Monday, January 28, 2013

समाजाची उभी फाळणी करणारी मानसिकता....


आशिष नंदी यांना सर्व भारतीय नागरिकांप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे प्रथम स्पष्ट करुन या निमित्ताने भारतातील सांस्कृतीक संघर्ष आजही कसा जीवित आहे यावर येथे चर्चा करायची आहे.

आशिष नंदी ओबीसी, एस.सी/एस.टी/भटके विमूक्त यांच्या विरोधात नाहीत असा तर्क त्यांचे समर्थक देत आहेत तर त्याच वेळीस आशिष नंदी यांनी उच्चवर्णीय मनुवादी मानसिकतेचे दर्शन घडवले असून मागासवर्गीयांप्रतेची हीणभावना त्यांनी व्यक्त केली आहे असा मागासवर्गीय नेते व विचारवंतांचा आरोप आहे. नंदी यांच्याविरुद्ध अट्रोसिटीची तक्रार दाखल झाली असून जयपूर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर व्हायचा आदेश काढला आहे असे ताजे वृत्त आहे.

मागासवर्गीयांत अधिक भ्रष्टाचार असून प. बंगालमद्ध्ये मागासवर्गीय सत्तेच्या जवळपासही फिरकले नसल्याने प. बंगाल हे भ्रष्टाचारमूक्त राज्य राहिले आहे असा दावा नंदी यांनी केला आहे. हे त्यांचे विधान वक्रोक्तियुक्त आहे, ती त्यांची शैली आहे ते त्यांना "मागासवर्गीयांना कोणी वाली नसल्याने त्यांच्या भ्रष्टाचारची चर्चा अधिक होते." असे सुचवायचे होते ते नंदी हे जेवढे चांगले लेखक आहेत तेवढेच ते वाईट वक्ते आहेत  अशा विविध पद्धतीने त्यांचे समर्थन केले जात आहे.

खरे तर नंदी बोलले आणि ही चर्चा सुरु झाली असली तरी अशी चर्चा अप्रत्यक्षपणे समाजात मागासवर्गियांना आरक्षण मिळाल्यापासून सुरु आहे. ती प्रकटपणे बोलण्याचे धाडस कोणी केले नव्हते एवढेच. नंदी यांनी ते केल्याने त्याचा स्फोट उडाला आहे एवढेच!

खरा मुद्दा हा आहे कि भारतातील जाती-संघर्षाचे हे एक प्रकट रूप आहे हे लक्षात घ्यायला हवे.  मुद्दा फक्त भ्रष्टाचाराचा नसून एकुणातीलच मागासवर्गियांबद्दल जी उपहासाची, उपेक्षेची आणि आरक्षनामुळे मागासवर्गियांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोकळी झालेली द्वारे व त्यापोटी काही समाजघटकांत निर्माण होवू पाहणारी असुरक्षिततेची भावना यातून हा संघर्ष विविधांगांनी सतत सामोरा येत राहिलेला आहे.

नंदी यांचा खुलासा रास्त आहे असे मानले तरी प्रश्न हा उरतोच कि "मागासवर्गियांना कोणी वाली नाही म्हणुन त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा अधिक होते.." या विधानातुनही जातीय संघर्ष आहे व तो मागासवर्गियांच्या विरोधातच आहे असेच स्पष्ट दिसत नाही काय?

म्हणजेच उच्चवर्णीय विरुद्ध मागासवर्गीय अशी जर आपली सामाजिक रचना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे फोफावलेली असेल तर त्याला आपल्याकडे काय उत्तर आहे? महाराष्ट्रात ७०% सत्ताकेंद्रे विशिष्ट जातीच्या हातात एकवटलेली आहेत असा सत्याधरित आरोप गेली काही वर्ष होत आहे. प्रा. हरी नरकेंसारखे विचारवंत त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत. इतर मागास नसतांनाही जातीचे बनावट  दाखले घेवून निवडनुका लढल्या जातात व मागासवर्गियांच्या ताटातील घटनेने दिलेला घास पळवला जातो, हेही एक वास्तव नाही काय? हा भ्रष्टाचार नाही काय? परंतू तो राजरोसपणे केला जातो कारण मुळात सत्ताकेंद्रेच एकत्र एकवटलेली आहेत. त्यविरुद्ध आवाज उठवणे सोपे नाही. बदल तर फार दुरची गोष्ट राहिली.

हे उदाहरण अशासाठी दिले कि मागासवर्गीय विरुद्ध उच्चवर्णीय यांच्यातील संघर्ष हा विविधांगांनी पाहिला पाहिजे. त्यात जित बाजू कोणती आहे आणि पराजित बाजू कोणती आहे यावरही विचार व्हायला हवा. एकमेकांचा एकमेकांकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टीकोन नेमका का वेगळा आहे हेही तपासून पहायला हवे.

दृष्टीकोन वेगळे असण्याचे कारण काय आहे? गतकालातील दबलेले वर्ग आपल्या बरोबरीला येत आहेत, जीवनाच्या सर्व क्षेत्रांत स्पर्धक बनत आहेत याबद्दल स्वागतार्ह भुमिका न घेणारे लोक आपला वर्चस्वतावाद वर्तमानातही जीवित ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात म्हणुन त्यांचा दृष्टीकोन वेगळा आहे.

तर जो वर्ग या खुल्या आभाळाखाली येत नवीन जगाशी नाळ जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतांना, त्यासाठी स्वत:शी आणि परिस्थितीशी संघर्ष करत असतांना जर येथेही उपहास, उपेक्षा आणि वर्चस्वतावाद वाट्याला येत असेल तर त्यांचाही दृष्टीकोन उच्चवर्णीयांबाबत निकोप राहू शकत नाही. क्षेत्र कोणतेही असो.

अपवाद अर्थातच असतात. आहेत. पण ते अल्पसंख्याहुनही अल्पसंख्य असल्याने, या संघर्षाचे संपुर्ण आकलन व सर्वैक्यासाठी उपाययोजना यात आपण खुपच कमी पडलेलो आहोत हे उघड आहे.

नंदी यांचे विधान (ते केले असेल अथवा नसेलही, पण त्यामुळेच संतप्त प्रतिक्रिया उठलेल्या असल्याने) त्या दृष्टीने पुन्हा पहायला हवे. "मागासवर्गीय अधिक भ्रष्टाचारी आहेत..." हा संदेश माध्यमांमार्फत देशभर दिला गेला आहे हे एक वास्तव आहे. मागासवर्गीय भ्रष्ट असतात असा समज खाजगीत अनेकदा व्यक्त केला जात असतो. त्यामुळे नंदींनी उपरोक्त विधान केलेले नाही असे मानले तरी असा समज पसरवल गेला आहे हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे ही चर्चा फक्त नंदींपुरती मर्यादित ठेवता येत नाही.

असे समज एखाद्या समाजवर्गाबाबत का पसरवले गेले असतील? आजही त्याची व्यापक प्रसिद्धी एखाद्याला प्रवक्ता मानत का केली जात असेल?

मल वाटते आपण एक अत्यंत धोकादायक वळणावर येवून पोहोचलो आहोत. मागासवर्ग विरुद्ध उच्चवर्णीय यांच्यातील आजवर अप्रकट राहिलेल्या संघर्षाची ही प्रकट परिणती आहे. याचे रुपांतर भारतीय समाजात उभे दोन तट पडण्यात होण्याची शक्यता या मागासवर्गियांबाबतच्या उच्चवर्णिय मानसिकतेमुळे निर्माण झाली असून मागासवर्गियांचा उच्चवर्णीयांबाबतचा दृष्टीकोन दिवसेंदिवस नितळ होण्याऐवजी पुरेपूर गढुळण्याची वेळ या एकंदर प्रकरणाने आणली आहे.

आणि दुर्दैव म्हणजे नंदी यांचीच पाठराखन करण्यात बव्हंशी उच्चवर्णीय विचारवंत धन्यता मानत आहेत व नंदी असे बोलले अथवा नाही किंवा त्यांची नेमकी भूमिका कोणती यावरच जोर देत ख-या दुखण्याकडे दुर्लक्ष करत आहेत ही निषेधार्ह बाब आहे. उच्चवर्णीय दृष्टीकोन मागासवर्गियांबाबतचा एकुणात कसा आहे हेही या निमित्ताने स्पष्ट होते आहे. हा दोन संस्कृतींमधील संघर्ष पेटवण्याचे लक्षण आहे.

आणि हे अत्यंत विघातक आहे. परस्परांबद्दलचा दृष्टीकोन नितळ होण्याच्या मार्गात ही सर्वात मोठी धोंड उभी केली गेली आहे. याचे निराकरण न करता, एकुणातील सर्वच समाजाची मानसिकता बदलण्यासाठी कसलाही प्रयत्न करण्याऐवजी ती मानसिकता परस्परविरुद्ध करत नेण्याची ही एक चाल आहे. यातून पुढे अजून काय सामाजिक अभिसरण घडेल याचे भाकित वर्तवता येत नसले तरी अनेक समीकरणे बदलू लागण्याची चिन्हेही आजच्या वास्तवात दडलेली आहेत.

भ्रष्टाचाराला जात नसते कि धर्म नसतो. उच्चवर्णीय उच्चवर्णीयांकडुन लाच घेत नसतील असे नाही. पैशांची हाव जात-पात बघत नसते. तसेच इतरांचेही आहे. भ्रष्टाचार ज्या प्रवृत्ती/विकृती आणि अर्थजाणीवांच्या असंमजसपणातून निर्माण होतो, त्याचे निराकरण कसे करायचे हा खरा प्रश्न आपल्यासमोर असतांना ते बाजुला ठेवत समाजाची उभी फाळणी करनारी मानसिकता देशात असावी ही अत्यंत खेदाची बाब आहे.  

34 comments:

 1. संजयजी, आपण व्यक्त केलेले भाष्य चिंतनशील आहे. देशावर, समाजावर मनोमन प्रेम करणाऱ्या कोणाही व्यक्तीला, समूहाला अस्वस्थ करणारे हे प्रकार आहेत.
  बाळासाहेब ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी साहित्यिक अथवा विचारवंत जमातीला बैल असे म्हटल्याने गदारोळ उडला होता. आता योगायोग म्हणा किंवा काही, पण ते खरे असल्याचे सिद्ध केले ते या नंदी नामक बैलाने. भ्रष्टाचाराला जात कारणीभूत असते, असा सिद्धांत प्रथमच कोणी मांडला व गंमत म्हणजे त्याचे समर्थन करण्यास अनेक चॅनलवीर पंडीत धावले. इतकेच नव्हे तर कांचा इल्लैयासारख्या विद्रोही विचारांचा पुरस्कार करणाऱ्यांचाही त्यात समावेश होता. हे सारे अगदीच अनाकलनिय आहे. थोडक्यात, जोवर आपल्या स्वार्थावर गदा येत नाही, तोवर सारेचजण पुरोगामी भासतात... राजकारण्यांमुळे भ्रष्टाचार फोफावतो आहे, यातून निर्माण होऊ पाहणारा असंतोष कमी करण्याच्या दृष्टीने विषयाला फाटा फोडण्याचे कसब आपल्यातील सत्ताधाऱ्यांना चांगले जमते. म्हणजे, आता भ्रष्टाचाराला कारणीभूत कोण...मागास जमाती की (तथाकथित)उच्चवर्णीय असा नवाच निरर्थक वाद सुरु करण्याचे चातुर्य अशा कामांमध्ये तरबेज असणाऱ्या सत्ताधाऱ्यांशिवाय कोणाचे असणार?
  नंदीच्या समर्थनार्थ भाष्य करणाऱ्यांचा मग ते कोणीही असोत,निषेध करतानाच, त्यांचे बोलावते धनी कोण आहेत याचा तपास केला तर खूप काही उघडकीस येऊ शकते.
  - संतोष देशपांडे

  ReplyDelete
 2. सर, आपले म्हणणे एकदम रास्त आहे. परंतू, यातील 'मनुवादी' हा शब्द खटकला. यातून जो संदेश जातो तो वर्ग कधीही सत्तेत नव्हता, नाही. यातून आपल्याला जे अभिप्रेत त्यापेक्षा वेगळा संदेश जनमानसात जातो आहे. कृपया विचार करावा.

  ReplyDelete
  Replies
  1. अमोघजी, मनुवादी हा शब्द मी माझा म्हणुन वापरलेला नसून जी सध्या चर्चा/वाद सुरु आहे त्यात तो वारंवार वापरला जातो आहे. मी नंदींचे समर्थक आणि विरोधक काय बोलत आहेत याचा तो सारांश दिला आहे. बाकी माझे मत सुस्पष्ट आहेच.

   Delete
 3. मूलत: या देशातील बहुसंख्य जनतेवर मागासवर्गीय म्हणून हिणवले जाण्याची वेळ नेमकी कशामुळे आणि कोणामुळे आली याबद्दल कृपया विश्लेषण करावे. या सर्वांची सामाजिक आणि राजकीय उन्नती करण्याची संधी हजारो वर्षे कोणत्या आधारावर हिरावून घेण्यात आली हे स्पष्ट झाले पाहिजे.

  ज्या माध्यमांनी हे वक्तव्य देशभर पसरवले ती माध्यमे एका विशिष्ट जातीच्या हातात आहेत असा सत्याधारित आरोप गेली काही वर्षे होत आहे. त्याविरुद्ध आवाज उठवणारे विचारवंत कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित होतो.
  अजमल कसाबचा चेहरा वारंवार दाखवला जातो आणि कर्नल पुरोहित आणि साध्वी(?) प्रज्ञा हे सोयीस्कररीत्या माध्यमांतून गायब होतात हा देखील भ्रष्टाचारच नव्हे काय? आझाद मैदानावरील तोडफोडीची छायाचित्रे सतत दाखवली जातात आणि कुमार केतकरांच्या गाडीवर नंगानाच घालून काचा फोडणाऱ्या सुसंस्कृत(?) लोकांचे चेहरे मात्र दाखवले जात नाहीत हा देखील भ्रष्टाचारच नव्हे काय? परंतू तो राजरोसपणे केला जातो कारण मुळात माध्यमांची सत्ताकेंद्रेच एकत्र एकवटलेली आहेत. त्याविरुद्ध आवाज उठवणे सोपे नाही. बदल तर फार दूरची गोष्ट राहिली.

  इथे अजूनही जातींची आणि पोटजातींची संमेलने वेगवेगळी भरतात, दलित लेखकांनी काहीही लिहिले की त्यावर दलित साहित्याचा शिक्का मारला जातो आणि त्यांच्यावर विद्रोही साहित्य संमेलने भरवण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत नितळ दृष्टीकोन कोणी कोणाविषयी बाळगायचा?
  खरी पोटदुखी ही मागासवर्गीयांच्या भ्रष्टाचाराविषयी नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय सत्तेच्या संघर्षात त्यांनी उच्चवर्णीय समाजाशी बरोबरी केल्याची आहे. "आम्ही त्यातले नाही होSS" असा लडिवाळ सूर काढणे उच्चवर्णीय समाज थांबवत नाही आणि जळजळीत वास्तवाचा स्वीकार करत नाही तोपर्यंत हा संघर्षही संपणार नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. आचरट पणा बंद कसा होईल ते बघा .
   रोज आंघोळ करा
   हात भट्टी कमी ढोसा
   शब्द आणि उच्चार नीट करा.
   डॉ .आंबेडकरांचे रोज तीर्थ प्या .
   आणि उच्च मराठा आणि ब्राह्मण यांच्या बरोबरीचे स्वप्न विसरून जा .
   खरे ब्राह्मण राजपूत आणि मराठे आहेत कुठे शिल्लक ?

   Delete
  2. स्वत:चे वैयक्तिक अनुभव जाहीरपणे मांडण्याचे धैर्य दाखवल्याबद्दल अभिनंदन.

   Delete
  3. आप्पा - मत मांडताना कदाचीत काही कारणामुळे नाव गुप्त ठेवण्याची पाळी आलेले समजू शकते,
   बाप्पा - पण मत खोडून काढायच्या वेळी आपले नाव लपवणे म्हणजे - -
   आप्पा - आपण अनौरस आहोत हे मान्य करण्यासारखे आहे
   बाप्पा - लाखातले एक बोललात आप्पा !
   आप्पा - या अशा लावारीस लोकांची इतकी गर्दी झाली आहे कि या देशाची वाट लावत आहेत हे !

   बाप्पा - मर्दासारखे आई बापाचे नाव लावायला लाज कसली.?
   आप्पा - असते एकेकाची अडचण !
   बाप्पा - आपली पाळण्यातली नांवेच आप्पा आणि बाप्पा त्याला आपणतरी काय करणार ?
   आप्पा - शिवाजीला आबासाहेब म्हणायचे तसे आपल्याला आप्पा बाप्पा !
   बाप्पा - विनोद बास झाला , आता कसा जोडा मारेल आपल्याला हा अनोनिमास बघा !
   आप्पा - काय करेल वाटतंय ? आपण शिवाजीची बरोबरी केली म्हणून जोडे ! किंवा
   आपण नामर्द कसे ते सांगेल. वात बघू या बर का ! मजा असते या लफंगे लोकांची.
   बाप्पा - काहीही म्हणा काहीना फार झोंबतात काही गोष्टी.पण तरीही डोक्यात प्रकाश पडत नाही ,
   आप्पा - लेकारानो आपल्या आई बापानी ठेवलेले नाव मिरवण्यात मजा असते बघा !
   इतक छान लिहिता मग तुम्ही आपले मराठीच कि ,
   बाप्पा - काही जन विद्रोही , छावा असे टोपण नावाने लिहितात.तसे लिहाव ,
   पण हे अनोनिमास म्हणजे अगदीच डबडे गळ्यात अडकवाल्यासारखे वाटते- फेकून द्या ते !

   Delete
  4. आप्पा आणि बाप्पा ही दोन बापांची नावे लावणाऱ्या अवलादी अशा उपटसुम्भासारख्या टपकतात आणि विनाकारण दुसऱ्यांच्या आई-बापाची चौकशी करतात! दोन दोन बापांची अवलाद असल्याने 'आई' या शब्दाबद्दल बहुधा आत्यंतिक तिरस्कार निर्माण झाला असावा. "मर्दानगीचे" भूत ज्यांच्या मानगुटीवर बसले आहे त्यांना "आई"ची ओळख होणार तरी कशी?

   Delete
  5. अरे नालायका ,
   अरे अभद्र कुत्र्या -
   तुला लाज कशी वाटत नाही !
   तुझा कान पकडून विचारत आहेत की
   साधारण आपल्याकडे सर्वाना सोपे जावे म्हणून , आपले नाव मत प्रदर्शन करताना लिहावे ही अपेक्षा आहे तर ,
   तुला जास्तच जोर येत आहे.
   मला जर तू रस्त्यात भेटलास तर विनाकारण
   स्त्री जातीला या भांडणात ओढल्या बद्दल चपलेने सडकून काढीन !
   याद राख.
   संजय झोपलेला दिसतोय !

   Delete
  6. शब्दांतून जखमा उघड्या पडल्या आहेत. गुडघे फुटलेले दिसतात!
   गुडघ्यावर पडणे वाईटच. तोल सांभाळताच येत नाही!
   मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याची लायकी नसली की गुद्यांवर उतरणे हे ओघाने आलेच!
   ज्यांच्या विचारांना आणि शब्दांना धार नसते त्यांची योग्यता दुसऱ्यांच्या चपला हातात धरण्याचीच असते. तुझ्या सडक्या मेंदूला सडकून काढण्यासाठी शब्दच पुरेसे आहेत.
   इतरांचे जाऊदे पण संजय सरांचा अपमानास्पद एकेरी उल्लेख करून विनाकारण त्यांना मध्ये ओढ्ल्याबद्दल तुझी इथून उचलबांगडी होऊ शकते हे नक्की!

   Delete
 4. संजय,
  आपल्या लेखनातील ५वा पारीग्राफ- त्यात आपण म्हणता की मागासवर्गीयाना मुख्य प्रवाहात - - -
  म्हणजेच " एक मुख्य प्रवाह " आहे.हे जसे आपण मान्य करता तसेच सर्व जण मान्य करतीलच .
  त्यात या मागास लोकाना सहभाग देण्यासाठी आज ६५ वर्षे वाट पाहात उच्चवर्गीय ( का वर्णीय ?) पुरोगामी वर्ग सुद्धा प्रयत्न करतो आहेच !
  आज ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्रात टक्केवारीत काय वजन आहे.?
  टीका करताना आपण किंवा सर्वजणच कोकणस्थ इत्यादी नावाने टीका करता पण इतर वेळी उच्च वर्ण किंवा उच्चवर्ग
  असा उल्लेख करत मराठा समाजाचे धडधडीतपणे नाव घेणे टाळता,हि मखलाशी कशासाठी ? हा पळपुटेपणा का ?
  मागासवर्गीयाना वाली नाही हे पण तितकेच खोटे नाही का ?
  सर्व पक्ष आज त्यांचे मतपेटीवर लक्ष ठेवत लांगुलचालन करत आहेत.

  त्यांचेच सर्वेसर्वा डॉ .आंबेडकर हेसुद्धा आरक्षण हे सदासर्वदा असू नये या मताचे होते.
  थोडक्यात - ब्राह्मण हे जसे जन्मतः उच्च होण्याचा हक्क मानतात असे आपण म्हणत असता
  तसेच शूद्र किंवा अस्पृश्य किंवा इतर मागास समाज डॉ . आंबेडकर किंवा इतर नेत्यांचे नाव घेत
  जन्मतः आरक्षित असल्याचा तहहयात हक्क मानू लागला आहे .आणि पुन्हा पुन्हा अधोरेखित करावीशी वाटणारी
  बाब हीच आहे की त्यांचे सर्वेसर्वा डॉ .आंबेडकरच तसे म्हणत नाहीत.


  आपणसुद्धा लिहिताना " उच्चवर्णीय " आणि " मागासवर्गीय" असे शब्द योजता ही गम्मत आहे .

  " उच्च वर्गीय " असा शब्द जास्त योग्य ठरला असता - नाही का ? हा लढा सामाजिक अधिक आहे का आर्थिक ?
  आर्थिक असहीष्णूतेबद्दल असेल तर तिथे स्पृश्य अस्पृश्यता हा मुद्दाच येत नाही.
  ( नोटेवर बसलेला गांधीबाबा धर्म,जातपात मानीत नाही )
  मंडल आयोगाने हाच गोंधळ केला होता.
  हा लढा जर सामाजिक असेल तर उच्चवर्णीयांना इतर लोक वाळीत का टाकत नाहीत ?
  उच्च वर्णीय समाजाला वाळीत टाकणे अशक्य का आहे ? आहे का ? आणि का ?

  आज कुणीही रस्त्यावर उतरावे आणि ढोल ताशा बडवत लाल हिरवा नीळा रंग उधळत लोकांचा खोळंबा करत ,
  शांततेचा भंग करत,नागरीकांचा पादचाऱ्याचा मूलभूत हक्क पायदळी तुडवत आपण जे वागतो
  त्याचे " सामाजिक लढा " असे नामकरण करत संघटीत उन्मादाचे अमर्याद प्रदर्शन करणे हा आपला हक्क समजावा असा जमाना आला आहे ! .
  एक दणदणीत मिरवणूक हे लढ्याच्या यशाचे प्रतीक होत नाही !.
  सुजाण नेत्यांचा अभाव आणि- नेतृत्वगुणांची प्रचंड पोकळी तसेच सर्वंकष सामाजिक जाणीवांबद्दल अनास्था ही बहुजन चळवळीतील ठळक वैगुण्ये आहेत.
  त्याचा फायदा घेत मराठा समाज सामाजिक पुढाकार घेतल्याचे भासवत जातींच्या ध्रुविकरणाचे- दिशाभूल करण्याचे " यशस्वी " राजकारण करत आहे.
  यशस्वी म्हणण्याचे कारण असे की ब्राह्मण समाजाला या ध्रुविकरणाचे काहीच सोयर सुतक उरलेले नाही .
  साकारण असो वा अकारण , ब्राह्मण वर्गाला पुरेसे बदनाम केल्याने , त्यांनी कधीच सामाजिक बांधिलकीशी तत्वतः काडीमोड घेतला आहे.
  या महाराष्ट्रात अनेक प्रकारे ब्राह्मण विरुद्ध बहुजन समाजरचना घडवून आणलेली आहे हे सत्य नाकारता येत नाही !
  आणि ब्राह्मण समाजाला त्याची फिकीर नाही हेच खरे मराठा समाजाचे दुखणे खुपणे आहे .
  फिकीर नसण्याचीही कारणे अभ्यास करण्यासारखी आहेत .

  ReplyDelete
  Replies
  1. आगाशेजी, आपण म्हणता त्यातील मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. ब्राह्मण समाजाला वाळीत टाकावे का आणि टाकले समजा (ते अशक्य नाही) तर एकुणातील सामाजिक मानसिकतेत विशेष बदल घडेल असे नाही. पुर्वकाळातील ब्राह्मण चळवळ्या म्हनवणा-यांकडुन पुन्हा पुन्हा उगाळले जातीलच, कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बहुजन चळवळ ही भरकटलेली आहे आणि नेतृत्वहीण आहे, पण कोनती चलवळ तुम्हाला अभिप्रेत आहे? बामसेफी कि ब्रिगेडी? ते म्हनजे बहुजन नव्हेत कि महाराष्ट्र नव्हे. पण त्याचवेळीस वरकरणी असंघटीत वाटला (म्हणजे ते आक्रस्ताळेपणा कोठेही करत नसल्याने) तरी विचारी बहुजनांचा फ़ोर्स प्रचंड वाढत चालला आहे आणि माझ्या मते ही स्वागतार्ह बाब आहे. सामाजिक संरचना ही येत्या काही वर्षांतच एवढी बदललेली असेल कि आजचे उच्चवर्णीय आपल्या अस्तित्वाच्या शोधात जातील असे चिन्ह आहे. "वर्ण" ह शब्द वापरतो कारण जन्मजात श्रेष्ठत्वतावाद ते जपतात म्हणुन. त्याची प्रतिक्रिया म्हणजे अन्य जाती आपापली महनिये शोधत आपापल्या अस्मिता आणि इतिहास स्वतंत्रपणे शोधू लागल्या आहेत. ते करतांना त्यांना ब्राह्मनांना दोषी ठरवण्याचेही गरज वाटत नाहीहे. पण मराठा नेत्रुत्वाला याची जाण असल्याने नाईलाजाने का होईना बहुजनांशी जुळवून घ्यावे लागत आहे...राजकीय स्वार्थासाठी का होईना. भगवानगडावर जमलेले नेते याचेच लक्षण आहे. आता चोंडीला तेच रिपिट होईल. समीकरणे बदलत आहेत व आजवरच्या सत्ताधारी असणा-यांच्या पायाखालील वाळु सरकत आहे. हा एका अर्थाने ब्राह्मनी धर्मसत्ता व राजकीय सत्तेला हादरा देणारा प्रवास आहे, द्वेषविरहित पायावर होत असलेली ही एक मोठी सामाजिक क्रांती आहे, याचे भान मराठ्यंना आले असले तरी ब्राह्मनांना आलेले नाही. ते वरकरणीच्या निरिक्षनावरुन आपली मते नोंदवत उपहास जपत आहेत, तो त्यांच्याही उपयोगाचा नाही. अखिल ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष श्री. गोविंद कुलकर्णीही भगवानगडावर गेले होते. जाण्यापुर्वी आणि नंतरही माझी त्यांच्याशी जी चर्चा झाली, त्याचा सारांश असा कि त्यांनाही आता या बदलाची जाण काही प्रमानात का होईना आली आहे, आधी त्यांचा माझ्या म्हनण्यावर विश्वास बसत नव्हता हेही मी नमूद करतो. त्यमुळे ब्राह्मनी सत्तेचे कसलेही भय अथवा असुया बहुजनांत नसून काही आक्रस्ताळ्या संघटनांच्या वक्तव्यांनाच बहुजनांची भावना समजणे ही चूक ब्राह्मण समाज करत आला आहे. मराठे सत्तेच्या राजकारणात अधिक हुशार असल्याने ते अशी चूक करणार नाहीत व ते आपल्याला येत्या निवडनुकीतच दिसेल, ते बहुजनांना नाईलाजाने का होईना सत्तेत अधिक वाटा देतील. नव्हे तो त्यांना द्यावाच लागेल. ब्राह्मणांशी सर्वसामान्य बहुजनांना सामाजिक व्यवहारापलीकडे व काही प्रमाणात धर्मकृत्यांपलिकडे काहीएक घेणेदेणे नाही. मुस्लिमांना शिव्या दिल्या कि हिंदू एकत्र येतील हा जसा हिंदुत्ववाद्यांचा अंतत: भ्रम ठरला, तसेच ब्राह्मनांना शिव्या दिल्य कि बहुजन आपल्यामागे येतील हा बामसेफी व ब्रिगेडी भ्रम कधीच तुटला आहे. मला वाटते या नव्या सामाजिक अभिसरणाचे नीट विश्लेशन कोणीही केलेले दिसत नाही. नंदींच्या वक्तव्याने (ते पुन्हा मुळचे कसेही असो...) या अभिसरणाला उलट अधिक गती येईल व काही दशकांत समाजाचा प्रवास उलटा सुरु झाल्याचे चित्र आपल्याला दिसेल...म्हनजे आजचे बहुजन हे उद्याचे उच्चवर्गीय होतील व इतर वर्ण म्हणा कि वर्ग, मात्र मागासपनाकडे वाटचाल करु लागतील. हे टाळायचे असेल तर ब्राह्मण-मराठ्यांना बदलावे लागेल व विशिष्ट मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. हे मी कुलकर्णी, त्यांचे सहकारी आणि अगदी पं. वसंतराव गाडगिळांनाही एका बैठकीत स्पष्ट सांगितले होते व ते त्यांना, वरकरणी का होईना, पटले होते. सर्वैक्य अशक्य नाही पण सत्ता व धर्माची मस्ती पुढे चालणार नाही. धनगर असोत कि माळी, वंजारी असोत कि अगदी ढोर (डहर) यांची मानसिकता फार मोठ्या प्रमानावर बदललेली आहे आणि सध्यस्थितीत त्याला पर्याय नाही कारण ही परिस्थिती तथाकथित उच्चवर्णीयांच्या स्वाभाविक दोषांनी निर्माण केलेली आहे...दलितच नव्हे तर प्रत्येक जात जागी झालेली आहे व स्वत:च्या संस्कृतीचा उद्घोष करू लागली आहे. आता त्या संस्कृतीला संस्कृती म्हणा अथवा म्हणु नका...हवे तर तिचा उपहास करा...कोणाला काय फरक पडतो? हे आजचे वास्तव आहे हे समजुन घेणे न घेणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

   Delete
  2. संजय जी ,
   आपण करत असलेल्या विचारांच्या आदान प्रदानाच्या यज्ञाला माझे सर्व प्रथम नम्र अभीवादन !
   अशी विचारांची देवाण घेवाण एक मैत्री दृढ करते इतके मात्र निश्चित .
   हे ताटवे असेच फुलत जावेत हीच निर्मळ इच्छा .
   माणूस संस्था स्थापन करतो. त्याचा उद्देश काय असतो ते त्यालाच माहित असते,बरेच वेळा त्याच्या पश्चात ते सगळे बिनसत जाते !
   अनेक संस्था रातोरात भूमिका बदलतात .
   मला माझे मत विचाराल तर माझ्या अनेक ब्राह्मण मित्रांनी आणि नातेवाइकानी डोळसपणे त्यांच्या मुलाना आंतरजातीय विवाह करायला अजिबात विरोध केलेला नाही.
   हे एक फार चांगले कृतीशील आंदोलन म्हणावे तर तसेही काही नाही .
   मी मुद्दाम काही मुलाना विचारले की तसे काही वाटते का तुम्हाला ?
   तर ते निर्मळपणे पण स्पष्ट पणे आणि पुरेसा आदर राखत सांगतात की आम्ही तसा काहीही तिढा मानत नाही.
   नव्या पिढीला हा जो सहवासाचा एक नवा दिलासा मिळाला आहे त्याने त्याना बऱ्याच कालबाह्य विचारांपासून ताजेपणाच्या वातावरणात आणून सोडले आहे.
   आपण म्हणता त्या प्रमाणे बऱ्याच काही चांगल्या घटना घडत आहेत.
   त्या जर राजकीय नेत्यांच्या सावलीबाहेर घडल्या तर ती खरी नव्या मन्वन्तराची सुरवात असेल.
   कधीतरी बामसेफ चा अर्थ सांगाल का ?मला खरोखरच माहित नाही.

   Delete
  3. बामसेफ (मेश्राम शाखा) ही एक जहरी ब्राह्मणद्वेष्टी संघटना आहे. देशात मुली कुपोषित...का तर म्हणे ब्राह्मण जबाबदार......यांचे लोजिक वाचले तर आपण बेशुद्धच होतो बुवा! असो. मी काही गोष्टी स्पष्ट लिहितो, त्याबद्दल कदाचित रागही येत असेल, पण सत्याकडे जात आपल्याला आपला सर्वांचाच वर्तमान समजावून घेत पुढे जावे लागनार आहे. काही लोक बरलतात म्हणुन सर्वांचेच ते मत नसते. काही ब्राह्मण सनातनी विचारसरणी जपतात म्हणुन सर्वच ब्राह्मण सनातनी असतात असा सिद्धांत मांडता येत नाही. बहुसंख्य बहुजन तसे मानत नाहीत. त्यांना आपले आजचे प्रश्न महत्वाचे वाटतात...इतिहास उगाळणे नव्हे. मला वाटते यातुन एक दिवस सर्वच बदलण्याचा प्रयत्न करतील आणि सर्वैक्य साध्य होईल...भले जाती जाणार नाहीत, पण परस्पर द्वेष तरी उरणार नाही. धन्यवाद आगाशेजी आपल्या मोकळ्या प्रतिक्रियेबद्दल.

   Delete
 5. ब्राह्मण हे शूद्र लोकांशी कधीच बरोबरी करणार नाहीत.
  शूद्र हे सर्वश्रेष्ठ आहेत.

  त्यांनी या देशाचे नीतीनियम लिहिले
  त्यात या लोकांनी ३६० च्या वर दुरुस्त्या का केल्या तो बुद्धच जाणे.

  शूद्र लोकांनी समाजाचे कल्याण करायला स्वतःच्या पक्षाचे तुकडे तुकडे केले.
  त्यांच्या या नवीन उपक्रमाची सर्व ब्राह्मण आणि मराठा वर्गाने दाखल घेतली पाहिजे आणि कृती केली पाहिजे.

  आणि आपले उरले सुरले राजकीय अस्तित्व संपवून पूर्ण सामाजिक जागृती करण्याचे उच्च ध्येय त्यांनी ठेवले आहे.
  मराठा , माळी , इत्यादी समाज त्याना आपल्या शेजारच्या पाटावर बसवून घास भरवतो हे खेडोपाडी दिसणारे चित्र पाहून
  मन सद्गदित होते.
  आत्ता
  साने गुरुजी असते तर त्यांनी या सामाजिक क्रांतीचे भरभरून कौतुक केले असते.
  सहभोजन करणारे सावरकर आनंदाने नाचले असते !

  ReplyDelete
 6. शरद पवार ,आर आर पाटील हर्षवर्धन पाटील इत्यादी थोर नेते तसेच संभाजी ब्रिगेड आता
  डॉ .आंबेडकरांचे पुतळ्याचे चरणतीर्थ सर्वाना मोफत देणार आहेत असे समजले.
  त्यातच शाहू महाराज आणि म.फुले यांचे तीर्थ देण्याचे ठरले आहे.
  सनातन संघाने त्याच ताटात कुंभ मेल्याचा प्रसाद वितरण करण्याचे ठरवले आहे.
  सर्व जनतेने आपले बहुमुल्य मत या सर्वांना देऊन आपले पुरोगामित्व सिद्ध करावे.

  ReplyDelete
 7. या सगळ्या प्रश्नांवर एकच रामबाण (चुकलो, राम कसा चालेल? हवे तर अशोक बाण म्हणू ) म्हणजे ब्राम्हण सोडून सगळ्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा. तसे केल्याने देशातील सर्व भ्रष्टाचार मिटेल, जातीवाद मिटेल, जातच न राहिल्याने जातींचे वर्चस्व रहाणार नाही (कारण बौद्ध धर्मात जात नसते म्हणे), त्यामुळे जात संघर्ष पण असणार नाही, बौद्ध झालेले मराठे स्वत:ला मराठा म्हणवून नाहीत, ओबीसी स्वत:ला ओबीसी म्हणवून घेणार नाहीत. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, कारण पाउस वेळेवर आणि भरपूर पडेल.. सारा भारत बौद्धमय केला तर सारखी सारखी घटना दुरुस्तीही करावी लागणार नाही. आज या सगळ्या गोष्टी होत नाहीत कारण त्याला ब्राम्हण जबाबदार आहेत. त्यामुळे ब्राम्हणांना मात्र बौद्ध धर्मात घ्यायचे नाही बरे का. तर चला सारा भारत बौद्धमय करुया आणि जातीवाद गाडुया.

  ReplyDelete
  Replies
  1. KARTARSING THATTE was a person who did lot of things as suggested by you.HE WAS FROM PUNE,MAHARASHTRA

   Delete
 8. मोठे होण्याची प्रेरणाच नैसर्गिक असते. इतिहासात कोणीही जात म्हणुन मोठा झालेला नाही. इतरांपेक्षा मोठे होणे ही एक स्वयंप्रेरणा असते, जी कोणालाही, अगदी परिस्थितीलाही रोखता येत नाही. सर्व अडथळ्यांवर मात करत महान झालेले इतिहासात अगणित झालेले आहेत...सर्व समाजांत झालेले आहेत...पण लोक मात्र आपल्या कमतरतांना छपविण्यासाठी शक्यतो स्वजातीय महानांचेच स्मरण ठेवत जातिअहंकाराला विकृत रुप देत जातात, कोण मोठे आणि कोण छोटे तेच ठरवतात. जातिअहंगंडाच्या वा हीणगंडाच्या भावनांनी लिप्त होत ते स्वत:च्या मोठे होण्याच्या प्रक्रियेला मुठमाती देत असतात.

  कोणत्याही देशात महान माणसे असतील तर ती सर्वच समाजांचीच असतात...पण प्रत्येक महानत्वाला आपापल्या जातींशी जोडनारे त्यांचे अवमुल्यन करत जात असतात. मुलत: सर्वच भारतीय समाज अनाम गंड-विकृतीने पछाडलेला आहे, जो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे...आणि त्याचे निराकरण कसे करायचे हाच आपल्यासमोरचा बिकट प्रश्न आहे. आजच्या टेकाडे-वारुळाच्या उंचीच्या महत्तांना मागे सारत हिमालय घडवायचे असतील तर आपण या गंडांना सर्वप्रथम तिलांजली दिली पाहिजे.

  ReplyDelete
 9. संजय सर ,
  आपण छान लिहिले आहे.
  छत्रपतीना अशा कोत्या वृत्तीमुळेच संभाजी ब्रिगेडने बंदिवान बनवले आहे असे रूपकात्मक म्हणावेसे वाटते.
  एकेक जात आणि त्याची एकेक त्या त्या जातीतली प्रसिद्ध व्यक्ती अशी वाटणी झाल्यासारखा आजचा समाज झाला आहे असे वाटते.
  त्यातच बहुभाषीकत्वामुळे अजून भाषा आणि प्रांत अशी अस्मितेची भर पण पडली आहे -
  ( पूर्वीची गोत्र कल्पना नव्या रुपात अवतरली असे म्हणावेसे वाटते )
  इतर देशात असलेली महाराष्ट्र मंडळे तीच भावना दृढ करतात.
  पूर्वी शीख समाज म्हटल्यावर सुवर्ण मंदिर आणि गुरु नानक अशीच प्रतिमा डोळ्यासमोर माध्यमांतून आणली जायची .
  तसेच ते लोण जातीनिहाय डॉ .आंबेडकर ,टिळक ,म.फुले छ.शिवाजी असे पसरत जात आहे.

  स्वघोषित हिंदू हृदय सम्राट तर मुंबई पुण्यात गल्ली बोळातून आहेत.
  शिवाजी पार्क पासून हि लागण लागली आहे.त्याला कुणी विशेष किंमत देत नाही हा भाग वेगळा.!
  युवा कोन्ग्रेस - महिला आघाडी सारखेच विविध रुपात ब्रह्मकुमारी ,आणि तत्सम संघटना दिसतात.
  पुण्यात तर बुद्धिमत्तेला किंमत नाही इतकी ती स्वस्त आहे.
  शुद्ध स्वरूपात मराठी बोलण्याचे लिहिण्याचे कौतुक ब्राह्मण समाजाला अजिबात नाही इतके ते गृहीत धरले जाते.
  पण ब्राह्मणेतर समाजात शुद्ध मराठी बोलणेसुद्धा एक प्रगती मानली जाते.त्यामुळी तसे करणारा हा विचार प्रवर्तक वगैरे धरला जातो.
  काय फाड फाड इंग्लिश बोलतो हे जसे म्हटले जाते तसेच काय हाय-क्लास मराठी आहे असे पण बोलले जाते.
  माझे असे निरीक्षण आहे की ज्यांच्या मनात शुद्ध मराठी आणि उच्च जात असे समीकरण आहे तो वर्ग हिंदी जास्त वापरतो.
  दलित वस्तीत मुस्लिम समाजाचा सहवास असेल तर ते प्रकर्षाने अंगवळणी पडते.
  पुण्यात येरवडा ,मंगळवार झोपडपट्टी,कोंढवा वस्ती , उंदरी ,डायस प्लॉट,पाटील इस्टेट या भागात हे जास्त आढळते.
  अशा ठिकाणी सरसकट डॉ .आंबेडकर यांचा एक अर्ध पुतळा त्या वस्तीला स्वतःची ओळख म्हणून पुरेसा वाटतो.
  आणि भाषा हिंदी !- अशामुळे तो समाज आपण वापरलेला शब्द " मूळ प्रवाह " पासून लांब राहातो.
  त्या समाजात शुद्ध मराठी लोकप्रिय करणे हे सुद्धा एक सामाजिक कार्य होऊ शकते.

  ReplyDelete
 10. संजय, खरेच अशा लोकाना डांबर फासून त्यांची धिंड काढली पाहिजे.
  स्त्रियांचे आणि आई या पदाचे असे उठसुठ नाव घेणे बंद झाले पाहिजे.
  आप्पा बाप्पा कधीही आपला संयम सोडत नाहीत.
  उलट ते कडवट विषयात विनोदी अंगाने रस निर्माण करतात.
  त्यांच्यावर अशी टीका शोभत नाही.
  आप्पा बाप्पा नि फक्त सुचवले कि अनोनिमास न लिहिता आपले नाव टाळू नये,
  तर इतके आई काढेपर्यंत का जावे ?
  खुद्द आप्पा बाप्पा नि जाहीर केले तशीच् प्रतीक्रीया झाली हे विशेष !

  ReplyDelete
 11. अनोनिमास चा दिक्कार !
  त्याचा बोलावता धनी कोण आहे ?

  ReplyDelete
  Replies
  1. "दिक्कार" नव्हे तर "धिक्कार" असा मूळ शब्द आहे. इतरांना वेळी अवेळी शुद्धलेखनाचे धडे देणारे लोक नेमक्या अशा वेळी कुठे गायब होतात बरे?

   Delete
 12. संजय आमचा लाडका आहे.
  भावाला आईला एकेरीच हाक मारतात.
  आमच्यात
  आम्ही अरे संजय असेच म्हणणार !
  अनोनिमास चा दिक्कार !
  त्याचा बोलावता धनी कोण आहे ?

  ReplyDelete
 13. अरे माकडा ,
  अक्कलशून्य लोचट !
  किती हीन दर्जाचा आहेस रे तू अनानिमस !
  तुझे थोबाड फोडायला आमच्या महिला मंडळाचे हात शिवशिवत आहेत.
  पण अनमिकतेच्या पडद्यामागे बसणारा " षंढ " आहेस तू.
  तुला लाज कशी असणार ?
  तू तर ना इधरका न उधरका !
  तुझी जागा दौंड मनमाड - टाळ्या वाजवायची !

  ReplyDelete
 14. काय रे टोणग्या,
  थोडीतरी जनाची नाही तरी मनाची लाज बाळग
  हाण्डग्या !
  इतक्या बायका झापडत आहेत तरी हा आहे तिथच !
  खरच हा छ्कडम दिसतोय .!
  कोणत्या आई बापानी जन्माला घातला रे सडक्या ?

  ReplyDelete
 15. संजय जी ,हा शब्दांचा तांडव नाच का चाललाय ?
  अनोनिमास सारखा एक वेडगळ माणूस सगळ्यांना भडकावू शकतो का ?
  मलासुद्धा अनेक वेळा हा अनुभव आलेला आहेच
  अनेकजण भडकपणे मत प्रदर्शन करायचे झाले कि अनानिमास या ऑप्शन चा आधार घेतात .

  आपले नाव गुप्त ठेवून कुणी टीका करत असेल तर लेखन सभ्यता पाळणाऱ्या प्रतिसाद देणाऱ्या
  आमच्या सारखीचा पण तोल जाइल असे वातावरण तयार होते.
  यावर आपणच काहीतरी शिस्तीचा तोडगा सुचवला तर आमच्या सारख्या अनेक जणींना बरे वाटेल !
  काही स्त्रियांनी सुद्धा नाईलाजाने इथे लक्श्मनरेशा ओलांडलेली दिसते आहे.

  ReplyDelete
 16. संजयदादा,हे कुठेतरी थांबवा,आपण एक छान कादंबरी वाचत असताना त्यातून काहीतरी अश्लील दुसऱ्या पुस्तकाचे ठेवलेले
  पान घरंगळत पडावे तसे हे वाटत आहे.आपल्या कुणाचीच ही इच्छा नाही की ते ध्येयही नाही.
  मग अचानक हे असे का होत आहे ?
  आपण म्हणता तसे काही हितशत्रू असतात का ?
  कुणाला बघावत नाही का ?
  शुद्ध सात्विक असे मतांचे प्रदर्शन जोत असताना ,
  एकदम असे स्फोट कसे पेललेल्या सुरुंगा सारखे सुरु होतात .
  त्यातून काय साधते ?

  ReplyDelete
 17. अरे संजया !
  वाचव रे या स्त्री वृंदाला ,
  लक्ष घाल जरा !
  कोण हा अनामिक ? त्याची अडचण काय आहे ?
  कुणाला घाबरतो आहे हा ?
  खुल्या दिलाने समोर यावे -बोलावे - चार शब्द लिहावेत आपले विचार मांडावेत
  हा तर उद्देश आहे या जागेचा .
  आपण संजय सरांबरोबर मैत्री केली तर आपण एकत्र येवू शकतो,
  प्रत्यक्ष भेटू शकतो .यापुढे अजून काय हवे ?
  आहे त्या सोयींचा आपण चांगला उपयोग करून घेऊया !

  ReplyDelete
 18. सर्वात्मका सर्वेश्वरा ,
  जे जे जगी जगते तया .
  माझे म्हणा करुणाकरा -
  ज्याने कुणी हे सुरु केले त्याला हे समजो की सामाजिक बांधिलकी ,जबाबदार मत प्रदर्शन हे नुसते शब्दांचे बुडबुडे नाहीत,
  अनोनिमास या ऑप्शन विषयी इतके राग असायचे काय कारण ?
  हा संघटीत उन्माद आहे का ?
  आणि कुणाविरुद्ध ?
  बिचाऱ्या त्या अनोनिमास ला हे कसे वापरायचे मराठी अक्षरांचे जुळवणे ते माहित नसावे कदाचित !
  ते सांगण्या ऐवजी एकदम सगळ्या बायकांनी कलकलाट सुरु केला - त्याला नाही नाही ते बोलल्या -
  बिचारा लपून बसला असेल वळचणीला - जाऊ दे रे -
  बायकांचे इतके मनावर घेऊ नकोस.
  स्वतःचे मेल अकौंट तयार कर म्हणजे मग आपले नावासकट या ब्लोग वर कसे लिहायचे ते कुणीतरी समजावून सांगेल.
  घाबरू नकोस. आणि रडू तर अजिबात नकोस !

  ReplyDelete
 19. जय भवानी , जय शिवाजी !
  शेवटी पसार झाला ,
  पाय लावून पळाला
  घाबरला !
  आता आपण त्याचे टेन्शन घ्यायला नको.
  अनानिमास ने पलायन केले.
  पुढच्या १२ पिढ्या तो कुणाला त्रास्देणार नाही !

  त्याच्या आईनेच त्याला थोबाडले असणार !
  जय शिवाजी ! जय भवानी !

  ReplyDelete
 20. 1.samajik sanrachna hi yetya kahi varshatach ashi badalleli asel ki aajche uchcha varniy aaplya astitvachya shhodhat astil...
  2.aashish nandi yanche vaktavya he samajachi ubhi falni karnarri mansikata dakhvaate.
  3.ekmekavishyiche drushtikon nital kartne garjeche aahe.
  to respected sanjasonwani,the first statement shows that those from backward classes want themselves to rule today's upper classes....it is there in ur statement that they will even pursue to find their identities.....if ur logic behind this that we have adopted democracy in which majority carries law then further anything u read is in vein .here first of all i want to show the confused mind set of maratha leaders or educated.they have pride in their caste that chhatrapati is from their caste(though chhatrpati considered himself as rajput) and they consider themselves with brahmin as upper castes.but when they come to know their population in maharashtra they become bahujan(those who are major in no.)and express their outrage against brahmin with other castes..it is fact that both these caste are competitor of each other in any political and social regard.so,in politics they have centralised all powers still they are succesfull in showing that they are inclined to backward classes.....
  aashish nandi's comment should not be given any importance and don't panic about its pros and cons........

  ReplyDelete
 21. continued......
  it is worthy to those economically stable from all castes to discuss so called sensitive issues only...those who are still fighting to earn to feed their families do not even look to this battle of wordsssssssssssss..
  it is not completely true that the 'drushtikon'of backward get immpured by upper caste people. because if upper caste consider themselves as shreshth same is the case with others also since they also pursue to show that they are different....
  ur statement about making "nital paraspar drushtikon"shows all 'asuya' goes at bottom of life..but this indirectly confirms that asuya would be there at somewhere.
  it is not complete truth but balanced thought that castes would remain their by eliminating asuya and envy nature.........
  all people who are educated so called highly they have organized people from their community strongly far before education is given to all,that is education divided india more unequally than ever.....
  person from each caste wants his current and future problems would be solved.so,it is social and moral responsibility of educated to help them to get rid off from their problems......but today's scenario does not satisfy them b'coz scholers try to make points of their priority as agenda of any 'chalval'.
  pschologically it is man- nature to dominate surrounding people.so,it does not make any sense if today's upper caste will try to find their identities in future which is outcome of 'samajik sanrachna badal'  '

  ReplyDelete
 22. आमचा योगेश वेडा आहे.
  बावळट आहे

  ReplyDelete