आत्म्याबद्दल...
१. आत्मा आहे असे म्हटल्याने आत्मा आहे असे होत नाही अथवा आत्मा नाही असे म्हटल्याने आत्मा नाही असेही होत नाही.
२. मन, बुद्धी आणि काळ यांना जोडणारे सूत्र म्हणजे आत्मा होय. आत्मा केवळ बुद्धीगम्य असून त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही.
३. आत्मा नव्हे तर चेतना हेच मनुष्याच्या जीवित असण्याचे कारण आहे.
४. आत्म्याला स्वता:चे कोणतेही विकार नसुन मन, बुद्धी व काळामुळे त्याच्यावर विकार आरोपित होतात.
५. काळाच्या सहास्तित्वाने मनाच्या व बुद्धीच्या -हासाबरोबरच आत्म्याचा -हास होतो तर उत्थानाबरोबरच उत्थान.
६. बुद्धीची परमोच्च संपृतावस्था म्हणजे प्रज्ञा होय. मन आणि बुद्धी यांच्यातील आंतर्विरोधात मनाचा वा बुद्धीच -हास झाला कि जी अवस्था निर्माण होते, तिलाच आपण आत्म्याचे अध:पतन म्हणतो....कारण मन व बुद्धी यांच्यातील दरी वाढल्याने आत्म्याचे कारण घटलेले असते.
७. आत्मा, बुद्धी व मनाचे कारण चेतना असून आत्मा कशाचेच कारण नाही तर उपफल आहे.
८. चेतना जीव ते जडजगताचे अहेतुक कारण आहे. चेतनेचे अस्तित्व विश्वाच्या अस्तित्वाने लक्षात येते...तिचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही.
परमेश्वराबद्दल...
१. परमेश्वर ही मानवी प्रज्ञेची मानसिक प्रक्षेपणरुप कल्पना असून, मानवी समुहाच्या एकत्रीत प्रक्षेपणांतुन निर्माण झालेली प्रतिमा आहे.
२. मानवी मन व प्रज्ञा यांच्या कालसंदर्भ चौकटीत आत्म्याच्या सूत्रांतील क्षीणपनामुळे निर्माण होणा-या संवेदनांचे मानसिक वा प्रत्यक्ष प्रतीकरुपाने मनुष्याकडुन होनारे प्रकटन म्हणजे परमेश्वर होय.
३. परमेश्वराला मानवी अस्तित्वाखेरीज स्वतंत्र अस्तित्व नाही.
४. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र प्रतिमात्मक परमेश्वर असून एकुणातील मानवी समुदायाचे सामुदायिक परमेश्वर-स्वरुप प्रक्षेपणाचा समुच्चय म्हणजे एकुणातील परमेश्वर.
५. या परमेश्वररुपी प्रतीकांचे पुजन म्हणजे अप्रत्यक्षपणे स्वपुजनच असते, परंतु "स्व" पेक्षा अधिक श्रेष्ठत्वाच्या शोधात हा विभेद लक्षात येत नाही.
६. खरे तर आहे त्यापेक्षा आपला "स्व" श्रेष्ठ व्हावा या आदिम परिप्रेक्षात स्वत:पेक्षा श्रेष्ठ परमेश्वराची मानस अथवा प्रतीक प्रतिमा मनुष्य निर्माण करतो आणि हेच त्याच्या श्रेष्ठत्वाचे खरे लक्षण आहे.
७. बुद्धी, मन आणि प्रज्ञा काळाच्या चौकटीत विक्षेप निर्माण करत असल्याने मनुष्य "स्व" चे प्रतिबिंब विराट स्वरुपात बाह्य विश्वात परमेश्वर रुपात पाहतो. तेही त्याचे श्रेष्ठत्वच आहे.
८. मनुष्य दयाळु असेल तरच परमेश्वर दयाळु आहे. मनुष्य कृतघ्न असेल तर परमेश्वरही कृतघ्न आहे. मनुष्य दुष्ट असेल तर त्याचा परमेश्वरही दुष्ट आहे. परमेश्वर वा देवता या सर्वच मानवी मनांचे प्रक्षेपण आहेत. म्हणुन जसा माणुस तसा त्याचा परमेश्वर असतो.
९. मनुष्य भक्ती करतो ती परमेश्वराची नाही तर तो जसा आहे तसा आहे त्या परमेश्वराची...मानवावर कोणी प्रसन्न वा अकृपाळु होत नसतो तर तो स्वत:वरच प्रसन्न वा अकृपाळु होत असतो.
सोनावानिजी , इथे खूपच छान अशी प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरत नाही पण मी तो कटाक्षाने आवरत आहे. कारण तुम्ही जे अप्रतिम लिहिले आहे ते तुमच्या इतर ब्लोग मध्ये आढळत नाही....तुम्ही देव आणि हिंदू धर्म यांचे समर्थन आपल्या परंपरा याच्या गोंडस नावाखाली करता. मी अगदी मान्य करतो कि ब्राह्मणांना शिव्या देणे म्हणजे पुरोगामी पण नव्हे पण धर्म आणि देव आणि आत्मा , पुण्या स्वर्ग नरक या संकल्पनेतून लोकांना मुक्त करणे हे आपले कर्तव्य आहे (वरचा लेख वाचून मी असे समजतो) पण तुम्हाला कोत्या धर्मावर देवावर केलेली टीका आवडत नाही कारण म्हणे भावना दुखावतात. अहो प्रतीगामांचा भावना दुखावणारच...पण त्यांना समजावून सांगणे कि या भावना खोट्या श्रद्धेच्या मुले निर्माण झालेल्या आहेत त्याला काही अर्थ नाही हे आपले कर्तव्य आहे.
ReplyDeleteमला सलाम कविता आठवते......."देवा धर्मावर बोललो तर नाक्यावर गाठून ठोकतील " हे खरे आहे आणि त्यांना तुम्ही पण पाठींबा देत आहात.
असो जाता जाता तुम्हाला सांगतो गौतम बुद्धाना कधीच खातीय (शक्य) जातीचा अभिमान नवता. ते तुम्ही कोणताही पुरावा ब देता आपल्या एका ब्लोग मध्ये लिहिले आहे....मी तुम्हाला पाली कानोन चे पुरावे देवू शकतो ते जातिव वादावर बुद्धांनी खूप मार्मिक टीका केली होतइ . जिथे अश्या जातीच नवत्या तिथे हा धर्म पसरलाच नसता.........असो आपल्याला शहाणपणा शिकवण्या येवढा मी मोठा नाही पण आपल्या हेतू बद्दल कधी कधी शंका येते.
कोणताही विचारवंत, अभ्यासक एखाद्या गटात कीव कळपात सामील झाला कि त्याला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही हे आपण पण मान्य कराल.
विकासजी,
Deleteटीका आणि शिवीगाळ यात मोठा फरक आहे. टीकेचे स्वागतच असायला हवे पण एखादे दैवत मान्य नाही म्हणुन शिवीगाळ हे मात्र अत्यंत चुकीचे आहे. देवतांना शिव्या दिल्याने, मग त्या कोणत्याही धर्माच्या असोत, आपण जी असंस्कृतता दाखवतो त्याबाबत दुखावले जाणे स्वाभाविक आहे.
"..तुम्ही देव आणि हिंदू धर्म यांचे समर्थन आपल्या परंपरा याच्या गोंडस नावाखाली करता...." देव म्हणजे काय हे सांगितल्यावर गोंडस समर्थनाचा प्रश्न्न कसा येतो? आहे त्या ध्र्माला समजावुन घेणे, चिकित्सा करणे याला गोंडस समर्थन म्हणतात हे नवलच नाही काय?
राहिले खतीय आणि ब्राह्मण यांचे. त्याबद्दल अनेक पुरावे त्रिपिटकांत मिळतात. वज्रसुची अर्थात अनमोल अपवाद आहे. असो. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.