Tuesday, January 29, 2013

कळत नाही.... का?


ओळखीचे चेहरे
का नकळे गाताहेत
अनोळखी गीते
स्तब्ध प्रकाशालाही
काळोखाने
केलेले दिसतेय रीते...

कळत नाहीहे आज
भांबावलेल्या दिशांना
कोणत्या दिशेने जावे...
सर्वत्र उद्विग्न-खिन्नांची गर्दी
मग हे इवले हास्य तरी
कोणाहाती द्यावे?

कळत नाही का
आज आभाळालाही
गाज यावी
समुद्राला दडपत
थकल्या थिजल्या विश्वाला
घोर निजेची डुब द्यावी?

* * *

ते इवले हसू तसेच
निरागस अन पवित्र
माझ्या ओंजळीत
एकाकी!

2 comments:

  1. संजय ,
    आमच्या लहानपणी एक कविता होती
    सर्व श्रेष्ठ हसू कुणाचे असा विषय होता.
    तरुणीचे
    बालकाचे
    का बुद्धाचे
    असा तो बाज होता.
    बहुतेक काणेकरांची किंवा मर्ढेकरांची होती कविता.
    असो.
    आपली कविता आवडली.
    सुंदर !

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...