Saturday, January 21, 2012

मालक मराठ्याला गुलाम "कुणबी" व्हायची स्वप्ने?.... का?

"कुणबी प्रमानपत्र मिळते मार्गदर्शक तत्वानुसारच" या शिर्षकाखाली आजच्या पुणे टुडे मद्धे अखिल भारतीय मराठा महासंघाने स्पष्टीकरण दिले आहे. या स्पष्टीकरणामागे कालच्याच सकाळमद्धे प्रसिद्ध झालेल्या श्री क्रुष्णकांत कुदळे यांनी मराठा असुनही कुणबी असल्याची प्रमाणपत्रे घेत ओबीसीच्या ताटातील घास उचलण्याबाबत टीका केल्याचा संदर्भ होता.

प्रश्न असा आहे अखिल भारतीय मराठा महासंघ, ज्याच्या नांवातच "मराठा" ही सरंजामशाहीवादी बिरुदावली जपलेली स्पष्ट दिसते, त्यांना आपण "कुणबी" असल्याचा साक्षात्कार का आणि कधी झाला? कुनबी हे ओबीसीत आहेत आणि त्याला कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही. नव्हते. कारण कुणबी म्हणजे  कुळे होती. शेतात, रानांत आणि खळ्यांत राबणारे "कुळ" म्हनजे कुनबी. हे कुळकायदा येईपर्यंत कधीही जमीनीच्या छोट्या तुकड्याचेही मालक नव्हते. मालक, सरंजामदार आणि राबवणुक करुन घेणारे जमीनदार मराठे - ब्राह्मण हे खरे मालक. त्यांनी जे या कुणब्यांचे आणि अन्य बलुतेदारांचे शोषण केले त्याला सीमा नाही. आजकाल हे सारे पाप ब्राह्मणांवर ढकलायचे प्रयत्न होताहेत. पण आजही पाटन तालुक्यातील मातंग महिलेवरील अत्याचाराची घटना पाहिली तर खरे शोषक कोण आहेत हे स्पष्ट होईल.

मराठा आणि कुनबी या स्वतंत्र जाती आहेत हे पार सातवाहन काळापासुनचा इतिहास पाहिला तरी सहज लक्षात येईल. महारट्ठी हे शासकीय/राजकीय सरंजामदार होते तर कुनबी हा प्रत्यक्ष शेतावर राबणारा कामगार होता. ओबीसी म्हनजे मुळचा खरा निर्माणकर्ता समाज. याच समाजाने संस्क्रुती घडवली. मानवी जीवन सुखकर व्हावे यासाठी नव-निर्मिती घडवली. मग ते शेतीकाम असो, भाज्या-फळांचे निर्माण असो कि पार पायतनांपासुन ते बैलगाड्या-नांगरांचे निर्माण असो...जहाजांचे असो कि किल्ले/लेण्यांची उभारणी असो...आजही समाज जगतो तो यांच्या जीवावर.

आणि त्यांच्याच नैसर्गिक आणि घटनात्मक अधिकारावर आजही अतिक्रमण करत, आपणच कुणबी आहोत अशी धि:कारार्ह हाकाटी पिटत, तशी खोटी सर्टिफिकेट घेत निवडनुका लढवत आपला "मराठा अजेंडा" राबवणा-या या सरंजामदारांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. पुन्हा वर मराठ्यांना आरक्षण द्या, ते गरीब आहेत म्हणुन, ही मागणी तर निर्लज्जपणाचा कळस आहे. एकीकडे कुनब्यांची खोटी सर्टिफिकेट्स घेवुन बहुजनांचा घास हिरावुन घ्यायचा आणि वर मराठा म्हणुनही आरक्षण मागायचे....मग बहुजनांनी यांच्याच गुलामीत सडायचे...जसे आजही सडत आहेत...!

थोडक्यात चारी बाजुंनी ओबीसी, बीसी, भटके विमुक्तादिंना पुन्हा मनुकाळात न्यायचा हा डाव आहे. दुर्दैव हे कि जे मराठे स्वता:ला "बहुजन" म्हणवण्याचा प्रयत्न करतात, तेच आता राजकीय पटलावर मनुस्म्रुतीचेच अक्षरश: पालन करत आहेत. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेण्याचाही हक्क गमावला आहे. फुले-आंबेडकर तसेही यांच्या खिजगणतीत नव्हतेच...

बहुजनांना माझी विनंती कि त्यांनी हा डाव ओळखावा आणि आपली राजकीय व सामाजिक कत्तल होण्यापुर्वीच सारे भेदभाव विसरत एक होत या भिषण डावाला उधळुन लावा.




17 comments:

  1. हा ब्राह्मण, तो कुणबी, तो मराठा, तो ओबीसी... च्यायला कधी विसरणार यार तुम्ही लॉक जातपात? स्वतः विसरत नाही आहात आणि ज्यांना विसरायची इच्छा आहे त्यांनाही विसरू देत नाही आहात हे असे लेख लिहून. !!!

    ReplyDelete
  2. "मालक मराठ्याला गुलाम "कुणबी" व्हायची स्वप्ने?.... का?"
    कारण फक्त एकचं.परमेश्वराने मानवाला दिलेले विस्मृतीचे वरदान.आपण येथे म्हणता त्या प्रमाणे हे स्वप्न पडायचे कारण म्हणजे त्याला कुणबी समाजाचा लिखित इतिहास किंवा त्यांच्यावर भूतकाळात म्हणजे आत्ता-आत्ता अगदी १९ व्या शतकाच्या समाप्ती पर्यंत इतर समाजा कडून काय अत्याचार होत होते किंवा एकूणच त्या काळात इतर समाजाच्या तुलनेत कुणब्यांचे समाजातील स्थान काय होते किंवा त्यांना समाज काय समजायचा ह्या इतिहासाची अजिबात नसलेली जाणीव,समज किंवा माहिती.थोडक्यात म्हणजे घोर अज्ञान.
    त्या काळातील कुणबी समाजा विषयी रूढ असलेल्या ग्रामीण म्हणींच्या मधून त्यांचे त्या वेळचे समाजातील स्थान खूपसे स्पष्ट होते. आपल्या लेखातील वरील विधाना पुष्ट्यर्थ अतिशय माफक पुराव्या साठी त्यातील काही म्हणी नमुन्या दाखल खाली देत आहे.त्या वाचल्यावर आजचे हेच आरक्षण जर आज पासून शंभर सव्वाशे वर्षा पूर्वी असते,तर ते स्वीकारायचे धाडस "ह्या" लोकांमध्ये असते का ह्याचा ज्याने त्याने विचार करावा.
    अडाणी कुणबी ,दुप्पट राबी
    असा कुणबी हाट्या,वाटेवर लावी काट्या
    कुणबिक जोरावर खरी,पण एक नांगर नाही घरी
    कुणबी विळ्या इतका वाकडा
    कुणब्याचा बेटा,ढुंगणात लंगोटा,पण धर्माचा मोठा
    कुणब्याची आई,कुणब्यास व्याली
    कुणब्याची जात विळ्या सारखी वाकडी,पण ठोकून होती नेटकी
    कुणब्याची बेटी,गव्हाची रोटी,मळल्याने तिला,चव येती
    कुणब्याचे पोर शहाणे झाले तर,गोंधळ्याचीच कथा गाईल
    कुणब्याचे बोलणे मुळाभर इकडे, का मुळाभर तिकडे
    कुणब्याच्या जातीला आडवे ना उभे
    कुणब्याला जो म्हणील आप,त्याचा गाढव बाप
    कुणब्या सारखा दाता नाही,कुटल्या वाचून देत नाही
    चालते तिफणी बारागळ,आणि कुणब्याची तारांबळ
    महाराष्ट्रात अगदी १९ व्या शतकाच्या समाप्ती पर्यंत किंवा कदाचित अगदी त्या नंतरचा काही काळ सुद्धा ह्या म्हणी व्यवहारात रूढ होत्या.त्याचे त्या काळी कुणालाच नवल वा वावगे वाटायचे नाही.त्या मुळे आत्ताच्या काळात ह्या जातीच्या आरक्षण मागणी साठी जेव्हा एवढे हात वर होतात ते पाहून आश्चर्याने थक्क व्हायला होते आणि कौतुक हि वाटते कि,जो समाज फक्त १०० वर्षा पूर्वी इतका उपेक्षित होता, त्याच्या आरक्षणाच्या लाभा साठी आता अगदी हमरीतुमरी वर उतरण्या पर्यंत वेळ येऊन ठेपली आहे.त्या मुळे कोण म्हणतो कि आजच्या भारतात दलितांवर अन्याय होतो ?चूक आहे ते. कारण त्याला त्याच्या "हक्काची" जाणीव झाली आहे.कर्तव्याचे नंतर सवडीने बघुयात.स्वातंत्र्या नंतरच्या अवघ्या ६५ वर्षात बुद्धवासी बाबासाहेबांचे स्वप्न आज वास्तवात यायला लागले आहे.चला हे हि नसे थोडके.
    आता उत्सुकता एवढीच आहे कि,ह्या अस्सल नमुनेदार म्हणींचा वापर,आता संबंधित राजकीय नेते त्यांच्या-त्यांच्या सोयीने ह्या पुढील काळात कशा पद्धतीने वापरून घेऊन आपापली पोटे अजून किती नि कशी मोठी करत रहातील हेच बघत राहायचे.खरे तर "लायक असेल तो जगेल/टिकेल" हा सृष्टीचा निसर्गदत्त नियम आहे,परंतु कलियुगात मनुष्य जेथे समुद्र हटवून तेथे वस्ती करायचा कृती करतो,तेथे "ह्या" आरक्षणाचे नि त्या वरून उठणाऱ्या वादळाचे तितकेसे काय कौतुक ?

    ReplyDelete
  3. @ हेरंबजी, जाती विसरायच्या तरी कोणी त्या विसरु देत नाहीत हे खरेच आहे. या लेखाचा उद्देश जातींबाबत नसुन जी जातच नाही ती जात राजकीय स्वार्थासाठी बनावटगि-या करत मिळवण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न होत आहे त्यावर प्रकाश टाकणे हा आहे. या बनावटगिरीमुळे अन्यांचा नैसर्गिक अधिकार हिरावुन घेतला जात आहे. उदा. गेल्या निवदनुकांत जे मराठा म्हणुन ओपन जागांवर लढले तेच आता त्या जागा ओबीसींसाठी राखीव होताच कुणब्यांची सर्टिफ़िकेट्स घेण्याच्या मागे आहेत...आणि नेमका यालाच विरोध आहे. ही सामाजिक बदमाशी आहे...गुन्हा आहे...घटनेची पायमल्ली आहे. त्याबद्दल बोलने याला जातीयवाद म्हणत नाहीत. कुणबी समाज हाही अन्य समाजांप्रमाणेच अन्न्यायग्रस्त राहिलेला आहे. सत्ता व संपत्ती यात त्याला कधीच वाटा मिळत नव्हता...त्या समाजाला जागे करण्याचा हा प्रयत्न आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Barobar sir.. heramb saheb ugichach bhavnik comment karat ahet

      Delete
  4. वरील प्रतिक्रियेत ज्या म्हणी दिल्या आहेत तस्या म्हणी भारतातल्या प्रत्येक जतिबद्दल प्रचलित आहेत. अगदाई ब्राह्माण मराठा किवा मागास. त्यात एवढे कुनब्यानी किवा मराठ्यानी वाईट वटुन घ्यायचे कारण नाही. कुणबी हे वोबिसि आणि मराठा नाहीत हे तुम्ही कोणत्या ग्रहीतकावर बोलत आहात? महात्मा फूलयानी शिवाजी महाराजना सुद्धा कुनबीच संबोधले आहे. कुणबी जर शेती करणारे तर महाराष्ट्रात सगळे जमीनदार ब्राह्मनच होते मरते होते ज्यांच्याकडे पाटिलकी होती. त्यामुळे मराठे कुणबी नाहीत आणि क्षत्रिय आहेत असे तर खुद्द ब्राह्मनाणीच नाकारले आहे. सत्तधारी जात असली म्हणजे त्या जाटीतियाल सगळे लोक हे समृद्दा असतात असे म्हणणे बरोबर नाही. कुणबी हे शेतकरी होते आणि आहेत तर मग पशचीम महाराष्ट्रातील शेतकरी गेले कोठे? कारण इथे कुणबी जाताच नाही. वात्यने जमीन करणे हे मुख्यता कुणबी होते असे लेखकाचे म्हणणे जर खरे धरले तर माझ्या गावाताल ८०% मराठे हे वत्यानेच जमिनी करतात त्यांच्याकडील छोट्या जमिनीवर त्यांचे भागणे शक्या नाही. मग हे कुणबी नाहीत का? सोनवाणी सर, तुमचे इतिहास संशोधन निस्पाक्षया आहे पण मराठ्यांच्या विरोधतील मनात असलेला कोपरा बाहेर येतोच.

    ReplyDelete
    Replies
    1. विकासजी, तुमचा काहीतरी घोळ होतो आहे. जर कुनबी ही जात काही भागात नाही हे खरे असेल तर निवदनुकीच्या वेळी ओबीसी रिझर्व जागांत घुसण्यासाठी कुणब्याची सर्टिफिकेट्स का मिळवली जातात? माझे एक विख्यात समिक्षक मित्र आहेत, ते आजवर मराठा म्हणुन अभिमानाने मिरवत होते. पण त्यांनी कोल्हापुरला आपल्या मुळगांवी जात जुने कागद शोधत आपण कुणबी असल्याचा शोध लावला व तसे सर्टिफिकेट मिळवले. यात वावगे नाही असे वरकरणी वाटु शकते, पण यात अनैतिकता नाही काय? मराठा रोषाचा यात प्रश्न कोठे आला? मी स्वत: आजतागायत जात सर्टिफिकेट घेतलेले नाही.

      मराठे क्षत्रीय नाहीत, नव्हते हे मला मान्यच आहे...पण मग वेदोक्त प्रकरण कशामुळे निघाले? मराठे (भले ते क्षत्रीय नसतील) पण सत्तेत होते आणि आजही आहेत हे वास्तव तुम्हाला अमान्य करायचे आहे काय? ओपनमद्धे मराठा म्हणुन लढायचे आणि राखीव जागा झाली रे झाली कि ओबीसीचे सर्टिफिकेट घ्यायचे...लग्ने ठरवतांना मात्र ९६-९२ कुळी शोधायचे हा दांभिकपणा नाही काय? एकदा आपली जात नेमकी काय हे तरी ठरवायला नको का? आणि जातीबाहेर जायचे...शाहु-फुलेंचा विचार अम्मलात आणायचा तर मग हे ढोंग करताच कामा नये एवढेच माझे म्हणने आहे. सत्ताबाह्य समाजांना कधीतरी संधी देनार आहात कि नाही हाच माझा प्रश्न आहे.

      Delete
    2. Ji goshta bramhananni nakarali as tumhi mhantay ti mi nahi nakarat.. sarv jamindar he bramhan hote, asle faltu shodh tumhi kas lavta? gharat 5-7 mul aslyavar jamini chotya honarach na! Swatachya hatane zak marlyavar bakiche kay karnar tyala

      Delete
  5. विकास तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे.यांनी फ़क्त मराठा आणि कुणब्यांच्या विरोधात बोलायचे
    आणि जातीच्या नावाखाली यांनिच सवलती घ्यायच्या मुद्दाम ओपन मधून अर्ज करायचा आणि ओपनची जागा लाटायची तेव्हा चालतय यांना.मात्र बास झाल्या सवलती आता नको आम्हाला आता आम्ही स्पर्धेत उतरतो असं नाही म्हणणार एका घरात पाच पाच सवलती घेणार ते चालतं यांना.

    ReplyDelete
    Replies
    1. वैभवजी, तुम्ही म्हणता ते सिद्ध करण्यासाठी किती ओबीसी ओपन जागांवर लढले आणि निवडुन आले याची आकडेवारी द्यायला हवी. पण मराठा असुनही कुनबी सर्टिफिकेट घेत निवडुन आलेले व त्यांच्या विरोधात खटले असलेले एकट्या पुण्यातच ८२ लोक आहेत. दुसरे म्हणजे ओपनचा अर्थ ओपनच असतो व तेथे कोणीही अर्ज भरु शकतो. पण राखीव म्हणजे राखीवच असते. उद्या बाईचे रुप घेवुन महिला जागा लुबाडल्या तरी नवल वाटणार नाही. (तसेही आपापल्या बायकांना उभे करणारे आहेतच!) ही दांभिकता कधी संपणार? आरक्षण योग्य कि अयोग्य यावर चांगला वाद होवु शकतो, मी आरक्षणाच्या विरोधातच आहे हे मी या लेखात स्पष्ट केले आहे. पण सध्या जी काही घटना आहे, नियम आहेत त्याचे पालन करावे. जे अमान्य आहे त्यासाठी घटनेत बदल घडवुन आणावा व त्यासाठी प्रयत्न करावेत. माझे या विषयावर याच ब्लोगवर काही लेख आहेत ते अवश्य वाचावेत.

      दुसरे असे कि जे खरे कुनबी आहेत त्यांच्या मी बाजुनेच आहे. असायलाच हवे. पण आपण मराठा आणि सोयीनुसार कुणबी हा जो प्रकार होतो त्याला मात्र सख्त विरोध आहे.

      Delete
  6. सोनवणीजी , फक्त पुण्यात २९ कमी ३९ वोबिसी खुल्या जागेतून निवडून आलेत.....पुण्यात तर मला वोबेसी आणि मराठा ह्या समाज्यात फरक दिसून येत नाही....सामाजिक आणि आर्थिक बाबतीत ब्राह्मण हा समाज वेगळा दिसतो, दलित समाज वेगळा दिसतो म्हणजे त्यान्ह्च्या आर्थिक परीस्तीतीवरून वोलाखू येतो...पण तुम्ही कोण मराठा आणि कोण वोबिसी सहसा वोलाखू यांर नाही.........हि जात व्यवस्था फक्त लग्न संस्थे मुले टिकून असावी आणि आता जातीच्या राजकारणामुळे.....नाहीतर वोबिसी अशी जात असण्याचा काही साम्बधाच नवता? तुम्हीच सांगा, माली धनगर आणि सोनार आणि वंजारी यांना तुम्ही एकाच मापात कसे मोजू शकता.....कैकाडी सुद्धा वोबिसी, काही पारधी सुद्धा वोबिसी.....ह्यात ह्या अति मागास वोबिसीनी धनगरांच्या आणि मळ्यांच्या राजकीय महात्वाकांशेच्या पाटीमागे फरफटत यायचे का? . कारण ते तथाकथित वोबिसी आहेत म्हणून. जेवा वंजारी आणि कैकाडी संजयचा त्यांच्या काही हक्कासाठी भांडणे होती तेवा तुम्ही कैकाडी समाज्याच्या हक्कासाठी का नाही भांडले? ,

    ReplyDelete
  7. sonavaniji no answres.....note one more name in yoiur allaince...prakash pol...because he wants to be writer and thinks that without bhandarkar's approval no body can become writer......

    ReplyDelete
  8. Dear Shri Vikas jee,
    Is Maratha a caste? Doese it have any kind of historical background? If at all it is not a caste, on what basis it can claim any advantages based on the caste? Can you plese enlighten me on this issue?

    You have no right at all to talk abpout Bhandarkar Institute and presence of bahujans in it.

    Your other arguments are not worthy enough to deserve reply. Thanks.

    ReplyDelete
  9. MALA MARATHA ANI KUNBI MADHE KAHIHI FARAK JANAVAT NAHI. ME EKA KHEDEGAVAT RAHATO ANI MARATHA ANI KUNBI MADHE JARATARI FARAK SHODHUN SAPDAT NAHI. HISTORY BADDAL MALA JAST KAHI MAHIT NAHI ANI AJACHYA 21 VYA SHATKAT SUDDHA ASHA POST HONAR ASATIL TAR MAG TYACHA FAYADA KAY. KUNBI ANI MARATHA JAR VAGVEGALE ASATIL TAR MAG RAIGAD KHORYAMADHE MARATHA LOKANACHI SANKHYA KUNBI PEKSHA JAST ASAYALA HAVI. MALA FACT EKACH SANGAVESE VATATE JAR KAHI FARAK ASEL TAR TO FACT SHRIMANTICHAY BABATIT ASU SHAKEL. FARAK FACT EKACH LOKKANI KELA ANI TE ME SANGANYACHI KAHI GARAJ NAHI.
    MARATHA ANI KUNBI MADHE DIFFERENCE:
    MARATHA -KSHTRIY ANI KUNBI -SHUDRA ...JEVHA BRAHMAN PATRIKA BHAGTAT TEVHA.
    MARATHA- VIDHAVA VIVAHALA ANUMATI NAHI ANI KUNBI-VIDHAWA VIVAH MANJUR AHE... ANI AJACHYA 21 VYA SHATKAT KITI LAGU PADTOY HA VICHAR HA...VIDHAWA VIVAHABADDAL JE KAHI SANGITAL JAT TI PRATHA KUNBYAMADHE PRACHALIT HOTI...

    ME SWATA KUNBI AHE ANI PURVICHI JI KHOT PRATHA KONKANT HOTI TICHYAMULE KUNBYACHE FAR NUKSAN ZALE... ATACHYA PARISTHIMADHE ASE DISUN YETE KI "OBC" reservation che fayade milanyakarta MARATHA caste people kunbi lokanche dakhale milavatat ani he prakar konkant sarras chalu ahet he mala suddha khedane namud karave lagatey.

    ani ho RSS RASTRIY SWAYAMSEVAK SANGH ajkal kunbi samajala javal karnyacha prayanta kartey pan tyachyakadun pan apeksha karane mhanaje payavar dhonda marun ghenyasarkhe ahe. ani tyanchi vicharsarani hi bhootkalat ghevun janari ahe . RSS apalya karyakrama madhe CHRISTEN missionary baddal lokanche prabodhan karate. maze avahan ahe samasta kunbi samajala ekvel CHRISTEN parvadatil ani tyachyakadun shikanyasarakh pan barach kahi ahe. visheshata ENGLISH LANGAUGE compared to OLD,OUTDATED SANSRIT language. KUNBI lokkanni history lakshat thevavi ani future cha vichar karava.thanks

    ReplyDelete
  10. Maratha jar soyinusar kunabi hot asel tar tyalach sonvani yancha aakshep ahe, baki vishay koni bharkatavu naka

    ReplyDelete
  11. जात पात धर्म या सगळ्याची सुरवात कुठून झाली.....कोणी ठरवलं जात,पात,धर्म,वर्ण ...हा ब्राह्मण हा कुणबी हा मराठा कोणी ठरवलं हे आणि कोणत्या base वर ठरवलं हे सगळं...मला कळेल का. आपण इतका जात पत धर्म मानतोय याची सुरुवात नेमकी कुठून झाली ते, ???

    कृपया प्रीतिसाद द्यावा

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...