Tuesday, July 10, 2012

त्यांनी पुरोगामित्वतेचा टेंभा मिरवु नये...


प्रा हरी नरके यांना यंदा १ जुन रोजी महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानतर्फे पहिला "महाराजा यशवंतराव होळकर पुरस्कार प्रदान केला गेला. कसे नकळे राहुन गेले, त्यांना दिल्या गेलेल्या मानपत्रातील मजकुर मी द्यायला विसरलो. एका मानपत्रात बसावे एवढे त्यांचे कार्य छोटे नाही. मी ते मानपत्र येथे उद्घृत करत असून माझे एक चिंतन त्याखाली मांडत आहे.


"मानपत्र


गेली चौतीस वर्ष बहुजनांच्या आत्मिक, बौद्धीक आणि वैचारिक उत्थानासाठी अहर्निश संशोधन, लेखन, व्याख्याने याद्वारे महाराष्ट्राचे प्रबोधन करणारे श्रेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांस हे मानपत्र आणि पहिला "महाराजा यशवंतराव होळकर सन्मान" बहाल करतांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. शालेय जीवनातच, वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात आपण झोकुन दिले व एक महिन्याचा तुरुंगवासही भोगला. हे आपले फुले-आंबेडकरी तत्वधारेच्या महामार्गावरील पहिले पावूल होते. महात्मा फुलेंची बदनामी करणा-या लेखनावर आपण वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी "महात्मा फुले यांची बदनामी:एक सत्यशोधन" हा मौलिक ग्रंथ लिहुन सनातन्यांना सडेतोड उत्तर दिले व बहुजन महाराष्ट्राला अत्यंत संशोधकीय व वैचारिक बैठक असलेल्या एका तरुण विचारवंताचा उदय झाल्याची साक्ष पटली. त्यानंतर आपण ३५ ग्रंथ लिहिले, जवळपास चाळीस विद्यापीठांत आपण शोध-प्रबंध सादर केले, पाचशेहुन अधिक लेख देशभरातील महत्वाच्या वर्तमानपत्रांत व नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. महात्मा फुले व डा. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे संपादन हे आपले कार्य चिरस्मरणीय व अतुलनीय असेच आहे. आपल्याचे प्रेरणेने व पुढाकाराने महात्मा फुलेंचे पुण्यातील स्मारक, महात्मा फुलेंच्या पुतळ्याची संसदभवनात उभारणी, नायगांव (सातारा) येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक ही महत्कार्ये घडली.    
आपण देशातील आजचे सर्वोत्कृष्ठ वक्ते आहात व आजवर सहा हजारांपेक्षा अधिक व्याख्याने देश-विदेशात दिली आहेत. आपल्या माय मराठीला "अभिजात" भाषेचा दर्जा मिळावा म्हणुन आपण जे अतुलनीय कार्य करत आहात त्याबाबत समस्त मराठी भाषक आपले आजीवन कृतद्न्यच राहतील. 
आपले जीवन म्हणजे समाजाला जागृत करण्याचा झंझावाती प्रवास आहे. त्याला प्रगल्भ बुद्धीनिष्ठ वैचारिकतेचा तेजाळता पाया आहे. आज सर्वच बहुजनीय जनता आपल्या स्वतंत्र वैचारिक प्रतिभेने नुसते दिपली आहे असे नाही तर त्यांच्यातही जे वैचारिक परिवर्तन होत आहे ते पाहता हा महाराष्ट्र ख-या अर्थाने पुरोगामित्वाच्या दिशेने चालु लागला आहे हे जाणवते आणि त्याचे सर्वस्वी श्रेय आपल्याकडेच जाते हे नमुद करतांना आम्हाला अनिवार आनंद वाटतो. आपणास आजवर असंख्य सन्मान, पुरस्कार मिळालेले आहेत, भविष्यातही मिळतच राहतील, परंतु आपल्याप्रती कृतद्न्यता, आपल्या कार्याला शुभेच्छा आणि पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आम्ही आपणास हे मानपत्र व महाराजा यशवंतराव होळकर सन्मान डा. स. दा. तुपे यांच्या हस्ते प्रदान करत आहोत."

मुक्त चिंतन:

पुरोगामित्व म्हणजे नेमके काय असते हा प्रश्न विचारला कि पुरोगामी म्हणवणारे उत्तर देतील कि फुले-शाहु-आंबेडकर हे एकोणिसाव्या व विसाव्या शतकात होवून गेलेल्या महनियांच्या व पुरातन काळाबाबत बोलायचे तर चार्वाक-बुद्धाच्या तत्वज्ञान व विचारांचे अनुसरन करतो तो पुरोगामी होय. मला वाटते आधुनिक पुरोगाम्यांची ही प्रतिगामी आत्मवंचना आहे. प्रत्यक्ष जीवन, आचरण आणि विचार हे नाममात्र दाखवण्यापुरते पुरोगामी असून प्रत्यक्षात प्रतिगामित्वाचे जहर या पुरोगाम्यांतही भरलेले आहे. हे कसे ते आपण थोडक्यात पाहुयात.
त्यासाठी काही प्रश्न विचारता येतील:
१. या कथित पुरोगाम्यांपैकी कितींनी आंतरजातीय विवाह केला आहे व करवण्यात हातभार लावला आहे?
२. चार्वाक व बुद्धाचे तत्वज्ञान यांना खरोखर कितपत समजले आहे कि केवळ विशिष्ट स्वार्थासाठी, अनुनयासाठी वा स्वतंत्र आयडेंटिटी सिद्ध करण्यासाठी त्यांची नांवे घेतली जात आहेत?
३. परमेश्वर यांनी खरेच नाकारला आहे, जातीय बंधने खरेच नाकारली आहेत कि ते फक्त आपले इतरांपेक्षा वेगळे दाखवण्याचे एक ढोंग आहे?
४. भारतात जन्माला आलेले सारेच धर्म एन-केन स्वरुपात देवतांना मानतात. एकही अपवाद नाही. जातीत धर्म आणि धर्मात जात हे वास्तव मान्य करत त्यांपार जाण्यासाठी यांच्याकडे नेमका काय कार्यक्रम आहे? एका दैवताला अमान्य करत दुसरी दैवते स्वीकारणे याला पुरोगामी म्हणतात काय?
५. वैदिकांत ब्राह्मण श्रेष्ट तर बौद्ध धर्म तत्वज्ञानात खतीय (क्षत्रीय) श्रेष्ठ अशीच जर उतरंड असेल तर खरेच या देशात समतेचा धर्म कधी खरोखर निर्माण झाला काय? संतांनाही जातीय अभिमान वा हीनगंडात्मक मानसिकतेने ग्रासलेले इतिहासात दिसत नाही काय? या वर्चस्वतावादी वा हीणगंडात्मक मानसिकतेला या वर्तमानातील पुरोगाम्यांनी नेमके काय उत्तर शोधले आहे? आजही सर्व बहुजनीय जातींतील ९९% लोक आपली पाळेमुळे पुरातन काळातील ब्राह्मण वा क्षत्रिय कुळांत शोधत असतात, या न्युनगंडात्मक मानसिकतेतून समाजाला सोडवण्याचे कार्य/प्रयत्न कोणत्या वर्तमानातील पुरोगाम्याने केले आहे?
असो. प्रश्न खुप आहेत, पण येथे विश्राम घेत पुढील मुद्दे चर्चेला घेतो. वरील प्रश्नांची उत्तरे मी या पुरोगाम्यांवर सोडुन देतो. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे उत्तरे द्यावित एवढीच अपेक्षा.
महाराष्ट्रात सांस्कृतिक गोंधळ जेवढा या पुरोगाम्यांनी निर्माण केला आहे तेवढा यांच्याकडुन गालीप्रदान केल्या जाणा-या प्रतिगाम्यांनीही केला नसेल. हे विधान नीट समजावून घेतले पाहिजे. काळाच्या ओघात मनुष्याच्या वैचारिकतेत प्रगती होत असते व स्वाभाविकपणे समाजाचीही प्रगती होत असते...कालचे विचारवंत आज, त्यांच्याबद्दल आदर ठेवुनही, खुजे व्हावेत अशी झेप नव्या पिढ्यांनी घ्यावी अशी अपेक्षा असते. स्थितीस्थापकता म्हणजे प्रतिगामीपणा होय, तर विकसनशीलता (मग ती वैचारिक असो, आध्यात्मिक असो, आर्थिक असो अथवा राजकीय) म्हणजे पुरोगामीपणा होय. काळ तर अव्याहतपणे पुढे जाणारच. पण जसे शिव्या खायच्या लायकीचेच असणारे काही वैदिक (जसा आमिरखानाच्या कार्यक्रमातील काशीचा बडवा जो घटनाच मानत नाही...व तसे अनेक आणि संघवादीही) जसे जुण्याला चिकटुन बसलेत ना तसेच हे फुले शाहु आंबेडकर आणि पार बुद्धालाही चिकटुन बसणार! जणु त्यांच्यानंतर काही नाही आणि त्यांच्यापुर्वीही काही नाही. आणि समजला तर एकही नाही.
मी याला सरळ ग्राम्य शब्दात सांस्कृतीक अडानचोटपना म्हणतो.
यांना मी पुरोगामी म्हणुच शकत नाही.
कोणत्याही व्याख्येवर ही पुरोगामित्वाची आख्याने टिकु शकत नाहीत.

जातीबाहेर जाणा-यांना जातींत ढकलणारे हरामखोर...

प्रा. नरकेंना यशवंतराव होळकर पुरस्कार मिळाला तर खुद्द काही धनगरांना खटकते. माळ्यांनी बोलवलेल्या कार्यक्रमांत ते माळ्यांच्या उणीवा परखडपणे सांगतात तर माळी नाराज. पुर्व-दलितांसाठी आयुष्य घालवत बाबासाहेब समजावून द्यावेत तर बामसेफ...भारत मुक्ती मोर्चाने पार त्यांच्या डी.एन.ए. चाचणीची मागणी करावी. मराठा सेवा संघाने केवळ मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणुन त्यांनी नरकेंचा पत्ता हर प्रकारे काटायचा प्रयत्न करायचा. मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळावा या रास्त मागणीला खुद्द मराठीचे सारस्वत म्हणुन मिरवणा-यांनी "मराठी ही भाषा अभिजाततेचा दर्जा मिळायला लायक नाही" हे स्वयंघोषित शंकराचार्यांप्रमाणे घोषित करत पोरांना इंग्रजी शाळांचा रस्ता दाखवायचा. मराठी साहित्यिक म्हणुन मानसन्मान घ्यायचे ते घ्यायचे...नरकेंनी "जर ओबीसी मुस्लिमांना आधीच ओबीसींचे आरक्षण आहे तर वेगळे (ओबीसी कोट्यातुनच) साडेचार टक्के निर्माण करणे हे अश्रफ आणि अजलाफ मुस्लिमांपैकी अजलाफांचेच नुकसान करेल हे तथाकथित पुरोगामी मुस्लिमही समजावुन घेत नाहीत. चीप प्रसिद्धीच्या नादात अविचारी होत फसव्या विचारव्युहांशी शरणागती पत्करणारे हे कधीच समजावून घेवू शकत नाहीत.
भारतीय समाज हा लबाड, खोटारडा, आत्मवंचना करनारा...समाजालाच काय...स्वत:लाही फसवणारा आणि दांभिक आहे हे माझे स्पष्ट मत आहे. आणि त्यांत पुराणे व जुना इतिहास सांगणारे ब्राह्मण जेवढे वरील आक्षेपांना जबाबदार आहेत तेवढेच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त, आजचे बोलायला गेलो तर, हे कथित पुरोगामीही आहेत.
यांना सत्य काय आणि असत्य काय यातील मुळात फरकच माहित नाही. पुन्हा वर तुकोबांचे "सत्य असत्याशी मन केले ग्वाही" म्हणायला चोरासारखे तयार कि! चोरही एवढे निगरगट्ट नसतात.
प्रा. नरके या सामाजिक "हिग्ज फिल्ड"च्या दाय-यातुन वस्तुमान घेत समाजाला समाज का म्हणावे, तो कसा बनतो आणि तो कसा चिरकाळ टिकेल यासाठी असा कोणता "सामाजिक बोसान" कण सापडेल याचा शोध घेत आहेत. ते विश्वनिर्मिती वगैरे ही काही या मराठी जनांची महत्वाची बाब नाही...आपण असेच का आहोत आणि असे आपच्याच म्हनवणा-यांकडुन का अविरत छळले जात आहोत या अत्यंत मुलभुत प्रश्नांची उत्तरे जोवर मिळत नाहीत तोवर आम्हाला आमचे सामाजिक अस्तित्व निर्माण करनारे हिग्ज-बोसान कण शोधावे लागणार आहेत. त्याशिवाय या विश्वाकडे आम्ही कधीही उघड्या डोळ्यांनी पाहु शकणार नाही. हे विश्व तसेही आम्हासाठी कालांधार आहे. आमच्याच लोकांकडुन जसे आहे तसेच आमच्यातल्याच लोकांकडुनही आहे.

मला नुकताच एका मित्राचा फोन आला होता, त्यांना माझ्याकडुन एक लेख हवा होता. माझ्यावर कोणाचा प्रभाव आहे असे विषद करणारा लेख त्यांना माझ्याकडुन हवा होता. मी त्यांना नम्रपणे विचारले कि तुम्हाला नेमके काय अभिप्रेत आहे? त्यांनी मला सांगितले कि फुले शाहु किंवा आंबेडकर...यांपैकी तुमच्यावर कोणाचा प्रभाव पडला यावर विवेचन अभिप्रेत आहे.

मी क्षमा मागुन म्हणालो...मला सर्वच महापुरुषांबद्दल आदर आहे...

पण माझ्यावर प्रभाव कोणाचाही...अगदी कोणाचाही नाही!

माझे जीवन वा विचार हे कोणत्याही एखाद्या गतकालातील असो कि वर्तमानातील...प्रभावात नव्हते व नाही.
मित्राला आश्चर्य वाटले. त्याच्या अपेक्षा मी पुर्ण करु शकलो नाही याचा खेद आहे. पण मी मित्राला खुश करण्यासाठी काही लिहिले तर ते लिहिणे हाच अनादर ठरेल...त्या महनियांबाबत. मी त्यांचा आदर करतो पण माझ्यावर एकाही विगतातील महनियाचा प्रभाव नाही.

आणि तो नसण्यातच माझे असतेपण आहे!

त्यामुळेच आजकाल काही भोट प्रा. नरकेंना जेंव्हा भटाळलेला म्हणतात तेंव्हा फक्त त्यांची विद्वेषाची फुत्कारती द्विधा जिंव्हा तेंव्हा तळपत असते...असल्या वांड सर्पांना कसे थप्पड मारुन ठिकाणावर आणायचे हाच प्रश्न आहे आणि सुटेल तो लवकर. ज्यांना वैचारिकता समजत नाही , ते फक्त हमरीतुमरीवर येवु शकतात, तोडफोड सोडुन ज्यांना काहीच समजत नाही...उमजत नाही...ते कालौघात दफनच होत जाणार. जगात प्रेतांच्या राशी उठवणारे क्रुरात्मे आज कोणत्या मातीत (वा समुद्रात) दफन झाले हे सुसंस्कृत जगाला माहित करुन घ्यायची गरज नसुन उद्याची स्नेहमय सह-संस्कृती कशी उभी करायची व त्यासाठी कोणत्या त्यागांना आजसाठी का होईना सिद्ध व्हायचे हाच खरा प्रश्न आहे.

मला वाटते, हिग्ज-बोसान कण असतील अथवा नसतील...आम्हाला आमचा समाज विकृत करणारे विषकण मात्र शोधुन त्यांचा विनाश करणे क्रमप्राप्त आहे...अन्यथा हा एकुणातीलच समाज एबढा क्रमाक्रमाने विषमय होत जाईल कि विश्व कसे बनले हे कधीकाळी समजायच्या आतच हे मनोविकृत ज्या जगामुळे विश्व समजु शकेल कदाचित ते मानवी जगच नष्ट करुन टाकतील!

कोणी कोणाला नष्ट करण्याच्या व आज एक वांझ सत्ता हाती आहे म्हणुन दुस-यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न जे करतात ते षंढच असतात.

सर्व समाज संपुर्ण आत्मशक्तिने प्रेरित होत पुढे जाणारच आहेत...वैचारिक मतभेदांसहित...
पण ज्यांची विचार करायचीच मुळात लायकी नाही त्यांनी पुरोगामित्वतेचा टेंभा मिरवु नये...

20 comments:

  1. Mr. Sonawani, a fearless free thinker like you is a Godly gift to our modern society. You are true friend of friends. We know the stupids will trouble you and your friends...but they are one who will revive our dead society some day...best of luck and though mute...support to your cause.

    ReplyDelete
    Replies
    1. या सोनवन्याची लायकी आहे का कि बुद्धाचे नांव घ्यावे? नरक्याला तर नरक पक्काच मिलनार. भुजनल काय देतो यांना माहित नाही काय? एकदम थर्ड क्लास लेख.

      Delete
    2. आपलं काळं तोंड लपवून असली मुक्ताफळं उधळणार्‍या अनामिका तुझी तरी लायकी आहे काय रे उघडपणे खर्‍या नावाने असे उत्तर लिहायची? ओळख लपवून उंदीर पण वाघासारखा डरकाळ्या फोडायचा आव आणू शकतो.सोनवणी जे लिहितात ते छातीठोकपणे स्वतःच्या नावावर लिहितात. खरा मर्द गडी आहे तो. तुझ्यासारखा नामर्द नाहीये थोबाड लपवायला. आम्हा बहुजनांना अभिमान आहे की सोनवणी व नरके साहेबांसारखे निरपेक्ष बुद्धीचे विचारवंत लाभले आहे. तुझ्यासारख्यांशी गनिमी कावा आम्हा बहुजनांना पण खेळता येतो हे समजून ऐस.

      Delete
    3. "या सोनवन्याची लायकी आहे का कि बुद्धाचे नांव घ्यावे? नरक्याला तर नरक पक्काच मिलनार. भुजनल काय देतो यांना माहित नाही काय?"

      सही है बॉस!! ह्या लोकांना सत्य सहन होत नसले तरी ऐकवलेच पाहिजे. Keep it up!!

      Delete
  2. [भारतीय समाज हा लबाड, खोटारडा, आत्मवंचना करनारा...समाजालाच काय...स्वत:लाही फसवणारा आणि दांभिक आहे हे माझे स्पष्ट मत आहे]
    अतिशय परखड आणि उत्तम लेख. भारतीय समाज हा खरोखरीच अतिशय लबाड आहे. जात तर दूर राहिली, पोटजातीत पण भांडणे, श्रेष्ठत्वाचे हेवेदावे चालू असतात, चालू आहेत. दलित - बहुजन बहुसंख्य दारिद्र्यात, अज्ञानात तर त्यांचे नेते, ज्यांचे जरा भले झाले आहे, ते मस्तीत शिवराळपण करण्यात गुंग. मराठा असणे हे फक्त आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र येण्याची लबाडी, पण सोयरिकी, लागणे करताना तो ९६ कुली असण्याचा ताठा, आम्ही फक्त ९६ कुळी नाही तर आम्ही देशमुख किंवा आम्ही पंचकुळी ह्याचा प्रभाव अजूनही कमी झालेला नाही. ज्या ब्राम्हण समाजातून मी आलोय, त्यात पण असल्या गोष्टी ३०- ४० वर्षापूर्वी होत्या - कोकणस्थ देशस्थाना कमी समजणार तर देशस्थ कर्हाडे ब्राम्हणांना नावे ठेवणार. सध्या हा प्रकार ब्राम्हण समाजात खूप कमी झालेला आहे, पण तरीही असल्या विचारांच्या व्यक्ती दुर्दैवाने अजूनही भेटतात. तसेच पोटभेद इतर सर्व सर्व जातीत पण आहेत. मति गुंग करणारी समाज रचना आहे. समाज रचनेत फरक पडतो आहे, पण त्याचा वेग खूपच कमी आहे. नवी जात पैसा असणार्यांची आहे आणि मूलनिवासी नायक त्याला ब्राम्हण-बनिया युती म्हणतात. म्हणजे चातुर्वर्ण्यातील पहिले आणि तिसरे यांची युती. ह्या विधानाला काहीही अर्थ नाही, परिमाण नाही, फक्त शिव्या देण्यासाठी तयार केलेला, आणि त्यांच्या समर्थक लोकांना शिव्या द्यायला अजून एक टार्गेट तयार केलेले आहे असे वाटते.

    [मी क्षमा मागुन म्हणालो...मला सर्वच महापुरुषांबद्दल आदर आहे. पण माझ्यावर प्रभाव कोणाचाही...अगदी कोणाचाही नाही!]
    आता काही लोक हिंदू देव नाकारून आता नवे देव तयार करत आहेत, हे खटकते. जसे बुद्ध हा देव, मग शाहू महाराज, आंबेडकर, म. फुले, शिवाजी महाराज हे नवे देव. आंबेडकर ह्याचे समजा ९९% विचार पटत असतील, आणि त्यांच्या एका विचारला विरोध केला, त्यावर प्रश्न केला की तो भटाळलेला, मनुवादी, बहुजन विरोधी. हा विचार आणि सनातनी हिंदू, जिहादी मुसलमान आणि बॉर्न अगेन क्रिश्चन ह्यांच्यात काहीही फरक नाही. मुलतत्वत्वादी कोणत्याची समूहाचे असतील तरी त्यांचे विचार जवळपास सारखे असतात. जिहादींना गैरमुसलमान सगळ्यांना मारून टाकायचे आहे, खेडेकारांना सगळ्या ब्राम्हण पुरुषांना (फक्त पुरुषांना) मारायचे आहे तर बॉर्न अगेन क्रिश्चन लोकांना परत कृसेडस हव्या आहेत. ह्याचा अर्थ एकाच की, त्या सगळ्यांना अश्मयुगाकडे वाटचाल करायची आहे.

    [या सोनवन्याची लायकी आहे का कि बुद्धाचे नांव घ्यावे? नरक्याला तर नरक पक्काच मिलनार. भुजनल काय देतो यांना माहित नाही काय? एकदम थर्ड क्लास लेख.]
    ह्या लेखावरची ही प्रतिक्रिया मात्र अगदी विनोदी आहे. हे अनामिक आपण बुद्धावर कॉमेंट केली म्हणून नाराज आहेत पण ते श्री. नरकेंना "नरक" मिळणार हे खात्रीने सांगत आहे. भूजनल म्हणजे ह्यांना बहुतेक छगन भुजबळ म्हणायचे असावे, आणि ते श्री. नरकेंना काय लिहायचे ते सांगून वर पैसे वगैरे देतात असला विनोदी आरोप. काय उत्तर देणार असल्या आरोपांना आणि असल्या क्षुद्र अक्षेपान्न्ना?

    ReplyDelete
    Replies
    1. भारतात राहू देण्याच्या बदल्यात बामनांना ‘विशेश आश्रय कर' लावा
      Special Article. Read on my Blog : http://sarvsamaj.blogspot.in/

      Delete
    2. kay pan bolto haa BSS. aaj bamananvar tax lava mhanto, udya baman sample kee mag amha dalitanchya mage. amacyavar sadhya atyachar tumhich marathe karata ani paisa kha kha khata...

      Delete
  3. संजय सोनवणींचे सगळेच लेखन मनस्वी असते.त्यांचा व्यासंग एव्हढा दांडगा आहे की हा एक माणुस आहे की ही एक टीम आहे असा ब-याचदा प्रश्न पडतो.संजयसर,स्वता: मोठे असुनही त्यांच्याकडे इतरांचा गुणगौरव करण्याची दानत आहे ही सुखद गोष्ट होय.मोठी माणसे ब-याचदा आत्मकेंद्रीत असतात,इतरांचे कौतुक करण्यात कंजुषी करतात.सोनवणी याला अपवाद आहेत.नरके-सोनवणींचा रस्ता खडतर आहे.त्यांनी काही माथेफिरु संघटनांशी सामाजिक भुमिकेतुन उघड मतभेद प्रगट करण्याचे असामान्य धैर्य दाखवलेले आहे.जे शिवीगाळ करतात,ते आपण तुमचे मुद्दे खोडु शकत नाही अशी जाहीर कबुलीच देत असतात.त्यामुळे त्यांना फार महत्व देवु नका.आपला फोकस योग्य आहे.आम्ही तुमच्यासोबत आहोत.तुम्ही एकटे नाही हे कायम लक्षात ठेवा.सर्व शुभेच्छा..

    ReplyDelete
  4. थोडक्यात काय तर नरके आणि सोनवणी हे आजपर्यंतच्या सर्वच सुधारकांपेक्षा श्रेष्ठ आहेत. ते म्हणतील तेच सत्य. त्यांना विरोध करणारे सारेच प्रतिगामी असून त्यांचे समर्थन करणारे सर्वच जण पुरोगामी आहेत. जो कोणी ह्या दोघांशी असहमत असेल त्याला विचारवंत तर सोडाच पण माणूस म्हणवून घ्यायचा देखील हक्क नाही. त्यांच्या पेक्षा वेगळे विचार जे मांडतील त्यांना प्रतिगाम्यांचे हस्तक ठरवून त्यांच्यावर टीकेचा भडीमार करण्यात येईल.
    कळावे. लोभ असावा (कसला ते विचारू नका).

    ReplyDelete
    Replies
    1. True they are all above Buddha, Fule shahu ambedkar...............Not worth of commenting

      Delete
  5. माजोरडा सत्ताधीशJuly 11, 2012 at 7:56 AM

    "कोणी कोणाला नष्ट करण्याच्या व आज एक वांझ सत्ता हाती आहे म्हणुन दुस-यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न जे करतात ते षंढच असतात."
    -इति सोनवणी

    [अस्मादिकांचे मनोगत - सुप्रसिद्ध सानुनासिक आवाजात]
    कळतात! कळतात बरे आम्हांस ही बोलणी! पाहुण्याच्या हातून विंचू मारणे हा प्रकार नवीन नाही आम्हांस.

    ReplyDelete
    Replies
    1. Nav Baare shobhel se ch theun ghetlay...

      Delete
  6. Sanjayji, jatiy vyavastha evadhi aplyawar hami ahe ki. Apan tyachyapalikade vichar karu shakat nahi. Apyalat aplyat bhandanche mul suddha hi jatiy vyavastha ahe. Jata jat nahi. Kevadhe he shdhyantra ahe. Apan matra ek mekhache une dune kadhat baslo ahot.
    Ti matra aplya sarvanchi maja bhagat ahe.

    ReplyDelete
  7. मी सर्व प्रतिक्रिया दात्यांचा विनम्र आभारी आहे. अनुकुल असोत कि प्रतिकुल, पण प्रतिक्रिया द्याव्या वाटने/देणे हे मानवी मनाच्या विकसनात्मक बुद्धीचे लक्षण आहे आणि मला त्याबद्दल आनंदच होत आहे. मला हेल काढुन बोलता लिहिता येत नाही पण अनामिक नांवाने (खरे तर जन्माला येतो तेंव्हा प्रत्येक जणच अनामिक/निरास्तित्व असतो त्यामुळे मी अनामिकांनी अनामिक का राहिले याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही) ज्यांनी प्रतिकुल प्रतिक्रिया दिल्यात त्यांना मी एवढेच सांगु इच्छ्घितो कि:

    बुद्ध, येशु, महावीर, पैगंबर, कृष्ण हे त्यांच्या आधीच्या काळांतील महनियांपेक्षा मानवजातीला अधिक उपकारक ठरु शकेल असे चिंतन केले, तत६वज्ञान मांदले व त्यानुरुप जीवन जगले म्हणुन ते श्रेष्ठ झाले. त्यांनीही त्यांच्या पुर्वीच्या तत्वज्ञान्यांचे तत्वज्ञ्नान खोडले पण अनादर केला नाही...आणि म्हणुनच ते महान आहेत. याचा अर्थ असा नाही कि मानवजातीने तेथेच थांबावे व त्यांचे सर्व काही अंतिम होते हे समजत त्यांचे तत्वज्ञान पुढे नेण्याचा प्रयत्न न करता स्थितिस्थापक व्हावे. स्थितिस्थापकता हा पुर्वसुरींवरीन अन्याय असतो हे समजावून घावे लागणार आहे. न्युटनचे सिद्धांत आईन्स्टाईनने खोडले म्हनजे न्युटन छोटे नव्हेत तर अधिक महान ठरतात कारण न्युटन नसते तर आईन्स्टाईन झाले नसते. बुद्ध-महावीरांबाबत हे जेवढे सत्य आहे तेवढेच ते फुले, शाहु, म. गांधी आणि बाबासाहेबांबद्दलही खरे आहे. या सर्वांनी पुर्वसु-या कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट नाकारल्या म्हणुन ते महान आहेत. गतकाळातील सारेच पुरेपुर नाकारत नवा समाज घडवता येत नाही याचे भान त्यांना होते. त्यांच्या रननित्या त्या कालाच्या संदर्भ चौकटीशी त्यांनी जुळवून घेतले.

    आज संदर्भ चौकटी बदललेल्या आहेत. गतशतकांतील महनियांना ते होते तसेच्या तसे आज स्वीकारने हा प्रतिगामी झाला कारण कालाचा वेग कधी नव्हे तेवढा वाढला आहे. छायेखाली वाढ्णारी खाडे खुरटलेलीच राहतात. पराक्रमी वीर पुरुष आपल्या प्रजेला आमच्याच सावलीत वाढा असे कधीही म्हणत नाहीत वा अपेक्षा करत नाहीत. पण ज्यांना काहीच करायचे नसते ते मात्र नामघोष करत आपली कमतरता छपवण्यासाठी स्वार्तोत्पन्न जुन्याचा जयघोष करत बसतात. ज्यांनी वाट बनवुन दिली तिचा महामार्ग करायचा असतो व ती आपली जबाबदारी असते याचे भान सुटले कि अशा प्रतिक्रिया येणारच...

    सनातनी ब्राह्मण आणि यांच्या मनोवृत्तींत काहीएक फरक नाही...एवढेच.

    ReplyDelete
    Replies
    1. Sundar.. Sir
      Sudhir Dhamankar,Belgaon

      Delete
  8. शाहू आणि आंबेडकर यांनी फुलेंच्या विचारांचा प्रभाव नाकारला नाही तर त्यात भर घालून त्यांच्या मार्गावरूनच मार्गक्रमण केले. प्रस्थापितांचे हितसंबंध जपणारे तत्वज्ञान नाकारणे वेगळे आणि आधीच्या महामानवांचे तत्वज्ञान नाकारणे वेगळे. महामानवांचे तत्वज्ञान नाकारून त्यांनी दिलेल्या वाटेचा महामार्ग करता येत नाही. त्यासाठी प्रथम महामानवांचा स्वत:वर असलेला प्रभाव मान्य करावा लागतो.
    मूळ वाटेचा महामार्ग करतांना कुठे जायचे आहे याचे भान असणे हे आवश्यक असते आणि हे भान मूळ वाट लक्षात ठेवूनच जपता येते. महामार्ग तयार करण्याच्या नावाखाली मूळ वाटच पुसून टाकण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा तो महामार्ग तयार करणाऱ्यांपासून सावध राहणे भाग पडते.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...