Wednesday, October 19, 2011
...तर या क्रुत्रीम अर्थव्यवस्था कोसळुन पडतील....
जी अर्थव्यवस्था आर्थिक निर्मितीसाधनांचे पुनरुज्जीवनाचे चक्र अबाधित ठेवत जनतेच्या मुल्यवर्धीत आर्थिक विकासात भर घालत अनिश्चिततेच्या दु:श्चक्रातुन मुक्तता देवु शकेल तिला आपण शाश्वत अर्थव्यवस्था म्हणु शकतो. प्रुथ्वी एकच आहे आणि नैसर्गिक संसाधने मर्यादित आहेत. या संसाधनांचा वापर ज्या गतीने वाढत चालला आहे त्या गतीने येत्या काही दशकांतच अनेक संसाधने पुर्णतया संपुष्टात आलेली असतील. अन्य ग्रहांचे शोध सुरु असले तरी तेथे मानवी जीवनास अनुकुल हवामान असेल याची खात्री नाही...आज जे ग्रह अन्य दीर्घिकांमद्धे सापडत आहेत ते एवढे दुर आहेत कि माणसाने तंत्रद्न्यानाच्या जोरावर अगदी प्रकाशवर्षाच्या वेगाने प्रवास करण्याची क्षमता गाठली तरी काही हजार ते लाख प्रकाशवर्ष एवढे ते दुर असतील. सुर्यमालिकेतील अन्य ग्रहांवरुन खनिजादि आयात करायचे ठरवले तरी त्याचा खर्च आज आहे त्याच्या किमान लक्षपट असेल. त्यामुळे तंत्रद्न्यान विकसीत झाले तरी त्याचा लाभ सर्व मानवजातीला होणार नाही. मानवी मुल्यव्यवस्था व अर्थव्यवस्थाच त्यामुळे कोलमडुन पडेल.
मी येथे सायंस फिक्शन लिहित नसल्याने काल्पनिक भयावह चित्र निर्माण करण्याचा मानस नाही. पण या वास्तवाच्या दिशेने आपण अत्यंत वेगाने निघालो आहोत. सध्याची आपली उत्पादकता, भांडवलाचे स्त्रोत आणि उत्पादनांची खरी मुल्यवर्धकता याचा विचार केला तर आपण वास्तवदर्शी अर्थव्यवस्थेत जगत नसुन काल्पनिक मुल्यांवर आधारीत अर्थव्यवस्थेत जगतो आहोत हे सहज कोणाच्याही लक्षात येईल. जगभरचे भांडवलबाजार आज ज्या गतीने कोसळत आहेत त्या गतीने खरोखर अर्थव्यवस्था कोसळल्या आहेत काय हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. जेंव्हा भांडवलबाजार वरची दिशा गाठु लागतात तेंव्हा गुंतवणुकदार आशांच्या लाटेवर आरुढ होत नवीन गुंतवणुकी सुरु करत असतो तेंव्हा खरोखर अर्थव्यवस्था वर गेलेली असते काय हाही प्रश्न असतोच आणि यावरही चिंतन करण्याची गरजही उपस्थित करतो.
भांडवलबाजार हा अर्थव्यवस्थेचा खरा निदर्शक नाही पण तोच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतो हेही तेवढेच खरे आहे. भांडवलबाजात अल्पावधीत ज्या वेगात कोसळलेला असतो तेवढ्या वेगात वास्तव अर्थव्यवस्था नक्कीच कोसळलेल्या नसतात. तसेच हाच बाजार झपकन वरच्या पातळ्या गाठतो तेंव्हा अर्थव्यवस्थेने तेवढी प्रगती नक्कीच केलेली नसते. शिवाय भांडवलबाजारात गुंतवणुकदार जेंव्हा गुंतवणुक करतो, तेंव्हा तो पैसा तो ज्या कंपनीत म्हणुन गुंतवतो तो त्या कंपनीकडे जात नाही...(फक्त आय.पी.ओ. वा अतिरिक्त भागभांडवल विक्रीचाच अपवाद असतो) तर एका भांडवलदाराकडुन दुस-या त्रयस्थ भांडवलदाराकडे जात असतो. मग हा भांडवलदार लघुत्तम असेल वा महत्तम. म्हणजे एरवी जी भागभांडवल बाजारांतील उलाढाल असते ती जुगा-यांची उलाढाल असते. त्या भांडवलाचा उपयोग ख-या उत्पादक कंपन्यांना होत नाही हे माहित असने आवश्यक आहे. लिस्टेड शेयर्स हे एक जुगारी विनिमयाचे साधन असते त्यामुळे त्यातील वाढ वा घट ही कधीच वास्तवदर्शी असु शकत नाही.
म्हणजेच त्यातील चढ-उतार ना त्या कंपन्यांच्या ख-या आर्थिक मुल्याचे-मुल्यवर्धिकतेचे दर्शन घडवतात ना त्यांना या चढ-उतारीचा फायदा असतो. मग हा पैसा जातो कोठे? आधीच म्हटल्याप्रमाणे एका भांडवलदाराकडुन दुस-याकडे तर तिस-याकडुन चवथ्याकडे असा हा अनुत्पादक प्रवास सुरु असतो. त्यातुन वास्तव उत्पादनाला कसलाही हातभार लागत नाही. त्यातुन वास्तव संपत्तीचे निर्माण होत नाही. ज्या कंपनीच्या भागभांडवलात पैसे गुंतवले आहेत त्या कंपनीची खरी आर्थिक प्रगति होवुन तिला होणा-या फायद्यातुन लाभांश मिळावा हा हेतु सहसा एकाही गुंतवणुकदाराचा नसतो. म्हनजे तो एक स्टेक लावत असतो...कधी जिंकण्याचा तर कधी हरण्याचा...म्हणुन ब्रांड-लोयल्टी शेअरबाजारात आढळत नाही. भाव पडायला लागला कि विकुन टाका...वर व्हायला लागला कि विकत घ्या...ही मानसिकता जागतीक भांडवलादारांची आहे. अगदी अवढव्य ब्रोकींग कंपन्या, ब्यांका, अन्य वित्तसंस्था या नियमाला अपवाद नाहीत. यात अशा अनेक जायंट्सची दिवाळीही निघालेली आहेत असे आपण पहातो...वाचतो...
याचे कारण हे आहे कि हा पैसा मुळात या अवाढव्य वित्तसंस्था ब्रोकींग कंपन्यांचाही असतो का?
खरे तर हे भांडवलदारांचे दलाल असतात...स्वत: भांडवलदार नसतात. ब्यंकांचेच उदाहरण घेवुयात. ब्यंका जी कर्जे देतात वा भागभांडवल बाजारात गुंतवतात तो त्यांचा नसुन अगणित छोट्या गुंतवणुकदारांनी त्यांच्याकडे गुंतवलेला पैसा असतो. भले तो मुदत/बचतठेवींच्या रुपात असेल वा म्युचुअल फंडांतील गुंतवणुकींचा. पण तो असतो ख-या गुंतवणुकदारांचा. अगणित छोट्या भांडवलदाराणी मोठे भांडवलदार कसे निर्माण केले जातात त्याचे हे एक स्वरुप आहे, पण त्यावर नंतर चर्चा करुयात.
येथे प्रश्न असा आहे कि ब्यंका असोत वा ब्रोकींग कंपन्या असोत...हे खरे भांडवलदार नसुन भांडवलाचे व्यवस्थापक असतात. शेयरमार्केटमद्धे यांना दलाल म्हनतात. प्रत्यक्ष-अप्रत्यक्श्ढ रितीने हे लोक आपल्याला हव्या त्या कंपन्यांत पैसे वळवायला प्रेरीत करत असतात. ब्यंका आपल्याला हव्या त्या क्षेत्राचे नियोजन करुने ठेवरुपातील धन वेगवेगळ्या क्षेत्रांकडे कर्ज वा गुंतवणुकीच्या स्वरुपात वळवत असतात. अशा रितीने भांडवल आधी एकत्र येत मग विशिष्ट क्षेत्रांत विभाजीत होत असते. कारखाने, अन्य सर्व प्रकारचे व्यवसाय ते व्यक्तिगत कर्जे ते भागभांडवलबाजार यात ब्यंका आपला निवेश करत जातात तर त्याउलट फक्त भागभांडवलबाजारावर अवलंबुन असणा-या गुंतवणुकदार संस्था मात्र अधिकाधिक लाभाच्या आमिषांना समाजाला बळी पाडत भागभांडवलबाजारात गुंतवणुक करायला प्रेरीत करत असतात तसा अर्थपुरवठा समाजातुनच उभा करत असतात.
आता यातील फरक समजावुन घेतला पाहिजे. ख-या वास्तव उद्योगांतील गुंतवणुक ही मुल्यवर्धन करत असते तर भागभाम्डवलातील (आय.पी.ओ ते विस्तारीत भागभांडवल...अग्रक्रमाचे समभाग ते कर्जरोखे वगळता) कसल्याही वास्तव संपत्तीचे निर्माण करत नाही वा करण्यास हातभार लावत नाही. एका अर्थाने तीही सोण्यात केलेल्या गुंतवणुकीसारखी आहे. म्हनजे डेड इन्वेस्टमेंट आहे. त्यात शाश्वत मुल्यवर्धिकता नाही.
येथे मुल्यवर्धिकता म्हनजे सोन्याचा भाव वाढला म्हनजे वर्धन झाले असा नसुन ते अर्थव्यवस्थेच्या एकुणातील विकासाला हातभार लावण्यास पुर्णतया अक्षम असते हा त्याचा अर्थ आहे.
याला आपण शाश्वत आर्थिक विकास म्हणु शकत नाही. असे आर्थिक विकासाचे क्रुत्रीम मापदंड हे नेहमीच अस्थिर असु शकतात आणि तेच वास्तव आज आपण एकुणातील जागतीक अर्थव्यवस्थेच्या अनिश्चित चढ-उतारावरुन कल्पु शकतो.
ख-या अर्थव्यवस्थेचे लक्षण
खरी अर्थव्यवस्था तीच असते जिच्यातुन श्रीमंतांकडुन गरीबांकडे अर्थस्त्रोत वाहतील. त्यात सातत्य राहील. गरीबांनी श्रम, बुद्धी, कल्पकता, कौशल्ये, लघुत्तम (शेतीज, प्राणीज...ई) उत्पादने विकुन त्या बदल्यात सुस्थिर अर्थार्जन करावे आणि त्या अर्थाचा वापर आपले जीवन शाश्वत रित्या सुस्थिर करण्यासाठी वापरावे. येथे सुस्थिरतेसाठी वापर याचा अर्थ एवढाच आहे कि ज्याशिवाय जगणे असह्य आहे, जी खरीखुरी गरज आहे जिच्या आपुर्तीशिवाय जीवनयापन अशक्य आहे अशा सर्वच गरजांच्या पुर्तीसाठी...क्रुत्रीमरित्या जाणीवपुर्वक निर्माण केलेल्या गरजांसाठी नाही.
अशीच अर्थव्यवस्था श्रेष्ठ असते जिच्यात गरजाधारीत उत्पादन होते...अतिरिक्त उत्पादने (म्हणजे मागणीपेक्षा अधिक) करत लोकांच्या गरजा भावनीक आवाहने करत वाढवत त्यांना आपल्या उत्पादनाच्या सापळ्यात अडकवण्यासाठी नाही.
यामुळे साधनसामग्रीचा अकारण विनाश टळत असतो. आणि हेच शाश्वत अर्थव्यवस्थेला अभिप्रेत असते.
परंतु सध्याच्या जागतीक अर्थव्यवस्थांचा प्रवास वेगळाच आहे. म्हणजे गरीबांकडुन श्रीमंतांकडे अर्थस्त्रोत वहात असतात. आपण वर पाहिलेच आहे कि अगणित छोट्या भांडवलदारांच्या (म्हणजे त्यांचा बचतीचा...वा अतिरिक्त उत्पन्नाचा) प्रवाह मोठ्या भांडवलदारांकडे सुरु असतो. ते त्याच्याच भांडवलाचे व्यवस्थापक बनतात आणि अशा क्षेत्रांकडे तो प्रवाह वळवतात जे आवश्यकतेपेक्षा वास्तव मागणीपेक्षा अधिक उत्पादनाच्या मागे लागतात आणि प्रतिष्ठेच्या नव्या संकल्पना जाहिराती-माध्यमांच्या माध्यमातुन त्यांच्याच डोक्यावर आदळत पुन्हा त्यांनाच ग्राहक बनवत त्यांना पुन्हा अर्थ-क्षीण करत जात असतात.
हे वरील विधान बारकाईने समजावुन घ्यायला हवे.
ख-या अर्थाने आर्थिक स्त्रोत वरुन खाली येतच नसुन तो खालुनच वर जातो आणि समाजाला वेठीस धरुन अर्थ-दुश्चक्रात पाडतो. एका रात्रीत उच्चतम आर्थिक दर्जा असणा-या ब्यंका दिवाळे काढतात. अवाढव्य जागतीक दर्जाचे कारखाने बंद पडतात. ग्रीससारख्याच काय अमेरिकेवरही दिवाळखोरीची वेळ येते...रशियावर ती आलीच होती...खरे तर ती कोनावरही कधीही येवु शकते. मी येथे उदाहरणांत जात नाही कारण सुद्न्य वाचकांना ती माहितच आहेत.
असे होते कारण जनसामान्यांच्या नैसर्गिक आणि वास्तव भांडवलाचे यांचे व्यवस्थापन पुरेपुर फसलेले असते. राष्ट्रीय साधनस्त्रोतांची किती लुट होवू द्यायची याबद्दल ते डोळे झाकुन असतात. कर्नाटकमद्धे जे घडले ते खान-कांड...त्यात आज किती नुकसान झाले याची किंमत जेंव्हा सारेच स्त्रोत संपु लागतील तेंव्हा कळेल, पण तेंव्हा हे लोक जीवंतही नसतील.
म्हनजे स्वत:चा विशेष स्टेक नसनारे भांडवलदार जेवढे ख-या भांडवलदारांचे अहित करतात तेवढेच या भांडवलव्यवस्थापकांनाच अनुकुल असणारे लोकप्रतिनिधीही करत असतात.
अर्थव्यवस्था वरुन खाली यायला हवी...तळागाळापर्यंत पोहोचत ते खालील साधनस्त्रोत विकसीत व्हायला हवेत.वास्तवदर्शी अर्थव्यवस्थेचे हेच लक्षण आहे. ख-या भांडवलदारांना सक्षम करता आले नाही तर या क्रुत्रीम अर्थव्यवस्था कोसळुन पडतील यात शंका नाही. त्याबद्दल आपण पुढील लेखात अधिक चर्चा करुयात.
-संजय सोनवणी
९८६०९९१२०५
Subscribe to:
Post Comments (Atom)
गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी
ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
अतिशय छान लिहिले आहे. अगदी खरे खुरे.........................कृषी व्यवस्था हीच खरी व्यवस्था........
ReplyDeleteThe country that is more developed industrially only shows, to the less developed, the image of its own future.
ReplyDeleteKarl Marx
क्या बात है सर.
ReplyDeletemahiti purn lekh aahe, aavdla.
ReplyDelete@Sanjay , from where I can buy/order your books online? I am looking for Kushan, Abhalat geleli manase and many of other books. I need your marathi books , not in english.
ReplyDeleteब्लॉग एक नंबर झालाय ... अतिशय माहीतीुूर्ण असा लेख
ReplyDeleteDear Suyog, pls give me your email address so that I can send list of my books and from where they can be procurred.
ReplyDeleteThanks.