
क्षणांसारखा
अंतरात नाद अनाहत...
ॐ त्र्यंबकं यजामहे...
तोही भिजलेला
चिंब चिंब झालेला...
स्वर तो अविरत
या वेड्या
अनाहुत पावसासारखा...

आज पावसाळ्याचा हा पहिलाच दिवस...

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...