मी अपघाताने रवींद्र तहकीक नामक कोणा अनाम ग्रुहस्थाचे पु. ल. देशपांडे यांच्यावर अश्लाघ्य टीका करणारे लेख वाचले. मला आधी कोणीतरी माझ्या एका लेखावर प्रतिक्रिया देतांना पु.लं.वर टीका होत असल्याबद्दल लिहिले होते, पण मला विश्वास नव्हता...पण प्रत्यक्ष हे लेख वाचुन हादराच बसला. ही नुसती टीका नव्हे तर तालीबानी हल्लाच आहे याबाबत शंका नाही.
सर्वप्रथम, पु. ल. हे विनोदी लेखक होते पण त्याचवेळीस त्यांचे सामाजिक भान कधीही सुटलेले नव्हते. त्यांनी आपल्या द्न्यातीबांधवांवर अधिक व त्यांच्या शैलीत, पण कठोर टीका केलेली आहे. गांधीजींवर त्यांनी ज्या आत्मीयतेने लिहिले आहे त्याला तोड नाही. रा.स्व. प्रणित भावभावनांना कुटील विचारांना त्यांनी नेहमीच विरोध केला. सामाजिक वैगुण्यांकडे त्यांनी नेहमीच लक्ष वेधले.
साहित्त्यिक नेमका काय असतो हे या अद्न्य बांधवांना समजावुन सांगणे अत्यावश्यक आहे. मी आजवर ५८ कादंब-या आणि ९ नाटके लिहिली. साहित्यिकाचे स्रुजन हे अत्यंत व्यक्तिगत पातळीवर असते. माझ्या कादंब-या, नाटकांचे नायक ब्राह्मण आहेत तसेच क्षत्रीयही, महार आहेत तसेच मराठेही. क्लीओपात्रासारखी इजिप्तची सम्राद्न्यि आहे तसेच ग्रीक ओडिसियसही. शीबासारखीही नायिका आहे जिचा कोणता असा स्वतंत्र धर्मही नव्हता. नायक-नायिका लेखक निवडतो तो आपल्या विषयाला अनुसरुन. त्यातील भावनिकता लक्षात घेत. त्या भावनिकतेला आपल्या कथामाध्यमातुन विस्तार करत तो आपापल्या मगदुरानुसार पात्र, कथात्मकता व मनोविश्लेषनाद्वारे प्रक्षेपित करत असतो. लेखक लिहितो तेंव्हा जातीय नसतो. (अपवाद फारफारतर ऐतिहासिक कादंबरीकारांचा असू शकतो.)
पु.ल. मुळात कादंबरीकार नव्हते. पण त्यांनी "कान्होजी आंग्रे" ही मनोहर माळगांवकरांनी लिहिलेली, एक अत्यंत आदर्श नव्य शैलीतील कादंबरी, मराठीत आवर्जुन अनुवादित केली. आंग्रे काही केल्या ब्राह्मण नव्हते. माळगांवकरांनी घोडचुक केली असे हे बिनडोक लोक सहज म्हणु शकतात. त्यांनी हेमिंग्वेच्या "Old Man & The Sea" चा मुळ लेखकालाही लाजवेल असा अनुवाद केला. चुकच केली...मराठी माणसाला एका अद्भुत साहित्यिक प्रतिभेचे उदात्त रुप दाखवायची काही गरज नव्हती...असले येडचाप-मनोविक्रुत नंतर या महाराष्ट्रात जन्माला येतील याची त्यांना कल्पनाही नसावी, म्हणुन त्यांच्याकडुन असे क्रुत्य घडले असावे...असे खेदपुर्वक म्हणावे लागते.
पु.लंचा पींड तसा विनोदी लेखनाचा. त्यांनी कमरेखालचे विनोदही केले असे या रवींद्र महोदयांचे जयश्री गडकरांच्या "पार्श्वभुमी" वर म्हणने आहे. असे अनेक काही पांचट विनोद अत्रेंच्या नांवावरही खपवले जातात...पण त्या इतरांच्या विक्रुत कल्पना आहेत...वास्तव नाही हे या मुढांना माहितही नसते. विनोदी लेखन म्हणजे नेमके काय असते, त्यातील पात्रे कोणीही असू शकतात...अगदी संत महात्मेही...त्याकडे मोकळ्या मनाने पहायची मनोव्रुत्ती लागते. पु.लं.नी रामदासांवरही कोट्या केलेल्या आहेत हे मात्र पाहिले जात नाही..."विट्ठल तो आला आला..." हे मुळात चरित्रप्रधान वा ऐतिहासिक नाटक नसुन एक विनोदी प्रहसन आहे व त्याकडे त्याच द्रुष्टीने पहात समीक्षा केली पाहिजे याचे भान या ग्रुहस्थाला नाही. असेच करायचे तर मग दादा कोंडके ते पार क्रुष्णालाही वेठीला धरत प्रहसने करणारी तमाशा मंडळे याच न्यायाने बरखास्त करायला हवीत.
मागे कोणी वेडपट राम गणेश गडकरींच्या नाटकावरही तुटुन पडत त्यांचा संभाजी उद्यानातील पुतळा तोडायच्या वार्ता करत होता. मी याच ब्लोगवर त्याला उत्तर दिले होते. माझ्या मते ज्यांना साहित्य म्हनजे नेमके काय हेच समजत नाही त्यांनी उगा आपल्या लंगड्या तंगड्या अडवत विखार माजवु नये. हो, त्यांचे लेखन वैचारिक वा इतिहास मांडणारे असते तर त्यावर टीका करण्याचा अधिकार आहे आणि असतोच. पण कलाक्रुतीवरची टीका ही कलाक्रुतीच्याच सामर्थ्य/वैगुण्ये याच आधारावर होवू शकते...जातीय नाही.
महाराष्ट्राला तसेही विनोदाचे वावडे आहे. काही जातीघटकांना तर अधिकच. अत्रे-पु.लंनी महाराष्ट्राला हसवायला शिकवले हे ऋण मान्य करायलाच हवे. उलट हे आताचे जातीय वीर मात्र दिसला ब्राह्मण कि झोड या कुव्रुत्तीचे बळी ठरत आहेत आणि त्यातच त्यांचा सांस्क्रुतिक -हास आहे.
उद्या कोणी जी. ए. कुलकर्णींवरही असलेच वाह्यात लिहू लागेल. ज्यांच्यामुळे सांस्क्रुतीक गोंधळ झाला अशांबद्दल लिहिले-बोलणे वेगळे आणि ज्यांनी संस्क्रुती व्रुद्धीत हातभारच लावला त्यांच्याबद्दल अधमपणे लिहिणे-वक्तव्य करणे वेगळे याचे भान असायला हवे. नाहीतर साहित्यिकांना आपल्या लेखण्या बाजुला ठेवुन मुक्त श्वास न घेता आल्यामुळे चक्क काढता पाय घ्यावा लागेल...आणि मग संस्क्रुती रसातळाला जायला वेळ लागणार नाही. आपापल्या जातीचे साहित्य आपणच निर्माण करायचे आणि आपणच वाचायचे असला नवा उद्योग सुरु होईल.
असेच करायचा विचार असेल तर करा...तसेही अशा मुर्खांना कोण अडवू शकतो?
Subscribe to:
Post Comments (Atom)
गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी
ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
वसंत व्याख्यान माला
ReplyDeleteम. जोतिराव फुले व डॊ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त
तसेच
भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख पूण्यतिथी निमित्त
आयोजीत
वसंत व्याख्यान माला
दि. १० एप्रिल २०१२ मंगळवार ते १३ एप्रिल २०१२ शूक्रवार
ठिकाण : अर्बन बॆंक सभाग्रूह नांदूरा
वेळ : दररोज सायंकाळी ८ वाजता
१) मंगळवार दि. १० एप्रिल २०१२ सायं ८ वा.
विषय : पत्रकारिता व समाज
वक्ते : राजेशजी राजोरे ,आवृत्ती संपादक ,दै.देशोन्नती
अतीथी : गजानन डोंगरकार
अध्यक्ष : राम देशमुख , ठाणेदार नांदूरा.
२) बूधवार दि. ११ एप्रिल २०१२ सायं ८ वा.
विषय : शेती व कास्तकार : काल ,आज आणि ऊद्या
वक्ते :महादेवराव भूईभार ,कृषी किर्तनकार अकोला
अतीथी : रवीकांतजी तुपकर , स्वाभीमानी शेतकरी संघटना.
अध्यक्ष : प्रभाकर राव घनोकार ,मा. सभापती कृ. ऊ. बा. स. नांदूरा.
३)गुरुवार दि. १२ एप्रिल २०१२ सायं ८ वा.
विषय : महराष्ट्रातील चळवळींचे पितामह : म. फूले
वक्ते :अमर हबीब ,साहित्यीक अम्बेजोगाई
अतीथी : गजानन्जी अम्दाबादकर , समाज सेवक.
अध्यक्ष : प्राचार्य भाऊसहेब तथा सिद्धार्थ मेश्राम, एस.पी.एम. कोलेज नांदूरा.
४) शूक्रवार दि. १३ एप्रिल २०१२ सायं ८ वा.
विषय : सांख्य तत्वज्ञान : कपील मूनी ,भगवान कृष्ण, तथागत बुद्ध
वक्ते :संजयजी सोनवणी ,रहस्यकथाकार,साहित्यीक
अतीथी : प्रा. महेन्द्रदादा शेगावकर अकोला
अध्यक्ष : भीमरावजी तायडे , प्रबंधक महाबॆंक नांदूरा.
Sanjay Ji, These are crazy people. I don't know what makes one full of hatred like this? Again, these are the products of the systematic brainwashing that has been happening for sometime now.
ReplyDeleteएका बिनडोक बाईने तिच्या ब्लॉगवर साने गुरुजी, कुसुमाग्रज, रामदास स्वामी, सावरकर, पु.ल. आणि अनेक महान व्यक्तींवर अतिशय आक्षेपार्ह भाष्य केले आहे. ही ब्राम्हणद्वेष्टी मूर्ख बाई 'औरंगाबाद'ची आहे, हे तिच्या प्रोफाईलवरून समजले आणि मला मीही औरंगाबादला स्थायिक असल्यामुळे फारच लाज वाटली. साने गुरुजींचे "श्यामची आई" जातीयवादी आहे, पु.ल. खोटारडे होते, कुसुमाग्रज उचले होते... वगैरे वगैरे काय काय गरळ ओकली आहे! त्या ब्लॉगवरील एका लेखात ह्या तहकिक नामक हलकटाच्या लेखाचा संदर्भ दिला होता.
ReplyDeleteहे समजायचं कारण - फेसबुकवरील एक स्नेही काही दिवसांपूर्वी ह्या विकृत बाईच्या प्रोफाईलवरील 'विद्या बालन'च्या एका फोटोत टॅग झाले आणि त्यावरील "ब्राम्हणांच्या पोरी अश्या... ब्राम्हणांच्या पोरी तश्या" सदृश्य आचरट मजकूर त्या अश्लील फोटोसह माझ्या फेसबुक भिंतीवर दिसू लागला! मला संताप कमी पण कीव जास्त आली. त्या फोटोवर असलेल्या इतर प्रतिक्रिया तर इतक्या जहाल होत्या की विकृतीची परिसीमाच!
एकविसावे शतक आहे. आणि आपल्याला आपल्याच ढुंगणात बोट घालून वास घेत बसण्यापासून फुरसत नाहीये.. (क्षमा करा, पण ह्या असल्या विकृत मूर्खपणाला तशीच विकृत उपमा देणे अपरिहार्य वाटले.)
संजय साहेब जय महाराष्ट्र !
ReplyDeleteरवींद्र तहकीक नामक कोणीतरी थोर लोकांची बदनामी करतो आणि अनिता पाटील (प्रोफाईल वर नाव हेच आहे ) या फेसबुक पेज वर पण बरेच ब्राह्मण विरोधी लिखाण करत आहे . तर हे का ब्राह्मण द्वेष म्हणून कि जातीयवाद म्हणजे सगळ्याच जातीमध्ये भांडणे लावायची हे माहित नाही पण थोर लोकांचे अपमान हे लेख वगळता आणखी बरेच लेख आहेत त्यात तथ्य हि आहे.
पु. ल. देशपांडे, साने गुरुजी, कुसुमाग्रज
ReplyDeleteही मंडळी सर्व नियमांच्या वर आहे का?
तुम्ही म्हणता ते लिखाण माझ्या ब्लॉगवरचे आहे. श्री. तहकीक यांनी लेखात वापरलेली भाषा तिखट आहे. मी स्वत: अशा भाषेच्या विरोधात आहे. माझ्या ब्लॉगवर या घडीला २०० पानांचा मजकूर आहे. या संपूर्ण मजकुरात अशी भाषा तुम्हाला कुठेही दिसणार नाही. तरीही मी श्री. तहकीक साहेबांचे लेख माझ्या ब्लॉगवर टाकले. त्यांना एडिqटग मंजूर नव्हते. मला सत्य लोकांसमोर आणायचे होते. सत्यासाठी थोडीशी किम्मत मोजावीच लागते. तहकीक यांचे लेख टाकून मी ती मोजली.
दुसरे असे की, आपला विरोध कशाला आहे, हे स्पष्ट होत नाही. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याची चिरफाड करताना त्यांनी पुल यांचा एकेरी उल्लेख केला त्याला आपला विरोध आहे का? की तहकीक यांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्यांना आहे? की दोन्हींना आहे.
तहकीक यांनी जी भाषा वापरली, तिला आपला विरोध आहे, असे आपले म्हणणे असेल, तर ते मला मान्य आहे. तथापि, श्री. तहकीक यांनी मांडलेल्या मुद्यांना आपला विरोध असेल, तर मात्र मोठी समस्या आहे.
लेखन विनोदी आहे, म्हणून महापुरुषांचे चारित्र्य हनन खपवून घ्यायचे का? हा यातील सर्वांत मोठा प्रश्न आहे. बायकोच्या जाचाला कंटाळून तुकाराम देवध्यानी लागले, तुकारामांचे टाळकरी छंदी फंदी होते, असा स्पष्ट संदेश पु ल देशपांडे यांचे नाटक देते. याला विनोद नव्हे चारित्र्यहनन म्हणतात. चारित्र्य हनन करणारी व्यक्ती पुल देशपांडे आहे, म्हणून सहन करून घ्या, असा पवित्रा कोणालाही घेता येणार नाही. पुलंच्या या लिखाणाला कुणी विनोद म्हणणार असेल, तर त्यापेक्षा दुसरा मोठो विनोद असू शकत नाही.
माझ्या ब्लॉगवर साने गुरूजी, कुसुमाग्रज, विन्दा करंदीकर, वि. स. खांडेकर यांच्या साहित्याची समीक्षा करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत महाराष्ट्रातील तमाम ब्राह्मण वर्गातून कडवट विरोध होत आहे. विशिष्ट व्यक्तींच्या साहित्याची योग्य समीक्षाच करायचीच नाही, ही मानसिकता केवळ मराठी भाषिकांमध्येच असू शकते. ही लेखक मंडळी मोठी आहेत qकवा जातीने ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांना हात लावायचा नाही, असे कोणी म्हणत असेल, तर आपल्याला ते मान्य आहे का?
अनेक ब्राह्मण लेखकांनी बहुजन महापुरुषांबद्दल कथा कादंबèया लिहिल्या आहेत, हे आपले म्हणणे अगदी योग्य आहे. अशा उत्तम लिखाणाबद्दल सर्वांनाच आदरही आहे. तथापि, या लिखानाच्या बदल्यात कोणी जर आमच्या महापुरुषांची बदनामी करण्याची परवानगी मागत असेल, तर ती आम्ही देऊ शकत नाही. जे वाईट आहे, त्याला वाईट म्हणण्याचा आमचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
आपण अत्र्यांचे नाव घेतले आहे. अत्र्यांनी जी भाषा वापरली आहे, ती तुम्हाला सांगण्याची गरज नाही. श्री. तहकीक यांची भाषा त्यापुढे अगदीच फिकी आहे. ज्या महात्मा फुल्यांचा वारसा तुम्ही आम्ही सांगतो, त्यांनीही यापेक्षा जहाल भाषा वापरली आहे. येथे मुद्दा भाषेचा नाहीच. मुद्दा आहे, चारित्र्य हननाचा. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही चारित्र्य हनन करण्याचा परवाना दिला जाऊ शकत नाही.
सोनवणी साहेब, मी आपला ब्लॉग नियममित वाचते. आपल्या काही मुद्यांबाबत माझे मतभेद असले तरी मला आपले लिखाण आवडते. असो. मी तुमचा ब्लॉग वाचते, म्हणून तुम्ही माझ्या लिखाणाला पाqठबा द्या, अशी माझी भूमिका नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की, कोणतीही भूमिका घेताना ती न्याय्य आहे, हे पाहिले पाहिजे.
असो. लहान तोंडी मोठा घास घेतला, त्याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल, याची खात्री आहे.
ता. क.
मला विकृत म्हणणाèयांनी माझ्या ब्लॉगला भेट द्यावी. मला शिव्या देणाèया ब्राह्मणांच्या कॉमेंटस मी ब्लॉगवर कायम ठेवल्या आहेत. त्या वाचाव्यात आणि मग भाषिक शूचितेबाबत बोलावे.
आपलीच लहान बहीण
अनिता पाटील.
Respected sonavni sir,
ReplyDeletepls visist my blog. and decide what is right and what is wrong. link is bellow.
http://anita-patil.blogspot.in/
अनिताजी, माझा प्रतिसाद खुपच मोठा झाल्याने त्याचा स्वतंत्र लेखच या ब्लोगवर प्रसिद्ध केला आहे. क्रुपया वाचुन घ्यावा. धन्यवाद.
Deleteश्री संजय सोनवणी,
ReplyDeleteमाझ्या रिसर्चप्रमाणे अनिता पाटील आणि रवींद्र तहकिक हे एकाच व्यक्ती आहेत. हा पुलं वरचा आणि इतरही लेख ह्यातून हीन पातळीवर टीका केलेली आहे. संजय - आपण त्या टीकेला अतिशय उत्तम उत्तर दिलेले आहे. मी जेव्हा अनिताच्या ब्लॉगबद्दल ऐकले आणि वाचला तेव्हा बसलेला धक्का मला अजूनही आठवतो. मी तिला आणि पर्यायाने रवींद्र तहकिक ह्यांना kohamblogger.blogspot.com ह्यावर उत्तर देण्याच्या प्रयत्न केलेला आहे. उत्तरे देता देता एक गोष्ट लक्षत आली की भावनांच्या प्रवाहात वाहत जात माझी प्रतिक्रिया पण अनिता/रवींद्रच्या विषारी लेखानासारखी होऊ लागली होती. आपले उत्तर अतिशय समर्पक, अभ्यासपूर्ण आणि non -instigating (ह्याला मराठी शब्द काय?) आहे. अभिनंदन.
उत्तरात एका ठिकाणी अनिता म्हणते कि तहकिकने जहाल भाषा वापरली आहे. तिच्या एकूणच ब्लोगवर अशी भाषा, असे विचार आणि अश्या वागणुकीला प्रोत्साहन दिलेले आहे. मी ब्राम्हण आहे पण एक मुद्दा मला कळला नाही तो म्हणजे मी स्वतः किंवा माझ्या वडिलांनी किंवा आजोबांनी कोणत्या जातीवर अन्याय केला? ५००० वर्षांपूर्वी मनुने जे काय लिहिले ते गेल्या ६०-७० वर्षांमध्ये पुसून गेलेले नाही का? आणि ब्राम्हण समाजाला का बरे एकटे झोडपणे चालू आहे? मराठा समाज हा पण उच्चवर्णीय होता पण आता त्यांचे नेते मागासवर्गीयांच्या बाजूने असल्यासारखे दाखवून ब्राह्मणांवर चिखलफेक करत आहेत. त्यांना पण आता आरक्षण हवे आहे. जे मराठा गरीब आहेत त्यांना सवलती हव्यात तर गरीब ब्राम्हणांना सवलती का बरे नकोत? आरक्षण आर्थिक निकषांवर असावे का किंबहुना का बरे नसावे?
कृपया आपले विचार समजतील तर आनंद होईल.
आपलाच सस्नेह
कोहम महोक
दि ८, माहे एप्रिल, सन २०१२
This comment has been removed by the author.
ReplyDeleteमला असे नेहमी वाटते कि ब्राह्मण समाजाने २००, ३०० वर्षापूर्वी काही अन्याय केले असतील. ते सर्व असमर्थनीय आहेत त्याचे कोणी समर्थन करू शकत नाही.. पण म्हणून आपण आता त्यांना आत्ता त्रास देणे कितपत योग्य आहे. हो आमचे वैचारिक मतभेद आहेत पण त्याचा आपण शुद्ध विचार, शुद्ध आचाराने सामना करूया. याने बहुजन चळवळ भरकटून जायील .(आणि विशेष म्हणजे असा प्रकार कायद्याला न धरून नाही)
ReplyDeleteविठ्ठल खोत
सोनवणी साहेब,
ReplyDeleteरवींद्र तहकिक यांच्या मेलवरून आपल्या ब्लॉगवर रिप्लाय पोस्ट होत नाही. त्यामुळे, मी त्यांच्या वतीने हा रिप्लाय पोस्ट करीत आहे. श्री तहकिक साहेबांचा इ-मेल आयडी rtahakik@gmail.com असा आहे. ते फेसबुक वरही आहेत.
...........................................
श्री. रवींद्र तहकिक यांचे उत्तर (भाग-१)
माननीय श्री. संजय सोनवणी,
रवींद्र तहकिकचा आपणास सप्रेम नमस्कार
हें माझे आपणास पहिले वाहिले पत्र. ही काही आपण लिहिलेल्या
लेखाची प्रतिक्रिया किंवा उत्तर नाही. प्रतुत्तर तर अजिबात नाही.
अनिता पाटील यांच्या ब्लॉग वरून प्रसिद्ध झालेल्या माझ्या
लेखा बद्दल आपण आपल्या ब्लॉग वर " तसेही अशा मूर्खाना
कोण अडवू शकतो " असा लेख लिहिला आहे. त्यात पहिल्याच वाक्यात
नव्हे लेखाच्या टायटल मधेच आपण मला उद्देशून "मूर्ख" असे संबोधन
वापरले.त्याच बरोबर आपण हें लिखाण तालिबानी आहे .असेही आपण म्हटले . हा माझा गौरव निश्चितच नाही. आपण माझ्या लेखनाचा निषेध
केला आहे असेही दिसत नाही. होय , आपण ज्या शब्दात आणि ज्या शैलीत
हा लेख लिहिला आहे त्याला " पाणउतारा " किंवा "तेजोभंग " असे मात्र
म्हणता येयील .
मला येथे वानरांच्या टोळ्यातील "म्हाळ्या" चे उदाहरण देण्याचा मोह होतो आहे आणि मी तो आवरू शकत नाही . वानराच्या टोळीतील बलदंड नर वानर इतर कमकुवत वानरांना मारझोड करून टोळीतून पिटाळून लावतो आणि मग नंतर
एकटाच टोळीतील सर्वा माद्या भोगत राहतो. त्याची म्हाळे पानाची लालसा इतकी तीव्र आणि निर्दयी असते की स्वतः पासून झालेल्या नर अपत्यांना देखील तो जगू देत नाही किंवा पिटाळून लावतो.
मा . सोनवणी साहेब मी तुमच्यावर थेट असा काही आरोप करत नाही. परंतु
प्रबोधन आणि क्रांतीच्या चळवळीत देखील सुरुवातीला स्वकर्तुत्वाने इतिहास घडवणारे,
चळवळीला योग्य दिशा निश्चित उद्दिष्ट आणि यश मिळवून देणारे ,प्रसंगी जीवाची बाजी लावणारे. सर्वस्वाचा त्यागही करणारे नेतृत्व एका टप्प्यावर मात्र हेकेखोर आणि आत्मकेंद्रित होताना दिसते. ही आपल्या देशातल्याच नाहीतर जगाच्या इतिहासातील सर्वच चळवळीची अपरिहार्य शोकांतिका आहे . म्हणजे माकडाचा माणूस झाला तरी
" म्हाळे" पणाचे " जीन्स " मात्र आपल्यात आजूनही कायम आहेत .
त्यातूनच मग हें म्हाळे मी म्हणजेच संघटना. मी म्हणजेच विचार. मी म्हणजेच
चळवळ आणि मी करतो तेच खरे प्रबोधन अशी दुराग्रही व अडेलतट्टू भूमिका घेवून
नावे नेतृत्व एक तर जल्मालाच घालत नाहीत किंवा मग त्यांचा डोळा चुकवून
असे नवे नेतृत्व जल्माला आलेच तर हें "म्हाळे" पाळण्यातच त्यांच्या नरडीला
नख लाऊन संपवून टाकतात. त्यांना हव्या असतात फक्त माद्या...ज्या म्हाळ्या चे
डसणे-ओरबरडने शृंगारक्रीडा म्हणून सहन करतात. पाहजे तेंव्हा त्याच्या
वासना विरेचनाचे साधन बनतात आणि त्याच्या अपत्यांना जल्माला घालतात.
अपत्यापैकी मादी जातीच्या आपल्या मुली म्हाळ्याने भोगण्यास त्यांची
हरकत नसते आणि नरबच्चाच्या नरडीचा घोट घेतल्यास त्यालाही त्यांची हरकत नसते.
पण एक दिवस असाही एतो की या म्हाळ्याला सवाई म्हाळ्या भेटतो.
आणि पहिल्या म्हाळ्याचे अनभिषिक्त साम्राज्य नष्ट होते........एक तर म्हाळ्या
मारला जातो किंवा टोळीतून पिटाळला जातो. आणि आश्चर्य म्हणजे ज्या माद्याच्या
जीवावरहा म्हाळ्या दांडगाई करत असतो त्या माद्या एका क्षणात नव्या म्हाळ्याशी
रत होतात. आर्थात नवा बलिष्ट म्हाळ्या मिळे पर्यंत.
सोनवणी साहेब कोणत्याही चळवळीचा इतिहास हा आणि असाच असतो.
आपण असे करता आहात असे मला म्हणायचे नाही तर असे करून नये हें
आपल्या लक्षात आणून द्यायचे आहे.
आणखी पहा भाग- 2)
धन्यवाद !
आपला
प्रा. रवींद्र तहकिक
श्री. रवींद्र तहकिक यांचे उत्तर (भाग-२)
ReplyDeleteमाननीय श्री. संजय सोनवणी,
आपण एक थोर आणि साक्षेपी लेखक /विचारवंत /समीक्षक / प्रबोधक / आहात , आपण लिखाण करताना एक विशिष्ट नियमांची आपण आखलेली चौकट पाळता . भाषा /लेखन विषय / शैली/ व्यक्ती / इत्यादी बाबतही आपण स्वतःला काही नियम आणि मर्यादा घातल्या आहेत .असे तुम्ही सांगितले. ही एक चांगली आणि अनुकरणीय गोष्ट आहे. परंतु प्रत्येकाने आपण ज्या वाटेवरून चालत आहात त्याच वाटेवरून चालावे. जो असा आपल्याला योग्य वाटणाऱ्या आवडणाऱ्या /भावणाऱ्या/ मार्गाने चालतो तो योग्य आणि जो वेगळी वाट काढून त्यावर चालू पाहतो तो मूर्ख ......हें निसर्गदत्त न्यायाला धरून नाही असे आपणास वाटत नाही का ?
संत ज्ञानेश्वारानी असे म्हटले होते की
सिंहाचे चालणे | जगती जालिया सिहाने |
म्हणोनी काय कोणे | चालोची नये ||
" सिंह ऐटीत चालतो म्हणून इतरांनी
चालूच नये काय ? " कोकिळा गोड गाते म्हणून इतरांनी गाउच नये काय? मला देखील आपला पूर्ण आदर ठेवून असे म्हणायचे आहे की
" सोनवणी असे लिहितात म्हणून आम्हीही तसेच लिहावे काय ? "
लेखन ही देखील एक लढाई असेल तर त्यात फक्त मनात एक आणि कागदावर वेगळेच असणारे तह आणि करारनामे किंवा ओढून ताणून अति सभ्य भाषेत खरडलेले कारकुनी कलाम असावेत असे तर आपले म्हणणे नाही ना? छापील लिखाणात आणि व्यासपीठावर बोलताना सभ्यता आणि शब्द शुचिता पाळणारा मनुष्य खाजगीत जर ती पाळत नसेल तर त्याच्या त्या ढोंगी पणाला तुम्ही काय म्हणाल ? त्या पेक्षा आम्ही जर सार्वजनिकरित्या जरा असभ्य भाषेत बोलत असू तर ( तो आमचा मूर्ख पणा) त्या ढोंगीपणा पेक्षा अधिक पारदर्शक नाही काय ?
दुसरे महत्वाचे असे की एखादी लढाई लढत असताना आपला शत्रू तोच आमचा असावा हा आग्रह कशासाठी? ( शत्रू हा शब्द टीका-विषय या अर्थाने घ्यावा मग तो व्यक्ती असेल किंवा विचार असेल )
आपण तर अमुक अमुक ( येथे पु ल देशपांडे ) हें अवध्य ( खून या अर्थाने नव्हे तर टीका या अर्थाने ) आहेत असे सांगता आहात. किंवा त्या पुढे जाऊन मारायला हरकत नव्हती परंतु हत्यारे फारच धारदार वापरली (भाषा)आणि विनोदी लेखकाला काय मारता ? विचारवंताना मारा की असा सल्ला देता....
म्हणजे असे तर नाही ना की राजा ने लढाईत फक्त शत्रू वरच हत्यार चालवायचे. दरबारातल्या विदुषकाने राणी साहेबांच्या ढुंगणावर लाथ मारली तरी त्यातल्या विनोदी (कलंदर ) वृत्तीची कदर करून दाद द्यायची! आणि त्याचा आस्वाद घ्यायचा. जो असे न करता त्या विदूषकाच्या मुस्कटात भडकावून त्याला लाथे खाली
तुडवत-बडवत त्याची रवानगी कोठडीत करील तो अरसिक ...असभ्य ...इतकेच काय मूर्ख सुध्धा! नाही काय सोनवणी साहेब !
श्री. रवींद्र तहकिक यांचे उत्तर भाग-२
ReplyDeleteमाननीय श्री. सोनवणी,
आपण एक थोर आणि साक्षेपी लेखक /विचारवंत /समीक्षक / प्रबोधक /
आहात , आपण लिखाण करताना एक विशिष्ट नियमांची आपण आखलेली
चौकट पाळता . भाषा /लेखन विषय / शैली/ व्यक्ती / इत्यादी बाबतही
आपण स्वतःला काही नियम आणि मर्यादा घातल्या आहेत .असे तुम्ही
सांगितले. ही एक चांगली आणि अनुकरणीय गोष्ट आहे .
परंतु प्रत्येकाने आपण ज्या वाटेवरून चालत आहात त्याच वाटेवरून चालावे .
जो असा आपल्याला योग्य वाटणाऱ्या आवडणाऱ्या /भावणाऱ्या/ मार्गाने
चालतो तो योग्य आणि जो वेगळी वाट काढून त्यावर चालू पाहतो
तो मूर्ख ......हें निसर्गदत्त न्यायाला धरून नाही असे आपणास वाटत नाही का ?
संत ज्ञानेश्वारानी असे म्हटले होते की
सिंहाचे चालणे | जगती जालिया सिहाने |
म्हणोनी काय कोणे | चालोची नये ||
" सिंह ऐटीत चालतो म्हणून इतरांनी
चालूच नये काय ? " कोकिळा गोड गाते म्हणून इतरांनी गाउच नये काय ?
मला देखील आपला पूर्ण आदर ठेवून असे म्हणायचे आहे की
" सोनवणी असे लिहितात म्हणून आम्हीही तसेच लिहावे काय ? "
श्री. रवींद्र तहकिक यांचे उत्तर भाग-३
ReplyDeleteमाननीय श्री. सोनवणी,
लेखन ही देखील एक लढाई असेल तर त्यात फक्त मनात एक आणि कागदावर वेगळेच असणारे तह आणि करारनामे
किंवा ओढून ताणून अति सभ्य भाषेत खरडलेले कारकुनी कलाम असावेत असे तर आपले म्हणणे नाही ना ?
छापील लिखाणात आणि व्यासपीठावर बोलताना सभ्यता आणि शब्द शुचिता पाळणारा मनुष्य खाजगीत जर
ती पाळत नसेल तर त्याच्या त्या ढोंगी पणाला तुम्ही काय म्हणाल ? त्या पेक्षा आम्ही जर सार्वजनिकरित्या
जरा असभ्य भाषेत बोलत असू तर ( तो आमचा मूर्ख पणा) त्या ढोंगीपणा पेक्षा अधिक पारदर्शक नाही काय ?
दुसरे महत्वाचे असे की एखादी लढाई लढत असताना आपला शत्रू तोच आमचा असावा हा आग्रह कशासाठी ?
( शत्रू हा शब्द टीका-विषय या अर्थाने घ्यावा मग तो व्यक्ती असेल किंवा विचार असेल )
आपण तर अमुक अमुक ( येथे पु ल देशपांडे ) हें अवध्य ( खून या अर्थाने नव्हे तर टीका या अर्थाने ) आहेत
असे सांगता आहात. किंवा त्या पुढे जाऊन मारायला हरकत नव्हती परंतु हत्यारे फारच धारदार वापरली ( भाषा )
आणि विनोदी लेखकाला काय मारता ? विचारवंताना मारा की असा सल्ला देता....
म्हणजे असे तर नाही ना की राजा ने लढाईत फक्त शत्रू वरच हत्यार चालवायचे. दरबारातल्या विदुषकाने
राणी साहेबांच्या ढुंगणावर लाथ मारली तरी त्यातल्या विनोदी (कलंदर ) वृत्तीची कदर करून दाद द्यायची !
आणि त्याचा आस्वाद घ्यायचा. जो असे न करता त्या विदूषकाच्या मुस्कटात भडकावून त्याला लाथे खाली
तुडवत-बडवत त्याची रवानगी कोठडीत करील तो अरसिक ...असभ्य ...इतकेच काय मूर्ख सुध्धा !
नाही काय सोनवणी साहेब !
श्री. रवींद्र तहकिक यांचे उत्तर भाग-४
ReplyDeleteमाननीय सोनवणी साहेब,
आपण आमचे शत्रू निवडण्याचे आणि त्याला कसे जेरबंद किंवा नामोहरम करायचे याचे व युद्ध तंत्र निवडण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहूद्या. त्यासाठी कोणती हत्यारे वापरायची. कसे डावपेच आखायचे. तह -करार -मदार कसे केव्हा करायचे याचे देखील स्वातंत्र्य अबाधित राहूद्या. आमच्या तंत्र आणि पद्धतीवर आपण आक्षेप/निषेध / टीका /टिप्पणी /सूचना /सल्ला /काहीही देवू शकता ....परंतु हें तंत्रच मुळात चुकीचे किंवा अनैतिक सदोष अथवा अवैध आहे आणि ते वापरणारे मूर्ख आहेत असे मात्र आपण म्हणणे बरोबर नाही .
अपझल खानाला कसा निपटायचा ? हें शिवाजीला ठरवू दया ना ? कारण त्याला तिथे शामियान्यात जायचे आहे . हें नैतिक हें अनैतिक ..हें शास्राला धरून हें नियमाला सोडून ,,,,असा विचार केला असता तर अफजलखानाचे सोडाच ..कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने ही शिवाजीचे मुंडके उडवले असते..... नव्हे ती वेळच आली होती.....एक क्षण ...एक क्षण जरी शिवाजी महाराजांच्या मनात ब्रम्ह हत्येची पाल चुकचुकली असती ना ......सोनवणी साहेब ! कार्यभाग बुडाला असता !!
असो आपण जेष्ठ आहात .......प्रबोधन चळवळीत आहात . अनिता प्रमाणे मी देखील आपला वाचक आहे. मी आपला आदर करतो तो आपल्या परखड -तर्कशुद्ध आणि पुरावे व मुद्द्यावर आधारित लेखना मुळे. परंतू याचा अर्थ असाही नव्हे की आम्ही ही आपल्याच पद्धतीचे अनुकरण करावे....
स्वतःची पध्धत वापरली म्हणून आम्ही जर मूर्ख ठरत असू तर तेही स्वीकारावे लागेल. आम्ही तुकोबा एवढे मोठे नाही परंतु त्यांनी ही उकळते पाणी / उसाचा मार / चोरीचा आळ/ घरादाराची लिलाव बोली / गाथेची बुडवणूक / आणि अखेर वैकुंठ गमन ( ? ) स्वीकारले ....तिथे कोणी आम्हाला मूर्ख संबोधित असेल तर ती सुरुवात आहे.असेच म्हणावे लागेल.
आपला उपमर्द किंवा अवमान करणे हा या पत्राचा उद्देश नाही. तथापि, अनावधाने असे घडले असल्यास आपली विनम्रता पूर्वक माफी मागतो
धन्यवाद ! (समाप्त)
आपला नम्र
प्रा. रवींद्र तहकिक
...................................
Mi tumhala kahi bolawe hi mazi icha hi nahi karan manus Shahanyala bolato. Manasik rugnala kahihi bolale tarihi tyala tyache kay vatnar. Aso, Pan aata vishay kadhalach aahe tar sangato jar tumhi eka Brahmana mule ase sangat aahat ki Sarv Brahman he Shivrayanche Shatru hote tar tumchyasarkhe aandhale aani mati bhrasht tumhich karan Shiv rayanna sarvat jast virodh Tumachya Marathyanich kela tohi futakal swarth payi. Tyach pramane tumhi lok tumachya tuccha swartha sathi Hindu dharmache tukade karu pahat aahat. jyaveli bangaladesh, pakistan, China he sarv desh aaplaya Deshavar chalun yetil na teva tumhi aani tumachya sanghatana kothe palun jatil hesuddha konal kalnar naahi.
Deleteसओनावानिजी, पु ला हे एक विनोदी साहित्यिक होते हे मान्यच , परत्नू त्यांच्यावर टीका होता कामा नये हा तुमचा दुराग्रह आहे. पु लांचे लेखन मला पण खूप आवडते, मी पुस्तके विकत घेवून वाचली आहेत.....पण एक दोष्ट अगोदर नाही यायची ती आता ध्यानात येत आहे ती म्हणजे त्यांचे ९०% पत्रे हि ब्राह्मण होती......कदाचित त्याकाळी वाचन वर्ग आणि त्यांनी मध्यम वर्ग मुंबईचा आणि पुण्याचा सोडून जास्त दुनिया बघितली नसेल म्हणून असेल.....पण त्यांची पुस्तके जर एखाद्या अ मराठी माणसाला ज्याला मराठी वाचता येते आणि कळते आशयाला दिली त्याला वाटेल....मराठी संस्कृती म्हणजे ब्राह्मण संस्कृती....तुम्ही आजपण झी मराठी पहा ८०% पत्रे (मालिका मधील ) हि ब्राह्मण असतात आणि इतर नावे (आडनावे) प्रामुख्याने नकारार्थी किवा गाव्न्ढाल भूमिकेत असतात याला काय म्हणायचे? व्यक्ती आणि वल्ली मध्ये किती बर्हमेतर पत्र आहेत, त्यांना एकपण ९७.5% पैकी दिसला नाही का?
ReplyDeleteअनिताजी, मी सर्वप्रथम आपले मन:पुर्वक अभिनंदन करतो. आपल्या ब्लोगवर प्रतिक्रिया देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. आपण जो अत्यंत संतुलित आणि ध्येयवादाला मुळीच तिलांजली न देता जो मार्ग आता पकडला आहे तो नक्कीच प्रशंसनीय आहे. आपला लढा समतेसाठी आहे. बंधुत्वासाठीच आहे. आपले भांडण नाही. खरे तर आपले कोणाशीच भांडण नाही. आपण महान बळीराजाचे वारस आहोत. बळीराजाने आपल्या प्रजेत कसलाही भेद केला नव्हता. आपण भेदातीत जाण्यासाठी कटीबद्ध आहोत यात शंका नाही. भेद माजवु पाहणा-यांना अंधांना जागे मात्र नक्कीच करायला हवे, पण ते बळीराजाच्या व्यापक मानवतावादी द्रुष्टीकोनातुन. माणसे बदलत नाहीत असे आजिबात नाही. माणसे बदलतात कारण बदलणे हाच मानवी स्वभाव आहे. फक्त सांगण्याची पद्धत संयत/सम्यक आणि मुलभुत तत्वद्न्यानावर आधारित अशी हवी. आता तुम्ही नेमके तसेच करत आहात. पानिपतबाबत आपल्या लेखात काही ऐतिहासिक त्रुटी असल्या तरी त्या मुळात हेतुत: नसल्याने त्याकडे दुर्लक्षच करायला हवे. आरएसेस, गडकरी, मोदी, भागवत, हिमानी सावरकर, सनातन प्रभात ईईई हा साराच कंपु देशाच्या समतेच्या वाटचालीकडे जाणा-या मार्गातील अडसर आहेत याबद्दल शंका बाळगायचे कारण नाही. हे अडसर कसे दुर करायचे हे आपल्यापुढचे आव्हान आहे. या संघटना व त्यामागील प्रव्रुत्तींवर आपण सतत प्रकाशझोत टाकणे आवश्यक आहे व त्याच वेळीस बहुजनांना द्न्यानसत्ता, अर्थसत्ता याविषयी जागे करण्याचीही गरज आहे. या संघटनांत दुर्दैवाने बहुजनांची संख्या वाढत आहे. संघटना या प्रव्रुत्ती असतात. या प्रव्रुत्तींना सर्वच समाज (मग ते कोणीही व कोणत्याही जातीचे असोत) अजुन तरी शरण गेलेला नाही. तो जावू नये हीच आपली इच्छा असायला हवी. तुम्हीच तुमच्या ब्लोगवर म्हणता..."कोणाही जीवाचा न घडो मत्सर..." येथे मत्सर हा शब्द तुकोबारायांनी अत्यंत जाणीवपुर्वक वापरला आहे. मत्सरग्रस्त कधीही स्वत:ची वा इतरांची प्रगती साधु शकत नाहीत. अधिक लिहित नाही. कोणाला उपदेश करण्याची माझी योग्यता नाही. पण तुम्ही माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत जो सकारात्मक बदल घडवला ते मात्र अद्भुत आहे एवढे येथे मी आवर्जुन नमुद करतो. मी तुमचा थोरला भाउ आहे आणि हा मान तुम्ही मला दिलात हे तुमच्या परिवर्तनातुन ठळक होते. मी तुम्हाला या परिवर्तनवादी विचारसरणीला अनंत शुभेच्छा व आशिर्वाद देतो.
ReplyDelete