ओबीसींची ससेहोलपट किती काळ? या माझ्या लेखावर प्रसिद्ध पत्रकार श्री. सुर्यकांत पळसकर यांनी खालील अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया नोंदवलेली आहे व त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यांची संपुर्ण प्रतिक्रिया मी येथे आधी देत आहे. या लेखात त्याधारितच चर्चा करणार आहे...
"मा. श्री. संजय सोनवणी साहेब,
मी तुमचा ब्लॉग नियमित वाचतो. तुमचा अभ्यास दांडगा आहे, हे लेखांवरून स्पष्टच दिसते. ओबीसींबाबत तुम्ही व्यक्त केलेली खंत योग्यच आहे. विशेषत: बोगस जात प्रमाणपत्रांचा मुद्दा फारच गंभीर आहे. तथापि, आपले हे विश्लेषण बरेचसे मोघम झाले आहे. स्थळ-काळ आणि व्यक्तींचे संदर्भ दिले असते, तर मोघमपणाचा दोष टाळता आला असता. तसेच अनुत्तरीत राहिलेल्या काही प्रश्नांची उत्तरेही कदाचित मिळाली असती.
ओबीसींचा जो आकडा तुम्ही सांगता आहात तो पचायला जरा जड जातोय. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ओबीसींचा आकडा खरोखरच ५२ टक्के असेल, तर ओबीसी नेत्यांना कोणाच्या आधाराची गरजच काय? त्यांची एकहाती सत्ता राज्यात यायला हवी. पण परवाच्या निवडणुकांत दिसलेली वस्तुस्थिती फार वेगळी आहे. छगन भुजबळांचा नाशिक जिल्ह्यात धुव्वा उडाला आहे. गोपीनाथ मुंडे यांना बीडमध्ये फार चमत्कार दाखविता आलेला नाही. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद भूषविणारे गोपीनाथ मुंडे परळीसारख्या एका तालुक्यात अडकून पडले होते.
५२ टक्के लोकसंख्या असूनही जर ओबीसींना सत्ता मिळविता येत नसेल, तर त्याचे अनेक अर्थ निघतील. तुमचा लेख वाचून माझ्यातील पत्रकाराला अनेक शक्यता दिसल्या. त्या पुढे थोडक्यात देत आहे.
१- ओबीसी समाजाला सत्तेत रस नसावा.
२- सत्ता हाती घेण्यापेक्षा ओबीसी जनतेला आपल्याच नेत्यांचा पराभव करून त्यांची मानहानी करण्यात जास्त रस असावा.
३- सत्तेत रस आहे, पण सत्ता हाती कशी घ्यायचे याचे ज्ञान त्यांना नसावे.
४- सत्ता ताब्यात घेण्याएवढे संख्याबळच ओबीसी समाजाकडे नसावे.
५- सत्ता ताब्यात घेण्याजोगे संख्याबळ असले तरी, ओबीसी समाज उदार अंत:करणाने दुसèया जातीच्या हाती सत्ता सोपवित असावा.
६- ओबीसी समाजाचा कोणी तरी बुद्धिभेद करीत असावे. त्यामुळे त्यांना सत्ता ताब्यात घेणे जमत नसावे.
आणखीही अनेक शक्यता वर्तविता येतील. पण नमुना म्हणून एवढेच पुरे.
बोगस प्रमाणपत्रे घेऊन निवडणुक लढविणे हे पापच आहे. पण, येथे प्रश्न फक्त बोगस प्रमाणपत्राचा नाही. प्रश्न आहे संख्याबळाचा. बोगस प्रमाणपत्र घेणाèया उमेदवाराचा संख्याबळाच्या आधारे सहज पराभव करता येतो. झेडपी, पंचायत समित्या, qकवा नगरपालिका निवडणुकीचे क्षेत्र फार मोठे नसते. सर्व जण उमेदवारांना नावनिशी ओळखत असतात. हा प्रश्नांचा तिढा कसा सोडवायचा? तसेच, संख्याबळ असतानाही भुजबळ, मुंडेसारख्या नेत्यांना अपमानित करण्यामागील ओबीसी जनतेचा हेतू काय, हेही येथे अस्पष्टच राहते. आपण मोघम न लिहिता स्थळ-काळ आणि व्यक्तिनामासह विश्लेषण केले असते, तर या प्रश्नांची उत्तरे कदाचित मिळू शकली असती.
लोकशाहीत ताकद असतानाही कोणी सत्ता ताब्यात घेत नाही, इतकेच नव्हे तर दुसèया कोणाच्या तरी हाती सत्ता सोपवून दिले जाते, हे मनाला पटवून घेताना जरा जड वाटतेय. काही तरी चुकते आहे खास. काय चुकते आहे?"
ओबीसींची टक्केवारी:
ओबीसींचा आकडा ५२% आहे व ही टक्केवारी मंडल कमिशनच्या अहवालावरुन घेतली गेलेली आहे. आता जातनिहाय जनगणना होत असल्याने, व दरम्यानच्या काळात त्यात काही जातींचा समावेश करण्यात आला असल्याने या टक्केवारीत अधिकची भर पडण्याचीच शक्यता आहे. जातनिहाय जनगणनेला अनेक नेत्यांनी व राजकीय पक्षांनी विरोध केला असला तरी संसदेत श्री समीर भुजबळ व श्री गोपिनाथ मुंढे, लालुप्रसाद यादव आदिंच्या आग्रहाने या वेळीस जातीनिहाय जनगणना होत आहे. प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरि नरके यांनी या मागणीला अनेक लेख लिहित सैद्धांतिक व वैचारिक बळ पुरवले हेही येथे लक्षात घ्यायला हवे.
या जातनिहाय जनगणनेला विरोधाचे मुख्य कारण हेच होते कि ओबीसींना आपली खरी संख्या समजली तर शक्तीही कळेल आणि कदाचित राजकीय समीकरणेही बदलतील. जातनिहाय जनगननेमुळे जातीयवाद वाढेल असा विरोधकांचा दावा होता, परंतु धर्मनिहाय जनगणना, जी आजवर होत आलीच आहे, तीमुळे जर धार्मिक तेढा निर्माण झाला नाही तर जातनिहाय जनगणनेमुळे जातीयवाद कसा वाढेल असे प्रतिपक्षाचे मत होते आणि तेच शेवटी ग्राह्य झाले.
त्यामुळे ओबीसींची संख्या ही लोकसंखेच्या प्रमाणात किमान ५२% आहे हे तर नक्कीच आहे. ओबीसींमद्धे हिंदु ओबीसीच नव्हेत तर मुस्लिम, ख्रिस्ती, जैन व शीख ओबीसीही आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. सध्या ओबीसींना २७% एवढेच आरक्षण आहे व त्यातही क्रीमी लेयरची पाचर आहे. त्याचे दु:ष्परिणाम नेमके काय होत आहेत याबाबत स्वतंत्र लेखातच चर्चा करावे लागेल एवढा हा भाग व्यापक आहे.
५२% लोकसंख्या असुनही ओबीसींना सत्ता का मिळत नाही?
श्री. पळसकर साहेबांचा हा पहिला प्रश्न अत्यंत रास्त आहे. श्री. छगन भुजबळांचा महानगरपालिका निवडनुकांत नाशिकमद्धे धुव्वा उडाला असुन श्री. मुंढेही बीडमद्धे विशेष चमत्कार दाखवु शकलेले नाहीत हे श्री. पळसकर यांचे निरिक्षण योग्य असेच आहे. मुंढे राष्ट्रीय स्तरावरील नेते असुनही त्यांनी बीडमद्धेच का अडकुन पडावे हाही प्रश्न अत्यंत योग्यच आहे. या प्रश्नांचा वेध घेणे हे एक आव्हान आहे. पण आधी आपण यामागील कारणे तपासुन पाहुयात.
१. ओबीसी हा मुलचा निर्माणकर्ता समाजघटक होता. जीवनोपयोगी साधनांची निर्मिती करणे वा सेवा देणे हे त्याचे शतकानुशतके चरितार्थाचे साधन होते. गांवगाड्यात त्याला बलुत्यावर तर कुणब्यांना शेतमजुर ते पट्ट्याने (खंडाने) जमीनी कसुन उपजिविका करावी लागत असे. कुलकायद्यामुळे कुनब्यांची नांवे किमान सात-बा-यावर आली तरी, परंतु ओबीसींचा आर्थिक खात्मा तत्पुर्वीच झालेला होता. अठराव्या शतकापासुन सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे या वर्गाची गरजच जवळपास संपली. हस्तकौधल्ल्यावर आधारित असलेल्या बव्हंशी उद्योगांची वाट लागली. त्यामुळे जे आर्थिक संक्ट कोसळले त्यामुळे हा वर्ग उत्पन्नाची नवी साधने शोधण्यासाठी बाहेर पडला....मजुरी ते कामगार/हमाल/नोकर अशी नवी चरितार्थाची साधने त्याला शोधावी लागली. गायराने, चरावु कुरणांची संख्या कमी होत गेल्याने धनगर समाजाची वेगळीच ससेहोलपट सुरु झाली. परंपरागत माळीकाम करनारे अद्रुष्य होत नवीनच तंत्रे पुढे आल्याने त्यांचीही पीछेहाट होत गेली. याला अपवाद आहेत, पण अपवादानेच नियम सिद्ध होतो.
या सर्वाचा एकत्रीत परिणाम म्हनजे पोटाच्या प्रश्नाने भेडसावल्या गेलेल्या व नवीन अवस्थेशी जुळवुन घेण्याची कसरत करु लागलेल्या या समाजाला मुळात आत्मभानच आले नाही. त्यामुळे राजकीय आकांक्षा कोठुन येणार? आपण संख्येने किती आहोत, त्याचे राजकीय गणित काय असु शकते, राजकीय गणित साधले तर ओबीसींच्या सामाजिक व आर्थिक हितासाठी काय करता येणे शक्य आहे या जाणीवाच मुळात विकसीत झाल्या नाहीत.
अलीकडे (हा लेख मी महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवला आहे.) काही प्रमाणात जनजागरण सुरु झाले आहे. ते पुरेसे नसुन ते एका व्यापक चळवळीत बदलले पाहिजे हे खरेच आहे. मुंढे व भुजबळांची समस्या नेमकी वरील विवेचनात आहे. पण ती मी येथे अधिक स्पष्ट करतो.
मुंढे हे वंजारी समाजाचे असुन बीड भागात या समाजाचे प्रमाण मोठे आहे. मुंढेंना किमान त्यांच्या व अल्प प्रमानात अन्य ओबीसींचा पाठिंबा आहे. मागील विधानसभा निवडनुकीत "वाजवा तुतारी: हाकला वंजारी" अशा घोषणा राजरोसपणे दिल्या जात होत्या. मुंढे हे ओबीसींचे नेते नसुन वंजा-यांचेच आहेत कि काय असे चित्र राजकीय पक्षांनी तसेच माध्यमांनीही निर्माण केले आहे. व हे नेत्रुत्व पुन्हा बीजेपी सारख्या पक्षाशी निगडीत असल्याने परंपरागत कोंग्रेसी ओबीसी हा दुर राहतो हेही एक वास्तव आहे. (पण ते पक्षीय राजकारणात सर्वांनाच लागु आहे.) मुंढेंना बीड/परळीतच का अडकुन पडावे लागते याचे उत्तर त्यांना आपला मतदारसंघ सांभाळणे याचेच आव्हान जास्त मोठे आहे.
भुजबळांबाबत म्हणायचे तर नाशिकमधील पानिपत अपेक्षित असेच होते. ऐन निवडनुकीच्या तोंडावरच नव्हे तर त्याही आधीपासुन त्यांची अकारण पदावनती करत त्यांचे पंख कापायला सुरुवात झालेली होतीच. अत्यंत सक्रिय मराठा लोबीने भुजबळांना नाशिकात "त्यांची जागा" दाखवुन देण्यचा प्रयत्न केला. यशस्वीही झाले. यातुन लवकरच काहीतरी वेगळे निघेल असे दिसते. लोबीने (कोणत्याही पक्षातील असो.) तीच गेम मुंढेच्या बाबतीत केली...पक्षातील त्यांचे स्थान धोक्यात आनले गेले...त्यांच्याच घरात फोडाफोड करुन खेळली गेली. ओबीसी नेत्रुत्व शक्यतो निर्माण होवु द्यायचे नाही, झाल्यास त्यांना डोईजड होवु द्यायचे नाही हा खेळ महाराष्ट्रात कोणती सत्ताधारी जात खेळते आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही...पक्ष कोणताही असो. माळ्यांच्या बाबतीत गेल्या विधानसभा निवडनुकीत...वाजवा टाळी...हाकला माळी" अशा घोषणा देण्यत येत होत्या हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.
माळी-वंजारी यांबरोबरच विस्त्रुत मोठा असलेला समाज म्हणजे धनगर. या वर्गाला तर जवळपास शुन्य प्रतिनिधित्व आहे. महादेव जानकरांनी राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. शरद पवारांच्या विरोधात उभे राहुन लाखभर मते मिळवली. हे खरे असले तरी हा समाजही राजकारणात नगण्य आहे.
अशा स्थितीत जर माळी-वंजारी-धनगर हे लोकसंख्येने ओबीसींतील मोठे जातीघटक असतांना त्यांची ही अवस्था आहे तर शिंपी, सोनार, साळी, तेली, कोष्टी, धोबी, न्हावी, सुतार इ. ना कोण विचारतो? आणि ते कोणत्या बळावर राजकीय स्वप्ने पाहतील? या अन्य जातीयांची जातनिहाय संख्या अखिल महाराष्ट्रातच मुलात ५-१० लाखांवर नाही...त्यांची वोट ब्यंकच नाही...आणि सारे ओबीसी एक आहेत, सारेच एकाच समाजघटकातुन व्यवसायानुसार कालौघात वेगळे झाले आहेत...आता ते व्यवसाय उरलेले नाहीत...त्यामुळे पुन्हा एकत्र या असे सबळ आवाहन करत तात्विक पायावर त्यांना एकत्र आणेल असे नेत्रुत्व मुलात उपलब्ध नाही. श्री. महादेव जानकर हे एकमेव कि जे या दिशेने प्रयत्न करत आहेत...परंतु त्यांच्या प्रयत्नांना अजुन व्यापक रुप यायचे आहे आणि त्यासाठी सामाजिक पाठबळही उभे व्हायचे आहे. भुजबळांनी समता परिषदेच्या माध्यमातुन तसे प्रयत्न आधीच सुरु केले आहेत, परंतु त्याची फळे नाशिकात तरी त्यांना विशेष मिळालेली दिसत नाहीत. आणि जोवर फक्त "माळी" हा शिक्का आहे तोवर वेगळे काही होईल अशी शक्यता दिसत नाही.
याचा अर्थ श्री. पळसकर म्हनतात तसाच घ्यावा लागतो कि ओबीसींना आपल्याच नेत्यांना पाडन्यात आनंद वाटतो कि काय? त्यांचा कोणी बुद्धीभेद करतो कि काय? खरे आहे. ही कटु वस्तुस्थिती मान्य केलीच पाहिजे. लोकसंखेच्या प्रमाणात सत्ता हवी असेल तर ती माळी,धनगर, वंजारी आहे म्हणुन नव्हे तर "ओबीसी" आहे म्हणुनच मिळु शकते, विशिष्ट ओबीसी जातीचा म्हणुन नव्हे हे जोवर ओबीसींतील सर्वच जाती लक्षात घेत नाहीत, त्यांच्यात तेवढा विश्वास निर्माण केला जात नाही, त्यांना (ओबीसींतील सर्वच जातीयांना) कोणत्या ना कोनत्या प्रमानात, कोठेनाकोठे प्रतिनिधित्व मिळेल अशी खात्री देता येत नाही तोवर ओबीसी एकीकरण ही एक अवघड बाब आहे. परंतु ती अशक्य नाही. किंबहुना ती सुरुवात झालेलीही आहे, परंतु त्याची फळे दिसायला वाट पहावी लागेल.
माळी/वंजारी व धनगर असे शिक्के मारल्याने अन्य ओबीसींचा बुद्धीभेद होतो, किंबहुना तसा प्रचार करण्यामागे असा बुद्धीभेद करणे हेच कारण असते हेही एक वास्तव आहे. वंजारी पडला तर कोळ्याने का वाईट वाटुन घ्यायचे...धोबी उभा असेल तर मग पाडलाच पाहिजे अशी काहीशी मनोव्रुत्ती ओबीसींची आहे हे अमान्य करता येत नाही.
अन्य जातीयांना सत्ता देण्यात ओबीसींना रस आहे असे नसुन मुळात उमेदवार निवडीतच ओबीसींना फाटा दिला जातो. त्यामुळे मतदान तर होतेच...ज्यांना निवडुन यायचे ते येतात...फक्त त्यात ओबीसी नसतात...एवढेच! जेथे ओबीसी आरक्षण असते तेथे बोगस कुनबी असतातच...खटले भरले तरी त्याचा निकाल लागेपर्यंत टर्म संपलेली असते. मग ख-या ओबीसीने काय करायचे?
आणि हेच वास्तव आता ओबीसींना समजावुन घ्यावे लागणार आहे. समजवुन सांगावे लागणार आहे. या समाजाचे बहुसंख्य असुनही जे पराकोटीचे विभक्तिकरण झाले आहे त्यालाच आधी रोखत, समान सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय प्रश्नांसाठी तरी एकत्र यावे लागणार आहे. नाहीतर हा समाज गुलाम तर होताच...पुढे तो अशा गुलामीत जाईल कि कोणत्याही क्रांतीची संभावनाच संपुन जाईल.
चुकते आहे ते येथेच कि सकारात्मक शक्यताच हा समाज विसरला आहे. या चुका येथेच थांबत नाहीत तर त्यांची संख्या अजुन मोठी आहे...पण त्याबद्दल पुढे.
मी श्री. पळसकर साहेबांचा खुप आभारी आहे कि त्यांनी ही चर्चा पुढे न्यायला अनमोल मदत केली आहे. त्यांचेही या विवेचनावरील विचारांची प्रतिक्षा आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी
ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
Faar chaan lekh Sonawani Saheb.
ReplyDeleteChala tumhich manya kelet ki OBC samajamadhech eki nahi. asha eki naslelya samajala rajakiya pratinidhitwa kase milayche? ha samaj gulam tar hotach aani aata ajun jasti gulamit jaail hey tumhich manya kelet te bare zaale. pan mag ya saglyawar tumhi kaay upay suchawita? tathakathit uchchawarniyankadun aani nirmankartya saamajakadun tumchya kaay apeksha aahet? aarakshan sodun dusra kahitari upay suchwa. karan tyacha farsa kahi sakaratmak parinam zalyacha tumchya lekhatun disat naahi.
मा. श्री सोनवणी साहेब,
ReplyDeleteविश्लेषण खरोखरच उत्तम झाले आहे. एका दुर्लक्षित विषयाला तुम्ही हात घातला आहे. या विषयावर तुम्ही मुख्य प्रवाहातील मीडियामधून लिहावे, बोलावे, असे सूचवावेसे वाटते.
तुमचा दादोडी कोंडदेवांवरचे लेख खूपच अभ्यासपूर्ण आहेत. ते आवडले. इतर लेखही चांगले आहेत.
सोनवणी साहेब दादोजी कोंडदेवासंबंधीचे तुमचे विश्लेषण खूपच प्रभावी होते. तुमची मांडणी अभ्यासातील खोलीमुळे खूपच चांगली झाली आहे. पण या लेखात माझ्या मते काही चुका झाल्या आहेत. त्या अशा: १) ओबीसी नेत्रुत्व शक्यतो निर्माण होवु द्यायचे नाही, झाल्यास त्यांना डोईजड होवु द्यायचे नाही हा खेळ महाराष्ट्रात कोणती सत्ताधारी जात खेळते आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही... हे तुमचे विधान मराठा जात डोळ्यासमोर ठेऊन केले आहे असे मी समजतो. या विधानाशी मी अंशतः सहमतही आहे. अंशतः यासाठी की हा खेळ पूर्ण मराठा जात खेळत नसून मराठा जातीचे पुढारी खेळत आहेत. त्यांना संपूर्ण मराठा जातीचे प्रतिनिधी निदान याबाबत तरी म्हणता येणार नाही. ते स्वतःला मराठ्यांचे प्रतिनिधी समजत असते तर त्यांनी मराठ्यांच्या हिताचे काहीतरी धोरण राबविले असते. आज ग्रामीण भागातील, विशेषतः जिरायत भागातील मराठ्यांची अवस्था पाहिल्यास या पुढाऱ्यांनी मराठा हिताचे कोणते धोरण राबविले ते स्पष्ट होते. या बाबीचा उल्लेख आपल्या लेखात यायला हवा होता. मात्र तो आलेला नाही. तो चुकून राहिला असावा अशी अपेक्षा करतो.
ReplyDelete२) भुजबळ हे माळ्याचे व मुंडे वंजार्यांचे प्रतिनिधित्व करतात, असे आपले मत या लेखातून दिसते. मराठा नेते त्यांचे पंख छाटत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. तुमचे वरील विधान (ओबीसी नेत्रुत्व शक्यतो निर्माण होवु द्यायचे नाही, झाल्यास त्यांना डोईजड होवु द्यायचे नाही हा खेळ महाराष्ट्रात कोणती सत्ताधारी जात खेळते आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही...) तेच सुचवते.
मराठा नेते प्रस्थापित झाल्यामुळे जसा मराठ्यांचा फायदा होऊ शकला नाही, तसाच या दोघांच्या प्रस्थापित होण्याने माळी तसेच वंजार्यांचा होणार नाही. दोघांनाही ओ बी सी च्या प्रश्नांची जाण असल्याचे कधी दिसले नाही. खाउजा धोरणामुळे संपूर्ण आरक्षणच धोक्यात आले आहे. परंतु त्याविरुद्ध लढा उभारण्याऐवजी दोघेही ते धोरण राबविणाऱ्या पक्षांची पालखी वाहण्यात धन्यता मानत आहेत. त्यांच्या प्रस्थापित होण्याने त्यांच्या जातीहिताऐवजी पक्षांचे धोरण यशश्वी होण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यांचे पक्ष व नेते भांडवलदारांचे व ब्राम्हणवादाचे भोई आहेत. (मुंडेंचा जनाधार वाढल्यास ते राम मंदिराचा मुद्दा गुंडाळून ठेवतील, याची खात्री देऊ शकाल काय?) अशा नेत्यांचे नेतृत्व निर्माण होऊ न दिल्याबद्दल दुख: वाटण्याचे काही कारण नाही, असे मला वाटते.
महादेव जानकर यांच्याबाबत असे म्हणता येणार नाही. त्यांची कोणतीही कृती भांडवलदार किंवा ब्राम्हणवादाच्या हिताची असल्याचे आजवर दिसलेले नाही. त्यामुळे त्यांना ताकद देणे गैर म्हणता येणार नाही.
तथाकथित मराठा नेते, माळी नेते, वंजारी नेते यांना बाजूला सारून भांडवलशाही व्यवस्थेचे बळी असलेले मराठा, माळी, धनगर, वंजारी आणि इतर छोट्या obc जातींना, sc st यांना सोबत घेऊन सर्वांच्याच मुळावर उठलेली भांडवलशाही व ब्राम्हणशाही गाडावी, अशी मांडणी केल्यास अधिक योग्य ठरणार नाही का?
संजय सोनावणी जी, तुम्ही म्हणलात की महाराष्ट्रात (भारतात) ५२% ओ.बी.सी आहेत असतील ही, आणि ते सर्व खरे ही आहे समजा, परंतु त्यात मराठा समाजाची पोट जात असणारे कुणबी-लेवा पाटील व तत्यसम मराठा पोट जातीची त्यातील टक्केवारी जवळपास २०% आहे, हे तुम्ही, प्रा. हॅरी नरके, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे तसेच ओ.बी.सी चे असणारे सर्व नेते जाणीव पूर्वक विसरता की, उगीच आकडा फुगवून सांगून आपल्याच जातीतील लोकांची दिशा भूल करून त्याना "मराठा" विरोधी करण्याचाच तुम्हा सर्वांच कल असतो असे मला तुम्हा सर्वांच्या लिखाणावरुन व बोलण्यावरून दिसून येते... तुम्ही सर्व जन ओ.बी.सी च्या बॅनर खाली जाणीवपूर्वक "मराठा" द्वेष करीत असता, ह्याचा माझ्या सह महाराष्ट्रातील खूप लोकाना माहीत आहे... तसेच महाराष्ट्रातील परिट -शिंपी-नाभीक-गवळी ई.सह अनेक जाती ह्या अजुन ही मराठा समाजा सोबत नाळ जोडुन आहेत म्हणून महाराष्ट्रात मराठा समाजाचा राजकारानात दबदबा आहे.... हे तुम्ही जानिक पूर्वक लोकान पासून लपवून ठेवत असता... तुम्ही म्हणलात तसा मराठा द्वेषयाने प्रेरित असणारा "माधव" (माळी-धनगर-वंजारी)पॅटर्न खूप वर्षापूर्वीच फसलेला आहे, ह्याची आपण नोंद घ्यावी.....
Deleteजास्त काही लिहीत नाही..... असो....
आपलाच -: योगेश(दत्ता) पवार....YP
जिल्हा-शहर अध्यक्ष -: छावा मराठा संघटना, सोलापूर.....
👍👍
Deleteधनंजयजी, अत्यंत समर्पक प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे. मी याच मालिकेतील तिस-या लेखांकात मराठा समाजाबद्दल व सरंजामशाहीवादी नेत्यांबद्दल नेमके हेच मत मांडले आहे. क्रुपया तोही लेह अवश्य वाचावा म्हनजे आपल्यातील असहमतीचा भाग दूर होईल. मराठा तरुणांचीही कशी दशा केली गेली आहे हे मी त्याच नेखात नव्हे तर अन्यत्रही अनेकवेळा लिहिलेले आहे. येथे मी मराठा शब्द कोणाला उद्देशुन वापरला आहे हेही स्पष्ट केले आहे. या लेखमालिका असल्याने वेगवेगळ्या मुद्द्यांचा सविस्तर विचार करायचा आहेच, त्यांत मी आपले अन्य पण महत्वाचे मुद्दे नक्कीच समाविष्ट करेन. सविस्तर व सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteapan jatine "Dhangar" ahat ka? asel tar jatichya utarandit kon shresht Mali-vanjari ka Dhangar. Bahutek utarand ashi ahe 1) mali 2)Dhangar ani 3) Vanjari. Ani Shimpi sonar vagaire tar svatala yanchyapeksha shrsth samajtat. Tar mag obc chya navakhali eki kasi hoil. OBC nna jati-antat mulich ras nahi. Tyanna utarirandit samadhan ahe. Ugach "Maratha" samajas dosh deun kay phayada. Ani obc 52% he saaf khote ahe. sarv obc kadhihi unite honar nahit agadi next 1000 yrs till there is annihilation of caste in absolute sense.
ReplyDelete@Sanjay Sonawani Ji, संजय सोनावणी जी, तुम्ही म्हणलात की महाराष्ट्रात (भारतात) ५२% ओ.बी.सी आहेत असतील ही, आणि ते सर्व खरे ही आहे समजा, परंतु त्यात मराठा समाजाची पोट जात असणारे कुणबी-लेवा पाटील व तत्यसम मराठा पोट जातीची त्यातील टक्केवारी जवळपास २०% आहे, हे तुम्ही, प्रा. हॅरी नरके, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे तसेच ओ.बी.सी चे असणारे सर्व नेते जाणीव पूर्वक विसरता की, उगीच आकडा फुगवून सांगून आपल्याच जातीतील लोकांची दिशा भूल करून त्याना "मराठा" विरोधी करण्याचाच तुम्हा सर्वांच कल असतो असे मला तुम्हा सर्वांच्या लिखाणावरुन व बोलण्यावरून दिसून येते... तुम्ही सर्व जन ओ.बी.सी च्या बॅनर खाली जाणीवपूर्वक "मराठा" द्वेष करीत असता, ह्याचा माझ्या सह महाराष्ट्रातील खूप लोकाना माहीत आहे... तसेच महाराष्ट्रातील परिट -शिंपी-नाभीक-गवळी ई.सह अनेक जाती ह्या अजुन ही मराठा समाजा सोबत नाळ जोडुन आहेत म्हणून महाराष्ट्रात मराठा समाजाचा राजकारानात दबदबा आहे.... हे तुम्ही जानिक पूर्वक लोकान पासून लपवून ठेवत असता... तुम्ही म्हणलात तसा मराठा द्वेषयाने प्रेरित असणारा "माधव" (माळी-धनगर-वंजारी)पॅटर्न खूप वर्षापूर्वीच फसलेला आहे, ह्याची आपण नोंद घ्यावी.....
ReplyDeleteजास्त काही लिहीत नाही..... असो....
आपलाच -: योगेश(दत्ता) पवार....YP
जिल्हा-शहर अध्यक्ष -: छावा मराठा संघटना, सोलापूर.........
Dhangar Samja'cha Aajvar Ekhi Khaasdaar Gelela / Pathvilela Naahi... Aata Matra Kuthe Ek Bahujan Jankar Saheb'hi Konaas va Ka Satat Khupte ? Kalat Naahi ????
ReplyDeleteTasech Majhya Mahitipramane Aata Mali Samaja'cha Suddha Ek'ch Khaasdaar Zhalela Aahe...Tehi Bhujabal Sahebaan'chya Krupne ( Matra Bujbalan'chyach Virodhaat Tyaveli Rashtrwaadi'ni Aapli Dadagiri Daakhvili Hoti.... Hey Tar Ubhya Maharashtrane Pahile... )
Koli' Samajacha Suddha Aajvar Ekch Khaasdaar To hi Swabalvar Piwla Zenda Ghevun Nivdun Aalela Aahe....
Yaa O.B.C'til Mothya Jaatichi Hi Avstha ? ( Tar Lahan O.B.C Jaatichi Avstha Mag Kaay Asnaar ? ) Sarv Prasthapeet, Tyathi Swatala Purogaami Samajnaare Pakshani O.B.C'na Sthaan , Sanmaan va Bhagidaari Aajvar Kaay Dile ? Ulat Tyanni Dabavaakhali O.B.C'na Thevle...Tukda Mahnje Bhagidaari Navhe...)
O.B.C'chi Bhaigidaari Aahe Tari Kuthe ?
Ulat O.B.C jar Ektra Aale Tar Kahinche Pot Matra Kamaliche Ka Dukhte ?
O.B.C ha Aajvar Konachyahi Virodhaat Gelela Naahi... Ulat Tyani Sarvanaa Saath'ch Dili...
Matra Aaj Kaahi O.B.C Ektra Yet Astaana Va Bahujan Netrutwa Mahnun Pudhe Yet Astanna, Matra Kahinche Pot Matra Ka Dukhtey ? Kalat Naahi...
Phule - Shahu - Aambedkar Yancha va Sarvanacha Asa Ha Maharashtra Hava Aahe Ki.... Ki Kaahi Dadagiri Karnaare Kaahi Moothbhar Lokanche / va Gharane'shahincha'ch Asa Maharashtra Hava Aahe ?
Yach Kaahi Moothbhar Lokani va Gharane'shahini Sarvpratham Sarvsaamnya Maratha Samajala Maage Thevle.... Doke Bhadkvile...Aaj Hi Bhadkaavit Aahet..... Hech Lok Kaarnibhoot Aahe...va O.B.C'che Netrutwa hi Yaanich Pudhe Aanun Dile Naahi....( Uda. Ekikade Baarmati'madhye Aaple Gharaneshahi Majboot Karnaare Sharad Pawar Maadha yethe tey fakt Aani Fakt O.B.C Chalvalis va Bahujan Samajatil O.B.C Netrutwa Jankar Saheb Yanna Dhakka Denyasaathich.....Hey Tar Ubhya Maharashtrane Pahilele Aahe...)
Chori to Chori Aur Uper Se Aaj Tak Sina Zori....Kamal Hai...
सत्ता धारी जात त्यांना कशाला पाहिजे आरक्षण ज्या o.b.c मध्ये समाविष्ट जाती जांचे कोणीच आमदार नाहीत खासदार नाहीत किवा कुठल्याच प्रकारची राजकीय सत्ता नाही अशा o.b.c जातीना जीवन जगण्याकरिता o.b.c चे आरक्षण आहे ते सुधा हे सत्ता धरी जात o.b.c चे आरक्षण घेत असेल तर ज्या o.b.c चे कोणी वाली नाही त्यांना तर गुलाम करण्याचे हे सह्द्यंत्र आहे व त्यांना सरकारी नौकर्याच मिळणार नाही सत्ताधारी जात नौकर्या बळकावून सत्ता सुधात्याच्याच हातात प्रशानातील crem पदे सुधा यनचेच उरलेलं खेरखार ज्या o.b.c चे सत्ते मध्ये वाली नाही अशा मधील येखाद्यालाच दिले जातील व तमाम ओ.ब.सी जातींना गुलाम करून फक्त मत मिळवण्याच उपयोग केला जाईल
ReplyDeleteओबीसींना किंवा मागास/दलित यांना अजुन राजकीय मॅच्युरिटी (राजकीय जाणीवांचे व त्या सांभाळण्याचे शहाणपण)नाही. अजुन तसे ते अभ्यासपूर्ण किंवा एकमेकांत विश्वास निर्माण करणारे असे आंदोलन निर्माण करु शकले नाही. मुळात ते फार छोटे छोटे (मोठे) मतांचे गट आहेत. काय करणार त्यांना आपले रोजचे कसे चालले याचे पडले आहे. फार मोठा अन्याय निदर्शनास आल्यासच ते एकत्र होतील. शिवाय ओबीसीअंतर्गत ही मराठा किंवा मागास समाजातल्या राजकारण्यांप्रमाणे एकमेकांचे पाय ओढण्याचे काम अतिशय सावधपणे सुरुच असते. त्यांना सांभाळता सांभाळता बाकी मतदार सांभाळणे त्यांचा विश्वाास कामे करुन दिलासा /आशा/पैसा दाखवूनच करावी लागतात. मग यात तरबेज व पूर्णवेळ राजकीय मनाचे थोडक्यात संधी बघून तातडीने निर्णय घेणारे लोक लागतात. ओबीसींत व्यापार /व्यवहार करणारे लोक व्यवहार व्यवसाय कुशल आहेत. पण शेती किंवा मजूर तत्सम क्षेत्रात ते तसे मोठया प्रमाणात आर्थिक चणचणीने,संघटीतपणाच्या अभावाने त्या-त्या भागात गावांत प्रदेशात एकएकटे आहेत. अशा छोटया ग्रुपचा गावातील राजकीय पटलावर फारसा प्रभाव नसतो.असेल तर तो नाममात्रच. तसेच मोठयाप्रमाणातील हे समाजबांधव वारकरी संप्रदाय, इतर संप्रदानय, धार्मिक रितीरिवाज,परंपरा सण देव त्यांवरील श्रध्दा व्यवसायातील अनिश्चितता यांत प्रचंड अडकले आहेत. महात्मा फुले किंवा आंबेडकर गाडगेबाबा इ. महनीय व्यक्तींच्या समाज सुधारणा केवळ नावापुरत्याच /बोलण्यापूरत्याच स्वीकारल्या जातात. मात्र,तसे एका लहान मुलाच्या विकसनशीलतेच्या टप्प्याप्रमाणेे या परिस्थीतीकडे बघीतले पाहिजे. पण मला वाटते ओबीसी असो किंवा अन्य कोणीही यासाठी अतिशय ज्ञानी अभ्यासपूर्ण उकृत्ष्ट संघटन असणारे वेगवेगळे राजकीय /सामाजिक समजदार नेतृत्व एकत्र उभे राहिले तर या समाजांच्या विकासासाठी शिक्षण व्यवस्थेचे डिझाईन बदलण्यापासून व्यवसायोपयोगी प्राथमिक मध्यम व आंतरराष्ट्रीय शिक्षण अनुभव हा समाज फार लवकर डायजेस्ट करेल.माफ करा थोडे मोकळे बोलतो या समाजांमध्ये जनुकीय प्रयत्नवादी क्षमता,व्यापार वाणिज्यिक अनुभव अदभुत कलानुभव देण्याची क्षमता देयता, नैसर्गिक वाढीबरोबर पिढयानपिढया सोबत आलेली आहे. कृपया या अफाट भारतीय/ तसेच जागतिक क्षमतेचा योग्य वापर अगदी बेसिक शिक्षणापासून झाला तर भारत खऱ्या अर्थाने पर्यावरण, व्यापार उद्योग निती व्यवहार कला अशा निर्माण क्षेत्रांची अतिशय वैभवशाली महासत्ता होईलच यात तर माझी/ अनेकांची खात्री आहे. अभय पवार वांद्रे, मुंबई.काही चुक असेल तर माफ करावे.
ReplyDelete