(अनिता पाटील यांनी माझ्या http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_9158.html या ब्लोगवर एक प्रतिक्रिया दिली होती. आधी त्यांचे प्रतिक्रिया:
पु. ल. देशपांडे, साने गुरुजी, कुसुमाग्रज ही मंडळी सर्व नियमांच्या वर आहे का? तुम्ही म्हणता ते लिखाण माझ्या ब्लॉगवरचे आहे. श्री. तहकीक यांनी लेखात वापरलेली भाषा तिखट आहे. मी स्वत: अशा भाषेच्या विरोधात आहे. माझ्या ब्लॉगवर या घडीला २०० पानांचा मजकूर आहे. या संपूर्ण मजकुरात अशी भाषा तुम्हाला कुठेही दिसणार नाही. तरीही मी श्री. तहकीक साहेबांचे लेख माझ्या ब्लॉगवर टाकले. त्यांना एडिqटग मंजूर नव्हते. मला सत्य लोकांसमोर आणायचे होते. सत्यासाठी थोडीशी किम्मत मोजावीच लागते. तहकीक यांचे लेख टाकून मी ती मोजली. दुसरे असे की, आपला विरोध कशाला आहे, हे स्पष्ट होत नाही. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याची चिरफाड करताना त्यांनी पुल यांचा एकेरी उल्लेख केला त्याला आपला विरोध आहे का? की तहकीक यांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्यांना आहे? की दोन्हींना आहे. तहकीक यांनी जी भाषा वापरली, तिला आपला विरोध आहे, असे आपले म्हणणे असेल, तर ते मला मान्य आहे. तथापि, श्री. तहकीक यांनी मांडलेल्या मुद्यांना आपला विरोध असेल, तर मात्र मोठी समस्या आहे. लेखन विनोदी आहे, म्हणून महापुरुषांचे चारित्र्य हनन खपवून घ्यायचे का? हा यातील सर्वांत मोठा प्रश्न आहे. बायकोच्या जाचाला कंटाळून तुकाराम देवध्यानी लागले, तुकारामांचे टाळकरी छंदी फंदी होते, असा स्पष्ट संदेश पु ल देशपांडे यांचे नाटक देते. याला विनोद नव्हे चारित्र्यहनन म्हणतात. चारित्र्य हनन करणारी व्यक्ती पुल देशपांडे आहे, म्हणून सहन करून घ्या, असा पवित्रा कोणालाही घेता येणार नाही. पुलंच्या या लिखाणाला कुणी विनोद म्हणणार असेल, तर त्यापेक्षा दुसरा मोठो विनोद असू शकत नाही. माझ्या ब्लॉगवर साने गुरूजी, कुसुमाग्रज, विन्दा करंदीकर, वि. स. खांडेकर यांच्या साहित्याची समीक्षा करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत महाराष्ट्रातील तमाम ब्राह्मण वर्गातून कडवट विरोध होत आहे. विशिष्ट व्यक्तींच्या साहित्याची योग्य समीक्षाच करायचीच नाही, ही मानसिकता केवळ मराठी भाषिकांमध्येच असू शकते. ही लेखक मंडळी मोठी आहेत qकवा जातीने ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांना हात लावायचा नाही, असे कोणी म्हणत असेल, तर आपल्याला ते मान्य आहे का? अनेक ब्राह्मण लेखकांनी बहुजन महापुरुषांबद्दल कथा कादंबèया लिहिल्या आहेत, हे आपले म्हणणे अगदी योग्य आहे. अशा उत्तम लिखाणाबद्दल सर्वांनाच आदरही आहे. तथापि, या लिखानाच्या बदल्यात कोणी जर आमच्या महापुरुषांची बदनामी करण्याची परवानगी मागत असेल, तर ती आम्ही देऊ शकत नाही. जे वाईट आहे, त्याला वाईट म्हणण्याचा आमचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आपण अत्र्यांचे नाव घेतले आहे. अत्र्यांनी जी भाषा वापरली आहे, ती तुम्हाला सांगण्याची गरज नाही. श्री. तहकीक यांची भाषा त्यापुढे अगदीच फिकी आहे. ज्या महात्मा फुल्यांचा वारसा तुम्ही आम्ही सांगतो, त्यांनीही यापेक्षा जहाल भाषा वापरली आहे. येथे मुद्दा भाषेचा नाहीच. मुद्दा आहे, चारित्र्य हननाचा. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही चारित्र्य हनन करण्याचा परवाना दिला जाऊ शकत नाही. सोनवणी साहेब, मी आपला ब्लॉग नियममित वाचते. आपल्या काही मुद्यांबाबत माझे मतभेद असले तरी मला आपले लिखाण आवडते. असो. मी तुमचा ब्लॉग वाचते, म्हणून तुम्ही माझ्या लिखाणाला पाqठबा द्या, अशी माझी भूमिका नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की, कोणतीही भूमिका घेताना ती न्याय्य आहे, हे पाहिले पाहिजे. असो. लहान तोंडी मोठा घास घेतला, त्याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल, याची खात्री आहे. ता. क. मला विकृत म्हणणाèयांनी माझ्या ब्लॉगला भेट द्यावी. मला शिव्या देणाèया ब्राह्मणांच्या कॉमेंटस मी ब्लॉगवर कायम ठेवल्या आहेत. त्या वाचाव्यात आणि मग भाषिक शूचितेबाबत बोलावे.
आपलीच लहान बहीण
अनिता पाटील.
By anita patil on ...तसेही अशा मुर्खांना कोण अडवू शकतो? at 05:17
अनिताजी, आपला काहीतरी गोंधळ उडालेला आहे. काही ब्राह्मण तुम्हाला शिव्या देतात तशाच त्या मलाही देत असतात. "अखेर ब्राह्मण सोनवणी, नरके आणि रामटेकेंवर उलटले" असे आपणही आपल्या ब्लोगवर एकदा म्हटलेले होते. तुमचा गोंधळ नेमका काय आहे हे मी येथे थोडक्यात स्पष्ट करु इच्छितो.
१. शिवाजी महाराजांचे मंदिर गोतिये नामक फ्रेंच ग्रुहस्थाहस्ते बनवण्यात आले. त्याविरोधात मी लोकमत, डी.एन.ए. या व्रुत्तपत्रांमधे लिहिले होते, हे आपल्या वाचनात असेल. त्याबाबत आपण वा आपल्या कोनत्याही...अगदी एकाही (द्न्यानेश महारावांचा अपवाद वगळता...त्यांनी माझी प्रतिक्रिया प्रसिद्ध केली होती..) बहुजनीय शिवप्रेमी म्हनवणा-याने एक अवाक्षर काढले नाही. तुम्हीही नाही. म्हणजे शिवाजीमहाराजांचे दैवतीकरण तुम्हाला मान्य आहे असाच त्याचा अर्थ होतो. मंदिराचे उद्घाटनही झाले...उपस्थितांत अजित पवारांच्या सौभाग्यवतीही होत्या हे आपणास माहित असावे.
२. साने गुरुजींच्या "श्यामची आई"त जातीयवाद ज्या महोदयांना दिसतो, त्यांना काळाच्या सापेक्ष सीमा माहित नाहीत. त्या काळी वाळीत टाकणे नामक एक भिषण प्रकार अस्तित्वात होता व ती प्रथा जवळपास सर्वच जातींतील लोक सर्रास वापरत असत. समजा एका महार व्रुद्धेला मदत करुन अन्य उपचार केले नसते तर त्या कुटुंबालाही वाळीत टाकले गेले असते. वाळीत टाकणे हा प्रकार जेलमद्धे टाकण्यापेक्षा भिषण असे हे बहुदा या रवींद्र तहकीक नामक महोदयांस माहित नसावे. त्यामुळे अस्प्रुष्य स्त्रीला मदत केली, जी त्या काळी अन्य कोणी करण्याचा विचर करणेही शक्य नव्हते, त्याकडे न पहाता नंतर श्यामने कशी अंघोळ केली याकडेच लक्ष वेधत साने गुरुजींसारख्यांना जातीयवादी ठरवायचे हा आपल्या सर्वांच्याच मानसिक गोंधळाचा एकुणातील परिणाम आहे.
३. कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्याबाबतही असाच गोंधळ केला आहे. त्यांनी आपल्या अनेक साहित्यक्रुती इंग्रजी नाटकांवर, विशेषत: शेक्सपियर, बेतल्या. पण ते त्यांनी स्वत: कधीही लपवलेले आहे काय? अन्य नाट्यातील कथा आपल्या वातावरणाच्या सापेक्षतेत बदलवुन रुपांतरे करणे हेही एक अवघड असेच साहित्यिक कार्य असते. हे अमान्य करायचे असेल तर शिवाजी सावंतांच्या कर्ण, क्रुष्ण या व्यक्तींवरील कादंब-यंनाही तोच न्याय लावता येईल व त्यालाही निखळ वाड्मय चौर्य य सदरात टाकुन देता येइल, कारण मुळ कथा महाभारतात होत्याच! विश्वास पाटीलांनी शेजवलकरांच्याच संशोधनाला मुलाधार घेत जी "पानिपत" लिहिली तिलाही तोच न्याय लावता येईल. (किंबहुना डा. आनंद पाटील यांनी विश्वास पाटीलांना त्याबाबत झोडपुय्न काढले आहे, पण पुरावे, नि:पक्ष न्याय आणि साहित्यिक दर्जाच्या आधारे.) कुसुमाग्रजांच्या कविता हा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे. त्यावर जरी सुरुवातीला इंग्रजी काव्याचा प्रभाव असला तरी नंतर त्यांच्या प्रतिभेला स्वतंत्र पंख फुटले व त्यांनी मानवतावादी कविता लिहिल्या, ज्यांचा आजही मराठी मनावर प्रभाव आहे हे कसे नाकारता?
४. कोणत्याही साहित्याची समीक्षा करण्यसाठी प्रथम यथोचित अभ्यास लागतो, क्रुतीचे आकलन लागते. समीक्षा कोणी कोणाची करायची हा अधिकार नाकारायचा प्रश्नच येत नाही. तो प्रत्येकाला अधिकार आहे. मलाही ज्या शिव्या पडतात त्या मीही कधी डिलीट करत नाही. काहेंना मात्र यावरील टीका नको असते तर काहींना त्यावरील. स्वजातीय लोकांवरील टीका कोणालाही आवडत नाही. जेंव्हा आपण स्वजातीयांवर क्रिएटीव टीका करु शकु तेंव्हाच जातीभेद संपेल. तेंव्हाच मानवी विक्रुतींना पायबंद बसेल. पण ब्राह्मणांनी शिव्या दिल्या तर त्यात आनंद साजरा करणारे बहुजन हे निव्वळ बिनडोक असुन स्वत:चे वंचना करुन घेतात कारण त्यांना शिव्याच हव्या असतात. किंबहुना त्याच त्यांनी द्याव्यात असा त्यांचा हट्ट असतो. असे लोक कधीही सामाजिक क्रांती घडवुन आणु शकत नाहीत, समाजात कसलाही बदल घडवु शकत नाहीत...ना स्वत:च्या ना ज्यांना हे शत्रु आणि निखळ शत्रुच मानतात त्यांच्याही. साहित्याची समीक्षा हा फार अवजड प्रांत आहे. साहित्याशी मुळात ज्यांचा संबधच नाही त्यांनी अशा फंदात पडु नये. पडल्यास नाकच ठेचले जाणार यात शंका नाही.
५. आपण स्वत: काय नवनिर्मिती करतो आहोत बरे? घाणीत दगड मारण्यात धन्यता माननारे कधीही नवनिर्मिती करु शकत नाहीत. मीही असा मुर्खपणा काहीवेळा करतो. पण त्यातील निरर्थकता मला चांगलीच माहित आहे. घाणीला स्वच्छ करायचे तर आधी आपलेच मन निर्मळ असायला हवे. नसेल तर करायला हवे. पण आपलेच मन घाण असेल तर कधीही, कालत्रयीही, जगात स्वच्छ मनांचे वारे वाहु शकणार नाही. तुमच्या ब्लोगवर जीही काही "समीक्षा" आहे ती कोणत्याही पातळीवर समीक्षेच्याच मुलार्थाला छेद देणारी आहे. याला जर समीक्षाच म्हनता येत नसेल तर मग तुम्ही नेमके काय करत आहात? ज्या महामानवांची बदनामी या साहित्यिकांनी केली आहे असे तुम्हाला वाटते, त्या महामानवांच्या बदनामीला उत्तर देण्यासाठी तुम्ही काही नवीन संशोधन केले आहे काय? तुकोबारायांबद्दल बोलायचे तर "बरे झाले बाईल मेली...मुलगा मेला....मी आता मुक्त झालो" अशा अर्थाचा त्यांचा अभंग आहे. त्याला दुष्काळाची पार्श्वभुमी आहे. या अभंगाला गाथेतुन शोधुन वाचा आणि समीक्षा करा. पण ते तुम्ही करु शकणार नाही याची पुरेपुर मला जाणीव आहे.
६. बहुजनांना खरेच वैचारिक क्रांतीत रस असेल तर त्यांनी आधी घाणीत हात बुडवत आपल्या मनाचीही घाण दाखवणे प्रथम बंद करावे. जेथे खरोखरचे मनोरुग्ण, विक्रुत, हिंसक प्रव्रुत्तींचे समर्थन दिसते त्यांचा हव्या त्या भाषेत निषेध करावा, पण आपण नेमके काय करत आहोत व नेमके काय साध्य करायचे आहे यासाठी जे तत्वद्न्यान लागते तेही बनवावे. तुमचे सध्याचे तत्वद्न्यान विध्वंसक पायावरच उभे आहे आणि ते कधीही टिकणार नाही याबाबत शंका बाळगु नये. उठसुठ बहुजनवादी म्हनवुन घेत, दिसेल त्याला शिव्या घालत, चार-पाचशे लोकांच्या चकाट्यांच्या जीवावर वैचारिक नेत्रुत्व होत नसते याचे भान असायला हवे. जगाच्या पाठीवर असल्या कथित क्रांत्या कोट्यावधी वेळा झाल्या आणि अस्तही पावल्या. हे माहित असायला हवे.
कोण माझा आदर करतो आणि कोण अनादर याची मला पर्वा नाही. पण आपण मला भाऊ म्हणता म्हणुन हे लिहिले अन्यथा सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाने उत्तर द्यायची इच्छा नव्हती. आपण समजुतदार असाल, आपल्याला खरेच वैचारिक क्रांती घडवायची असेल, जग बदलवायचे असेल तर प्रथम अभ्यास वाढवा...भावनांच्या आहारी जात वाटेल ते लेखन प्रसिद्ध करु नका ही माझी विनंती आहे. कारण त्यातुन काहीएक साध्य होनार नाही. होवू शकतही नाही. जोवर आपलाच नैतीक, वैचारीक आणि आध्यात्मिकसुद्धा पाया भक्कम होत नाही तोवर ही चीडचीड आणि उथळ लेखन व्यर्थच आहे असे माझे स्पष्ट मत आहे. राग आला असेल तर आताच क्षमा मागुन ठेवतो. धन्यवाद.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सिंधू संस्कृतीची मालकी!
सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
This comment has been removed by the author.
ReplyDeleteचांगले उत्तर दिलेत सोनवणीजी तुम्ही. असो आपल्यापेक्षा उच्चपदी पोचलेल्या लोकांवर थुंकायचा प्रयत्न केल्यावर थुंकी आपल्याच तोंडावर पडते याची त्यांना लवकरच जाणिव होईल.
Deleteहेरंब ओक यांच्या ब्लॉग वर त्यांनी जो ब्राह्मणद्वेषाचा सालावळी प्रमाणे उपाहासात्मक प्लान दिला आहे तो खराच आहे की काय असे वाटते. एका मागोमाग एक सर्व ब्राह्मणांवर टीका करण्याचे उद्योग काही जातीवादाने पोखरलेले सडके मेंदू सतत करत असतात. अशा विचारांनी बरबटलेल्या व्यक्तिंशी मी प्रत्यक्षात बोललो आहे. त्यांच्या मनावर सतत अशा ब्राह्मणविरोधी गोष्टींचा मारा केला जातो. मदरशांत तयार केले जाणारे जिहादी व फुटकळ पुस्तके लिहून तयार केले जाणारे ब्राह्मणद्वेषी एकाच पठडीतले वाटतात. यांनी फक्त शस्त्रे उचलली नाहीत म्हणूनच यांचे कार्यक्रम अजूनही बिनबोभाटपणे सुरु आहेत.
असो. आपल्याकडे मी माझा व माझ्या समाजाचा विकास करण्यासाठी काय करु शकतो याचा कोणी विचार करत नाही. पूर्वी काय झाले याच्यावरुन आज वितंडवाद करणे यांना पसंत आहे. एवढेच बहुजवादी असतील तर त्यांनी आजवर काय समाजकार्य केले ते सांगावे. मुलींच्या शिक्षणासाठी शाळा काढाव्यात, गरिब विद्यार्थ्यांसाठी शिश्यवृत्या चालवाव्यात, आदिवसी मुलांसाठी शहरातील नादुरुस्त सायकल दुरुस्त करुन वाटाव्यात, पुस्तके उपलब्ध करुन द्यावीत. अशा विधायक कामांत यांनी आपली ऊर्जा लावावी असे मला वाटते. तसे करायचे नसल्यास किमान समाजात जातिद्वेषाचे विष कालवू नये.
आदरणीय सोनवणी साहेब,
ReplyDeleteआपले अनिता पाटलांना दिलेले उत्तर वाचले आणि आत्मा थंड झाला.अक्षरशः जेव्हापासून मी ती गरळ वाचली होती तेव्हापासून खरेच ध्यानावर नव्हतो.( म्हणजे पु ल,कुसुमाग्रज आणि साने गुरुजींविषयी ) काय करावे या कर्माला अशी स्थिती झाली होती ,काही सुचत नव्हते .या नगांची कीव करावी म्हणावे तर स्वतःची लाज वाटत होती ,यांना काही बरे वाईट लिहावे तर चिखलात दगड मारण्यासारखे होते.आपली संयत आणि खरोखरीच वस्तुनिष्ठ प्रतिक्रिया वाचून मी जो मोकळा श्वास घेतो आहे त्याची बहुधा तुम्हाला कल्पना नाही साहेब...! या सगळ्या गोष्टींना उत्तरच सापडत नव्हते.मी जी घुसमट अनुभवत होतो ती आता पार निवळली आहे .
आता या महाभागांविषयी....यांचे जवळपास सर्व लेख मी वाचले आहेत.बर्याच गोष्टी पटल्या हि आहेत.परंतु ब्राह्मणांविषयी काही लिहायचे झाले तर यांच्यात काय वारे घुसते कुणास ठाऊक? मग हे इतके आंधळे होतात कि यांना कश्याचीही शुद्ध राहत नाही.मग ते थोर मोठ्यांचीही अवहेलना करण्यात मागे पुढे पाहत नाहीत.मला मान्य आहे कि पूर्वीपासून ब्राम्हणांनी आपल्या हातात सगळ्या गोष्टी ठेऊन समाजाला नागविले.परंतु आता जमाना बदलला आहे.आपल्यालाही मोठे होऊन बर्याच गोष्टी साध्य करता येतील ,कुणाची मक्तेदारी नाही.परंतु तेच रडगाणे गाऊन किंवा कुणाच्या नावाने गळे काढून फक्त मनोरंजन साध्य होईल ,बदल नाही..! आणि मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक तो काय? आणि आपला बहुजन समाजाला मनोरंजनाशिवाय बाकी काही नकोय. कारण गुंठे विकून मौज मजा करायची त्यात असले लेखन नजरेस पडले तर अजूनच बहार...अनिता ताई तुम्हीच विचार करा जरा कि याने आपले खरे प्रबोधन होतेय का ? खरे तर सुरुवातीला तुमचे विचार वाचून कोण हि रणरागिणी ? म्हणून आमच्या मित्र मंडळात कौतुक हि झाले होते मात्र नंतर नंतर गाडी रुळावरून ढळली आणि आपणही ब्राम्हणांच्या वाटेने निघालात.अहो या बाबतीत मला एक उदाहरण द्यावेसे वाटते कि एव्हढे बलाढ्य ब्रिटीश ,कधी काळी जगावर राज्य करीत होते परंतु आपल्याच गुर्मीत मश्गुल राहून आज कुठेच्या कुठे रसातळाला गेले ते..शेवटी निसर्गच पर्यावरणाचा समतोल ठेवतो मग तो कुठल्याही रुपात..!आणि ब्राम्हणांचे काय वेगळे आहे .कधी काळी सगळा कारभार आपल्याच हातात ठेऊन यांनी साऱ्या जनतेला वेठीस धरले , आज यांची परिस्थिती काय आहे ? आणि आपण त्याच गुल्काड्या ओढून त्यांना महत्वच देतोय.. एखादी काडी मोडून आपली काडी मोठी दाखवण्यापेक्षा आपलीच काडी इतकी मोठी करू कि अन्य खुज्या वाटतील...
आणि आता विषय या साहित्यिकांचा ...अहो सर्व यांचेच राज्य असतांना यांनी सकल जणांचा विचार केला , हि काही लहान सहान गोष्ट नव्हे.ते हि त्याच मार्गाने गेले असते तर कोणी त्यांचे काही वाकडे करू शकले नसते.बाबा आमटे,साने गुरुजी,पु ल ,अत्रे इ. यांचे कार्य/लेखन बघितले तर त्यांचे मोठेपण लक्षात येईल.
असो आता संपवतो, सोनवणी साहेब पुन्हा एकदा आभार कारण आता समाधान अनुभवतोय..आणि अभिनिवेशात बरेच असंबंध वाटण्याचा संभव आहे ,सांभाळून घ्या....
आणि हो अनिता ताई ,लहान तोंडी मोठा घास घेतोय पण राहवत नाही ,तुमच्या लेखनातून प्रबोधन घडवा ,सवंग मनोरंजन नाही...!!!
Spartan ji, Thanks for your response, full of humanatirian sentimens and guidance to all those think abusing all Brahmins is a kind of revolution. I am Sure, Anita ji too will change someday and become far more creative than destructive.
ReplyDeleteThanks again.
सर तूम्ही उत्तर तर तर्कसंगत दीलय त्याबदल आपले आभार
ReplyDeleteसर आनिता ताईला आणि तहकीक सरानां जमल नसेल समीक्षा करायला . सर मग तूम्ही कराना पू.ल. च्या आणि शामच्या आईची संमीक्षा ,मला वाटत त्या दोघांच्या मनात जसा ब्राम्हण द्वेश आहे तसाच तूमच्या मनात ब्राम्हणा विषय कळवळा दिसतो .
सर तूम्ही एकमेकांनवर टीका करन्यापेक्षा जर बहूजनासमोर सत्य मांडलतर बर होईल .
तूमच्या कार्याला हार्दीक मंगलकामना.
आपला एक वाचक
@जय भीम जय बूध्दा@