Tuesday, January 24, 2012

तर पानिपत झालेच नसते.....


Image result for malharrao holkar

सर्वसंहारक पानिपत युद्धाला १४ जानेवारी २०१२ रोजी २५१ वर्ष झाली आहेत. तरीही या शोकांतिकेचा सल मराठी मन-मानसावरुन अद्यापही गेलेला नाही. ज्या वीरांनी या अकल्पनीय अशा युद्धात रक्त-प्राण सांडले त्यांना आदरांजली वहात मुळात हे युद्ध झालेच का? या प्रश्नाचा उहापोह येथे करायचा आहे.

अब्दाली पाचव्यांदा चालुन आला. खरे तर मराठ्यांनी पातशाही रक्षणाचा अहदनामा २३ एप्रिल १७५२ रोजीच केला होता. त्यानंतरही १७५६ मद्धे अब्दाली चवथ्यांदा चालुन आला होता, मराठे दिल्लीच्या रक्षणासाठी तिकडे फिरकलेही नाहीत. एका अर्थाने तो करारभंग होता. पाचव्यांदा अब्दाली चालुन आल्यानंतर मात्र स्वत: भाउसाहेब पेशवा आणि स्वत: विश्वासरावांनी उत्तरेकडे मोहीम काढावी यामागे नेमके काय कारण होते? रघुनाथरावांना, ज्यांना अटकेच्या मोहिमेमुळे उत्तरेची व तिकडील राजकारणाची जाण होती त्यांना का पाठवले नाही? अटक मोहिमेत रघुनाथराव कोटभरचे कर्ज करुन आले म्हणुन त्यांना उत्तरेकडे पाठवायला नानासाहेब पेशवे तयार नव्हते असा निर्वाळा शेजवलकर देतात. पण ते खरे आहे काय?

आणि कोणाला उत्तरेच्या मोहिमेवर पाठवायचे याचा खल करुन भाउसाहेबांची नियुक्ती करत भाउ उत्तरेत पोहोचेपर्यंत तिकडे शिंदे-होळकर काय करत होते?

हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत आणि येथे या प्रश्नांची थोडक्यात उपलब्ध पुराव्यांनुसार उत्तरे तपासायची आहेत.

बुराडी घाटावर युद्धात दत्ताजी शिंदेंचा झालेला अपघाती म्रुत्यु हा एकार्थाने मराठेशाहीवर मोठा आघात होता. उत्तरेत जरी शिंदे-होळकरांमुळेच मराठी सत्ता फोफावली असली तरी कोनत्याही सरदाराला डोइजड होवु देवु नये म्हणुन त्यांना आपापसात भांडत ठेवण्याचे तंत्र पेशव्यांनी याही बाबतीत वापरले होते. प्रत्यक्षात शिंदे आणि होळकर यांच्यात वैमनस्य निर्माण होईल अशा घटना घडुनही (उदा. कुंभेरीचा वेढा आणि त्यात झालेला खंडेराव होळकरांचा म्रुत्यु अणि तरीही शिंदेंनी केलेला तह.) होळकर आणि शिंदे उत्तरेतील पेशव्यांचे राजकारण सांभाळण्यासाठी कसे का होईना एक राहिलेले दिसतात. खरे तर दत्ताजीच्या म्रुत्युमुळे शिंदेंची बाजु कमजोर झाली होती. जनकोजी तरुण आणि अनुनभवी व त्यात जखमी होता. तरीही मल्हारराव होळकरांनी सुरजमल जाटाचीही मदत घेत शिंद्यांसह १४ जानेवारी १७६० ते २८ फ़ेब्रुवारी १७६० या काळात गनीमी काव्याने वेगवेगळ्या पद्धतीने चढाया करत पार सिकंदराबाद ताब्यात घेत अब्दालीच्या नाकावर टिच्चुन चौथाई वसुल केली.

अब्दाली दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्यात उत्सुक नव्हता हे सर्वच इतिहासकारांनी नोंदवले आहेच. त्याला परत जायची घाई होती. त्याने शेवटी मल्हाररावांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. अनेक चर्चा होत तहही झाला. त्याचा इतिहास उपलब्ध आहे तो असा..."अब्दालीचा नजीबला असलेला पाठिंबा लक्षात घेऊन शिंदे - होळकरांनी हाफिज रहमतखानाच्या मार्फत तोड ठरवली कि, नजीबचा प्रदेश त्याच्याकडे कायम ठेऊन अब्दालीला अब्दालीस मार्गस्थ करावे. या बोलण्यात गंगोबातात्या ( होळकरांचा कारभारी ) व हिंगणे ( पेशव्यांचा दिल्लीतील वकील ) यांचा सहभाग होता. तहाच्या वाटाघाटी चालू होत्या तेव्हा शिंदे - होळकर भरतपूर येथे होते. सुरजमल्ल जाट देखील मध्यस्थी करू लागला होता. नजीबकडे असलेला प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवायच्या अटीवर १३ मार्च सुमारास अब्दाली - मराठे यांच्यात तह घडून आला. पण उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर भाऊची नेमणूक झाल्याची बातमी येतांच नजीब घाबरला. अब्दाली छावणी उठवून निघालेला असताना, नजीबने त्यास येथेच रहाण्याची गळ घातली. परिणामी वरील करार फिसकटला. असे असले तरी मराठी सरदारांनी तहाची बोलणी सुरुचं ठेवली होती. १२ जून रोजी होळकर लिहितो, " गिलच्यांच्या फौजेतून हाफिज रहमतखान भरतपुरास आला. गंगाधरपंतांशी ( बहुतेक गंगोबा तात्या ) बोलत आहे. नजीबखानाने सलुखाचा संदर्भ चालविला आहे, पण आमचे विचारानुरूप बनत नाही. श्रीमंतही संनिध आले." ( मराठी रियासत - खंड ४ )"

पानिपत युद्धाचे नवीन भाष्यकार संजय क्षिरसागर यांनी जे वरील भाष्य केले आहे ते मननीय आहे. प्रा. मधुकर सलगरे यांनीही पानिपत युद्धाबाबतची जी साधने वापरली आहेत त्यातुनही वरील विचारांना व माहितीला प्रुष्टी मिळते.

आता १३ मार्च रोजी अब्दालीशी तह झाला आहे. या तहानुसार नजीबाला त्याचा प्रदेश तसाच मिळनार असुन दिल्लीची पातशाही व्यवस्था सुरजमल जाटाच्या इच्छेनुसार (म्हनजे अलीगौहर ऐवजी शहाआलमला पातशहा बनवणे) होणार आहे हे पक्के झाल्यानंतर अब्दालीला भारतात राहण्याचे कारण उरले नव्हते तसेच भाउलाही उत्तरेत मोहीम करण्याचे कारण उरले नव्हते. आणि अब्दाली परत जायला निघालाही होता.

पण कदाचित भाउला ही माहिती उशीरा मिळाली असावी कारण तो १४ मार्च १७६० लाच उत्तरेकडे निघालाही होता. स्वत: पेशवा एवढे मोठे सैन्य घेवुन उत्तरेकडे निघाला आहे हे समजताच नजीबाची भंबेरी उडने स्वाभाविक होते. रघुनाथराव पेशवा हा होळकरांच्या ऐकण्यातील होता, नजिबाचे प्राण त्यामुळेच वाचलेही होते. पण भाउ हा होळकरांचा द्वेष्टा असल्याने अब्दाली निघुन गेला तर आपली खैर नाही हे माहित असल्याने नजिबाने इस्लामची वाह-उलि-उल्लाहप्रणित दुहाई देत अब्दालीला थांबवुन ठेवले.

अनुभवी होळकरांना या स्थितीचा अंदाज आला होता हे पुढील घटनाक्रमावरुन स्पष्ट होते. होळकरांनी तरीही फिसकटलेला तह कायम करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी भाउंना चंबळेपार येवू नका अशी गळ घातली. भाऊसाहेब चंबळेकाठीच थांबते तर कदाचित नजिबाला हायसे वाटुन अब्दालीला त्याने परत जायची संधी दिली असती.

पण पेशवाईतले राजकारण येथे लक्षात घ्यायला हवे. रघुनाथराव पेशवा आणि होळकर यांच्यात सख्य आहे आणि रघुनाथरावांची राज्यत्रुष्णा पहाता होळकरांच्या मदतीने ते उत्तरेत स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण करतील अशी भिती नानासाहेबांना सतत वाटत होती. भाउची उत्तरेसाठीची नियुक्ती त्याचाच परिपाक. त्यामुळे होळकरांचा कोनताही सल्ला भाउ ऐकणे शक्यच नव्हते आणि झालेही तसेच. पुर्ण पानिपत प्रकरणात भाउने होळकरांचा एकही सल्ला न ऐकता नव्यानेच सेवेत रुजु झालेल्या इब्राहिमखान गारद्याचाच भरवसा धरला. तरुण जनकोजीलाही विचारात घेतले नाही. इब्राहिमखान प्रस्तुत गोलाची लढाई एक प्रकारे हाराकिरी ठरली. कारण गोलाच्या मागील बाजुचे सैन्य युद्धात कामी आलेच नाही. ते यावे यासाठी जी युद्धाचा दुपारनंतरचा रांगरंग पाहुन योजना करायला हवी होती ती भाऊने केलीच नाही. त्यामुळे युद्ध झाले ते फक्त इब्राहिमखान गार्दी, हुजुरात, शिंदे-होळकर आणि सरदार विंचुरकरादी गोलाच्या पुर्व, दक्षीण आणि पस्चिम बाजुवर. उत्तर सुरक्षीत राहीली...आणि उत्तरेच्या बाजुचे नियुक्त सरदारच आणि सैन्य आधीच पळाले.
या युद्धाच्या तीन दिवस आधीपर्यंण्त (११ जानेवारी 1761) भाऊसाहेब पेशवा अब्दालीशी तहाच्या वाटाघाटी करत होता. सरहिंदेची सीमा आणि दिल्लीच्या पातशहाची नियुक्ती या मुद्द्यांबद्दल तह अडकुन बसला होता. युद्धखर्च हाही एक मुद्दा होताच. महत्वाची बाब अशी आहे कि मुळात होळकरांनी व शिंद्यांनी १३ मार्च १७६० रोजी अब्दालीशी जो तह आधीच केलेला होता त्यातील अटी जवळपास अशाच होत्या. त्या आधीच मान्य करत भाउने संशयी स्वभाव बाजुला ठेवला असता तर त्याला सुखनैव सर्व तीर्थयात्राही करता आल्या असत्या आणि हवे तर बंगालवरही स्वारी करता आली असती. पानिपत घडलेच नसते!

पण या १३ मार्च १७६० च्या आधीच झालेल्या तहाबाबत इतिहासकार मौन बाळगत असतात हेही खरे!



13 comments:

  1. सोनावणीसाहेब इतिहासातील अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समोर आणलीत. मल्हारराव होळकर हे खरोखरच एक हुशार व्यक्तीमत्त्व होते. पेशव्यांच्या बावळटपणामुळेच पानिपतामध्ये मराठे हरले. पण बदनामी मात्र निष्कारण होळकरांची केली जाते. पण अनुभवी होळकरांचा एकही सल्ला न मानता पेशव्यांनी स्वत:च्याच पायावर कसा दगड पाडून घेतला, याचे आपण अत्यंत समर्पक वर्णन केले आहे. धन्यवाद, आमच्याही ज्ञानात भर पडली.

    ReplyDelete
    Replies
    1. malhar holkaramulech kharetar panipat ghdale. najibla tyane aapla maanas putr maanala hota. kityekda najib ayata taawdait saapadun sudha ya holkaraane tyala jawu dile. aani shewati swata bhawu,vishwasrao ani jankoji shinde ladhat asatana dekhil tyane yudhatun pal kaadhali...

      Delete
    2. Panipat hijadya peshwyanmulech marathe marle gele. Pan abdaali ne ek kam changle kela ki sundar brahman striya prteki daha dinarla lilav kela.

      Delete
  2. सुंदर लेख आहे. साहेब

    ReplyDelete
  3. पानिपत युद्ध झालेच नसते..आमचा दुष्टीकोण आता सुभेदार मल्हारराव होळकरांकडे पाहण्याचा खूप बदलला आहे. त्यांचे प्रयत्न आह्माला आपल्या लेखातून कळले.
    धन्यवाद

    ReplyDelete
  4. I think there is a mistake in year in following statement. Please correct it and dont mind :)
    ...या युद्धाच्या तीन दिवस आधीपर्यंण्त (११ जानेवारी १६६१) आद्ल्या ...

    ReplyDelete
  5. sonavini yancha jaawai shodh. mhane peshawe aapalyach sardaaranmadhe bhaandane laawat hote. purava dya ya baddal..

    ReplyDelete
  6. https://navnathaher.wordpress.com/category/%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%a2%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97/

    ReplyDelete
  7. खूप उपयुक्त माहीतीवर प्रकाश टाकणारा लेख आहे. पानिपत मराठी मनातील सलणारी भावना आहे. पानिपत युद्धाबाबत
    इतर प्रांतात काय बोलले जात असेल ?
    अब्दालीचे पुढे काय झाले ? मराठी सत्तेवर इतर प्रांतात काय बोलले वा लिहिले जाते यावर प्रकाश टाकावा .
    धन्यवाद सर

    ReplyDelete
  8. लेख वाचतांना मजा आली. enjoy केला. उत्कृष्ठ लेख.

    ReplyDelete
  9. आपला लेख खुप अभ्यास पुर्ण असून इतिहासाची सखोल माहिती दिली आहे.पहिल्या कधी न वाचलेल्या गोष्टी या लेखात आहेत.लेख खुप आवडला

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...