Wednesday, February 1, 2012

वैदिक धर्म म्हणजे नेमके काय?

सनातन वैदिक धर्म म्हनजेच "हिंदु" धर्म आहे अशी सर्वसाधारण सामाजिक मान्यता आहे, पण ते वास्तव नाही. खरे काय आहे हे समजावुन घेण्यासाठी मुळात वैदिक धर्म म्हणजे नेमके काय आहे हे माहीत असायला हवे. कोणताही धर्म वेगळा आहे हे ओळखण्याचे साधन म्हनजे:

१. मान्य धर्मग्रंथ
२. धार्मिक कर्मकांड
३. धार्मिक श्रद्धा
४. परलोकजीवनाविशयक कल्पना
५. मान्य जीवन मुल्ये
६. संस्थापक.

वैदिक धर्माची वरील मुद्द्यांवर चर्चा करुयात.

१. ऋग्वेद हा वैदिक धर्मियांचा महत्वाचा धर्मग्रंथ आहे. या वेदात यद्न्यप्रसंगी म्हणावयाचे मंत्र आहेत. या वेदात काही सुक्तात इतिहासविषयकही अनेक ऋचा आहेत. सामवेद हा स्वतंत्र वेद नसुन ऋग्वेदातील ऋचा कशा गायच्या याचे दिग्दर्शन करणारा वेद आहे तर यजुर्वेद हा काही विशिश्ट यद्न्यांचे सांगोपांग वर्णन करणारा वेद आहे. अथर्ववेद हा चवथा वेद म्हणुन इ.स.पु. च्या ४थ्या शतकापर्यंत मान्य नव्हता.

२. वैदिक धर्माचा उदय सरस्वती नदीच्या काठी राज्य करणार्या सुदास राजाच्या कारकिर्दीत झाला. त्याचा मुख्य प्रवर्तक म्हणजे वशिश्ठ होय. त्याचा काळ हा सरासरी इ.स.पु. २५०० वर्ष असा अंदाजिला गेला आहे.

३. या वेदाची एकुण दहा मंडले असुन तो १० ऋशिकुळांतील ३५०च्या वर व्यक्तिंनी रचला आहे. ऋग्वेद रचना ही जवळपास इ.स.पु. १७५० पर्यंत सुरु होती. यात एकुण १०१२८ ऋचा आहेत.

४. यद्न्य हे वैदिक धर्माचे महत्वाचे कर्मकांड असुन यद्न्यात विविध द्रव्ये, मांस यांची आहुती देवुन इंद्र, मित्र, वरुण, नासत्यादि शेकडो देवतांना आवाहन करत त्यांच्याकडुन धन, पशुधन, दिर्घायुष्य, आरोग्यादिची मागणी करणार्या ऋचा म्हटल्या जातात. अनेक यद्न्य तर १२-१२ वर्ष चालणारे असत.

५. वैदिक धर्मियांच्या देवता अमर नसुन त्यांचे आयुष्य मानवापेक्षा खुप मोठे असते ही श्रद्धा. म्हणजे इंद्रसुद्ध मर्त्य्यच, कारण अमरतेची संकल्पना वैदिक धर्मात नाही. वैदिक देवता या बव्हंशी निसर्गाची प्रतीके आहेत. उदा. इंद्र हा पर्जन्याचे तर मित्र हा सुर्याचे प्रतीक आहे.

६. वैदिक धर्मात मोक्षाची संकल्पना नाही. तसेच संन्यास मान्य नाही. दीर्घायुरोग्य लाभो हीच अपेक्षा असंख्य ऋचांमधुन केली आहे. संततीहीण मनुष्य वैदिक समाजाला मान्य नव्हता...म्हणुनच संन्यासही मान्य नव्हता.

७. आश्रमव्यवस्था (ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ व संन्यास) ऋग्वेदात नाही. ती प्रथा वैदिक नाही. असुर प्रल्हादाचा पुत्र कपिल मुनीने सर्वप्रथम आश्रम व्यवस्था प्रचलित केली. तिचा वैदिक धर्माशी संबंध नाही.

८. यद्न्यसंस्थेभोवतीच सारे वैदिक कर्मकांड फिरते.

९. वैदिक धर्मात मुर्ती वा मुर्तीपुजेला स्थान नाही. "पुजा" हा शब्द मुळचा द्राविड असुन त्याचा अर्थ होतो "माखणे", म्हणजे जल, तेल, सिंदुर वा प्रसंगी रक्ताने पुज्य मुर्तीला माखणे म्हनजे पुजा. पुढे तिचा अर्थ अधिक व्यापक झाला, पण पुजा ही वैदिक नाही.

१०. सोमरस प्राशण हा महत्वाचा धार्मिक विधी होय. ऋग्वेदाचे पहिले मंडल तर पुरेपुर सोमसुक्तांनी भरलेले आहे. सोम म्हनजे इफेड्रा ही नशा आननारी वनस्पती होते असे धर्मानंद कोसंबी यांनी म्हटले आहे. सोम म्हणजे भांगही असावी असेही एक मत आहे. सोमपान करुन नशा होत असे एवढे मात्र खरे.

११. वैदिक समाज हा पित्रुसत्ताक पद्धतीचा होता. स्त्रींयांना यद्न्यात भाग घेण्याचा अधिकार नव्हता. एकही वैदिक मंत्र स्त्रीच्या नांवे नाही हे येथे नमुद केलेच पाहिजे.

१२. वैदिक धर्मात वर्णांतर सहज शक्य होते. म्हनजे क्षत्रिय ब्रह्मकर्म करु शके तर वैश्यही क्षत्र कर्म करु शके. याचे महत्वाचे कारण म्हणजे "ब्रम्ह" या शब्दाची ऋग्वैदिक व्याख्या. ऋग्वेदानुसार "ब्रह्म" म्हणजे "मंत्र". जोही मंत्र रचतो तो ब्राह्मण अशी अत्यंत सुट्सुटीत व्याख्या आहे ही. थोडक्यात मुळ ऋग्वेदात वर्णव्यवस्था जन्माधारित नव्हती. पुरुष सुक्त हे प्रक्षिप्त आणि वर्णव्यवस्था सुद्ड्रुढ झाल्याच्या काळात ऋग्वेदात घुसवण्यात आलेले आहे.

१३. अहिंसेच्या व अपरिग्रहाच्या तत्वद्न्यानाला वैदिक धर्माची मान्यता नाही. किंबहुना यद्न्यांचा पाया हा हिंसा हाच होता व आहे. मात्रुगमन, गुरुपत्नीगमन, भगिनीगमन ही नंतर बनलेली निषिद्ध्ये आहेत. परदारागमनाबद्दल मौन आहे. सत्याची (ऋत) महती आहे.

१४. संस्कार हे वैदिक धर्माचे मुख्य अंग आहे. गौतम धर्मसुत्रानुसार ४८ संस्कार दिले असले तरी ऋग्वेदात फक्त ३ संस्कार आहेत. पुढे वैदिक धर्मात फक्त १६ संस्कार महत्वाचे मानले जावु लागले ते असे-
गर्भादान, पुंसवन, सीमंतोन्न्यन, जातकर्म, नामकरण, निष्क्रम, अन्नप्राशन, चुडाकर्म, कर्णवेध, उपनयन, वेदारंभ, केशांत, समावर्तन, विवाह, विवाहाग्नी स्वीकार व दक्षिणाग्नी, गार्हपत्य आणि आहवनीय या ३ अग्नींचा संग्रह...म्हणजे अग्निहोत्र.

१५. कुलदैवत/देवता वैदिक धर्माला मान्य नाहीत. शिव, पार्वती, गणपती, मारुती (याचे वैदिक नाव व्रुषाकपी) वा त्या परिवारातील देवता अवैदिक असुन यद्न्यप्रसंगी या देवतांनी विघ्न आणु नयेत अशा अनेक प्रार्थना ऋग्वेदातच आहेत. शिवास "शिस्नदेव" असे हीणवण्यात आले असुन त्याला "स्मरारि" (म्हणजे यद्न्याचा विध्वंसक) अशी संद्न्या आहे. विनायक तथा गणपतीस तर यद्न्यात विघ्न आणु नये म्हणुन "विनायक शांती" प्रथम करुन त्याला दुर जाण्याच्या प्रर्थना आहेत. त्यामुळे वैदिक धर्मियांसाठी विनायक हा "विघ्नकर्ता" होता...विघ्नहर्ता नव्हे. वैदिक धर्मात नसलेल्यांना "अयाजक" (यद्न्य न करणारे) असे संबोधुन त्यांची हेटाळणी केली आहे. तसेच वैखानस, समन, यती, संन्यासी अशा अवैदिक पंथीयांचीही निंदा केली आहे.

१६. या धर्माचा मुळ संस्थापक वशिष्ठ ऋषि असुन त्याच्या सोबतची अन्य ९ ऋषिकुले सहसंस्थापक मानता येतात. ही सारी ऋषिकुले सुदासाच्या काळात होती व जोवर सुदासाचा वंश चालु राहीला तोवर ऋग्वेद व अन्य वेदांची रचना होत राहीली. सरासरी सनपुर्वे १७५० मद्धे ही रचना थांबली.

१७. वेद हे मौखिक परंपरेने जतन करण्यात आले अशी एक श्रद्धा आहे. परंतु त्याबाबत शंका आहे. विस्म्रुत वेद एकत्रीत करुन मग त्या संहितेचे वेद व्यासांनी चार भागांत विभाजन केले असे महाभारतातच नमुद आहे. मुळ वेद नेमके कोणत्या भाषेत होते यावर आता संशोधन सुरु आहे. मुळ वेदांची भाषा ही संस्क्रुत असणे शक्य नाही असे माझे मत आहे आणि त्याबाबत विपुल पुरावे सामोरे येत आहेत.

वरील माहिती अत्यंत थोडक्यात असुन महत्वाचे मुद्दे तेवढे दिले आहेत. सखोल माहिती ज्यांस हवी आहे त्यांनी मुळात वेद वाचलेलेच बरे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांचे वैदिक धर्माविषयीचे पुस्तकही वाचावे.

त्यामुळे वैदिक धर्म म्हनजेच हिंदु धर्म अशी जी काही फुटकळ व्याख्या केली जाते ती मान्य होत नाही आणि त्यामुळेच लो. टिळक, सावरकर, गोळवलकरगुरुजी इ. प्रणित व्याख्या स्वता:ला सनातनी समजणार्यांनाच मान्य नाहीत हे येथे लक्षात घेतले पाहिजे. वरील विवेचन पहाता वैदिक धर्म हा स्वतंत्र धर्म आहे हे स्पष्ट होते. या धर्माप्रमाणे जेही आचरण करत असतील, कर्मकांडे करत असतील त्यांचा धर्म नि:संशय "वैदिक" आहे. हा धर्म "धर्म" म्हणुन सर्व बाबींची पुर्तता करतो. फक्त तो आचरणात आननारे कोण आहेत आणि इंद्रदि वैदिक देवतांची आराधना करणारे कोण आहेत हेही क्रुपया स्पष्ट करावे. इंद्रादि देवतांची मंदिरे नाहीत कारण मुर्तीपुजा मुळात वैदिक धर्माला मान्य नाही हे मी आधीच स्पष्ट केले आहे.

थोडक्यात हिंदु आणि वैदिक धर्म हे नि:संशयपणे वेगळे आहेत हे उघड आहे.4 comments:

 1. वैदिक धर्म आणि हिंदू धर्म हे वेगळे आहेत हे स्पष्टपणे जाणवते. वैदिक धर्माबद्दल आपण माहिती दिलीत. पण प्रचलित हिंदू धर्माविषयी नेमके सांगावे. हिंदुना धर्म संस्थापक आणि धर्मग्रंथ नाही. त्यामुळे हिंदू हा धर्म नसून एक संकृती आहे असे अनेक जण म्हणतात. परंतु या संस्कृतीला धर्माचे स्वरूप का प्राप्त होऊ शकले नाही. बहुजन समाजात वैदिक धर्मातील रुढी आढळत नाहीत. त्यांची कुलदैवते वेगवेगळी असतात. शंकर हा मात्र सर्व बहुजन, आदिवासी जातींमधून आदरणीय आहे. हिंदू संस्कृती ही एक नसून अनेक संस्कृत्यांचे एकीकरण झालेली संस्कृती आहे असेही वाटते. यावर नेमके मार्गदर्शन करावे. हिंदू लोकांचे धार्मिक ग्रंथ याबद्दलही सांगा.

  ReplyDelete
 2. बुद्ध द्वारा यग्य[यद्न्य] की प्रशंसा-डा.अंबेडकर
  by Madhusudan Cherekar on Monday, February 13, 2012 at 8:42am ·
  भगवान बुद्ध और उनका धम्म,प्रथम डिलक्स संस्करण,२०१०,पृ.क्र.३७४,परिच्छेद५:-
  "लेकिन हे ब्राह्मण!जिस यद्न्य में गोहत्या नही होती-पशुओं की हत्या नही होती-ऐसा यद्न्य जिसमें पशुओं की बलि नही दी जाती-ऐसा यग्य[यद्न्य] मेरी प्रशंसा का पात्र है.उदाहरण के लिए चिरस्थापित दान या परिवार के सदस्यों के कल्याण के लिए त्याग."

  ReplyDelete
 3. वेदांची रचना कुणी केली?वेदांविषयी बुद्धांचे आणि बुद्धानुयायांचे काय मत होते हे जाणून घेणे रूचकर ठरेल.
  महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या वासेष्ठ आणि भारद्वाज या दोन ब्राह्मण शिष्यांशी चर्चा करताना ब्राह्मण मंत्रांच्या दहा रचनाकार ऋषींची नांवे सांगतात:-
  अष्टक
  वामक
  वामदेव
  विश्वामित्र
  यमदग्नी[जमदग्नी?]
  अंगीरस
  भारद्वाज
  वसिष्ठ
  काश्यप
  भृगु
  [तिपिटक में सम्यक सम्बुद्ध,पृ.क्र.१८६]
  आता या ऋषींविषयी अट्ठकथा[बुद्धवाणीवरील भाष्य] काय म्हणते ते पहा:-
  "[अट्ठक आदि ऋषियों ने] दिव्य चक्षु से देखकर भगवान काश्यप सम्यक सम्बुद्ध के वचन के साथ मिलाकर ,सून्य को पर-हिंसा-शून्य,ग्रंथित किया था.उस में दूसरे ब्राह्मणों ने प्राणि -हिंसा आदि डालकर तीन वेद बना,बुद्ध-वचन से विरुद्ध कर दिया."
  [मज्झिम निकाय,सम्यक प्रकाशन,पृ.क्र.४३१,चंकि सुत्त,बुद्धाब्द२५५३]
  विसाव्या शतकातील ब्रह्मदेशातील महान भिक्षु लेडी सयाडो यांनी वेदांचे अध्ययन केल्याचा उल्लेख विपश्यना विश्व विद्यापीठ,इगतपुरीने प्रकाशित केलेल्या सयाजी उ बा खिन जर्नल मध्ये आला आहे.हे वेदाध्ययन त्यांनी बौद्ध भिक्षुंच्या मार्गदर्शनाखालीच केल्याचा उल्लेख आहे.

  श्रमण परम्परा ही वेदांपेक्षा प्राचीन असून त्या परम्परेत अनेक सम्यक सम्बुद्ध होऊन गेले.परंतु भगवान गौतम बुद्धांचा जन्म होण्यापूर्वी त्यांनी शिकवलेली विपश्यना साधना लोक विसरले होते.तरीही तीन वेदांमध्ये त्यापूर्वी होऊन गेलेल्या भगवान काश्यप बुद्धांच्या वाणीचे पडसाद पाहावयास मिळतात.
  उदा>ऋग्वेदातील ही ऋचा पहा:
  यो विश्वाभि विपश्यति भुवन संचपश्यति
  सनपार्षदति द्विष:
  जो विश्व के अभिमुख होकर विपश्यना करता है वह सत्य देखता है और द्वेषॊं के पार चला जाता है.
  यजुर्वेद:
  १६-३
  मा हिंसी: पुरुषं जगत/
  जगत में किसी मनुष्य की हिंसा मत करो

  इमं मा हिंसी: द्विर्पादं पशुं
  मयुं पशुं इम्म मा हिंसी: एकशफ़ं पशुं[यजुर्वेद-१३-४७-४८]
  दो पाय वाले.पशु या मनुष्य की,एक पैर वाले पशु की हत्या न करो.

  गां मा हिंसीरदितिं विराजं[यजुर्वेद १३-४३]
  अदितीप्रमाणे शोभायमान गायीची हिंसा करू नका.

  इमं साहस्रं शतधारमुत्सं
  व्यच्चमानं शरीरस्समध्ये
  घृतं दुहानामद्दितिं
  जनायाग्ने मा हिंसी: परमं व्योमन[यजुर्वेद १३.४९]

  हे अग्नी !सैकडो-हजारों को पोसनेवाली,दूध का कुआं,घृत देनेवाली गाय का वध ना करो.

  परंतु आगे जाकर यग्य में जब गायों का वध हुआ तो भगवान बुद्ध ने सुत्तनिपात में इसका वर्णन करते हुए कहा-
  न पादा न विसाणेन नास्सु हिंसन्ति केणचि
  गावो एळकसमाना,सोरता कुम्भदूहना
  जो गायें न पैर से न सींग से,न किसी और अंग से हिंसा करती है,जो भेड के समान सीधी हाइ और घडाभर दूध देती है..

  संयुत्तनिकायातील अट्ठिसुत्तामध्ये भगवान गौतम बुद्धांनी गो-हत्येचा प्रखर विरोध केलेला आहे.

  अशा प्रकारे बुद्ध वचनांशी जुळणार्या वेदांतील ऋचा या हिंदू आणि बौद्ध यांचा समान वारसा आहेत.आपण फक्त एकाच वंशाचे आणि देशाचेच नाही तर एका समान वारशाचेही आहोत.

  ReplyDelete
 4. १. ऋग्वेद हा वैदिक धर्मियांचा महत्वाचा धर्मग्रंथ आहे. या वेदात यद्न्यप्रसंगी म्हणावयाचे मंत्र आहेत. या वेदात काही सुक्तात इतिहासविषयकही अनेक ऋचा आहेत.
  >>> AXEUALLY बिरादर, वैदिक वेदात इतिहास मानत नाहीत.
  ____________
  अथर्ववेद हा चवथा वेद म्हणुन इ.स.पु. च्या ४थ्या शतकापर्यंत मान्य नव्हता.
  >>> उम्म, क्रीश्द्विपाय्न व्यास यांच्या आधी वेद अखंड होता असा स्पष्ट इतिहास आहे.
  _____________
  २. वैदिक धर्माचा उदय सरस्वती नदीच्या काठी राज्य करणार्या सुदास राजाच्या कारकिर्दीत झाला. त्याचा मुख्य प्रवर्तक म्हणजे वशिश्ठ होय.
  >>> अरे हा हा हा , नाही. वेद धर्माच्या उदयाचा कोणताही इतिहास नाही असेल तरी तो आद्य ब्रह्म यांच्या पासून असेल. वाशिस्थ खूप नंतर आले.
  _______________
  ऋग्वेद रचना ही जवळपास इ.स.पु. १७५० पर्यंत सुरु होती.
  >>>> हे हे हे, महाभारत युधीस्थर कॅलेंडर जिथ ई.स.पु. २००० च आहे तिथ वेद १७५० पासून कशे सुरु होतील? वेद तर युधीस्थर चे पणजोबा जन्मायच्या आधी सुद्धा होते.
  ________________
  उदा. इंद्र हा पर्जन्याचे तर मित्र हा सुर्याचे प्रतीक आहे.
  >>> नाही, कित्तेकदा सर्वांचा राजा म्हणून परमेश्वराला इंद्र हि पदवी दिलेली आहे,राज्य करणाऱ्या राजांना जे आदेश दिलेले आहेत त्यात त्यांना सुद्धा इंद्र पदवी दिलेली आहे.
  __________________
  असुर प्रल्हादाचा पुत्र कपिल मुनीने सर्वप्रथम आश्रम व्यवस्था प्रचलित केली.
  >>>> मुनी कपिल प्रलाधाचे पुत्र कधी झाले ? काही जावई शोध .


  संजय सोणवणीजी प्रत्युतर कराल हि अपेक्षा

  ReplyDelete